|| नर्मदे हर हर हर ||
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
|| नर्मदे हर हर हर ||
माँ नर्मदा मैय्या
नर्मदा मैय्यारुपी आपणा सर्वांना नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!!
नर्मदा मैय्याने लाविली ओढ़ ।
निश्चित सुटेल जन्मोजन्मीचे कोडं ।
माई म्हणे फक्त सारा अहंकार सोड ।
त्यानेच दुःख सरतील होउनी मन गोड ।।
प्रपंच कर्तव्याचा पलडा भारी |
भुलून जाते मी कर्तृत्वाच्या आहारी |
शरण आले आई तुला, तूच यातून तारी |
ओढ लागते तुझी ग माई, कधी घडवशील तुझी वारी ||
तुझ्याच परिक्रमेची आता लागली आस |
कधी लाभेल ग तुझ्या कुशीत सहवास |
माई म्हणे, उतरव तुझ्या जीवनी मला घेऊनी ध्यास |
मग जीवनयात्राच घडेल माझी परिक्रमा खास || (By......सौ. कांचनगौरी सचिन सिधये )
नर्मदा ही एक नदी आहे हे लहान असताना भुगोलाच्या पुस्तकात वाचले होते. पुढे गजानन महाराजांच्या पोथीमधे नर्मदा नदीची पुसटसी माहीती कळली. तोपर्यंत नर्मदा माझ्यासाठी नदीच होती.
अशीच अनेक वर्षे निघून गेली. नर्मदेशी कुठलाही संबंध नव्हता. अशातच एके दिवशी माझी नणंद - सौं कांचनगोरी सिधये हिने चितळे मैय्यांची CD आणुन सर्वांनी नक्की बघाच असा आग्रह केला.
लगेच CD बघता आली नाही. त्यांच सुमारास office च्या कामासाठी सारखे भारताच्या बाहेर जावे लागत होते. एकदा असेच प्रवासात असताना CD बघण्याचा योग आला. मग काय, CD चे अनेकदा पारायणच झाले. मी CD audio मधे convert करून घेतली. विमानात बसले की सुरू करायचे ऐकायला. चितळे मैय्यां व माझी नणंद कांचन या दोघींमुळेच नर्मैमदा मैय्या समजली व तीची ओढ वाढतच गेली.
आता माझ्यासाठी नर्मदा ही नदी न राहता नर्मदा मैय्या कधी झाली हे समजलेच नाही.
मी व कांचननी मग google search, YouTube वर search करायला सुरवात केली. बरीच माहिती, video मिळाले. मैय्या परिक्रमा वर काही blogs मिळाले. पण एकदा वाचून झाले की ती लिंक शोधायला बराच वेळ जात होता. बरेचदा blog वरून / YouTube वरून माहीती डिलिट झालेली असायची. WhatsApp groups वरून पण बरीच खुपच उपयुक्त माहिती पोस्ट व्हायची पण काही दिवसांनी लुप्त होवून जायची.
मैय्यावर कुठलीच साईट उपलब्ध नव्हती.
यातूनच एक कल्पना सुचली. आपणच एक मैय्यावर साईट बनवू व सर्व माहीती एका ठिकाणी ऊपलब्ध करून द्यावी असे ठरवले. सध्याच्या online / mobile जगात या साईटचा नक्कीच उपयोग होईल तसेच पुढच्या पिढीला site वरून मार्गदर्शन मिळेल असे वाटले व साईट तयार झाली.
साईट करायला सुरवात करायच्या आधी platform सिलेक्ट करायचा होता. असा platform ज्यावर बरीच माहिती store करता येईल. Google site हाच सर्वोत्तम पर्याय होता. तुम्ही साईट develop करू शकता व 15Gb free storage मिळते. फक्त domain name registration करून घेतले.
साईट तयार करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की लेखकाच्या परवानगी शिवाय त्यांचे अनुभव कसे लोड करायचे? मग सुरवात चितळे मैय्यांपासून केली. त्यांचा होकार मिळवला. नंतर वंदनाताईंची ओळख झाली. त्यांनीतर सर्वच माहिती उपलब्ध करून दिली व मला प्रोस्ताहन दिले. पुढे भारती ताई ठाकूर, अपुर्वानंदजी, ओंकार खुंटे, प्रतापे महाराज, जगन्नाथ कुंटे, गोसावी काका, सुरूची नाईक, ज्योतीबेन मैय्या, नर्मदा शंकरजी, सियाराम बाबाजी / विष्णुगिरी महाराज, मांगिलालजी अश्या अनेक मैय्या परिक्रमावासी / भक्त / विभुतींची ओळख झाली. १२नोव्हेंबर २०१७ रोजी site launch केली.
हळूहळू साईटवर माहिती वाढत गेली. ५० users पासून आज ४८,००० users झाले आहेत. ही फक्त मैय्याचीच कृपा आहे.
ही साईट नर्मदामैय्याच्या भक्तांसाठी अनेक प्रकारे ऊपयुक्त ठरत आहे. अनेक जणांनी feedback दिले त्यामुळे मला प्रोस्ताहन मिळत गेले. अनेक मैय्या भक्तांनी त्यांचे परिक्रमेचे अनुभव शेअर केले.
या साईटचे सर्व श्रेय नर्मदामैय्याच्या भक्तांचेच आहे. त्यांनी शेअर केलेल्या अनुभवातून माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळाली व मैय्या परिक्रमेची इच्छा जागृत झाली. अशा सर्वच मैया विभुतींना शतश: नमन.
हीच संकलित माहिती आपणाला इंटरनेटच्या माध्यमातून साईट वर मिळू शकते.
Narmade Har...Narmada Parikrama is one of the most frequently searched key word by devotees of Narmada Maiya...
While searching for details on Narmada Parikrama / Maiya, I realized that lot of material is available on You-tube/Facebook/Whats up groups but it is scattered and not available in one place. I thought why not collect the information shared on various platform and put it in one place? With the information gathered from various sources and support from Maa Narmada Parikramavasi, created a google based Maa Narmada Maiya web-site.
The web-site is dedicated only to Maa Narmada Maiya and its devotees.
This is possible with blessings of Narmada Maiya and Parikramavasi who shared the valuable information...Thanks to Mrs. Kanchagauri Sachin Sidhaye for all the support....
Website contains -
परिक्रमा - अनुभव - PDF - This page contains all the anubhav shared by Parikramavasi in PDF format
Uttervahini Narmada Parikrama ( उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा)
NARMADA a social venture - Bharati Thakur ( भारती ठाकूर – नर्मदालय )
परिक्रमा व्हिडिओ / ऑडियो -प्रतिभा सुधिर चितळे / नर्मदेचा अपूर्वानंद - व्हिडिओ - ऑडियो / ओंकार खुंटे - परिक्रमा व्हिडिओ / ऑडियो
परिक्रमा व्हिडिओ - जगन्नाथ कुंटे / पायवाटा - संतोष कुलकर्णी / परिक्रमा व्हिडिओ / ऑडियो - ओंकार खुंटे / विश्वास - यशश्री तावसे - कृपा मैय्याची - व्हिडिओ / गोवर्धन गोसावी - 2017 परिक्रमा LIVE / परिक्रमा - गोवर्धन गोसावी 2018 / परिक्रमा - गोवर्धन गोसावी 2019 / Audio's / video's shared by Parikramavasi ( परिक्रमा व्हिडिओ / ऑडियो )
ओंकार खुंटे - फोटो गॅलरी / फोटो गॅलरी 1 - परिक्रमावासी / फोटो गॅलरी 2 - परिक्रमावासी / फोटो गॅलरी 3 - परिक्रमावासी / फोटो गॅलरी 4 - वंदना परांजपे - 2018 / फोटो गॅलरी 5 - शुलपाणी / सतीश कांबळे - पेंटिंग / सुरेश पित्रे - चित्रोळी / सुरेश पित्रे - चित्रोळी 1
If you have any information on Maa Narmada Maiya or Parikrama, kindly send me your write-up / video-audio / snaps or any other details available on Maiya or Parikrama to upload here...
My email id - kiranbapat09@gmail.com
Web-site address - www.narmadamaiya.com
ही वेबसाईट नर्मदामैय्या व तीच्या भक्तांच्या प्रेरणेतूनच तयार झाली आहे. मी मैय्या व सर्व परिक्रमावासींयांनाच अर्पण करते…
मानुष बनूँ तो तेरे तट पर ही जन्म धरूँ , तेरे स्नान कर नित तेरे गुन गाऊँ मैं ।
अन्य जीव बनूँ तो तेरे आश्रय में रहूँ , जन्म-जन्मों तक रेवा तुझमें विलय पाऊँ मैं ।
!! नर्मदे हर !! !! नर्मदे हर !! !! नर्मदे हर !!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
***Site created & managed by Mrs. Kiran Yogeshwar Bapat & Maiya Bhakta...