पायलट बाबा - परकम्मा
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
पायलट बाबा - परकम्मा
पायलट बाबा
नर्मदेचा अन् माझा कधी संबंध येईल अन् त्याचे दूरगामी परिणाम माझ्या मनोकायिक विश्वात खळबळ व खळखळ माजवतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी, *कपिल सिंग अद्वैत*. 15 जुलै 1938 ला जन्मलेला बिहारीबाबू. आईबाबा लाडाने *कँवर लल्लन* म्हणायचे. पुढे मी IAF मध्ये fighter planes चा वैमानिक बनलो. 1962 च्या नीच चीन हल्ल्यात माझं MiG 21 विमान रेडारवरून असंपर्क झालं. डोंगराळ मुलुख. मृत्यू समोर नाचत होता. शत्रूचा गोळा कधीही येऊन चिंधड्या उडवू शकत होता. पोटात गोळा आला. अन् तेवढयात विमानकक्षात [ cockpit ] चक्क माझे गुरू *हरीबाबाजी* आले. आतापर्यंत माझं त्यांच्याशी nodding acquaintance म्हणजे "देखल्या देवा दंडवत्" असंच नातं होतं. त्यांच्याकडे ही अशी काही कर्तूमकर्तूम अन्यथाकर्तूम शक्ती असेल असा माझ्या रगेल व रंगेल जवानीला कधी संशयही आला नव्हता. अरे बांगडू...तुझं जितकं वय [ 24 ] आहे नं...तेवढी वर्षं मी माझं बूड साधनेत घासलंय पोरा...मला ढकलून त्यांनी takeover केलं... I was shocked moreover due to his presence & not by the crunch situation.
"हरीबाबाजी तुम्ही कुठून आलात...अन् तुम्हाला या Mach2 च्या G- force मध्ये हे panel-control कसं जमणार...??" माझ्यातला वैमानिक बरळला.
अरे भडव्या...ज्यांनी हे विमान बनवलंय ना, त्या दोघांनाही [ Artem Mikoyan आणि Mikhail Gurevich ] माझे गुरू *महावतार बाबाजी* यांनीच हे विमान बनवायची बुद्धी दिली होती...भारताच्या संरक्षणासाठी !!
त्याला म्हणाव...तुमच्या रशियाचा राजा झार [ Czar ] सुध्दा बाबाजींच्या पायावर नाक रगडून गेलाय बरंका !
सबब, आम्ही सुखरूप Airbase वर अवतरलो. सगळे SO डोळे फाडून "आ" वासून बघत होते. एकटा गेलेला अन् दूकटा कसा काय आला ?? How's that ?
हरीबाबा मला "नोकरी सोड" असं बजावून निघून गेले.
पण मी ऐन गध्दे पंचविशीत होतो. Exuberence of Testosterone wasn't letting me to quit this. Defying G-force & doing acrobatic feats in mid-air was my full to business ! It was giving me full monty orgasm-like enjoyment....Oxytocin, endocrinal rush of blood, pineal & pituitary secretions were rushing & gushing in me in full throttle. Yeah..I was Masters in Science in Organic Chemistry. सो मला शरीरातून पाझरणा-या सर्वच ऐंद्रीय रसांचा परिपाक अनुभवायची चटक लागली होती.
सबब...मी काही नोकरी सोडली नाही.
अख्खा Air-Force मध्ये मी विमानाच्या उलट्या-सुलट्या कोलांट्या उड्या मारण्यात मशहूर होतो. मला *Green Pilot* असं टोपण नांव होतं. I wanted not to quit this topsy-turvy "in-air" weightlessness...but Destiny had a different dish to cater for me.
मी 65 चं युध्दही खेळलो.
शौर्यचक्रं, वीरचक्रही मिळाली. यथोचित थाटमाट झाले.
आता मी युध्दखोर झाला होतो. चटावला होतो. हिमालयाच्या पर्वतरांगा माझं जीवन बनून नसानसात दौडत होत्या.
अचानक 1971 च्या युध्दाला तोंड फुटलं.
भारत सरकारने covert operation साठी मला call दिला.
मी युध्दवेष परिधान केला.
दूस-याच क्षणाला मी पाकिस्तानी आसमंतात गगनभरा-या घेत होतो.
आणि पाहतो तर काय माझ्या MiG 21 च्या fuselage वर *हरीबाबाजी* वीरासनात बसलेले दिसले. Oh no...not again.
कितने बार बचाऊ तुझे...छोड दे यह लाईन बेटा...
अखेरीस मी भारतीय सैन्यदलाची नोकरी सोडली.
सद्गुरूंच्या कृपेने गोरखनाथ, महावतार बाबाजी, कृपाचार्य ( अश्वत्थाम्याचे मामा ), हीराखंड बाबा ( हैडाखान बाबा ), देवराहा बाबा, सुंदरनाथबाबा, सर्वेश्वरानंद बाबा [ सतिश चुरी लिखित "नमामि नर्मदे" पुस्तकात पृष्ठ क्र. 212 ] अश्या सर्व देवदूर्लभ सिध्दांची मला दर्शनं झाली.
महावतार बाबाजींनी मला नर्मदा परिक्रमेला धाडलं.
सबब...मी सन्यास घेतला अन् 1972 नंतर परकम्मा उचलली.
तसं माझं सन्यस्त नाम *सोमनाथ गिरी*...पण परकम्मेत मला नवं नांव मिळालं... *पायलट बाबा*.
ऐन मे महिन्यात मी शूलपाणी जंगलात शिरलो. राजघाटावर एकमुखी दत्ताला मला एक साथीदार येऊन मिळाला...त्याचं नांव पहाडी बाबा.
शूलपाणी येईपर्यंत मी नंगधडंग झाला होतो. फक्त फटकूर लंगोटी...बाकी उघडा-बदन...पहाडीबाबा भगव्यात होता ! दक्षिणतटीय पाऊण भाग आठवड्याभरात पार केला अन् इथे भिल्लमामांनी आम्हांला पकडून शूलपाणी सरदाराच्या दरबारात सादर केलं.
बम्मन नायक ! भिल्लांचा सरदार.
माझ्या डोईवरची कडूनिंबाची मोळी एकाने सोडून उत्सुकतेने तपासलं. त्याला वाटलं सूवर्णमुद्रा असतील. पहाडीबाबाच्या जटाही उपटल्या... पण आम्ही कफल्लक-करंटे. काहीच मिळालं नाही. आम्हांला असं अकिंचन बघून भिल्ल सरदाराने इशारा केल्याबरोबर एकाने अस्सल मधात कुस्करलेल्या रोट्या आणून आम्हास खाऊ घातल्या. घेराव घातलेले सगळे भिलटे, पावरी भाषेत कूजबूजत होते. आज नेमकी शिवरात्र होती. कदाचित् आम्हांला बळीचा बकरा तर नसतील बनवत !
मला आता पहाडीबाबा म्हणजे झेंडूच्या फुलांचा हार घातलेला बळीचा बकरा भासू लागला होता.
भेदरून मी गर्द घोळक्यातून पळण्यासाठी loopholes शोधू लागलो. Now we were like POW.( Prisoners Of War ) आता आम्ही किती काळ कैदेत मुसक्या वळून राहणार होतो माहीत नव्हतं. मला त्यांना सांगावसं वाटत होतं...अरे International captivesना *Geneva Convention* नूसार 24 तासांच्या आत सोडायचं असतं रे भौ !
POW or belligerent must be freed & sent within shortest possible time असा आंतरराष्ट्रीय कायदा आहे रे बाबांनो...पण इथे वाटतेय आंतरब्रह्मांड कायदेही लागू पडत नसावेत बहुधा !
या घोळक्यात "एक" जण उभा होता. तेजस्वी...वेगळ्या दुनियेतला भासूनही सर्वसामान्यांत मिसळलेला ! माझी लवभर त्याच्याशी नजरानजर झाल्यासरशी "तो" परतपावली चालू लागला. तो निघाल्याबरोबर सर्व सभाच पांगली. आम्ही चक्क scotfree सूटले होतो.
आम्ही त्याच्या मागे अनाहूतपणे चालू लागलो....तो डोंगर उतरणीवर चालत होता. आम्ही त्याच्या मागे पळत होतो. इतर रेंगाळलेल्या भिल्लांना आमचा असा हा अशिष्ट पाठलाग रूचला नसावा हे त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं. आटोकाट यत्न करूनही त्याच्या अन् आमच्यातलं अंतर समानच राहात होतं.
शेवटी तो निसटला.
आम्ही "लू" लागून मरू नये म्हणून शूलपाणैश्वर मंदिरात परतलो व यतिप्रायः करायचा निश्चय केला.
यतिप्रायः म्हणजेच चातुर्मास.
एव्हांना आमचे दोन आठवडे उलटून गेले होते. आशुतोष शूलपाणी महादेव आम्हाला काहिही कमू पडू देत नव्हता. एकदा आम्ही शूलपाणीच्या मेढीवर उभे असतां, "तो", परत निर्वाणशिळेजवळ उभा दिसला. सातेक फूट उंच...पिळदार मिश्या. चाणाक्ष पण भेदक नजर. पिवळ्या वस्त्रांने कपाळ झाकलेलं. माश्या घोंघावताहेत. उग्र दर्प. Smell of rotten Eggs...just like Hydrogen Sulphide. आम्ही मागून वाघ मागावर लागल्यासारखे तत्क्षणी त्याच्या मागे पळत सूटलो. आजही तो निसटून जाईल असं वाटत असतांनाच तो थांबला अन् चक्क मला मिठीत घेऊन म्हणाला," *कपिल...मी द्रोणपुत्र अश्वत्थामा. मीच तो महान कौरव सैन्याचा सेनापती. मी भूतकाळातच जगतो. हे भिल्ल माझे सखे आहेत. मी कधीकधी हिमालयात जातो कृपाचार्यांना भेटायला ! कधीकधी तेही इथे शूलपाणीत येतात. कृपमामा,विदूर, गोरखनाथ व इतर संतमंडळी इथे आली...कि शूलपाणी म्हणजे " प्रति कैलास " बनून जातं*."
पुढे तो आम्हांस शूलपाणी महादेव मंदिराच्या नजिक *मामा डोकरी* नांवाच्या गुहेत रोजच भेटीसाठी बोलावू लागला. [ ही गुहा कुठे आहे व मामा डोकरी कुणाला म्हणतात हे सद्या शूलपाणी पूजारी व सतिश चुरी यांनाच माहित आहे. ] भिल्ल आम्हा दोघांवर डाफरायचे. पण साक्षात् त्यांचा हा *माथेल्ला* आम्हांस बोलावायचा म्हणून त्यांचा नाईलाज होता.
असं म्हणतात...कि *मामा डोकरी गुहा* ही अश्वत्थाम्याची यतिप्रायःस्थली असते.
हो...दरवर्षी तो चार महिने इथे असतो. भिल्लांचा खडा पहारा असतो. चिटपाखरूही भिल्लांच्या करड्या नजरेतून सूटत नसतं या काळात. कीड-मुंग्यावरसुध्दा संशयाने बघायला हे मामालोक कमी नाही करत. भलतेच अचपळ, चंचल, तल्लख राहतात...का तर आमचा देव दूस-या कुणाच्या वाटणीला आला नाही पाहिजे....कुणी आगळिक केली, तर ठारही मारून टाकतात.
असो. शेवटी एक दिवस विरहाचा उजाडला.
कपिल...तू व पहाडीबाबा उद्या परकंबा सूधार. दैवी योजनेनूसार आपला एवढाच योग होता. इति द्रोणपुत्र !!
दूसरे दिवशी प्रातःकाळी वा-यावर फडफडणा-या शूलपाणी महादेवाच्या ध्वजेच्या साक्षीने आम्ही दोघांनी चाल मांडली. भृगू पर्वत सांडून वळसा घालून मणिबेली गांवातला दोन-चार घरांतला एरंड दिव्यांचा रात्र जगून टिकवलेला अंधूक टीमटीमाट दिसू लागला असेल नसेल तोवर इथे आम्हांस एक तिसरा परकम्मावासी भेटला...
धर्मानंद नांवाचा तरूण संन्याशी.
आम्ही आता तिघे झाले होतो.
नर्मदा नदीपात्राला खेटून आम्ही चालू लागलो. अन् एक विलक्षण घटना घडली. नर्मदा नदीपात्रावरून ऊत्तरतटाहून एक प्रचंड मोठा नाग जलाशयावरून तरंगत तरंगत वेगाने आमच्या दिशेने येतांना आम्ही पाहिला. त्याच्यासह गर्जना करत येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याने मी व पहाडीबाबा किनाऱ्याबाहेर पाच दहा फूट लांब फेकले गेलो.
पण ब्रह्मानंद मात्र डचमळला नव्हता.
तो दगड ऊगारून त्या अजस्त्र नागाला मारणार...तेवढयात साप येऊन त्याला कडकडून चावला. काही क्षणांत ब्रह्मानंदाच्या तोंडाला फेस येऊन त्यास मूर्च्छना आली. तोवर आम्हीही सावरलो पण थरथर कांपतच !! पहाडीबाबाने धर्मानंदाला मूर्च्छितावस्थेतून ऊर्जितावस्थेत आणण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पहाडीबाबा रागारागाने आता *अगस्त्यजनित सर्पमंत्र* जो कि ऋग्वेदात प्रथम मंडलात सूक्त क्रमांक 189 चा मंत्र क्रमांक 5 आहे...तो अर्धामूर्धा *ॐ मा नो अग्नेहव सृजो अघाया विष्यवे रिपवे दुच्छुनायै* पूटपूटला असेल नसेल तोच सापाचं रूपांतर एका वृध्द माणसामध्ये झालं व थरथरत्या पण जरबेच्या धारदार कंपायमान अन् मेघमंद्र स्वरात तो म्हणाला," *गुस्सा थूँक दे बेटा. मैं अवधूत बाबा हूँ. मैं वर्मदेश्वर का रहिवासी हूँ. गये पच्चीस सालों से मैं धर्मानंद कि राह देख रहा हूँ. अपना समय व्यर्थ ना गँवाओ वत्स ! जांव जांव परकम्मा का रास्ता नापो. यह खेल तुम्हारे बस्स का नहीं है. यह सब खेल शंबालानगरी से नियंत्रित होता है*."
मी असहाय्यपणे दीग्मूढ होऊन काही सूचेनासा झालो.
एक प्राण वाचवावा भौतिक जगतातला....कि अदृश्य जगतातला मायावी खेळ बघत बसावं !
मर्दूमकी गाजवून माणूस जगवायचा...कि भेदरून शेळपटासारखं आशाळभूत बनायचं.
एवढा अगतिक तर मी विमान पडतांनाही झाला नव्हतो.
पण मी, काय करायचं...काय नाही करायचं या द्वंद्वातून बाहेर येण्यापूर्वीच पहाडीबाबाने धर्मानंदाचा लोळागोळा झालेला तरणाबांड देह एका डोंगीत भरला व कुणी काही बोलण्यापूर्वीच डोंगी वल्हवत वल्हवत तो पैलतटावर निघूनही गेला....चक्क परकम्मा भंग करून पैलपार झाला. सबब,पैलतटी गुजराथ हद्दीतील आदित्य तीर्थावर काही तरी मदत मिळेल म्हणून !! पण पैलतटी कोणीही नव्हतं. धर्मानंद किनाऱ्यालगत निपचित पडला होता. एवढा अजस्त्र देह पहाडीबाबा काय उचलणार अन् कुठले डोंगर पोखरणार ? थोड्या वेळाने पहाडीबाबा निराश होऊन ऐलतटावर म्हणजे आमच्या दिशेने नावडी वल्हवू लागला. तेवढयात पाण्यावर बलदंड धर्मानंदाचा विषजर्जर काळाठिक्कर देह चक्क प्रवाहाच्या विरूध्द वाहत आमच्या दिशेने येतांना दिसला...तोही पहाडीबाबाच्या नावेला overtake करून! तोपावेतो आम्ही उभे असलेल्या नर्मदेच्या दक्षिणतटीय किनाऱ्यावरील दगडधोंड्याच्या फटीतून तो काळसर्प [ अवधूतबाबा ] बाहेर आला .
मला म्हणाला," माझं सर्पशरीर नर्मदेत फेकून दे."
माझी प्रतिक्रिया होण्यापूर्वीच नागाचं शरीर खाली पडून जराजर्जर जख्खड अवधूतबाबा नर्मदेच्या लाटेवर हेलकावणा-या धर्मानंदाच्या शरीरात प्रवेश करून ताजातवाना होत्साता उठून बसला.
दमत भागत नाव वल्हवत धापा टाकत तोवर ऐलतटावर पोचलेला पहाडीबाबा बघतो तर काय.....चक्क धर्मानंद [ परकाया-प्रवेशित अवधूत बाबा ] माझ्याशी दात खिदळत गप्पा मारतांना दिसला... हे सगळं माझ्यासाठी व पहाडीबाबासाठीही अतर्क्य होतं....भले मी महावतार बाबाजींचा व हरीबाबाजींचा चेला असलो तरी !!!
मी निमूटपणे नागाचं शरीर नर्बदेस अर्पण केलं. धर्मानंद [ तरूण झालेला अवधूत बाबा ] दात विचकत त्याच्या गुप्त योजनेवर निघून गेला. पहाडीबाबा हकनाक परकम्मा भंग पावली म्हणून जड पावलं उचलत चालेला गेला....मीही जडशीळ पावलांनी विस्मयकारी दक्षिणतटीय शूलपाणी जंगलाला " बाप्पाजी महीपती " या आविर्भावात भेदरून रामराम ठोकला. मागून पायलट बाबा, पायलट बाबा अशी कुणाची तरी हाळी ऐकूनही मी पाठ दाखवत *रेवा रेवा* मंत्र जपत नर्बदेचा रस्ता धरून पळत सुटलो.
नर्बदे हर....
सतिश चुरी -- 9823374299.