नर्मदा परिक्रमा -- सतिश चुरी
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
नर्मदा परिक्रमा -- सतिश चुरी
नर्मदा परिक्रमा -- सतिश चुरी
नर्मदे हर नर्मदे हर
*नमामी देवी नर्मदे या पुस्तकाचे लेखक पायी परिक्रमा वासी श्री सतीश चुरी यांचा दी. १९ जुन२१चा अभ्यासपुर्ण लेख सादर*
*नर्मदा परिक्रमा -- सतिश चुरी 9823374299*
*किमान एक कोटी वर्षांपासून युगानुयुगे वाहणारी *न मृता तेन नर्मदा*. *त्यामुळे ती वनुसती वाहिली... तरी तिला निदान इतिहास, भूगोल हा असणारच. तशी ती भलभलते विषय घेऊन तुम्हाला परिक्षेच्या कसोटीला लावते. तिच्या या विद्यापीठाचं नांव आहे *नर्मदा परिक्रमा*!
*कालौघात, स्थितीजन्य, परिस्थितीजन्य व देशकालवच्छिन्न परिमाणें, नर्मदा परिक्रमेची परिमाणे बदलत गेली.*
*आजमितीस नर्मदा-परिक्रमेचे असे पंधरा प्रघात दफ्तरनोंद व अदफ्तरनोंद आढळून आलेत.*
1] *मार्कंडेय परिक्रमा ( सोमसूत्री परकम्मा )* -- *भृगू महर्षी व ख्याती यांजपासून भार्गवी [ लक्ष्मी ] ही कन्या, तर धाता, विधाता हे पुत्र जाहले. विधाता व त्याची पत्नी नियती यांपासून मृकंडू जन्मला.*
*मृकंडू व मरूद्वतीपासून मार्कंडेय जन्मला.*
*मृकंडूचा तो मार्कंडेय.*
*त्याच्या उपनयनास जमलेल्यांपैकी अंगिरा ऋषींनी त्याला वारेमाप आशीर्वाद दिला. *दीर्घायुष्यी भवः* .
*मृकंडू म्हणाले," मुनीवर, मुलगा शिवाशीर्वादाने झालाय खरा...पण फक्त षोडशजीवी आहे. सोळाव्या वर्षी तो मरणार आहे. मग अंगिरा म्हणाले," याने नर्मदा नदीस गोल फेरी घालून तपस्या करावी...पोराचे प्राण वाचतील."*
*पुढे हे पोर, नर्मदेस येऊन मिळणाऱ्या एक हजार साहाय्यक नद्याही न ओलांडता व नाले-ओहोळ न ओलांडता त्यांनाही परिक्रमा करत करत नर्मदेस गोल फेरी मारून परत नर्मदा-उगमावर म्हणजे अमरकंटकास परत आलं. वाटेत कुठेतरी एका शिवलिंगास विळखा घालून त्याने अखंड *महामृत्युंजय मंत्र* *जपत साक्षात् यमराजाला रिक्तहस्ते यमसदनास पाठवलं. या घटनेवेळी तो सोळा वर्षांचा होतो...आजही तो सोळा वर्षांचाच आहे. बघा परकम्मावासींनो...परकम्मेत सोळा वर्षांचा सुकुमार जर भेटला...तर लक्षात असू द्या बरं !*
*ही परकम्मा करायला या अष्टम् चिरंजीवास 27•32 वर्षं लागली.*
2] *पद्मक परिक्रमा ( padmak circumambulation )* -- *शंखासूर नामक असूराशी युध्द करून त्याला ठार मारल्यावर, विष्णूने थकव्यापोटी चार मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी अशी निद्रा-विश्रांती घेतली होती. आषाढी एकादशीस *देवशयनी* *तर कार्तिक शुक्ल एकादशीस *देवऊठनी ग्यारस* *जीस मराठीत *देवोत्त्थापनी एकादशी* *म्हणतात. इथून पुढे चार दिवसांनी *कार्तिकी पौर्णिमा* *येते. या दिवशी एकदा शंकराने त्रिपूरासूराचा वध केला म्हणून हीस *त्रिपुरारी पौर्णिमा* *असं म्हणतात. नेमक्या याच दिवशी लाखो वर्षांपूर्वी विष्णूने दशावतारांपैकी पहिला म्हणजे मत्स्य अवतार धारण करून या मेदिनीचं संरक्षण केलं होतं. या प्रित्यर्थ्ये कार्तिकी पौर्णिमेस नदीतील जलास दीपदान केलं जातं...कारण पाण्यात देव अवतरले म्हणून !! असंही पहिले तीन अवतार हे जलाशी संबंधितच आहेत.*
*सबब, कार्तिक म्हणजे नवेंबर महिन्यात असाही पावसाळी गढूळ गाळसाळ निवळून... शुध्दजल दैवी संप्रेरकं घेऊन झूळझूळत असतं. थोडक्यात....नेमक्या या दिवसापासून पाण्याची उत्तम गुणवत्ता निसर्गातर्फे आपणांस अनुकूल होत असते.*
*जर या दिवशी नेमकं कृत्तिका नक्षत्र असेल...तर ती कार्तिकी पौर्णिमा *महाकार्तिकी पौर्णिमा* *म्हणून गणली जाते...त्यातही "भरणी" असेल , तर अधिकच लाभदायक !! याशिवाय नेमक्या या मुहूर्तास जोडून "कृत्तिकेचा चंद्र" अन् "विशाखाचा सूर्य" असेल...तर अश्या देवदूर्मिळ महाकार्तिकी पौर्णिमेला *पद्मक योग* *म्हणतात व अश्या पद्मक योगावर ऊचललेल्या परकम्मेला *पद्मक परिक्रमा* *असं म्हणतात.*
*अश्या परकम्मावासीस 18 परिक्रमांचं पुण्य लाभतं.
*कमळाच्या सर्वात कमी पाकळ्या 18 असतात. तर 20, 27, 32, शंभर, सहस्त्रदलकमल तसंच अनेकविध पाकळ्यांची कमळं असू शकतात.*
*कं अलं करोति तत् कमलम् |*
*" कं " म्हणजे जल. " अल् " म्हणजे अलंकृत करणे.*
*जलाला अलंकृत करणारं ते कंमल.*
*इंदीवर, ऊत्त्पल, कुवलय, नीलांबुजन्म या नीलकमलांच्या प्रजाती आहेत !*
*कृष्णाचा वर्ण वर्णन करतांना " इंदीवर श्याम " असा उल्लेख करतात.*
*श्वेतकमळांना "कुमूद" किंवा "कैरव" असं म्हणतात. श्वेतकमलं ही चंद्रविकासी असतात.*
*तर, लालकमलांना "अरविंद", "नलिन", "महोत्पल" व "पद्म" असं म्हणतात. रक्तकमलं ही सूर्यविकासी असतात.*
*सगळ्यात छोट्या लालकमलास *पद्मक* *असं म्हणतात व ते अष्टादशदल असते.*
*धन्य बाबा तो पद्मक परिक्रमावासी...ज्यास एका परकम्मेतच 18 परंकबा केल्याचं पुण्य ओरबाडता येते. 🤥*
3] *जल-हरी परिक्रमा* -- *जलहरी, जलेरी किंवा जलेहारी अशी नांवं असलेल्या या परिक्रमेत नदीऊगमापासून म्हणजे अमरकंटकातून परकम्मा ऊचलून दक्षिणतटावरील समुद्रसंगमावर म्हणजे विमलेश्वरास येऊन परत दक्षिणतटावरूनच माघारी फिरून परत अमरकंटकास येऊन तट-परिवर्तन करून ऊत्तरतटीय समुद्रसंगमावर म्हणजे हरी का धाम इथे येऊन तिथूनही माघारी परतत परत अमरकंटकास येऊन परकम्मा विसर्जित करण्याला *जलेरी परिक्रमा* *असं म्हणतात. यात 7200 किमीची पायी वारी घडते.*
*या परकम्मेत समुद्र ओलांडणं निषिद्ध आहे.*
4] *रूंडा परिक्रमा* -- *नर्मदाऊद्गम म्हणजे अमरकंटक सोडून कोणत्याही घाटावरून वा तीर्थावरून परकम्मा ऊचलून *नावडीपार* *म्हणजे समुद्र उल्लंघून परकम्मा उचललेल्या स्थानी येऊन परकम्मा पूर्ण करण्याला " रूंडा परिक्रमा " असं म्हणतात.*
*खरं तर या परकम्मेचं प्राचीन नांव *रूद्र परिक्रमा* *होय.*
*रूद्रचं रूद्रा झालं..व पुढे गावढंळ अपभ्रंश म्हणून रूंडा !*
5] *मुंडमाला परिक्रमा* -- *फक्त नदीउगमापासून म्हणजे अमरकंटकातून परकम्मा उचलून सागर पार करत दक्षिणतट परिवर्तन करून परत उगमतीर्थावर येण्याला "मुंडमाला परकम्मा" म्हणतात.*
6] *दंडवत् परिक्रमा* -- *मुंडमाला परिक्रमेनुसारच पण दंडवत् नमस्कार घालत केलेल्या परकम्मेस "दंडवत् परिक्रमा" म्हणतात. आजही असे महाभाग म्हणजे नर्मदावेडे दिसून येतात*.
7] *हनुमत् परिक्रमा* -- *अमरकंटकावरून परकम्मा ऊचलून दोन्ही तटांवरील तीर्थदर्शनं घेत नदीपार होत-होत केलेल्या स्वैर भ्रमणास "हनुमत् परिक्रमा" असं नांव !*
8] *द्रविड परिक्रमा* -- *अमरकंटकाहून परकम्मा सुरू करून दक्षिणतटीय सागरसंगमापर्यंत येऊन परकम्मा संपवणं किंवा दक्षिणतटीय सागरसंगमावरून म्हणजे विमलेश्वर किंवा कठपोरवरून परकम्मा उचलून अमरकंटकास येऊन परकम्मा विसर्जित करण्याला "द्रविड परिक्रमा" म्हणत होते. यात ऊत्तरतट नुसत्या नजरेने न्याहाळला जायचा. काही अंशकालमात्रे, आर्य व द्रविड वाद उद्भवल्यामुळे हा हंगामी पर्याय उपलब्ध होता. हा मानवी वाद होता.*
9] *आर्य परिक्रमा* -- *ऊत्तरतटीय ओंकारेश्वरनजिकच्या *चौबीस अवतार* *या गांवातून परकम्मा सुरू करून ऊत्तरतटीय अमरकंटकापर्यंत येऊन परत ऊत्तरतटावरूनच माघारी परतत चौबीस अवतारला परतण्याला "आर्य परिक्रमा" असं म्हणायचे. पूर्वी देव इथूनच परकम्मा उचलायचे. दक्षिणतटावर तेंव्हा दैत्यांचा सूळसूळाट झाला होता. अन् ओंकारेश्वरच्या ओंकारझाडीतही पुलत्स्यवंशी दानवांचं आधिक्य झालं होतं. सबब, आर्यांनी असा संकुचित तोडगा पौराणिक काळी काढला होता.*
10] *चंद्रकोर परिक्रमा* -- *ज्योतिर्लिंग ते ज्योतिर्लिंग परकम्मेस "चंद्रकोर परकम्मा" असं म्हटलं जात असे. ओंकारेश्वरच्या दक्षिणतटीय गौघाटावरून अमलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन परकम्मा उचलत तट परिवर्तन करत ऊत्तरतटीय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन परिक्रमा संपवण्याला "चंद्रकोर परिक्रमा" असं म्हटलं जायचं.*
11] *समर्पण परिक्रमा* -- *मुंडमाला परिक्रमेनुसार विचरण करत परकम्मा पूर्ण झाल्यावर अमरकंटकात नर्मदा जलप्रवाहात म्हणजे ज्यास आज "कबीर सरोवर" म्हटलं जाते, तिथे जलसमाधी घेऊन जीवनगाथा समर्पित करण्याला "समर्पण परिक्रमा" म्हणत असत...कबीराने व यापूर्वीही अनेक सिध्दांनी समर्पण करून आपली इहलीला संपवली आहे. किंवा मग दक्षिणतटीय शूलपाणी जंगलातील महातीर्थ म्हणजे शूलपाणैश्वर महादेव मंदिराच्या आवारात असलेल्या *निर्वाण शिळेवर* *योगमार्गाने अथवा योनिमुद्रा करून सिध्दादी संतांनी देह समर्पण केला आहे.*
12] *जलकुंड परिक्रमा* -- *नर्मदेच्या उभयतटावरील किंवा मग प्रत्यक्ष नदीपात्रांत असलेल्या कुंडांतून प्रगट होत नर्मदेच्या आजूबाजूच्या तीर्थांचा लाभ घेण्याला "जलकुंड परिक्रमा" असं म्हणतात.*
13] *विहंगम परिक्रमा* -- *वायूमार्गाने उड्डाण करत दोन्ही तटांवरून नर्मदेस एखाद्या विहंगाप्रमाणे म्हणजे पक्ष्याप्रमाणे नजरेने न्याहाळत गोल फेरी मारण्याला "विहंगम परिक्रमा" म्हणतात. बव्हंशी तांत्रिकसिध्द व अनेक अवलियांनी हा मार्ग सुधारला होता.*
14] *अंतःसलिला परिक्रमा* -- *भडोच येथील ऊत्तरतटीय *जालेश्वर महादेव मंदिर* *इथून भूगर्भाखालील गुप्त जलप्रवाहातून अमरकंटकानजिकच्या *ज्वालेश्वर महादेव मंदिर बावडी* *जिथून नर्बदेची मैत्रीण जुहिला उगम पावतेय...त्या बावडीपर्यंतचा अंतःसलिला प्रवास म्हणजे "अंतःसलिला परिक्रमा" होय. जलचर कृमी, जिवाणू, कीटाणू, विषाणू, जलदेवता, जलदैत्य आदी जलगत जीवांना लवकर म्हणजे लख-चौ-यांशीचा फेरा पुरा व्हायच्या आत ही उपरत-बुध्दी आल्यास...ते हा मार्ग चोखाळत असत. पण थांबा...अजून त्यांची परकम्मा पूर्ण झाली नाहीय.... ज्वालेश्वर महादेव बावडीपासून *माई कि बगिया* *जिथून साक्षात् ही रूद्रतनया नर्मदा ऊगम पावलीय...तिथपर्यंत आल्याशिवाय या जलगत अनुचरांची परकम्मा पूर्ण होत नाहीय. अन् हे अंतर अकरा किलोमीटर आहे. बरं, तसा अंतःसलिला प्रवाहही उपलब्ध नाहीय...कारण नर्मदाला सोडून...किंबहुना तिला फसवून तिची सखी ज्वाला ऊर्फ जुहिला ही शोणाला जाऊन मिळालीय. त्यामुळे दोघींमध्ये बेबनाव आहे.*
*मग हे जलजीव असेच ज्वालेश्वरच्या विहिरीत तिष्ठत पडून राहतात. सिध्दांची विनवणी करतात. मनधरणी करतात. मोक्षाची भीक मागत असतात. अन् तेंव्हा कुठे एखाद्या सिध्दादी संतास दया येते...व तो जोहिला ऊगमाजवळ येऊन एखाद दूसरा पोहरा पाणी शेंदून ते जल नेऊन माईच्या बगिच्यात सम्मिलीत करतो. अन् तेंव्हा कुठे या जलजीवांची "अंतःसलिला परिक्रमा" पूर्णत्व पावते. आजही आत्मज्ञानी संत सत्पुरूष आपली परकम्मा संपन्न झाल्यावर ज्वालेश्वर बावडीचं जल माईचा बाग येथील उगमकुंडात अभिसिंचीत करतात.*
15] *त्रिकूट परिक्रमा* -- *ज्या परिक्रमेत पायी चालतांना योगायोगाने महाशिवरात्रीच्या पावन पर्वकाळी तो परकम्मावासी जर अमरकंटकात असेल...तर त्यांस 3 परिक्रमांचं पुण्य लाभते. अमरकंटकाचं एक नांव *त्रिकूट* *आहे....अन् म्हणून अश्या परकम्मेस "त्रिकूट परिक्रमा* *म्हणतात.*
*हल्ली...परिक्रमेचा एक सोळावा प्रकार अस्तित्वास आलाय...अन् तो म्हणजे *शकट परिक्रमा* किंवा *वाहन परिक्रमा* !!
*आणि तो समयोचितही आहे. असे अनेक भाविक आहेत...विशेषतः स्त्रिया...ज्यांस सांसारिक जबाबदाऱ्यांतून एवढा समय देता येऊ शकत नाही शारीरिकदृष्ट्या सबला असूनही ! अश्या सर्वांनी वाहनाने परकम्मा जरूर करावी.*
*ऊपरोल्लेखित सर्वच परकम्मांचं इंगित म्हणजे *तिच्या किनारी काळ व्यतित करणं* *हे होय.*
*ज्याला जो प्रकार झेपेल परकम्मेचा...त्याने तो करावा व तिच्या किनारी काळ व्यतित करावा.*
*नर्मदे हर....जिंदगीभर...और जिंदगी के नंतर भी !!*
नर्बदे हर... सतिश चुरी