तावसे - मैय्या किनारा
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
तावसे - मैय्या किनारा
परिक्रमावासियांनी आवर्जून पहावीत अशी ठिकाणे
परिक्रमावासियांनी आवर्जून पहावीत अशी काही ठिकाणे इथे सांगत आहे. याव्यतिरिक्त अजून बरीच ठिकाणे असू शकतात. सर्व ठिकाणे सर्वां च्या वाट्याला येतीलच असे नाही. तसेच सर्व ठिकाणे, येथे देता येणे शक्य नाही. तुम्ही चालताना, तुम्हाला याव्यतिरिक्त अनेक ठिकाणे दिसू शकतील. सावध रहा व दर्शन घ्या. भराभर पुढे जायच्या नादात, काही ठिकाणे पहायची राहून गेली असे व्हायला नको म्हणून हा खटाटोप. कारण आपण काही वारंवार येथे येऊ असे नाही.
*भाग पहिला*
1) तेलिया भट्ट्याण ... सियाराम बाबा आश्रम... या ठिकाणी तुमच्या आवडीची साधना काही काळ तरी करावी.
2) मांडव्य ऋषींची गुफा.... गुफेत, काही वेळ साधनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा. येथे बालक दास महाराज आहेत त्यांचा नंबर 9285262974
3) लोहारा घाट... ह्याला कपिला संगम असे पण नाव आहे. याठिकाणी... 108 वेळा ओम नमः शिवाय ...असे म्हणण्याचा प्रयत्न करावा. तिथली माहिती त्या आश्रमात विचारावी.
4) शूलपाणी मंदिर... गोरा ग्राम ...जुने मंदिर पाण्याखाली गेल्याने हे नवीन मंदिर झाले आहे.
5) गरुडेश्वरच्या समोरचे तटावर इंद्रा वर महादेव
6) नानी रावल.... व्यासांच्या साधनेचे ठिकाण ....व्यासांनी याठिकाणी चार वेद लिहिले. ४ महादेव मंदिरे येथे आहेत.... व्यासेश्वर महादेव, वैद्यनाथ महादेव, पाताळेश्वर आणि मुंडेश्वर ....येथील दर्शनाने चार धाम यात्रेचे पुण्य मिळते.
तसेच अश्विनी कुमार यांचे मंदिर आहे. याठिकाणी श्रीराम व अश्विनी कुमार यांनी तपश्चर्या केलेली आहे.
7) तपोवन आश्रम... रामपूर...गुवार.... आश्रमात शुक्रवारी .. सकाळी ११ पालखी निघते.....तेव्हाच. तेथील महाराज.. दर्शन देतात.
काही वर्षांपूर्वी.. त्या महाराजांकडून... आम्हांला मिळालेल्या आशिर्वादाने.. आमच्या... त्यानंतरच्या.. साधनेमध्ये.. खूपच (quantity) आणि चांगल्या प्रकारच्या ( quality) सुधारणा झाल्या. .. आम्ही तर त्याबद्दल.. त्यांचे शतशः ऋणी आहोत.
जवळच रामानंद आश्रम आहे. तिथले अभिरामदास महाराज असतील तर त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे.
पुढे जवळच सिताराम आश्रम आहे. तिथले सिताराम महाराज सुद्धा सिद्धपुरुष आहेत.
8) कुंभेश्वर ...शनी मंदिर आहे. स्नानाचे महत्त्व आहे. येथे स्नान केल्याने..... महाकुंभ स्नानाचे पुण्य मिळते..... तसेच काशीक्षेत्री दहा हजार वर्षे निवास केल्याचे पुण्य मिळते..... तेथील स्थानिक किंवा पुजारी लोकांना येथील महात्म्य विचारावे. जवळच रामेश्वर तीर्थ ....चौकशी करावी..... प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. जवळच जिओर पाटी गावात ....माताराम
राधादास व सिताराम महाराज.... यांचा आश्रम आहे . मराठीत बोलतात. चांगली सेवा देतात. त्यांचा फोन नंबर 932 7642701
9) हनुमंतेश्वर... तसेच मोरनी संगम ....अवश्य पहावे. मोरनी संगमात स्नान करावे. पुढे
पूतिकेश्वर महादेव मंदिर आहे. अतिप्राचीन आहे.
10) रुंडगाव.... जलाराम आश्रम..... महामंडलेश्वर सुरेंद्रनाथ महाराज..... येथे मुक्काम जरूर करावा. कर्जन नदीचा संगम आहे. महाराज भेटले तर उत्तम. खूपच प्रेमाने सेवा देतात. त्यांचा फोन नंबर 7990086773
11) कर्जन नदी पार करून समोर शुक मुनींची तपस्थली आहे. भागवत पुराण सांगणारे शुकमुनि... अवश्य दर्शन घ्यावे.
12) कोटेश्वर महादेव.... एक माताजी सेवा देतात...
13) कार्तिकेश्वर महादेव.... कांदरोज.... आश्रम छान आहे. राहण्याची व्यवस्था छान आहे.
14) दगडूजी महाराज आश्रम .....108 वेळा राम नाम घ्यावे. असा गाव.
15) पंचमुखी हनुमान मंदिर.... रस्त्यापासून एक किलोमीटर आत आहे..... पण जरूर जावे. तेथील माहिती विचारावी.
जवळच गिरनारी गुफा आहे.
*भाग दुसरा*
16) सरसाड नावाचे गावी गुप्तगंगा आहे. आपल्याला गंगामैया चे दर्शन होते.
17) शाश्वत मारुती धाम.... हे खूप छान मंदिर आहे.
18) मणि नागेश्वर मंदिर.... शिवपिंडी खूप छान आहे.
19) भालोद ....
श्री. प्रतापे महाराज.... दत्तभक्त आहेत. खूप वर्षे साधना करीत आहेत. दत्तमूर्ती पण वेगळ्या प्रकारची आहे. फोन नंबर 02645-243603 महाराजांचा मोबाईल नंबर 7738360880
20) झगडिया मढी... याठिकाणी अनेक वर्ष अखंड राम धुन व रामायण वाचन चालते. तिथे गेल्यावर राम नामाचा जप अवश्य करावा. तेथील जगदीश महाराज खूप वर्षे अतिशय प्रेमाने सेवा देत आहेत.
21)अंकलेश्वर ..रामकुंड 22) बुलबुला कुंड ...पुढे कोटेश्वर तीर्थ नंतर विमलेश्वर येथून बोटी सुटतात. समुद्र पार करण्यासाठी.
या प्रत्येक तीर्थाचे वेगवेगळे महत्त्व आहे. 23) रत्नसागर पार करून.... आल्यावर मिठी तलाई.... दहेज.... नंतर भारभूत आश्रम.... कुकरवाडा येथील त्रिगुणातीत ध्यान आश्रम.... येथे स्वामी सिद्धेशानंद सेवा देतात... स्वामींना पण खूप चांगले अनुभव आलेले आहेत.
24) मंगलेश्वर ....शशी बेन.... ज्योती बेन पंड्या... दोघी भगिनी अनेक वर्षे सेवा देतात. गावात सत्यनारायण मंदिर आहे.... तेथे सर्वप्रथम सत्यनारायण पूजा केली गेली.... भारद्वाज आश्रम.... अतिशय पवित्र ठिकाण आहे. महाराजांनी अनेक वर्षे या जागी साधना केली आहे....
25) मोटी कोरल येथे पंचकुबेरेश्वर मंदिर आहे... म्हणजे महादेवाची पाच मंदिरे आहेत ....तेथील महात्म्य मंदिरामध्ये लिहिलेले आहे. एक दिवस जरूर मुक्काम करावा व भरपूर साधना करावी.
26) नारेश्वर ....
श्री रंगावधूत स्वामी महाराज..... येथील महिमा सर्वांना माहिती आहेच..... नंतर कहोना गाव कोहनेश्वर महादेव... हसरे हनुमान .... सुंदर मंदिर आहे. येथील महाराज पण सेवा चांगली देतात. आणि त्यांची साधना पण खूप आहे.... त्यांच्याबरोबर सत्संग अवश्य करावा.
27) रणापूर .....
या गावात काही वेळ थांबावे. गावातील मंदिरांची... कोणाला तरी विचारून माहिती घ्यावी. मैया किनारी अतिप्राचीन नर्मदा मंदिर आहे. माधवदास महाराजांनी साधना केलेली गुफा आहे.
या गावातील महादेव मंदिरात शिवांना शंखाने अभिषेक करतात.
रात्री मुक्काम करून सकाळी लवकर निघून जाऊ नये.... गावातील सर्व मंदिरांना अवश्य भेट द्यावी.
28) मालसर... डोंगरे महाराज... भागवत सांगायचे ...ते हे गाव तिथे पांडू तीर्थ आहे.
हे पांडव यांचे वडील पंडू.... यांनी या जागी तपश्चर्या केली होती.
29) शिनोर.... सुंदर सिद्धिविनायक मंदिर आहे. परिक्रमेत गणपती मंदिरे कमी आहेत. 30) चांदोद... शेषशायी भगवंतांचे मंदिर आहे... येथे प्रदक्षिणा केली असता पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते असे म्हणतात. आपण परिक्रमेत असताना सुद्धा येथील मंदिरात प्रदक्षिणा घालू शकतो, कारण ती पृथ्वीप्रदक्षिणा आहे. आम्ही एका महाराजांना विचारून या मंदिरात प्रदक्षिणा घालता येते हे कन्फर्म केले होते.
या गावातील सर्व मंदिरे बघण्यासारखी आहेत. फक्त मुक्काम करून पुढे जाऊ नये ....चांदोद वरून जाताना गावात अवश्य जावे.
*भाग तीन*
31) कर्नाळी.... कुबेर भंडारी, सोमेश्वर तीर्थ. स्वराज्यासाठी काम करत असताना श्री योगी अरविंद.. याठिकाणी राहिले होते. इथे त्यांना साक्षात्कार झाला की भारताला स्वातंत्र्य मिळणारच आहे. हे काम सोडून तू पॉंडिचेरीला जा.
32) तिलकवाडा.... गौतमेश्वर तीर्थ,
अगस्तीश्वर तीर्थ, तिलकेश्वर महादेव, सप्तमातृका मंदिर,
श्री. विष्णु गिरी महाराज ....वासुदेव कुटी .....
श्री आत्मकृष्ण महाराज.....
यांचे परिक्रमेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शनपर पुस्तक आहे. तेथे त्यांचा पण वेगळा एक आश्रम आहे. तिलकवाडा मध्येच.
33) गरुडेश्वर....
अवश्य मुक्काम करणे.
34) कोटेश्वर.... अखंड राम धुन चालू असते. आपण तेथे बसून भजनात किंवा रामनामात अवश्य सहभागी व्हावे. येथे एकदा राम नाम घेतले की एक कोटी वेळा मोजले जाते, अशी मान्यता आहे. हे निसरपुर जवळचे कोटेश्वर.
35) कोटेश्वर पासून पाच किलोमीटरवर कडमाळ नावाचे गाव. तेथे शिवमंदिर आहे. 114 वर्षांचे श्री लक्ष्मण पुरी नागबाबा वास्तव्य करून आहेत. ते स्वतः..
42 वर्षात या मंदिरातून बाहेर पडलेले नाहीत.
36) चिखलदा ....
श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे चातुर्मासाचे ठिकाण.
37) महेश्वर....
खूप महत्त्वाची स्थळे आहेत.
राजराजेश्वरी मंदिर.... तेथे 11 अखंड दीप अनेक वर्ष तेवत ठेवले आहेत.
कार्तवीर्य यांचे मंदिर याच आवारात आहे. गावात सप्तमातृका मंदिर आहे. अहिल्यादेवींचा चा राजवाडा....
तेथील बेलाच्या झाडाला 3, 5, 7, 9, 11 अशी पाने येतात.
घाट पण फारच सुंदर आणि प्रशस्त आहे. घाटावर पण एक अप्रतिम असे मंदिर आहे. अजून बरेच काही भेट देण्यासारखे आहे. चौकशी करून अवश्य पहावे.
एक दिवस तरी मुक्काम करावा.
38) मंडलेश्वर .... मोडकांचे राम मंदिर, दत्त मंदिर,
वासुदेव कुटी,
मंडन मिश्रा व श्री.शंकराचार्य यांच्यातील शास्त्र चर्चा झाली ते ठिकाण. या ठिकाणी एका गुहेत.... श्री. शंकराचार्यांनी सहा महिन्यासाठी.... योग मार्गाचा अवलंब करून.... देह ठेवला होता व ते एका राजाच्या शरीरात प्रविष्ट झाले होते.
या गावात श्री टेंब्ये स्वामी महाराजांनी अनेक घरांमध्ये भिक्षा स्वीकारली होती. ती घरे अजूनही आहेत. त्यांचे वंशज या कथा अभिमानाने सांगतात. तेथील केळकर माताजींनी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांच्या घरी पण स्वामीजी भिक्षेला जात होते.
39) खेडी घाट ..
कैवल्य धाम आश्रम, श्रीराम महाराजांनी साधना केलेले श्रीराम मंदिर,
दादा धुनिवाले यांचा आश्रम.
40) च्यवनऋषींचा आश्रम.... आपली प्रकृती/डोळे चांगली रहाण्यासाठी... येथे लोक दर्शनाला जातात. अतिशय पवित्र ठिकाण.
41) पिपरी गाव.....
सुंदर नर्मदा मंदिर आहे. राहण्याची सोय उत्तम आहे. या मंदिराचा इतिहास तेथील लोकांना विचारावा.
42)सीतावन आश्रम... राम-लक्ष्मण सीतामाई भरत शत्रुघ्न हनुमंत.. सर्वांच्या मूर्ती असलेले दुर्मिळ असे मंदिर आहे.
43) लक्कडकोट जंगल पार केल्यानंतर पामाखेडी नावाचे गाव लागते तेथे वाल्मिकी वृक्ष परिसर या ठिकाणाला भेट द्यावी. गावातील बऱ्याचशा लोकांना सुद्धा याची माहिती नाही.
श्रीनारद मुनींनी वाल्या कोळ्याला ... राम नाम घ्यायला सांगितले, ते हे ठिकाण असे सांगतात. सप्तऋषि यांचे मोठमोठे वृक्ष आहेत.
44) आवली घाट.... शिवालय मठ येथे संस्कृत पाठशाळा आहे. आम्ही गेलो तेव्हा विद्यार्थी नव्हते. तेथील बिस्वानंद ब्रह्मचारी महाराज..... एका फार्मा कंपनीचे सी ईओ होते. पण एके दिवशी त्यांना मिळालेल्या.. त्यांच्या गुरूंच्या आदेशाप्रमाणे ते सर्व काही सोडून याठिकाणी, या तीर्थक्षेत्री .. साधनेसाठी रुजू झाले. घाटावर भीम कुंड आहे. येथील पाण्याच्या खोलीचा थांग लागत नाही. अधिक माहिती तेथील लोकांना विचारावी.
45)बुधनी नंतर बांद्राभान घाट अत्यंत नयनरम्य आहे. त्यातच याठिकाणी पुढे पतई नावाचे गाव आहे तेथे जे महाराज साठ वर्ष राहिले होते, ते या जागी साधनेसाठी आलेले आहेत. त्यांचे अवश्य दर्शन घ्यावे. आळंदीच्या एक माताजी .. त्या महाराजांच्या सेवेत आहेत. महाराज खूपच तेजस्वी आहेत.
क्रमशः
*भाग ४* *आणि शेवटचा*
हरि हरि.....नर्मदे हर.....
46) अनघोरा... स्वामी उन्मेषानंद ....
हे महाराष्ट्रीयन आहेत. स्वामी समर्थांचे मंदिर आहे.
तिसाव्या वर्षी संन्यास घेतला आहे.
एलएलबी आहेत. आत्ता साधारण पस्तीस छत्तीस वर्षांचे असतील.
उदयपुरा पासून दहा किलोमीटर अंतर असेल.
47) रमपुरा .....
पुण्याचे श्री. धनंजय नाईक, श्री. शेवडे इ.इ. मंडळी हे सेवा केंद्र चालवतात.
व महाराष्ट्रातले लोक सेवा देत आहेत.
48)पिठेरा गाव...
स्वामी अर्घ्यानंद.... रामकृष्ण मिशनचे फॉलोअर आहेत.
छान सत्संग होतो.
49) खाटी गावानंतर.... मीरिया येथे श्री चैतन्यगिरी महाराज असतात.
या स्थानाला अमरकंटक चे प्रवेशद्वार म्हणतात. खूप कमी लोक या ठिकाणी जातात. पवित्र ठिकाण आहे.
अमरकंटकच्या परिक्रमेचा मार्ग व श्रीनर्मदा परिक्रमामार्ग हे दोनही, येथे एकमेकांना छेदतात. या junction वरच, हा आश्रम आहे.
50) अमरकंटक चे नंतर एरंडी संगम व त्यापुढे आठशे मीटर वर चक्रतीर्थ....
एरंडी संगमावरील आश्रमात सामान ठेवून चक्रतीर्थ बघून येऊ शकता.
51) कबीर चबुतरा.... येथे काही वेळा दुधाची धार पडताना दिसते असे म्हणतात.
श्री कबीर महाराज येथे आलेले होते.
52) ऋण मुक्तेश्वर.... कुकरा मठ.....
येथील गोष्ट तेथे लिहिलेली आहे.
53)दिंडोरी नंतर देव-नाला...
मार्कंडेय ऋषींची तपस्थली.....अत्यंत रमणीय ठिकाण.
54) सीता रपटन.... येथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. लव कुश व सीतामाई येथील आश्रमात राहिल्या होत्या.
55) मधुपुरी .....
घोडा घाट.....
सुंदर मंदिरे आहेत.
56) महाराजपूर... जमल्यास मुक्काम करावा...
चित्रगुप्त यांचे मंदिर आहे.
57) होशंगाबाद..
सेठानी घाट....
मैयाचे विशाल पात्र आहे....
खर्रा घाट ....
श्री गुळवणी महाराजांना शक्तिपात दीक्षा झाली ते ठिकाण....
येथील औदुंबर वृक्षास कल्पवृक्ष म्हणतात. त्याचे खाली बसून काही मागितले तर अवश्य मिळते असेही म्हणतात.
58) हरदा ....
गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिर ....
श्री गोडबोले व्यवस्था बघतात.
पायी परिक्रमावासियांची राहण्याची सोय करतात.
59) कोकसर घाट... गौरी शंकर महाराजांची समाधी....
60) शिव कोठी ...
🕉️ नमः शिवाय आश्रम...
एक रोटी बाबा आश्रम पण म्हणतात....
येथील महाराज डोळे बांधून शिवपुराण सांगतात.
शिव कवचाची माहिती देतात.
परिक्रमा उचलतात त्यादिवशी पण जाऊ शकतो व परत येताना पण जाऊ शकतो. ओंकारेश्वर चे आधी पाच किलोमीटर आहे.
निवास व भोजनाची सोय आहे.
मैय्या कृपेने एवढी माहिती देऊ शकलो. अजूनही अनेक पवित्र व उत्तमोत्तम तीर्थ आहेत.
विश्वास व सौ. यशश्री तावसे
मोबाईल नंबर - 955 290 60 06
नर्मदे हर। नर्मदे हर हर।। नर्मदे हर हर हर।।।
।श्रीनर्मदार्पणमस्तु।
*समाप्त*