नर्मदा परिक्रमावासी सेवासंघ
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदा परिक्रमावासी सेवासंघ
नर्मदा परिक्रमावासी सेवासंघ
एक कल्प म्हणजे चार युग (सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग)
असे एकूण सात कल्प (मायूर, कौर्मं, पाधम, तामस, मात्स्य, व्दिरद, वाराह) होऊन गेलेत.
प्रत्येक कल्पाचा नंतर एक प्रलय होतो आणि त्यात सर्व नद्या, समुद्र आणि सृष्टी नष्ट होते.
एकूण सात कल्पा नंतर असे एकूण सात प्रलय झालेत. सात प्रलय झाल्यानंतर एक महाप्रलय होतो.
महाप्रलयात सर्व देव आपले अस्तित्व निराकार ब्रह्म-स्वरूपात विलीन करून टाकतात. त्रिलोक आणि चौदा भुवनसहित संपूर्ण सृष्टी आणि ३३ कोटी देवता हे सर्व काही नष्ट होतात. प्रलय आणि महाप्रलय मध्ये सर्व नष्ट करण्याचे काम श्री महादेव करतात आणि सृष्टी नवनिर्माण-सृजन चे काम ब्रह्मदेव करतात (श्री विष्णू यांचे आदेश आणि मार्गदर्शन नुसार...)
त्रिलोक -
1.पाताल लोक ( अधोलोक )
2.भूलोक ( मध्यलोक )
3.स्वर्गलोक (उच्चलोक)
या त्रिलोक चे पुन्हा १४ भवन मध्ये भाग केले आहेत. हे १४ भवन ला १४ लोक असेही म्हटले जाते.-
1. सत्लोक
2. तपोलोक
3. जनलोक
4. महलोक
5. ध्रुवलोक
6. सिद्धलोक
7. पृथ्वीलोक
8. अतललोक
9. वितललोक
10. सुतललोक
11. तलातललोक
12. महातललोक
13. रसातललोक
14. पाताललोक
सातही कल्पाच्या सातही प्रलया मध्ये आणि महाप्रलय मध्ये केवळ दोघेच जिवंत राहिलेत, ते म्हणजे मार्कंडेय ऋषी आणि नर्मदा माई.... नर्मदा नष्ट झाली नाही कारण ती देवी स्वरूप आहे, महाभागा, महापुण्या आणि अमृता आहे . कारण नर्मदाला श्रीमहादेव यांनी वर दिला आहे की तू अमर राहशील आणि कधी नष्ट होणार नाही. त्यामुळे ७ प्रलय आणि एक महाप्रलय मध्ये सर्व नद्या, सागर, सृष्टी नष्ट होऊन देखील नर्मदा अक्षय, अमर राहिली. नर्मदा कधीही कोणत्याही काळी दूषित होत नाही. नर्मदा-पुराण अनुसार गंगा नदी दूषित होऊन काळ्या गायीच्या रूपात नर्मदा नदी मध्ये स्नानाला येते आणि पुन्हा शुध्ध होऊन पांढऱ्या गायीच्या रूपात वापस जाते.
पूर्ण ७ प्रलय आणि एक महाप्रलय काळात, नर्मदा एका घोर महार्णवात (महान-सागरात) दिसली म्हणून तिला "महार्णवा" असेही म्हटले जाते..
महादेवांच्या रुद्रदेहातून उत्पन्न झाल्यामुळे नर्मदेला " महापुण्यतमा " असेही म्हटले जाते..
मानवाला अभय देणारी आणि सदा कृपा करणारी असल्यामुळे नर्मदेला "कृपा" असेही म्हटले जाते..
कृतयुगात दिव्य मंदार वृक्ष-पुष्पांनी वेष्टित असल्यामुळे तसेच संथ आणि वक्रांगी वाहत असल्यामुळे नर्मदेला "मंदाकिनी" म्हणून म्हटले जात होते...
चित्र-विचित्र मोठं मोठ्या शिलांच्या समूहातून तसेच मोठमोठ्या हत्तींनी युक्त अश्या ऋक्ष-पर्वताचं (विंध्य-पर्वत) भेदन करून समुद्राकडे जात असताना गही दिशांना महान र्व (ध्वनी) करीत, वेगानं फिरत आणि आजूबाजूची भूमी समृद्ध करीत नर्मदा सदा सुशोभित राहून विराजमान असते म्हणून ती "रेवा" या नावाने ओळखली जाते ..
स्त्री, पुत्र, कलत्र (नातू) यांच्या मोहाच्या बंधनातून मुक्त करणारी आहे , म्हणून नर्मदाला "विपाशा" असेही म्हटले जाते. (विपाशा = वि: मुक्त करणारी, पाशा: मोहाच्या पाशातून)..
मलमूत्रादी मध्ये मग्न, धूळ-रक्तादीच्या चिखलात लोळणाऱ्या मानवांना सुद्धा मुक्ती देणारी आहे म्हणून नर्मदाला "विपापा" आणि "विमला" असेही म्हटले जाते.....
प्रलयाच्या रात्रीतून प्रकाशाकडे नेणारी, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाश देणारी असल्यामुळे नर्मदाला "महाप्रभा" असेही म्हटले जाते...
सुधाकराप्रमाणे किंवा हिमांशूप्रमाणे दिव्य हातानी जगाचं कल्याण करणारी म्हणून नर्मदाला "करभा" असेही म्हटले जाते..
लोकांचे पालन आणि मनोरंजन करणारी म्ह म्हणून नर्मदाला "रंजना" असेही म्हटले जाते...
कीटक, पतंग, गवत, पशु-पक्षी, वाळूचे कण इत्यादींना स्वर्ग प्रदान करणारी म्हणून नर्मदाला "बालुवाहिनी" असेही म्हटले जाते....
रुद्रदेवः महादेवाच्या आशीर्वादामुळे अमर, अक्षय झालेली म्हणून "नर्मदा" असेही म्हटले जाते.. (नर्मदा = मरण नसलेली) ....
मानव, ऋषी, मुनी, साधू संत, देवा, दानव यांचा मद (अहं भाव, अहंकार ) हरणारी असल्यामुळे म्हणून नर्मदाला "नरमदा" असेही म्हटले जाते...