काव्य - श्री विजय येडवे
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
काव्य - श्री विजय येडवे
काव्य - माता नर्मदा - श्री विजय येडवे
|। माता नर्मदा ।।
कुणी म्हणती तिला मेकला
प्रदक्षिती सरीता हि एकला
नर्म दा जी आनंद देई सकला
उत्तरवाहिनी नर्मदा हि दैवीकला .1
अमरकंटकी तिचा असे उगम
तिज वर्णीती शास्त्र आणी निगम
संगम भृगुक्षेत्री मिळे ती सागरा
शोभवी ति दिव्य क्षेत्र श्रीगरुडेश्वरा .2
अति प्रिय जी असे यती नी विप्रा
पवित्र नदी समीप पुर हे महेश्वरा
अभिषेका हिचेच जल दिव्य त्या ओंकारेश्वरा
वसे शिव मृत्यंजय अखंड सदैव जिच्या तिरा .3
जैसी ति शरयु भुषवी श्रीरघुकुला
जैसा यमुनातीरी खेळे तो नंदलाला
या भारता गंगा जैसी असे यज्ञोपवीतमाला
तैसी असे हि नर्मदा श्रीगुरु वासुदेवांची चित्कला .4
माता हि नर्मदामाई गरुडेश्वरी मम पिता
होतो मज आनंद यतीवासुदेव आठविता
असे खरोखर तयाची ती महाभाग्यशालीता
सोडुनी सर्व हे मायाजाल जो गरुडेश्वरी झाला येता .5
चातुर्मास जिथे घडला पडला योगज्ञानाचा सडा
दिव्य तिर्थ भुवरी अति पवित्र स्थान तिलकवाडा
तो भाग्यवान जो गुरुभक्तीचा तिलक लावी चढा
मी दास ओम् दत्ताचा वासुदेवचरणी माझा ओढा .6
नर्मदाप्रदक्षिणेचे आहे वरवरचे हे निमित्त
गुरु वासुदेवच जणु आकर्षितसे माझे चित्त
नमो गुरवे श्रीवासुदेवाय जे सर्वदा सर्वभुतहितारत
राही रे मना सदा श्रीपाद स्मरणी त्यातच तुझे रे आहे हित
राही रे मना सदा श्रीपाद स्मरणी त्यातच तुझे रे आहे हित .7
नर्मदा , मेकला ,हि एकच नदी आहे भारतात की जिला प्रदक्षिणा घातली जाते . नर्म म्हणजे आनंद सुख व दा म्हणजे देणारी ती नर्मदा , भ्रुगुक्षेत्र म्हणजे भरूच जवळ नर्मदा सागराला मिळते भरूचला भ्रुगु ऋषींनी तप केले म्हणुन त्यास भ्रुगुक्षेत्र म्हणतात .
तिच्या काठावर महेश्वर हे गाव प्रसिद्ध आहे अन तिथल्या महेश्वरी साड्या सुद्धा .ओंकारेश्वर ज्योतीर्लिंगपण तिच्याच तिरी आहे .
गंगा नदी जणु भारतवर्ष रुपी पुराणपुरुषाच्या गळ्यात यज्ञोपवीत म्हणजे जानव्या सारखी शोभते बघा नकाशात हिमालयात उगम पावुन बंगालच्या उपसागरास जातानाचा तिचा मार्ग खांद्यावरुन रूळणाऱ्या जानव्या सारखाच आहे यावरुन हे रुपक सुचले .
चित्कला म्हणजे आत्मशक्ती खरोखर नर्मदा हि वासुदेवानंदांची आत्मशक्तीच आहे कारण त्यांचे संपुर्ण जीवन तपस्या तिच्या तिरावरच झाली .
नर्मेदेबद्दल मला विशेष प्रेम वाटण्याचे पहिले कारण म्हणजे माझ्या कैलासवासी आईचे पहिले नाव नर्मदा हेच होते व दुसरे कारण टेंबेस्वामी मला गुरुस्वरुप तर आहेतच परंतु मला ते पितास्वरुपही आहेत एवढा प्रचंडज्ञानी महाज्ञानी पिता म्हणजे केवढे भाग्य .
काल नर्मदा परिक्रमेस जाण्यासाठी ट्रेनची तिकिटे मिळाली , त्या आनंदाच्या भरात आज हे काव्य सुचले , ओम् दत्त .
हे सुंदर शीघ्र काव्य श्री विजय येडवे - परम पुज्ज मधुकरराव ठाकूर महाराज यांचे परम भक्त ह्यांनी केले आहे .