विश्वास - यशश्री तावसे - कृपा मैय्याची
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
विश्वास - यशश्री तावसे - कृपा मैय्याची
हरि हरि। मी विश्वास प्रल्हाद तावसे ,व माझी ,सह-धर्मचारिणी ,सौ .यशश्री ,आम्ही पुण्यातील औंध या भागात राहतो ...... श्री -नर्मदा-परिक्रमा करताना ,प्रत्येक साधकाला ,काही वैशिष्टय पूर्ण असे अनुभव येतातच !..... आम्हाला परिक्रमा करताना नर्मदा मैय्याने दिलेलया बहुमूलय संपत्तीचा खजिना सुमारे ५० वर्षानंतर भेटलेल्या ...शाळेतील मैत्रिणींना /सर्वांना वाटण्यासाठी ... येथे काही अनुभव ,नमूद करीत आहोत ...ही परिक्रमा म्हणजे आमच्या आयुष्याच्या मार्गावरील ,एक असा सांधा ठरला की .... ज्यामुळे आमच्या आयुष्याचा त्या पुढील प्रवास एका विशिष्ट मार्गाने तसेच विलक्षण गतीने सुरु झाला ... आमच्या कडून आजपर्यंत .. ज्या विविध धर्मग्रंथांचे वाचन झाले ,त्यांतील शिकवण , 'आचरणांत कशी आणावी " याबद्दलचे मुद्दे .... या परिक्रमेतून आम्हांला सद् -गुरू -कृपेने ,शिकता आले .... नर्मदे हर ।नर्मदा मैय्या की जय ।