वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
श्री . वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज - नर्मदा मातेचे स्वामी महाराजांना कुमारिकेच्या रूपात दर्शन .
श्री .स्वामी महाराज नेमावर जवळील ब्राम्हणी गांवी मुक्कामी होते पण तेथिल एका दक्षिणी ब्राम्हणाने धर्मबाह्य कृत केले आहे हे स्वामी महाराजांना कळताच स्वामी महाराजांनी त्यागावी भिक्षाच घ्यायची नाही असे ठरविले व न भिक्षा मागताच परत फिरले
ती भर दुपारची वेळ होती.यावेळी जाणार तरी कोठे ? दुपार टळल्यावर पुढल्या गावी जाऊ, आजचा दिवस उपासच घडणार, असा विचार करून ते नदीतटावर एका वटवृक्षाखाली बसून राहिले.एवढ्यात तेथे एक कुमारिका आली व ती त्यांना असे म्हणाली की, "महाराज! ही तर आपली दुपारची भिक्षेची वेळ आहे.अशा वेळी आपण या ब्रम्हाणी गावात भिक्षा न घेता येथे झाडाखाली का बसून राहिला?" तिने असे विचारताच श्रीस्वामीमहाराज तिला असे म्हणाले की," या गावचे लोक धर्मभ्रष्ट आहेत.अशा लोकांकडचे अन्न घेण्यापेक्षा आजचा दिवस नर्मदेचे पाणी पिऊन राहणे काय वाईट आहे?"आजचा दिवस भिक्षेशिवाय घालवावा असे मी ठरविले." त्यावर ती मुलगी त्यांना असे म्हणाली की," महाराज! नेमावर नावाचे माझे गाव येथून जवळच आहे.तेथे तुम्ही आमच्या घरी भिक्षेस चला."
त्या मुलीचे हे म्हणणे ऐकताच श्रीस्वामीमहाराज तिला असे म्हणाले की," आपणास एकाच घरची भिक्षा चालत नाही.कमीतकमी तीन घरची भिक्षा आणि तीही दक्षिणी ब्राह्मणांच्याच घरची भिक्षा आपण घेत असतो.तुझ्या एकटीच्याच घरी येऊन मी भिक्षा कशी घेऊ?"
श्रीस्वामीमहाराजांची ही अडचण ऐकताच ती मुलगी त्यांना असे म्हणाली की," त्याची चिंता नको महाराज! या गावात दक्षिणी ब्राह्मणांची सतरा घरे आहेत.आपण माझ्या मागून या."असे म्हणून ती मुलगी पुढे झाली.श्रीस्वामीमहाराज तिच्या मागून चालू लागले.नेमावर गावात येताच मध्येच ती मुलगी कोठे दिसेनाशी झाली ते समजले नाही.श्रीस्वामीमहाराज तसेच पुढे गावात गेले व त्यांनी गावात जाऊन चौकशी केली.त्यावेळी त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे गावात दक्षिणी ब्राम्हणांची सतराच घरे असल्याचे समजले, पण ज्या मुलीने त्यांना नेमावर येथे आणले होते, ती मुलगी गावामध्ये कोणाच्याच परिचयाची नसल्याचे कळले.ती साक्षात नर्मदाच कुमारिकेच्या रूपाने आपल्या लाडक्या भक्ताच्या मदतीला आली होती.
श्रीगुरुदेव दत्त ।।
नर्मदे हर ।।