शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
।। सार्थ जन्म समर्पण - अर्थात नर्मदाख्यान ।। सौ.वंदना परांजपे...
असुर संहारानंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी।।
त्या बिंदुतून प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी?।।
मी तर असे आपुलीच तनुजा बोलली ती नमस्कारुनी। घर्मबिंदू मधून आपुल्या जन्म माझा पावनी।।
दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी।।
आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। ये मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी।।
दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी ग्रुहस्थी पाहुन डोलती उमा आणि मदनारी।।
स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खुणे दाखविती त्रिपुरारी।।
विसरुनि सारी भवचिंता निश्चिंत बैसले सदाशिव। नर्मम् ददाति तू नर्मदे सदा सर्वदा सुखी भव।।
आशिर्वचन दिलेत देवा हसून बोले शर्वरी। नंदिकेश्वर म्हणे,देवा! चला आता कैलासपुरी।।
उष्णदेशी जन्मलेली ही मम कन्या कैसी ते हिम सहन करी। कुणा हाती सोपवू मी कोमलांगी ही मम कुमारी?।।
मेकलराज उभा राहिला हात जोडोनि सामोरी। संधी द्यावी मला दयाळा मनिषा आपली करीन पुरी।।
संतोषले परमेश्वर या आश्वासनांतरी। सोपवुनी आपली कन्या मेकलराजाचे करी।।
निर्धास्त झाले शिवपार्वती निघाले माघारी। देवाधिदेव संतोषले उजळली कैलासपुरी।।
मेकलसुता आता जाहली शिवकन्या सुंदरी। विंध्य-सातपुडा दोन बंधू सुखावले बहु अंतरी।।
चुलबुली अन् अवखळ होती म्हणून रेवा म्हणती सारी। बाललिला पाहात तियेच्या आनंदित सारी मेकलनगरी।।
दिवस चालले आनंदाने मोठी झाली स्वरुपसुंदरी। विवाह आता हिचा करावा मेकलराज मनी विचार करी।।
योग्य वराचा शोध घेतसे भारतवर्षा माझारी। राजबिंडा शोणन्रुप तो राज्य करीतसे शेजारी।।
सर्वार्थाने योग्य असे हा विचार आला न्रुपांतरी। प्रस्ताव पाठवी मेकलराज शोण न्रुपाच्या दरबारी।।
निर्मल सुंदर मम कन्येचा स्वीकार करावा राजेश्वरी। किर्ती ऐकूनि नर्मदेची शोण तिचा स्वीकार करी।।
कैसा असेल राजपुत्र? कोण सांगेल?कोण योग्य वर्णन करी। जुहिला!प्रिय सखे,पाहून येई कैसा असे मम सख्याहरी।।
सजली धजली जुहिला नर्मदेसम पोषाख करी। पायीची नुपुरे झंकारीत ठुमकत जातसे बाहेरी।।
पुर्व दिशेला वसली होती निसर्गरम्य शोणपुरी। वर्तमान जाणुन घेण्या शोण न्रुपाचे आली जुहिला सेवेकरी।।
नटली सजली जुहिला देखून स्तब्द झाला शोणसखा। स्वर्गीची वाटे अप्सरा मोहीतसे मम चित्ता।।
राजबिंड्या शोणास पाहूनि जुहिला मनी हरखली। मदनबाणे विद्ध होऊनि कर्तव्य आपुले विसरली।।
येई गे सुंदरी मम चित्त चकोरी शोणराजा हर्षला। मी नसे आपुली वधू असे न बोले ती जुहिला।।
गैर समजाने पार पडला भव्य लग्न सोहळा। विसरुनि कर्तव्य आपुले रमली राणी ती जुहिला।।
बहुत दिन जाहले काहीच न कळे वार्ता। चिंतीत होऊनी स्वतः निघाली मग ती शिवसुता।।
दुरुनच दिसला दिपोत्सव आसमंत सजला धजला। स्वागतास आपुल्या नगरी सजली,मनी हरखली शिवबाला।।
समीप जाता तिने देखिला दरबार तो भरलेला। सिंहासनी बैसले होते शोणन्रुप अन् राणी जुहिला।।
ह्रदयभेदक द्रुश्य पाहूनि क्रोधित झाली नर्मदा। नर्मंम् ददाति ब्रीद आपुले विसरुनि होई ती क्रुता।।
अगे पापिणी! मम दासी तू,काय म्हणू मी तुला? क्रुतघ्न कामिनी आज शापिते मी तुला।।
जलरुप व्हा याच क्षणी दोघे लागा पतीत प्रवाहाला। थांब जुहिले,दुर्गंधीत होशील कुणी न स्पर्शी तव जला।।
मीही होऊन जलरुप जाते स्वदेश काजाला। संतापाने गर्कन फिरली रेवा निघाली अस्ताचला।।
सुन्न होऊनी दुःखीत मने शोण प्रवाह पडला। उंचावरुनी उडी घेऊनी पुर्वेकडे निघाला।।
जुहिलेचा प्रवाह राहिला त्याच ठिकाणी स्तब्दसा। मेकलतली आजही आहे वाहता तो कसानुसा।।
नर्मदा मग जलरुप जाहली ज्या स्थला। माई की बगिया म्हणती आज त्या वनस्थला।।
क्रमशः
सौ.वंदना परांजपे,नाशिक.