गोवर्धन गोसावी - नर्मदा परिक्रमा - 6
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
गोवर्धन गोसावी - नर्मदा परिक्रमा - 6
गोवर्धन गोसावी - सहावी, पायी नर्मदा परिक्रमा
|| श्री गौरीशँकर महाराजकी जय हो ||श्री धुनिवाले दादाजिकी जय हो ||श्री हरिहर भोले भगवनकी जय हो ||
परम सद्गुरू श्री रेवानंद महाराजकी की जय हो ||श्री गुरुदेव भक्तांनंद महाराजकी जय हो ||
महाराणी तापी माय तुमरी जय हो ||सच्चे दरबार की जय हो ||अटल छत्र की जय हो ||
|| माँतू नर्मदेहर ,नर्मदेहर नर्मदेहर जिंदगीभर ||
*सहावी, पायी नर्मदा परिक्रमा*
दिनांक 12 नोव्हेंबर 2019 ला पंजाब मेलने कल्याण येथून प्रवास सुरवात.सोबत माझं लहान भाऊ श्री बालकनाथ गोसावी ,सौ शरयू घाडी ,तसेंच पुण्यावरून सौ अरुण मंडल त्याची मैत्रीण सौ रंजना साखरे ,श्री राजेश जवळकर,श्री व सौ केसरकर,तसेच श्री व सौ सोनवणे व चंद्रकांत बेलव्हरे होते. सकाळी 6 वाजता खंडव्यास उतरून दादाजी दरबार मध्ये सर्वजण गेले.दादाजीचे दर्शन व भोजन प्रसादी घेऊन खाजगी वाहनाने ओंकारेसवरला जाण्याचे निश्चित झाले.आयत्या वेळेस सौ रंजना साखरे ,त्याचा भाचा कौस्तुभ व सौ.अरुना मंडल यांनी बसने येण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे ठरविलेल्या गाडीचा खर्च इतरच्या हिशोबात वाढला.त्याच्या ब्यागा व समान आम्ही बरोबर घेऊन दुपारी 3 वाजता गजानन आश्रमात पोहचून ,नोंदणी करून हॉल नंबर 1 मध्ये आसन लावले. श्री अनिलंदास महाराजांची भेट घेऊन सर्वाना प्रमानपत्र देण्याची विनंती केली.सर्वांनी प्रमाणपत्र घेतले व हॉल मध्ये आले.सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दिनांक 14 नोव्हेंबरला ममलेस्वर ,ओंकारस्वराचे दर्शन घेऊन,मांधातांची परिक्रमा पूर्ण झाली. संध्याकाळी श्री अनिलंदास याच्या आश्रमातच कन्या पूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला.सर्वांच्या चेहऱ्यावर्ती एक युद्ध जिकल्याचा अथवा कठीण गड सर केल्याचा अविर्भाव ओसंडून वाहत होता.मानधाताची परिक्रमा करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे अविर्भाव दिसत होते.परिक्रमेत कसा रस्ता असेल ,आपण चालू शकुका ,आपल्याला चालणे होईल की,आपली परिक्रमा माई पूर्ण करून घेईल का,असे अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव स्पस्ट दिसत होते.मानधताची परिक्रमा पूर्ण झाल्यावर सर्वजण हातपाय धुऊन ,भोजन प्रसादाचा लाभ घेण्यास गेले.उद्या सकाळी अनिलंदास महाराजांकडून सर्वांनी संकल्प घेऊन परिक्रमा सुरवात करावयाची असल्याच्या सूचना देऊन कोणत्या मार्गाने जावयाचे हेही सांगितले.
परिकर्मेचा 1 ला दिवस *शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2019*
सकाळी सर्वजण लवकरच तय्यार होते .पूजेचे आवश्यक साहित्य घेऊन संकल्प देणारे व पौरोहित्य करणारे श्री अनिलंदास महाराजाकडे गेलो.त्याच्या सुचने प्रमाणे घाटावर्ती सर्व जमले.यथासांग पूजा आटपून अंदाजे 9 वाजता परिक्रमाचे जल घेऊन चालायला सुरुवात केली.त्यापैकी सौ अरुना मंडल,सौ रंजना साखरे व कौस्तुब हे आम्हास न सांगता किनाऱ्याच्या मार्गाने गेले. दुपारी 11-30 ला शिवकोठी येथे एक रोटी आश्रमात भोजन प्रसादी ग्रहण करून पुढील मार्गक्रमण सुरू झाले व दुपारी 3 नंतर भक्तराज आश्रम मोरटक्का येथे पोहचलो.तिथे सौ वंदना परांजपे अगोदरच आलेल्या होत्या.आश्रमातील श्री व सौ नाना व नानी यांनी परिक्रमावासीयाचे यथोचित स्वागत केले.सध्याकाळी भोजनापूर्वी सर्व परिक्रमावासींना एकत्र बसुवून परिक्रमे सदर्भात माहिती सांगितली.तसेच आश्रमाची निर्मिती कशी झाली ,त्याच्या गुरू महाराजांची महती थोडक्यात विशद केली.भोजन करून सर्वांनी विश्रांती घेतली ,झोपण्यापूर्वी उद्याच्या मार्गाची व केव्हा निघाव्याचे या बाबत सर्व सहकऱ्यास कल्पना दिली.
ओंकारेसवर ते मोरटक्का एकूण अंतर 15 किलोमीटर
परिक्रमेचा 2 रा दिवस *शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2019.*
भक्तराज आश्रमातून सकाळी चहा घेऊ ,6-20 प्रवास चालू केला.नर्मदा कुटी पासून अलिराजपुर मध्ये गौघाट येथील गरीबदास आश्रमात चहा व ताक घेऊन पुढे निघालो.9-30 टोकसर येथिल गौमुख आश्रमात पोचलो.तिथे महाराष्ट्रातील एक परिक्रमेची MH16 या क्रमांकाची गाडी उभी होती.त्याच्याकडे मी व बालकनाथ व श्री एकनाथ आमले यांनी भोजन केले.बाकी सहकाऱ्यांनी आश्रमात भोजन केले व दुपारी 12-30 पुढील प्रवास सुरु . पितनगर, कांकरिया असा प्रवास चालू असतानाच सोबत असलेल्या विद्या देशपांडे ,सुजाता व स्वस्ति लघाटे यांचा पायी दुखायला लागल्यामुळे कांकरियालाच थाबल्या. खेडी येथी माँ गंगा आश्रम मध्ये संध्याकाळी 5-15 ला मुक्कामाला थांबलो. येथील घरमालक श्री नारू पटेल व त्याची पत्नी सुद्धा परिक्रमेस गेल्याचे त्याच्या सुनेने माहिती दिली.
मोरटक्का ते खेडी एकूण अंतर 23 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 3 रा दिवस *रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2019*
. खेडी येथून सकाळी 5-45 ला प्रवास सुरु.नर्मदेस्वर शिवालय येथे चहा घेऊन पुढे बकावाकडे प्रयाण.मर्दाना, नगावा ,तेली भट्टयांन येथे सकाळी 10-30 ला पोहचलो. परिक्रमा मार्गातील संत शिरोमणी श्री शियाराम बाबांचे दर्शन घेऊन धन्य झालो. खेडी ते तेली भट्यांन एकूण अंतर 16 किलोमीटर . भोजन प्रसादी झाली.दुपार नंतर पुढिल प्रवास सुरू.ससाबड ते लेपा असा प्रवास.मार्गात एक नदी ओलांडून जावे लागले.पाण्याला भरपूर ओढ होती,त्यामुळे बूट हातात घेऊन सवकासपणे नदी पार करावी लागली.लेपा येथील श्री राम मंदिरात मुक्काम.मांगीलाल वर्मा यांनी खिचडीभोजन प्रसादी केली .
खेडी ते लेपा एकूण अंतर 28-50 किलोमीटर,आजचा प्रवास.
परिकर्मेचा 4 था दिवस. * सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2019 *
स्नानदी कर्म व पूजा पाठ उरकून लेपा येथून सकाळी 5-50 ला प्रवास सुरु.वेदा संगम पार करून पुढे वेदांतहिला जवळील हॉटेलात चहा भिसकीट घेवन , मैय्या किनारी कठोरा येथील आश्रमात 8 वाजता पोहचलो.आश्रमात चहा व ठोस असा बालभोग घेऊन,पुढील प्रवास सुरू केला.कठोरा पासूनचा माईच्या किनाऱ्याच्या मार्ग बंद असल्या मुळे वरच्या जगलं व काटेरी मार्गाने जावे लागले .शालिवाहन आश्रमात सकाळी 10 वाजता पोहचलो.तिथे नाशिकच्या सौ राजकमल पिगले व रत्नमाला शिंदे याची भेट झाली .आश्रमात भोजन प्रसादी घेतली .लेप ते शालिवाहन आश्रम चे एकूण अंतर 14-50 किलोमीटर भरले. शालिवाहन आश्रमातून भोजन प्रसादी घेऊन पुढील प्रवास सुरु.नावडातोडी,बोतू, ढालखेडा,बलागावं,अकबरपूरा व खलबुद्रुक येथील श्रीराम मंदिरात मुक्कामास संध्याकाळी 5-45 वाजता पोहचलो.
लेपा ते खलबुद्रुक एकूण अंतर 33 किलोमीटर ,एकूण प्रवास झाला.
परिक्रमेचा 5 वा दिवस. * मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर 2019.*
खलबुद्रुक आश्रमातून सकाळी 6-10 ला पुढील प्रवास सुरु .खलबुजुर्ग ते खलटाका असा प्रवास झाल्या नंतर असे दिसून अले की सरदार सरोवर धरणाच्या पाण्याच्या फुगवट्या मुळे पूर्वीचा परिक्रमा मार्ग बंद होऊन नवीन रस्ता झाल्याचे दिसून आले. सांगवी ते चीचली च्या पुढील रस्ता कठोरा मार्गे बंद झाल्यामुळे भोईनदा मार्गे जावे लागले.भोईनदा येथील हनुमान मंदिरात सकाळी 10-30 ला पोहचलो. या रस्त्यावरील हनुमान नंदिरात नव्यानेच सेवा चालू झालेली होती.सर्व परिक्रमावासीयांना आग्रहाने थांबविले जात होते व सर्वांची आग्रहाने विचारपूस केली जातं होती.भोजन प्रसादी घेऊन दुपारी 12 वाजता पुढील प्रवास सुरु केला. आभाळी,कपालखेडी,कुवा, दवणा ते लाखणगाव फाटा ,नर्मदेसवर महादेव मंदिरात मुक्कामी 5-45 ला पोहचलो.
खलटक ते लाखणगाव फाटा एकूण अंतर 31 किलोमीटर ,आजचा प्रवास झाला
परिकर्मेचा 6 वा दिवस * बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2019*
लाखणगाव फाटा येथुन सकाळी 5-15 ला पुढील मार्गक्रमण सुरू.मेहंगावढेप,तळवाडाढेप,फत्यापुर, मंडवडा,चकेरी मेकळसुता धाम येथे 10 वाजता पोहचलो. आश्रमात मुक्काम. छोटा बडदा चे श्री रनछोड पाटीदार हे घ्यावयास आले.त्याच्या घरी भोजन झाल्या नंतर त्यांनी पुन्हा आश्रमात आणून सोडले .
लाखणगाव फाटा ते चकेरी एकूण अंतर 17 किलोमीटर.
परिक्रमेचा 7 वा दिवास *गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2019*
मेकलसुता आश्रम चमेटी येथून सकाळी 5 वाजता प्रवास सुरु .अंजड,नवलपूरा,बोरलाई,बीजेटा,पिपलाज व बडवाणी योगमाया मंदिरात 12 वाजता मुक्कामासाठी पोहचलो. दुसऱ्या दिवशी एकादशी आदल्या मुळे फराळाची सोया म्हणून शेंगदाणे भाजून व त्याचे लाडू करून बडवणी येथून करून घेतले.
चमेटी ते योगमय मंदिर ,बडवानी एकूण अंतर 21-50 किलोमीटर
. परिक्रमेचा 8 व दिवस *शूक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर 2019*
एकादशी, योगमाया मंदिर बडवानी येथून सकाळी 6 वाजता पुढील प्रवास सुरु.पेंडरा,कल्यानपुरा, जांमताबेडी,पिछोडी, कंठरा,गणेशपुरा,पाल्या, सोंदुल, भामटा,भवती,अम्लाली, बिजासन, मोरकट्टा ते बोरखेडी येथे मुक्कामासाठी दुपारी 3 वाजता पोहचलो.
योगमाया मंदिर बडवणी ते बोरखेडी एकूण 30 किलोमीटर प्रवास झाला.
परिकर्मेचा 9 वा दिवस * शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर2019 *
बोरखेडी वरून 6 वाजता प्रवास सुरु.कुली, घोणसा,खेरवाणी,सेमलेट येथे 5-30 वाजता मुक्कामासाठी पोहचलो., बोरखेडी ते सेमलेट एकूण अंतर 25 किलोमीटर.
परिक्रमेचा 10 दिवस *रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019*
सेम्लेटवरून सकाळी 6-30 ला प्रवास सुरु.खाराभादल येथून एका वाटाड्याने भमाना पर्यत रस्त्या दाखवण्यासाठी रुपये 500 घेऊन, सोबत येण्याचे मान्य केले .पुढे झरकन नदी पारकरून महाराष्ट्र भादल येथे ठीक 10-30 ला ,महाराष्ट्र हद्दीत प्रवेश केला. 11 वाजता श्री काळूराम यांच्याकडे थांबून भोजन प्रसादी घेऊन पुढील प्रवास 12-30 ला सुरू केला.भाबरी,धावडी ढाबरी येथे 3-30 ला मुक्कामासाठी थांबलो.सरदार सरोवरचत धरणातील पाण्याच्या फुगवट्या मुळे बरचसे दुरून जावे लागले.त्यामुळे जादा प्रवास करावा लागला. सेमलेट ते ढाबरी फल्या एकूण अंतर 17 किलोमीटर.
परिक्रमेचा 11 वा दिवस * सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2019*
ढाबरी फल्या येथून सकाळी 6-40 ला समोरच अवघड पहाड चढायला सुरुवात करून खपरमाळ कडे पुढील प्रवास सुरु .ढाबरी फल्या ते खपरमाळ एकूण अंतर 5 किलोमीटर आहे.खपरमाळ ते भमाना डोगर उतरून भमाना गावातील आश्रमात पोहचलो सोबतच वाटाड्या परत गेला..दुपारचे भोजन घेऊन ,1-40 वाजता पुढल्या प्रवासास निघालो.सावरीया दिगर येथून बिलगाव आश्रमशाळेत मुक्कामास संध्याकाळी 5-45 ला पोहचलो.तिथे संगमनेरच्या सौ सिधु कोल्हे व त्याची मैत्रीण श्रीमती निघूते याची भेट झाली. ढाबरीफल्या ते बिलगाव अश्रमशाळा एकूण अंतर 25 किलोमीटर.
परिक्रमेचा 12 व दिवस मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2019
बिलगाव आश्रमशाळेतून सकाळी 5-40 ला प्रवास सुरु.बोरी,गुंडासपाडा, खरडी, राजबर्डी, सोडकुई, जुनी मुबाई, धनाजे,धडगावं, हरणगाव,भुजगाव,सुरवानी,मोठी सुरवानी, भोजर ,खंडबारा, कुडल, खुंटामोडी माँ रेवा आश्रम मध्ये 5-30ला मुक्कामास पोहचलो.
बिलगाव ते खुंटामोडी एकूण अंतर 33 किलोमीटर झाले
. धडगाव सोमा महाराज यांनी चहा व बिस्कीट दिले ,त्या नंतर निघताना केळी व इतर साहित्य विकत घेतलेबाहेर एक झाड खाली विसरांतीस बसलो.इतक्यात श्री विलास जोशी गुरुजी धुळे याचा फोन आला व कुठे असल्याची चौकशी केली.त्यांना कुठे आहे या बद्दल माहिती दिल्या नंतर त्यांनी 10 मिनिटात पोहचतो असे सांगितले. गळा भेट झाल्यानंतर माई बद्दलच्या अनुभूतीची चरच्या चालू असताना त्यांनी भोजना बद्दल चौकशी केली व लगीच त्यांनी सोबत आणलेला भोजनाचा डब्बा आमच्या समोर ठेवला.तितक्यात सौ सिधु कोल्हे व त्याच्या सोबतचे एक परिकर्मवासी आले ,तसेच श्रीमती निघूते सुध्दा आल्या,त्यानं केली व फळे जोशी गुरुजींनी दिली .भोजनप्रसादी होऊन बसलो असतानाच तीन साधू महात्मे ज्योत घेऊन जाताना दिसले,त्यांना फळे देण्यासाठी व दर्शनासाठी सर्वजण पुढे गेले.नंतर मोबाईल मध्ये फोटो घेण्यात आले.श्रीमती निघूते यांनी सुद्धा फोटो घेण्यासाठी त्याचा मोबाईल श्री जोशी यांच्या ड्रायवरकडे दिला. फोटो घेऊन ,झाल्या नंतर जोशी गुरुजी गाडीत बसले,व गाडीत आमच्या सामानाच्या ब्यागा घेऊन गेले.4/5किलोमीटर गेले असता त्याचा फोन आला व त्याच्या मोबाईलची चौकशी करू लागले. त्या नंतर ते सर्वजण पुन्हा आमच्याकडे आले व मोबाईलचा शोध घेऊ लागले तथापि मोबाईल सापडला नाही. आमच्या पुढे सौ सिंधू कोल्हे चालत होत्या.व त्याच्या पुढे त्याच्या सोबत चालत असलेले सिन्नरचे परिक्रमावासी श्री चौधरी चालत होते. 5/6किलोमीटर गेल्यावर जोशींच्या लक्ष्यात आले की आपला मोबाईल कुठेतरी विसरला.आम्हास फोन केला,आम्ही सरांकडे व ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी शोध घेतला ,परंतु मोबाईल सापडलं नाही.मोबाईलची रींग होत होती परंतु जवळ पास आवाज येत नव्हता.जोशींनी गाडीतील सर्व सामान खाली काढून गाडीची तपासणी केली,परंतु मोबाईल सापडला नाही.ते पुन्हा आमच्या पर्यत आले.जोशींचा मोबाईल हरवला त्याचे माझ्या मनाला फारच दुःख झाले.त्याच वेळी श्री राजेश जवळकर हे असे म्हणाले बाबाजी चिंता करू नका तुमची सहावी परिक्रमा आहे .माई तुमच्यावर दोष येऊ देणार नाही, असे असताना सुद्धा मनाला शांती, समाधान मिळत नव्हते.सौ सिंधु कोल्हेच्या अगोदर श्री चोधरी खुंटमोडीच्या आश्रमात पोहचले होते.सौ कोल्हे यांनी श्री चौधरी याच्या कडे मोबाईलचा विषय काढला असता श्री चौधरी यांनी त्यांना रस्त्याच्या कडेला वाजत असलेला मोबाईल मिळाल्याचे सांगितले.तितक्यात श्री जोशींची गाडी आश्रमात पोहचली व त्यांना मोबाईल दिला,त्यावेळी श्री जोशींच्या चेहऱ्यावरचे आनंद भाव पाहण्या सारखे होते ,कारण त्या मोबाईल मध्ये त्याचा साधनेचा सर्व डेटा भरलेला होता,एक वेळेस मोबाईल घेत आला असता परंतु त्यातील डेटा परत मिळविणे त्याच्या दृष्टीने फारच अवघड होते.महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो,तिथे फोटो काढत होतो ते ठिकाण व श्री चौधरिस जिथे मोबाईल मिळाला ते ठिकानामध्ये 5/6 किलोमीटरचे अंतर होते . मोबाईल तिथे कसा गेला हे अद्याप अनुत्तरीतच आहे.श्री राजेश जवळकर म्हणत होते बाबाजी तुमची सहावी परिक्रमा आहे,माई तुमच्यावर दोष येऊ देणार नाही.श्री राजेश जवळकरचा शब्द माईने सार्थक ठरविला,नर्मदेहर जिंदगीभर, जय हो माईकी तो चिंता कायकी,नर्मदेहर परिक्रमेचा13 व दिवस*बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2019*
खुंटामोडी येथून सकाळी 5-30 ला प्रवास चालू केला.पिपरपनी,भागापाणी,काठी,मालपाडा,मोलगी. मोलगी येथे हॉटेल मध्ये बालभोग चहा,भजी घेतला.राजेशच्या पायास पट्टी व ड्रेसिंग केले. वरून पुढील मार्गक्रमण सुरू.पिप्लखुंट,मोक्ष,पांढरामाती,वडफळी व चापडी येथील श्री चैतन्य आश्रमात मुक्कामासाठी संध्याकाळी 5-45 वाजता पोहचलो.
खुंटामोडी ते वडफळी चापडी एकूण अंतर 38 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा14 वा दिवस *गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2019*
श्री चैतन्य आश्रम वडफळी चापडी येथुन सकाळी 6-30 ला पुढील प्रवास सुरु केला. कुकडी पादरच्या पुढे देव नदी पार करून ,महाराष्ट्र राज्यातुन गुजरात राज्यात सकाळी 7-15 प्रवेश केला.पुढे कनजी ते माथासर च्या दरम्यान थोड्या प्रमाणात वरूनराजाने सुद्धा आमचे स्वागत केले.माथासर येथील नित्यानंद आश्रमात भोजन प्रसादी घेतली.तिथे महंत श्री जेसलगिरी संचालक आहेत.झरवानी ,गोरागाव ते हरिधाम आश्रमात ठीक संध्याकाळी 6-15 वाजता मुक्कामी पोहचलो.
वडफळी चापडी ते गोरागाव हरिधाम अंतर 37 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 15 व दिवस*शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2019*
हरिधाम आश्रमातून सकाळी चहा घेऊन ठीक 7 वाजता माईच्या किनाऱ्यांने प्रवास सुरु.योगानंद आश्रम रामपुरा येथे दुपारी 12 वाजता भोजनास थांबलो. मंगरोल नंतर निचली गुवार येथील नर्मदा कुटी या आश्रमात दुपारी 4 वाजता मुक्कामासाठी पोहचलो. श्री राजेश जवळकरचा पायी जास्तच दुखायला लागल्यामुळे तो उशिरा पोहचला.भोजनझाल्य नंतरत्यास गाफीने येण्याचा सल्ला दिलाअसता तो फारच रडायला लागला.बाकी सहकार्यास निचली गुवर येथील भरतांद महाराजांच्या आश्रमात पाठवून दिले.आश्रमातुन गाडी बोलावली व गाडीवर श्री राजेश याना पाठवून दिले. हरिधाम ते नितळ गुवर एकूण अंतर 18 किलोमिर झाले. परिक्रमेचा 16 व दिवड* शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 3019* नर्मदा कुटी गुवार येथुन ठीक सकाळी 6-40 ला चाह घेवुन पुढील प्रवास सुरु केला. शहराव, दोडलीय,कुंभेस्वर शनी पणोती येथे सकाळी 10 वाजता पोहचलो. भोजन प्रसाफी घेऊन 12-40 ला पुढे निघालो. रुंद चौकडी ते रुंड गांव येथील जलाराम आश्रमात 3-45 ला मुककम साठी पोहचलो.
गुवार ते जलाराम आश्रम रूंड एकूण अंतर 24 किलोमीटर झाले.
डिसेंबर महिना
परिक्रमेचा 17 वा दिवस* शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2019*
.
जलाराम आश्रमातून सकाळी चहा व बटाटा भाज्यांचा बालभोग घेऊन सकाळी 8 वाजता निघालो.करझन नदीचा संगम नावेतून पार करून यावे लागले.सुखदेव, पाटणा,वरखड ,ओरी, निकोली, कनरोज,राजापूर,नाव्हरा,वराछ्या,असा येथील संत शिरोमणी श्री दगडू बापू याच्या आश्रमात संध्याकाळी ठीक 4-15 ला मुक्कामी पोहचलो.
रुंड ते असा एकुन चाल 24 किलोमीटर झाली
. परिकर्मेचा 18 व दिवस* सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2019 *
असा येथी शर संत दगडू महाराज आश्रमातून सकाळी ठीक 5-10 वाजता पुढिल मार्गक्रमण सुरू.पाणेथा,वेळूग्राम,नानावासना, भावपूरा, सरसाड, वढंवणा, शास्वत मारुती धाम, मनी नागेश्वर, भालोद, येथे 11-30 ला दत्त मंदिरात भोजनास पोहचलो. तिथे सौ शरयू घाडी व पुण्याचे श्री वसंतराव नाफडे याची भेट झाली. त्या पैकी सौ घडी आमच्या सोबत पुढिल प्रवासास निघाल्या.भोजनप्रसादी घेऊन दुपारी 1-45 ला निघालो.प्राकड, अविधा, लाडवा वडं, जगदीश मढी येथे संध्याकाळी 6 वाजता मुक्कामासाठी पोहचलो .
असा ते जगदीश मढी एकूण प्रवास 38 किलोमीटर झाला.
परिक्रमेचा 19 वा दीवस दिनांक 3 डिसेंबर 2019*
जगदीश मढी येथून सकाळी 5-20 ला निघालो.अंधार असल्यामुळे जगलात थोडा रस्ता चुकला, परत मागे आलो.मोठी झगडीया येथून गुमानदेव येथे येऊन दर्शन घेतले व हॉटेलमध्ये चहा व नास्ता करून पुढे निघालो.नानासंजा, गुजाली, गुलड, मांडवी,नौगावा, सामोरं, काशिया, अंदाडा,गरखोल, झरकुंड,,अकलेस्वर,अबुलीभुईदा,आडोल,बलबला कुंड/भराडी ,संध्याकाळी मुक्कामी 5-30 वाजता पोहचलो.
जगदीश मढी ते बलबला कुंड/भराडी एकूण अंतर 38 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 20 वा दिवस* बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2019*
बलबला कुंड येथून सकाळी 5-30 ला निघालो.पुढे तेलवा, मोटवाणा,कलम,अस्ता, हासोट, वासणोली, बडदरा, दंत्राई,हनुमान टेकडी येथे भोजन करून दुपारी 2-30 वाजता वमलेस्वला पोहचलो.
बलबला कुंड ते वमलेस्वर एकूण अंतर 29 किलोमीटर.
ओंकारेसवर ते वमलेस्वर प्रवास 20 दिसत पूर्ण होऊन ,एकूणअंतर 647 किलोमीटर म्हणजे 650 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 21 वा दिवस*वमलेस्वर येथून सकाळी 6 वाजता निघून रत्नासगरवर पोहचलो व 8 वाजता नव्हतं बसलो.वमलेस्वर ते रत्नासागर एकूण अंतर 3 किलोमीटर झाले. दक्षीण तट प्रवास पूर्ण. ------------------------------------------------------------------- **उतरत तट परिक्रमा सुरवाय**
परिक्रमेचा 21 वा दिवस*गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2019*
विमलेस्वर आश्रमातून सकाळी 6 वाजता निघून नावेत 8 वाजता बसलो.11वाजता नावेतून मिठीतलाई च्या धक्यावर उतरलो.मिठीतलाई येथे एका माईच्या खानावळीत भोजनप्रसादी घेऊन दहेज येथे हरसिद्धी माता मंदिर येथील अन्नक्षेत्रात मुक्काम. मितठीतलाई ते दहेज एकूण अंतर 9 किलोमीटर.
परिकर्मेचा 22 व दिवस*शुक्रवार दिनांक6 डिसेंबर 2019*
दहेज येथील हरसिद्धी माता मंदिरातुन सकाळी 5-15 ला प्रवास सुरु. जुळवा,रहीयज, अटाली,भेसली,,केसरोल,नवेथा,अमदाडा,वेसदडा ,हिंगलोज, देहगाव, भरुच येथे श्री सुनील व अनिल भाटिया याच्या निवास्तानी मुक्कामासाठी संध्याकाळी 6 वाजता पोहचलो.
दहेज ते भरुच 44 किलोमीटर प्रवास झाला.
परिकर्मेचा 23 वा दिवस*शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2019*
भरुच येथून सकाळी 6-45 वाजता निघून स्वामींनारायन मंदिर,झाडेस्वर, तंवरा ,ज्योतिबेन याच्या कडे 12 वाजता भोजनासाठी थांबलो.भरुच ते मंगलेसवर अंतर 20 किलोमीटर प्रवास झाला.दुपारी 1 वाजता निघून निकोर,अगारेस्वर, धर्मशिला, झनोर,नांद, सोमल,ओज किनाऱ्याने ठीक 5-30 वाजता मीरा आश्रम मध्ये मुक्कामासाठी पोहचलो.
भरुच ते मीरा आश्रम ओज एकूण अंतर 34-500 किलोमीटर झाले
. परिक्रमेचा 24 व दिवस* रविवार दिनांक 8 डिसेंबर 2019*
मीरा आश्रम ओज येथून सकाळी 6-15 ला पुढील प्रवास सुरु केला.नेमावर, सायर ,बिरजपुर, खून,देहली बकुल आश्रम येथे बालभोग घेऊन पुढील प्रवास सुरु.,कोठीया, रणापूर, दिवेर मढी, सुरसामल, मांडवा, मालसर येथील गजानन आश्रमत ठीक 4-30 वाजता मुक्कामासाठी पोहचलो. ओज ते मालसर एकूण अंतर 34 किलोमीटर झाले. गजानन आश्रमात सफेद पळसाची झाडे आढळून आली.मालसर येथे संत श्री डोगरे महाराजांची समाधी आहे.
परिकर्मेचा 25 वा दिवस* सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019*
मालसर येथील गजानन आश्रमातून सकाळी 6-30 ला पोटभर बालभोग करून निघालो.सिनोर येथून माईच्या किनाऱ्याने अनुसयामाता मंदिरात पोहचलो.पुढे रोडने परकलपाणी,मोलेथा,दरियापुर, बद्रिकाश्रमात दुपारी 1 वाजता भोजनासाठी थांबलो.भोजनप्रसादी नंतर विश्रांती घेऊन पुढील प्रवास सुरु केला.नदेसवर,चांदोद, कर्णाळी येथील कुबेर भडारी मंदिरात 4-30वाजता पोहचलो.
गजानन आश्रम मालसर ते करणाली कुबेर भंडारी एकूण अंतर 31 किलोमीटर झाले. चनोद ते करणाली संगमाचा रस्ता पाण्यामुळे बंद झाल्याने पुलावरून जावे लागले.त्या मुळे करणाली संगमावर जात आले नाही व अंतर सुद्धा जास्त झाले.
परिक्रमेचा 26 वा दिवस*मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2019*
करणाली कुबेरंभांडरी मंदिरातून सकाळी 6-50 ला परिक्रमा सुरू.वडिया,बरबट,मोरया,नडगाव,मारिया,चुडेस्वर,तिलकवाडा येथे 11-30 ला पोहचलो.तिथे अंबिवलीचे श्री दत्ता पाटील भेटले .भोजन प्रसादी घेऊन 12-30 ला गारुडेस्वर कडे प्रयाण.मनींनागेस्वर,सांजणोली, अगसत्येस्वर,गरूडेस्वर येथे नवीन हॉल मध्ये 4-30 ला मुक्कामासाठो थांबलो. कुबेरंभांडरी ते गरूडेस्वर एकूण अंतर 30 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 27 व दिवस*बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2019*
गरुडेस्वर येथून सकाळी 5-15 वाजता श्री प्रल्हाद यांच्याकडे चहा घेऊन निघालो. खडगदा, डेकाई,झरीया, उदवा.उदवा पासून कॅनलने निघालो.खोडीया चौकडी पासून पुन्हा रोडने प्रवास सुरु केला.त्यामुळे नानी आमबाजिला जाता आले नाही.पाचमबा,वाढवा,खंबाईता,नवागाव, चंदनपुरा,बोरियाद येथे भोजनासाठी दुपारी 1-45 ला थांबलो.2-15 वाजता पुढील प्रवास सुरू.बगाच ते भाका येथील श्री नीलकंठ महादेव मंदिरात ठीक 4-45 ला मुक्कामास थांबलो.तेथे बदलापूरचे श्री परांजपे भेटले .मंदिरात श्री.त.गोवर्धनगिरी हे व्यवस्तापक आहेत.
गरुडेस्वर ते भाका एकूण अंतर 41 किलोमीटर.
परिक्रमेचा 28 वा दीवस *गुरुवार दिनांक12 डिसेंबर 2019*
नीलकंठ महादेव मंदिर भाका येथून सकाळी ठीक 5-15 ला प्रवास सुरु.खदाडीया ,भेरवडिया,जांबा,कनाबेडा, आठाडोगरिया, मोठीदैयत,मोठासाकल, सकाळी 8-30 वाजता श्री जयस्वाल याच्या माँ नर्मदा आश्रमात चहा घेऊन कवाट कडे निघालो.कवाट, गुजरालीय,नवलजा,जामली येथील श्रीमती ठमकी बाई हासन यांच्या कडे भोजन करून पुढे निघालो,वगदून गुजरात व मध्यप्रदेश च्या सीमेवरील गुजरातचे शेवटचे गांव. दुपारी 2-45 ला गुजरात मधून मध्यप्रदेश्यात प्रवेश. करला.बखतगड हे मध्यप्रेशयातील पहिले गांव. पुढे उमरी येथील काजल माता मंदिर येथे ठीक 4 वाजता मुक्कामाला पोहचलो.
भाका ते उमरी एकूण अंतर 34 किलोमीटर
. परिक्रमेचा 29 व दिवस*शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2019 *
राणी काजल माता मंदिर येथून सकाळी 6-15 वाजता चहा व बालभोग घेऊन निघालो. पुढे छिनकी, आकलधरा,कोसरिया येथे सदाव्रत सेवा चालू झालेली आहे.तिथे चहा घेऊन पुढील प्रवास चालू.अठ्ठा, सिरखंडी, उमरठ येथे भोजनासाठी 10-30 वाजता थांबलो. भोजनकरून 11-30 वाजता पुढे निघालो.साकडी, गुलवट, टेमला बेहडवा व कुलवट येथील हनुमान मंदिर येथे मुक्कामाला ठीक 5-15 ला थबलो.
राणी काजल माता मंदिर उमरी ते कुलवट एकूण अंतर 35 किलोमीटर.
परिक्रमेचा 30 वा दिवस* शनिवार दिनांक 14 डिसेंबर2019*
हनुमान मंदिर कुलवट येथून सकाळी 5 वाजत निघालो.कुलवंट गांव, कवडा, गागणपूर,जलवट, डही,भंगावा, अत्तरसुमा, ठडला,चिभांन्या,बडवाण्या,पंडियाल येथील आश्रमात भोजनासठी दुपारी 12-50 ला थांबलो. दुपारी भोजन करून 1-50 ला पुढे भवरीया मार्गे निघालो.अमलझुमल ,हेलदण्ड, भवरीया,भिलसुरा, कनक बिहारी आश्रम नवीन कोटेस्वर येथे संध्याकाळी 6 वाजता मुक्कामाला पोहचलो.
हनुमान मंदिर कुलवंट ते कणकबिहारी आश्रम,नविन कोटेस्वर एकूण अंतर 44 किलोमीटर.
परिकर्मेचा 31 वा दिवस*रविवार दिनांक 15 डिसेंबर 2019 *
कणकबिहारी आश्रम नविन कोटेस्वर येथून चहा घेऊवून सकाळी6-35 ला निघालो.नवीन निसरपूर मार्गे पीपलिया, लिगवा,भिलट देव मंदिर पसुन कच्या रस्त्याने गणपूर,सिरसी येथे श्रीमती अतीत जाट यांच्या कडे 10-45ला भोजना साठी थाबलो व भोजन करून 11-35 वाजता पुढे निघालो.देवगड,सतातलाई,कवठी, पिपलाय, करोली, जोतपुर गावाच्या अगोदर 1 किलोमीटर असलेल्या हनुमान मंदीरात मुक्कामासाठी सध्याकाळी 5-15 ला थाबलो.
नवीन कोटेस्वर ते जोत हनुमान मंदिर एकूण अंतर 33 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 32 वा दिवस* सोमवार दिनांक 16 डिसेंबर2019.*
जोत हनुमान मंदिरातून सकाळी 6-15 ला प्रवास सुरू केला. आजनदा, लिब्बी,बजेटा, बकानेर, धनखेडी,बायखेडी, लुनेरा येथे 10-45 वाजता शांतीलाल राठोड याच्या दुकानात पोहचलो, त्याच्याकडे नास्ता चहा घेऊन पुढे हनुमान मंदिरात भोजन केले.12-15 बालीपुरसाठी पुढे प्रवास चालू लागलो.बालीपुर ,मदानपुरा,नयापुरा,रामाधामा, अहिरवास, बैडापूरा,कालिबावडी,बडाछत्री येथील आश्रमात संध्याकाळी 5-45 वाजता मुक्कामास पोहचलो.
जोतपुर हनुमान मंदिर ते बडाछत्री एकूण चाल 36 किलोमीटर झाली.
परिकर्मेचा 33 वा दीवस* मंगळवार दिनांक17 डिसेंबर 2019*
बडीछत्री येथील आश्रमातून सकाळी 6-15 ल निघालो.मतलंबपुरा,बदाव मांडव येथील नीलकंठ महादेवाचे दर्शन घेऊन पुढे चतुर्भुज रामाचे दर्शन घेतले. रेवा कुंडाचे दर्शन करून ठीक 12-15 वाजत अवघड व कठीण आणि तीव्र उतारअश्या रस्त्याने मंडडू गड उतरण्यास केली.1-15 मिनिटांत गड उतरलो.गडाचे उताराचे अंतर 2-500 किलोमीटर झाले.पुढे हिरापूर बंजऱ्या ,बागवण्या येथील राममंदिरात 4 वाजता मुकामासाठी थबलो.
बडाछत्री ते बागवण्या व्हाया मांडव गड एकूण अंतर 25-25 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 34 वा दिवस*बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2019*
राम मंदिर बागवण्या येथून सकाळी 5-45 वाजता निघालो.कुंदा, धामनोद, डहिवर,बडवी, खराडी येथे भोजनास थाबलो.भोजन करून 11-45 वाजता म्हेस्वर कडे निघून 12-30 वाजता सप्त मातृका मंदिर म्हेस्वर येथे पोहचलो. तिथे श्री ओंकार कुंटे व श्री उदयन आचार्य याची भेट झाली. बागवण्या ते म्हेस्वर एकूण अंतर 23 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 35 वा दिवस*गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2019 *
सप्त मातृका मंदिर,म्हेस्वर येथून सकाळी6 वाजता निघालो.कडवी,गांधीनगर, मंडलेस्वर,जळूड,सुलगाव,गंगावा, पथराड येथे भोजनासाठी थाबलो.भोजन करून दुपारी 1-30 वाजता पुढील प्रवास सुरु केला.चिराखान, बेहंगाव, पाड्याघाट खेडी,सेजगाव,भामपुरा, धनेस्वर महादेव मंदिर मध्ये मुक्कामासाठी संध्याकाळी 6-15 वाजता पोहचलो.
म्हेस्वर ते धनेस्वर एकूण अंतर 41 किलोमीटर.
परिक्रमेचा 36 वा दिवस*शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2019*
धनेस्वर मंदिरातून सकाळी 6-15 वाजता निघालो. खेगाव, कपास्थल, रामगड, कटघडा, मेथाखेडी, खेडी घाट,बडवाह, सुलगाव, येथील राममंदिरात मुक्कामासाठी 3-30 ला पोहचलो. धारेस्वर ते सुलगाव एकूण अंतर 30 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा37 व दिवस*शनिवार दिनांक2 21 डिसेंबर2019*
राममंदिर सुलगाव येथून सकाळी चहा घेऊन 7 वाजता निघालो.पुढे सर्व रस्ता जगलातून आहे.कुंडी,बडेल, मेहंदीखेडा,ट्रेनी,पिपरी येथील नर्मदा मंदिरात दुपारी 3-15 ल मुक्कामासाठी पोहचलो. सुलगाव ते कुंडी एकूण अंतर 20 किलोमीटर असून सुलगाव ते पिपरी एकूण अंतर 28 किलोमीटर भरले.
परिक्रमेचा38 वा दिवस*रविवार दिनांक 22 डिसेंबर 2019 एकादशी *
नर्मदा मंदिर पिपरी येथून सकाळी 5 वाजता निघालो.सितावन,तातुखेडी,काकड,रतनपूर,बावडीखेडा, ,जयंतीमाता मंदिर येथे 10-10 वाजता पोहचलो. सुरमन्या येथे राहणारे श्री महेश राठोड यांनी भगरीची खीर व शेंगदाणे भाजून उपवासासाठी आणले होते.तिथे असणाऱ्या सर्वांना फळरी देऊन उर्वरित फलहरी येणाऱ्या परिकर्मवासी साठी ठेवून दिली.फलहरी नंतर आमच्या ब्यागा महेशच्या गाडीवर पाठवून आम्ही जगलं मार्गे सुरमन्या कडे निघालो.दुपारी3-15 वाजता श्री महेश राठोड याचे निवस्थानी सुरमन्याला पोहचलो.त्याच्या निवास्तानी उत्तम प्रकारे स्वागत झाले.आमच्या साठी नवीन बेडशीट व इतर पांघरायचे कपडे सुद्धा नवीन आणलेले होते.घर व आगन स्वच्छ सारवलेले होते.मैय्या बद्दल किती प्रेम व आदर. जयंतीमाता मंदिर ते सुरमन्या एकूण अंतर 16 किलोमीटर झाले.
पिपरी ते सुरमन्या व्हाया जयंतीमाता मंदिर एकूण अंतर 36 किलोमीटर झाले
. परिक्रमेचा 39 व दिवस*सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2019*
श्री महेश राठोड याचे निवस्थानामधून सकाळी 8-15 वाजता एकादशीचा उपवास सोडून निघालो.उपवास सोडण्यास दालबाटी चा प्रोग्रॅम केलेला होता.आमच्या ब्यागा महेशच्य मोठ्या भावाच्या गाडीवर सतवास पर्यत पुढे पाठविल्या.सिंदराणी, उंडेल,बाल्या, बरोदा, सतवास,अतवास,झाबरिया,गरेडी, पिपलखेडा, इंद्रानगर, धायली,अजनास येथील हनुमान मंदिरात ठीक 5-15 ला मुक्कामी थांबलो.
सुरमन्या ते अजनास एकूण अंतर 37 किलोमीटर झसले.
परिक्रमेचा 40 व दिवस*मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2019*
अजनास येथील हनुमान मंदिरातून सकाळी 6-30 वाजता चहा व बालभोग घेऊन निघालो.खुडगाव,बागदा, सवासडा, सततलाई,नेमावर येथील ब्रम्हच्यारी आश्रमात भोजन प्रसादी घेऊन दुपारी 1-30 वाजता पुढील प्रवास सुरु.अजनास ते नेमावर एकूण अंतर 19-50 किलोमीटर झाले.खुडगाव, तुरणाल,दैयत,चीचली, करोनामाफी,बीजलगाव येथील नर्मदामंदिरात संध्याकाळी 5-45 वाजत मुक्कामासाठी पोहचलो.
अजनास ते बीजलगाव एकूण अंतर 37 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 41 वा दिवस*बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2019 *
नर्मदामंदिर बीजलगाव येथील आश्रमातून सकाळी 7 वाजता निघालो.पिपलनेरिया,निंबार्क आश्रमात चहा व बालभोग घेऊन छिपणेर येथील दादाजी दरबार मध्ये दर्शन घेऊन सीमा दीदी कडे सकाळी 9-30ला थांबून भोजन प्रसादी घेतली. 12-15 वाजता पुढील प्रवास सुरु.रणापूर,तोताखेडी,सातदेवला जाण्यासाठी डोग्यातून जावे लागले.टिगाली,सीलकंठ येथील आश्रमात मुक्कामासाठी 4 वाजता पोहचलो.तिथे शिरपूरचे चौधरी व त्याचे सोबतचे परिकर्मवासी भेटले. बीजलगाव ते सीलकंठ आश्रम एकूण अंतर 21 किलोमीटर.
परिक्रमेचा 42 व दिवस* गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2019,अमावस्या व सूर्य ग्रहण*
सूर्य ग्रहण असल्यामुळे ग्रहण सुटेपर्यत आश्रमातच थबलो.ग्रहण सुटल्या नंतर भोजन प्रसादी घेऊन दुपारी 12-45 वाजता पुढे निघालो.चमेटी ते मंजलीस.मजलीस येथे दुपारी 3-30 ला श्री गोस्वामी यांच्याकडे पोहचलो.चहा व भज्यांचा नास्ता झाल्यानंतर निघत असंताना राहण्याचा आग्रह झाल्यामुळे मुक्काम केला. सीलकंठ ते मजलीस एकूण अंतर 10 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 43 वा दिवस *शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2019 *
श्री राज गोस्वामी याच्या निवास्तनातून सकाळी 7-15 ला पुढे निघालो.खडगाव,बाबरी,जाजना,मंठा,नेहलाई, रेऊगाव येथे भोजनासाठी 11-15 वाजता थबलो.मजलीस ते रेऊगाव अबतर 16 किलोमीटर.रेऊगाव येथे भोजन करून दुपारी 1-40 ला पुढील प्रवास सुरु. मर्दांनपुर,आवरीघाट,गाजीत, पथोडा, चारूवा येथे रामगिरी गोस्वामी याच्या निवास्तानी संध्याकाळी 5-30 ला मुक्कामासाठी थांबलो.
मजलीस ते चारुवा एकूण अंतर 33 किलोमीटर झाले.
,.परिक्रमेचा 44 व दिवस* शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2019*
श्री रामगिरी गोस्वामी ,चारूवा याच्या निवास्तना पासून चहा घेऊन सकाळी 6-50 ला पुढे निघालो.कॅनाल मार्गे दीपड,उंचाखेडा, होळीपूर,खाडावड,देवगाव,पिलगारी, बुधणी रामघाट राम मंदिरात भोजन करून पुढे दुपारी 2 वाजता निघालो. जमनिया, बांद्राभान, जहानपुरा येथे श्री गोविंद यांच्या कडे सध्याकाळी 5-30 ला मुक्कामासाठी थांबलो.
चारूवा ते जहानपुरा एकूण अंतर 38 किलोमीटर
परिक्रमेचा 45 व दिवस*रविवात दिनांक 29 डिसेंबर 2019 *
श्री गोविंद याचे निवास्तनातून /जहाँनपुरा सकाळी 6-30 वाजता निघालो.हिराणी,शहागज चीचली, बनेटा, सुडानिया,हातनोरा,सरदारनगर,जैत,नांदनेर, कुसुमखेडा बमहोरी, भारकच्छ, गडरवास येथे श्री बीजमोहन साहू याच्या निवास्तनात संध्याकाळी 5-30 वाजता मुक्कामासाठी थांबलो.
जहानपुरा ते गडरवास ऐकून अंतर 41 किलोमीटर झाले
. परिक्रमेचा 46 वा दिवस* सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 *
ब्रिजमोहन साहू गडरवास याचे निवास्तनातून सकाळी 6-45 ला चहा घेऊन निघालो.बिसेर,सनखेडा, बामनवाडा किनारा आश्रम,बरखेडा, मोतलसर,किवली, घाटसेमली बगलवाडा येथे भोजना साठी दुपारी 12-15 ला थांबलो. दुपारी भोजन करून 1 वाजता पुढे निघालो. भिलाडिया, पाजरा, पुरोहित पिपरी, खणडराज चौरासा सर्रा,मंगलोर येथ संस्कृत पाठ शाळेत मुक्कामासाठी ठीक संध्याकाळी 5-15 ला थबलो.संस्कृत पाठशाळा बंद होती .फक्त परिक्रमावासीची सेवा सुरू होती. गडरवास ते मंगलोर एकूण अंतर 35 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 47 वा दिवस *मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2019 *
संस्कृत पाठशाळा मंगलोर येथून सकाळी 6-15 वाजता निघालो.अलीगज पासून मैयाच्या किनार्याने प्रवास सुरु.वराहकला, केतूधान, मोहडकला,उंडिया,सुलतांनगज/राख,बोरास चोरास,बासखेडा येथे पाऊस आल्यामुळे राम जानकी मंदिरात ठीक 4 वाजता पोहचलो.मंदिरात आज मैय्याने कोणतीच सुविधा केलेली नव्हती. मंगरोल ते बसखेडा एकूण अंतर 35 किलोमीटर झाले.
* 2019 संपून 2020 सुरू
परिक्रमेचा 48 वा दिवस*बुधवार दिनांक 1 जानेवारी 2020*
बासखेडा येथून सकाळी 9 वाजता निघालो.गावात एक ग्रहस्ताने चहा दिला.किणाऱ्याने अनघोरा येथी स्वामीसमर्थ आश्रमात सकाळी 10-30 वाजता पोहचलो. बासखेडा ते आनघोरा अंतर 7 किलोमीटर.
परिक्रमेचा 49 वा दिवस *गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2020*
पावसाळी वातावरण असल्यामुळे अनघोरा येथे मुककम करण्याचा निर्णय.
परिक्रमेचा 50 वा दिवस * शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020
* स्वामी समर्थ मठ अनघोरा येथून सकाळी 9-15 ला चहा व बालभोग घेऊन निघालो.पतयी घाट पासून किणाऱ्याने प्रवास.सिदघाट, शोकलपूर येथे माईच्या पात्रात बालबभोग घेऊन पुढील प्रवास सुरु.किनारा सोडून शेतातून वरच्या बाजूने रिछ्यावर, रंमपुर, नयाखेडा, टीमरावण,हिरापुर येथे राजराजेसवरी मंदिर मध्ये संध्याकाळी 4-30 ला मुक्कामासाठी थांबलो.
अनघोरा ते राजराजेस्वरी मंदिर हिरापुर एकूण अंतर 20 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 51 वा दिवस*शनिवार दिनांक 4 जानेवारी 2020 *
राजराजेस्वारी मंदिर हिरापुर येथून सकाळी 6-30वाजता निघालो.करौनदी, कंठाई, बिलथरी, सिमरिया, चावरपाठा ,बरमान घाट येथील सिद्धेस्वर मंदिरात संध्याकाळी 5-30 ला मुक्कामी थांबलो. तिथे छिदवाड्यावरुन श्री रोहित द्विवेदी व त्याचे सहकारी दोस्त,मैय्याचे प्रेमी ,300 किलोमीटर दूर वरून भेटावयास आले.येताना ज्या परिक्रमावासींना चप्पल,इनर व स्वेटरची आवश्यकता होती त्या वस्तू घेऊन आले.
राजराजेस्वारी मंदिर हिरापुर ते बरमानघाट एकूण अंतर 36 किलोमीटर झाले
परिक्रमेचा 52 व दिवस* रविवार दिनांक 5 जानेवारी 2020 *
बरमानघट येथून सकाळी 7-15 वाजता निघालो.सतधार धर्मपुरी, बिकोर,कुडी, गुरसी,गोकला, रामपुरा येथील आश्रमात 11-40 ला भोजनासाठी थांबलो.(19) किलोमीटर अंतर झाले.दुपारी 1-30 वाजता पुढील प्रवास सुरु.हतीया,केरपाणी, पिठोरा, बिचिया खेडा,बरुरेवा, मुरगाखेडा येथील श्यालेत मुक्कामासाठी 5-30 वाजता थांबलो. बरमानघाट ते मुरगाखेडा एकूण अंतर 34 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 53 वा दिवस* सोमवार दिनांक 6 जानेवारी 2020,एकादशी
मुरगाखेडा येथून सकाळी 7-15 ला निघालो.ज्योतखेडा, डोगरगाव येथून जबलपूर हायवेने प्रवास सुरु केला.इंदिरानगर,विक्रमपूर, मेरागावं, बसेडी गावच्या शिवारात, हायवेच्या उजव्या बाजूस श्री राजबहादूर उर्फ गुडडू यांच्याकडे फलहारीसाठी दुपारी 12-15 ला थांबलो. मुरगाखेडा ते बसेडी एकूण अंतर 21 किलोमिटर झाले.दुपारी 2 वाजता फलहारी नंतर पुढील प्रवास सुरु केला.सुनदरादेही ,बेलखेडा येथे मुक्कामासाठी 3-45 ला थांबलो.
मुर्गाखेडा ते बेलखेडी एकूण अंतर 28 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 54 वा दिवस * मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2020*
बेलखेडा येथून सकाळी 6-35 ला चहा घेऊन प्रवास सुरू केला.जमखार, गुदराई,मनकेडी, करहैया,नटवारा,शहपुरा बिटोउनी यथे श्री सोनी याच्या दुकानात भोजनासाठी दुपारी 12-30 ला थाबलो.बोरिवलीच्या सौ सीमा चौधरी या जबलपूरला आल्या व 10 माणसाचे भोजन घेऊन शहपुरा येथे आल्या. दुपारी भोजन करून 2 वाजता बिटोउनी ,भेडाघाट चौराह, सरस्वती घाट येथे मुक्कामाला सध्याकाळी 6-30 ला मुक्कामासाठी पोहचलो.
बेलखेडा ते सरस्वती घाट एकूण अंतर 40 किलोमिटर झाले.
परिक्रमेचा 55 वा दिवस* बुधवार दिनांक 8 जानेवारी 2020*
सरस्वती घाट येथून सकाळी 7-30 वाजता किणाऱ्याने निघालो.गोपाळपुरा, लमहेटा घाट,रामनगर,तीलवाराघाट,लालपूर घाट,गौरी घाट येथे दुपारी 1-20 ला पोहचलो.तिथे कहाणी येथून श्री व सौ साहू या भेटावयास आल्या होत्या.येताना सोबत खव्याची बर्फी बनवूनआणली व त्यांनी आम्हास हॉटेलमध्ये जेवण दिले.धुनिवाले दादाजी दरबार येथे पगलांनंद महाराजांच्या भेटीस गेलो परंतु ते त्यांच्या जन्मदिना निमित बाहेर गेले असल्यामुळे भेट होऊ शकली नाही.नतर जलहेरीघाट येथे पेशवेकालीन कुश्यावर्तीसवर मंदिर,संत ज्ञानेश्वर माऊली सभागृह येथे 3-30 ला मुक्कामासाठी थांबलो.
सरस्वती घाट ते जलहेरी घाट एकूण अंतर 18 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 56 वा दिवस*,गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2020.*
रात्री पाऊस झाल्या मुळे जलहेरी घाट येथून उशिरा सकाळी 8 वाजता निघालो.शारदानगर,भीतौली घाट,जत्रा घाट, गौर,शालीवाडा,कोसमघाट,बरेला, तीलहरी, रिछ्याई, शारदानगर येथे दुपारी 1-30 ला भोजनासाठी थांबलो व 1-50 ला पुढे निघालो.पुरवा, देवरीपटवारा, बम्हणी, धनपुरी येथे माँ नर्मदा सेवा समिती आश्रमात 4-15 ला मुक्कामासाठी थांबलो.
जलहेरी घाट ते धनपुरी एकूण अंतर 25 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 57 वा दिवस *शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2020 *
धनपुरी येथून सकाळी 6-30 वाजता निघालो.डँडी, पहाडीखेडा,ताकबेल, मनेरी,कोहानी, भदारी,सकरी येथे बालभोग घेऊन 11 वाजता पुढे निघालो.बंजारी सिद्धपीठ, हरडुली,ग्वारा,भलवरा,हातीतारा,गुंदलाई,भिकमपूर,बिझऊलीं, येथे देवीच्या मंदिरात संध्याकाळी 4-45 वाजता मुक्कामासाठी थांबलो.
धनपुरी ते बिझोऊली एकूण अंतर 37 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 58 व दिवस* शनिवार दिनांक 11 जानेवारी 2020*
बिझोऊली येथील देवीच्या मंदिरातून सकाळी 5-40 ला निघालो.आमगवा, बिसोरा,मणिकपूर, देवहरा, रामपूरी, देवरी,बिच्छीया, छपरा, कुंडगी, घुघुवा, गुतलवा,करौवदी रयत,भरद्वारा,शहपुरा,मुडकी बाकी,करौनदी,बरंगांव जनकल्याण जाती जमाती केंद्र येथे 4-40 ला मुक्कामासाठी पोहचलो.
बिझौली ते बरगांव एकूण अंतर 40 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 59 व दिवस* रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 *
जण जाती कल्याण केंद्र बडगाव येथून सकाळी 6-15 ला निघलो. अमेठरा, बडझर अमेरा, डुगरिया,आनाखेरा,विक्रमपूर,नूनखान,गणेशपुरा ,धनगाव, नरिया, शहापूर, आमाचुवा, धमनगाव, जोगीतिकडीया येथे माँ नर्मदा परिक्रर्मवासीं सेवासंघ येथे ठीक 6 वाजता मुक्कामासाठी पोचलो.
बरगाव ते जोगीटीकडीया एकूण अंतर 44 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 60 वा दिवस*सोमवार दिनांक13 जानेवारी 2020 *
जोगीटीकडीया येथून सकाळी 6 - 45 ला निघालो. रेवाटोला, देवरा,मुडकी, भहीरटोला,रुसा, धानामर, दुधी, हरा, ईटोर,घुंगरी,बरात, बाजापुरी,छरटोला,टेढि गावात मुक्कामासाठी ठीक 4-15ला थांबलो.
जोगीतिकडीया ते टेढि एकूण अंतर 36 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 61 वा दिवस*मगळवार दिनांक 14 जानेवारी 2020 *
टेढि लालपूर संगम येथून सकाळी 6-45 ल निघालो. बसनतपुर, पाखाटोला,कनचनपूर,खुजीया टोला, शिवाला घाट, ठाडपठार,देवरी,दमेडी, डुमरटोला, घुईदादर, सरवाडी, कस्तुरी,बिलासपूर, बद्रिटोला, पडरिया, खाटी येथे सरपंचाच्या घरी मुक्कामाला ठीक 4-45 ला थांबलो.
टेढि लालपूर ते खाटी एकूण अंतर 40 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 62 वा दिवस* मकरसंक्रांत बुधवार दिनांक 15 जानेवारी 2020*
खाटी येथून सकाळी ठीक 5-15 ला निघालो. मोहनदी, हाराई,मिरीया,फेरीसमल,दमगड, अमरकटक, माईचा बगीचा येथे ठीक 3-30पोहचलो.
उत्तर तट परिक्रमा पूर्ण. खाटी ते अमरकटक माईंची बगिया एकूण अंतर 36 किलोमीटर झाले, उत्तर तट जकुन प्रवास 1318 किलोमीटर झाले.
* तट परिवर्तन व माईची पूजा करून दक्षिण तट प्रवास सुरु.माईंची बगिया ते गीता स्वाध्याय आश्रम 3 किलोमीटर प्रवास.
परिक्रमेचा 63 वा दिवस* गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2020 *
गीता स्वाध्याय आश्रम अमरकटक येथून सकाळी 6-30 वाजता दक्षिण तट यात्रा सुरू.कबीर चबुतरा चौक, जगतपुर,बोदर, करंजीया,तेरेश, करैया,रामनगर,आमडालिहा, रुसा,पाटनगड,गोरखपूर, माधवपुर येथेश्री नरेश साहू याचे घरी 6 वाजता मुक्कामासाठी थांबलो.
आमरकट्टक ते मधवपूर एकूण अंतर 43 किलोमीट झाले.
-परिक्रमेचा 64 व दिवस* शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2020 *
श्री नरेश साहू ,मधवपूर याचे निवसातुन सकाळी ठीक 7 वाजता पुढे निघालो.चंदना,रामपूर,धावाडोगरि,मोहतारा, रत्ना,गडासराई येथे सद्गुरू शरनं या संतांचे दर्शन झाले. पुढे 12-30 ला निघालो. बरगाव, सागरटोला,सुरताटोला,सनपुरी,बोदर चौराह, सिवरी, बिझोउरी,खरंगणा,सर्रा,कोरोपाणी, चरखुटीया घाट येथे 5-15 ल मुक्कामासाठी पोहचलो. श्री व सौ चितळे या ठिकाणी सेवा देत होते.
माधवपुर ते चरखुंटिया एकूण अंतर 34 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 65 वा दिवस*शनिवार दिनांक 18 जानेवारी 2020 *
पहाटे पाऊस झाला.त्यामुळे सर्व वातावरण बदलून गेले.रस्ते व पायवाटा निसरड्या झाल्या होत्या.त्यामुळे सकाळी निघायला उशीर झाला. दलबाटीचा भोजन प्रसादी घेऊन सकाळी 10 वाजता पुढे निघालो.,बुधगाव, गिध,कुडा,महावीर,सेमरतीराह,घणाघाट, जुनी दिंडोरी येथे श्रीदेवेंद्र तुरकेल यांच्या निवास्तरणी दुपारी 3 वाजता पोहचलो. चरखुंटीया ते जुनी दिंडोरी एकूण अंतर 20 किलोमीटर झाले.
परिकर्मेचा 66 वा दिवस* रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 *
जुनी दिंडोरी ,श्री तुरकेल याच्याघरुन सकाळी 6-30ला निघालो.जमनिया,किराहाटोला,रहेगी,रियतपुरा,ईमलाइमाल,ईमलाईरैयत,सलैया,किसलपुरी, सक्का,कचनारी, बरगा,राई, बंजारीमाता,हरराटोला, गीधलौडी,कोयलीधासी,अंडीया, चाबी येथे मुक्कामास ठीक 6 वाजता पोहचलो.मंदिरात गर्दि असल्यामुळे समची व्यवस्ता रेस्ट हाऊस मध्ये करण्यात आली.
जुनी दिंडोरी ते चाबी एकूण अंतर 47 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 67 वा दिवस* एकादशी ,सोमवार दिनांक 20 जानेवारी 2020 *
चाबी येथून सकाळी 6-15 ला निघालो.खैरी,खाल्हेगीठोरी,गुप्तगँगा,मोहंगावा, बिढी, इंद्रा, रयगाव,सलीबाडा, देवगाव,(देवगाव संगम) बुडणेर नदी,बिलगाव(डोगरातून व पुढे शेतातून रस्ता),चंदवारा,पलेहरा,झिना, चौगाव,रामनगर येथे ठीक 5 -ला नर्मदा मंदिर मध्ये मुक्कामी पोहचलो.
चाबी ते रामनगर एकूण अंतर 39 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 68 वा दिवस * मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2020 *
रामनगर येथून सकाळी 6 वाजता पुढे निघालो.4 किलोमीटर पुढे आल्यानंतर असे लक्ष्यात आले की मी,इ लहान बंधू याची ब्याग तिथेच राहिली.पाठीमागे होते त्यांना फोनवर माहिती दिली अडत ते अर्ध्या रस्त्यात घेऊन आले,त्यामुळे 1 तास गेला.मुगली, मधूपुरी, घुगरा,आमगवा,खंडदेवरा,खंडदेवरी,पिपरपाणी, सुर्यकुंड, सकवा, पुरवा, महाराजपूर (रामनगर ते महाराजपूर एकूण अंतर 19 किलोमीटर.) पुढे घनसोर मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. मोहटोला, जागरवा, सुरसिधार,जारगी येथे ठीक 5 वाजता मुक्कामी पोहचलो.
रामनगर ते जारगी एकूण अंतर 39 किलोमीटर झाले.
*परिक्रमेचा69 वा दिवस*बुधवार दिनांक 22 जानेवारी 2020 *
जारगी येथून सकाळी 5-50 ला निघालो. रजरवारा,कटिया, मसुरभवरी, भिलाई, पिपरिया, माणेगाव, मोहंगाव, गुवारी, साधुटोला,कुरोपार, भूरकाळखापा, पहाडी, केवलारी,घनसौर, बाळापूर,मेहता,दारोट,देवरी,कहाणी येथे 6 वाजता श्री रघुवीर साहू याचे घरी मुक्कामासाठी पोहचलो.
जारगी ते कहाणी एकूण अंतर 47 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 70 व दिवस*गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2020 *
श्री रघुवीर साहू कहाणी ,यांचे घरून सकाळी 7 वाजता निघालो. खमरिया,भलरखेडा, सहसना, चुरका, सिहोरा बुधवांनी, हरराई, खुशीपार, लखनादौन,सिरमगनी,पिपरिया,बंजारीमता, पराशिया येथे फॉरेस्ट गार्ड याचे निवस्थांत मुक्काम केला.
कहाणी ते पराशिया एकूण अंतर 42 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 71 वा दिवस *शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2020 *
पराशीया येथून सकाळी 5-30 वाजता निघालो.गौराबी, खापा, डुडवारा, पाठा, गढरीया, मुगवानी येथे श्री गुप्ता यांच्या कडे चहा व बालभोग घेऊन पुढे निघालो.खमरिया देवनगर, बकोरी, बचई,मुगलीपौडी,अनिदाना, मुडिया,रोसरा, हॉटेल ग्रीन पार्क नरसिंगपूर येथे ठीक 5-15 ला पोहचलो.
परशिया ते हॉटेल ग्रीन पार्क नर्शीगपूर एकूण अंतर 46 किलोमिटर झाले.
परिक्रमेचा72 वा दिवस*शनिवार दिनांक 25 जानेवारी2020 *
हॉटेल ग्रीन पार्क नरशिंगपुर येथून सकाळी 5-30 ला निघालो.देवरी कला,करेली येथे 9 वाजता पोहचलो. श्री देवेंद्रपुरी गोस्वामी हे बालभोग घेऊन आले,.बालभोग घेऊन 9-45 ला पुढील प्रवास सुरु केला. वाटेसर,बनदेसुर, करपगाव,नारंगी,पणारी,पुरगवा, भम्होरी, मनकवारा, ब्राँझ, बोहानी,कौडिया येथे श्री रघुवीर साहू यांचे निवस्थांनी ठीक 5-30 ला पोहचलो.
नरशिंगपूर ते कौडिया एकूण अंतर 44 किलोमीटर.
परिक्रमेचा 73 वा दिवस*रविवार दिनांक 26 जानेवारी 2020 *
कौडिया येथून सकाळी 5-30 ला निघालो. गाडरवारा, कामटी, आमगाव,नांदनेर,बेलखेडी, गड्डा, पणागर, मालनवाडा,पलियापिपरी,बनखेडी,बाचाबानी,रजोला येथे सिगजी महाराज मंदिर येथे 5 वाजता मुक्कामासाठी पोहचलो.
कौडिया ते सिगजी महाराज मंदिर एकूण अंतर 44 किलोमीटर झाले
. परिक्रमेचा 74 वा दिवस * सोमवार दिनांक 27 जानेवारी 2020 *
सिगाजी महाराज मंदिर येथील बोअरवेल रात्री बिघडल्या मुळे , सकाळी 5 वाजता अंघोळ न करताच निघावे लागले. परिक्रमेतील पहिलाच दिवस आसा की अंघोळ न करता निघावे लागले.पुढील गावात अंघोळ करून पूजा पाठ केला. रामपूर,पिपरिया, राणीपिपरियाअंजनेरी, बरेली, शोभपूर,धोला, करणपूर,सोहागपूर येथे श्री चंद्रकांत मीना यांच्याकडे भोजनासाठी थांबलो व पुढे 2-15 ला निघालो.बमहोरी खुर्द,तिबलरी,सेमरी हरकचंद येथे मुक्कामासाठी ठीक 5-45 ला पोहचलो.
रजोला ते सेमरी हरकचंद एकूण अंतर 45 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 75 वा दिवस * मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2020 *
सेमरी हरकचंद येथून सकाळी चहा घेऊन 5 -30 ला निघालो.गुडारिया बुधवाडा,बाबई,कुठारीया, शुकरवाडा,अचलखेडा, तवाब्रिज, देवालाखेडी,निमसाडीया,जसलपूर, होशगाबाद येथे सौ.झोपे याचे घरी मुक्काम.
सेमरी हरकचंद ते होशगाबाद एकूण अंतर 40 किलोमीटर झाले.,
परिक्रमेचा 76 वा दिवस * बुधवार दिनांक 29 जानेवारी 20120 *
होशगाबाद येथून सकाळी 5 30 ला चहा व बालभोग घेऊन किनाऱ्या ऐवजी सरळ हरदा मार्गे रोडने निघालो.रोहना, सवळाखेडा,बैराखेडी,आमपूर, डोलरीया,रतवाडा, सोनखेडी, बधवाडा, धरमकुंडी, भिलटदेव, बाणापुरा,शिवणी मालवा येथील नर्मदामंदिर मध्ये मुक्काम. हौश्यागाबाद ते शीवणी मालवा एकूण अंतर 48 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 77 वा दीवस *गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2020 *
शीवणीमालवा येथून सकाळी 5-15 ला निघालो. भरलाय, रौनपीपल,पगढाल,गंजाल,छिदगाव मेल,,टीमरणी, चारखेडा, उंडा,हरदाच्या पुढे 8 किलोमीटर माखन धाब्यावर ठीक 5 -45 का मुक्कामासाठी थांबलो.
शिवणीमालवा ते हरदा माखन ढाबा एकूण अंतर 48 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 78 वा दिवस *शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 *
माखन ढाबा हरदा येथून सकाळी 5 वाजता निघालो. मसनगाव, कांकरिया, बारंगी,मदला, मूहार, छिपाबड,पोखरणी, कंडोपी,धानोरा,दगडखेडी, धारूखेडी येथील हनुमान मंदिरात मुक्कामास थांबलो तिथे श्रीमती छाया चीतारे रा पुनवले,तळेगाव दाभाडे ज्या 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करत होत्या त्या पुन्हा भेटल्या. प्रथम वर्षी म्हणजे माझ्या चौथ्या परिक्रमेत त्या म्हेस्वर ला भेटल्या दुसऱ्या वर्षी म्हणजे माझ्या 5 व्या परिक्रमेत दिंडोरी घाटावर भेटल्या व आता पुन्हा माझ्या सहाव्या परिक्रमेत धारूखेडी येथे भेटल्या
.माखन ढाबा ते धारूखेडी एकूण अंतर 45 किलोमिटर झाले
. परिक्रमेचा 79 वा दिवस*शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2020 नर्मदाजयंती *
धारूखेडी येथून सकाळी 5-15 ला निघालो.उमरखेडी,रामपूर, बेडीयाखाल, छनेरा, सकलापूर, चारखेडा खुर्द,सेलदा ,पुनर्वास,मांदला,सहेनला,देवळा,माखनि,पालसुदमाल,गोंडबेडी,मुंदी येथील दुर्गा मंदिर मध्ये 5-30 ला पोहचलो. पाचव्या परिक्रमेत मुंदीची कु बबिता राठोडंने आमच्या सोबत परिक्रमा उचलली होती व पूर्ण सुद्धा आमच्या सोबत तिने केली.आज नर्मदा जयंतीच्या मुहूर्तावर तीचे लग्न होते तिने आग्रहाने लग्नाचे आमंत्रण दिले होते व माईने त्या शुभ प्रसंगी आमची उपस्तीती घडवून आणली .व विशेष म्हणजे लग्न समयी संपूर्ण नर्मदाअष्टक ,लग्नमंडपी म्हणण्याचा योग्य आला. खरोखरच बबिता भाग्यवान ठरली की जिचे लग्न परिक्रमेनंतर ,नर्मदा जयंतीस झाले व मंगलाष्टका सोबत नर्मदाअष्टक गायिले गेले. धारूखेडी ते मुंदी एकूण अंतर 46 किलोमिटर झाले.
परिक्रमेचा 80 वा दिवस* रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2020 *
मुंदी येथून सकाळी 5 वाजता हॉटेलमध्ये चहा घेऊन निघालो.केळु, भमोरी,जलवा, देवळा, माकणी डुडगांव,बखरंगाव,करोली,हतीयाबाबा.येथून पुढे कॅनलच्या कडेच्या मार्गाने जावे लागते.पुढे खंगवाडा,अंजरुद, डुकीया येथून डोगरातूनगजाजन महाराज आश्रम ओंकारेसवर येथे ठीक 6 वाजता पोहचलो.आश्रमात श्रीमती शैलजा मोरे तासगाव येथून परिक्रमेसाठी आलेल्या होत्या त्याच्या दोबत सुरेंद्रनगर गुजरात येथून डॉ सौ मिता ठकार याही आमच्या स्वागतास उपस्तीत होत्या.
मुंदी ते ओंकारेसवर अंतर 51 किलोमीटर झाले.
परिक्रमेचा 81 वा दिवस*सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2020 *
परिक्रमा पुर्ततेचा श्री अनिलंदास महाराजांनी संकल्प देऊन परिक्रमा 81 दिवसात , ईस्टदेव धुनिवाले दादाजी व जगतजननी नर्मदामाई यांनी निर्विग्नपणे पूर्ण करून घेतली. ममलेसवरला व ओंकारेसवरला जल अर्पण करून मानधाताची परिक्रमा पूर्ण करून आश्रम आलो. संध्याकाळी ओंकारेसवर येथून निघून धुनिवाले दादाजी दरबार खंडवा येथे आलो.ईस्टदेव दादाजी चरणी नम्र होऊन त्याच्याच धक्तीने ,त्याच्याच दिव्य तेजाने 81 दिवसात परिक्रमा या देहाकडून पूर्ण करून घेतली, त्याच्या कडून मिळालेली दिव्य शक्ती त्यांनाच पुन्हा समर्पण करून,पंजाब मेलने कल्याणला आलो.कल्याण स्टेशनला घ्यावयास गाडी उभीच होती. घरी आल्या नंतर औक्षण झाले व नंतर अराम.नर्मदेहर,, नर्मदेहर, नर्मदेहर, जयश्री दादाजिकी गौरीशंकर महाराजकी जय हो धुनिवाले दादाजिकी जय हो हरिहर भोले भगवानकी जय हो परमसद्गुरू रेवानंद महाराजकी जय हो श्री गुरुदेव भक्तांनंद महाराजकी जय हो महाराणी तापिमाय तुमरी जय हो सच्चे दरबारकी जय हो अटल छत्र की जय हो श्री माँतू नर्मदेहर, हर ,नर्मदेहर ,हर