तीर्थजननी नर्मदामैय्याची परिभ्रमण-परिक्रमा
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
तीर्थजननी नर्मदामैय्याची परिभ्रमण-परिक्रमा
तीर्थजननी नर्मदामैय्याची परिभ्रमण-परिक्रमा - वंदना परांजपे
तीर्थजननी नर्मदामैय्याची परिभ्रमण-परिक्रमा
खुप वर्षापुर्वी सटाण्याच्या अहिरेगुरुजीनी [वियोगी नारायण] लिहिलेले नर्मदेहर नर्मदापरिक्रमा हे पुस्तक वाचले होते.तेव्हापासुन नर्मदापरिक्रमा करायची असे मनात होते,रोज स्नान करताना गन्गेचयमुनेचैव गोदावरी सरस्वती,नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन सनिधम कुरु.असे म्हणत मैय्याची प्रार्थना करुन लवकर योग आण असे म्हणत असे.
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 1
११/११/२०११ला हा योग मैय्याने आणला.ओम्कारेश्वरपासुन परिक्रमा सुरु केली.जितेन्द्रशास्त्री गुरुजीनी सन्कल्प पुजा सान्गितली,पुजा कढई कन्यापुजन करुन नर्मदेहर केले,नगरपालिकेच्या कार्यालयातुन प्रमाणपत्र घेउन चालायला सुरवात केली.
वाटेत श्रीराम महाराज भेटले.{ गोन्दवलेकर महाराजान्चे भक्त;मैय्याच्या उत्तर किनार्यावर नावघाटखेडीला त्यान्चा आश्रम आहे.} ते म्हणाले, मोरटक्क्याला भोजनप्रसाद घेऊन येतो.पाठीवर जड पाठपिशवी,भरदुपारचे रणरणते उन पहिल्याच दिवशी दम निघाला.जैनधर्मशाळेत पोहोचेपर्यन्त सन्ध्याकाळ झाली.कबुल केल्याप्रमाणे महाराज भोजनाचा भलामोठा डबा घेउन आले छान भोजन झाले.आमच्याकडील बोजा बघुन महाराजानी काही सामान कमी करावे असे सुचवले,त्यानुसार काही सामान त्यान्च्या जवळ ठेवले.खुप दमलो होतो,सन्ध्याकाळची मैय्याची पुजारती करुन विश्रान्ती.
पहाटे उठून विहिरीवर थन्ड पाण्याने स्नान आटोपले,पुजारती करुन प्रस्थान ठेवले.रेल्वे पुलाखालुन मैय्याच्या किनार्याने वाटचाल सुरु केली.वाटेत एका भल्या माणसाने आधारासाठी काठी हवीच असे सान्गुन बाम्बुच्या काठ्या आम्हा उभयताना दिल्या.परिक्रमेत त्यान्चा खुपच उपयोग झाला.
टोकसरला गोमुखआश्रमात भोजनप्रसाद,प्रमाणपत्रावर शिक्का घेउन पुढे निघालो. हा गोमुखाआश्रम खुप सुन्दर आहे,निसर्गरम्य.येथे एका कुन्डात गोदावरी प्रकट झालेली आहे. पीतनगर,कान्करिया,मढी,अशी गावे पार करत वेळोवेळी गावकर्याकडुन होणारे आदरातिथ्य स्वीकारत सन्ध्याकाळी रावेरखेडीला श्रीमन्तान्च्या आश्रयाला पोहोचलो.श्रीमन्त थोरले बाजिराव यान्च्या समाधीचे दर्शन घेउन समोरच राहणार्या सरपन्चान्कडे आसन लावले.वान्गी-बटाटा भाजी भाकरी असे गावरान चवीचे सुग्रास भोजन मैय्याच्या क्रुपेने मिळाले.पुजापाठानन्तर गावकर्यान्बरोबर गप्पागोष्टी करुन बिनघोर झोपलो,प्रत्यक्ष पेशवे सरक्षणास असताना भीती कसली?
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 2
परिक्रमेचा तिसरा दिवस.पहाटे चन्द्राच्या प्रकाशात मैय्याचे पात्र चमचमत होते जणू मैय्याने चन्देरी साडी परिधान केली आहे.पाणी उबदार होते,स्नानादी आटपुन राऊन्चे दर्शन घेतले.मैय्याची पुजारती केली.सरपन्चवहिनीने चहा दिला.त्या सर्वान्चा भावपुर्ण निरोप घेउन निघालो.धरणातुन रात्री पाणी सोडल्याने खडकनदी पार करणे जमणार नाही असे सरपन्च म्हणाले,त्यानी खेडी गावाहुन जाण्याचा सल्ला दिला.तीन कि.मि.वर खेडीगावातल्या सान्डव्यावरुन खडक नदी पार केली.
सान्गी गावात गावकर्यानी केलेले स्वागत स्वीकारुन पाच कि.मि.वरील बकावा या गावी आलो,या गावात शिवलिन्ग बनविण्याचे कारखाने आहेत,नर्मदेत मिळणार्या शाळिग्राम शिळेपासुन ही बनवली जातात सर्व भारतवर्षात येथुनच शिवलिन्गे पाठवली जातात.
सितारामबाबान्च्या आश्रमात गेलो,दर्शन घेउन निघणार तर महाराज म्हणाले,चहा घेतल्याशिवाय जायचे नाही. तिथे पुण्याच्या सॉ.काळेबाई भेटल्या पुण्याचे एकोणीसजण परिक्रमेत आहेत असे कळले,काळेबाईन्चे पाय सुजले होते म्हणुन त्या मागे थाम्बल्या होत्या.महाराज त्याना गाडीने सोडणार होते ह्या तीन दिवसात माणुसकीचे जे दर्शन घडले त्याने आम्ही भारावुन गेलो होतो.
बकावाहुन मर्दानाला हरिहरकुटीत पोहोचलो. मर्दाना गाव मोरध्वज राजाची राजधानी् हरिहरकुटी मैय्याच्या किनार्यावरील निसर्गरम्य आश्रम आहे.घनदाट झाडी रन्गिबिरन्गी फुलानी बहरलेला बगिचा मैय्याच्या पात्राजवळ जाण्यासाठी बान्धलेला सुरेख घाट्.आणि आतिथ्यशील सेवेकरी.खुपच छान.
क्रमश:
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 3
हरिहर कुटीचा निरोप घेउन निघालो,एका मुलाने जवळचा रस्ता दाखवला त्यामुळे एक कि.मि. चा फेरा वाचला.रस्ता धुळभरला कच्चा होता.धुळीत पावले बुडत होती पायात बुट असुनही पायाला चटके बसत होते. डोक्यावर उन रणरणत होते रस्त्याच्या बाजुला कापसाची शेते होती त्यामुळे मोठी झाडे नव्हती .तहानेने जीव व्याकुळ होत होता,जवळचे पाणी सम्पले ५/७ कि.मि. चालुन झाले असावे,मनेगाव फाटा आला,चॉक होता कुठल्या रस्त्याने जायचे?कुणी चिटपाखरुही दिसत नव्हते कोणाला विचारणार?किम्कर्तव्यमुढ होऊन रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलो.अडचणीच्यावेळी नर्मदामैय्या मदत करते असे म्हणतात .मग हाक मारली;नर्मदे हर! क्षणात प्रतिसाद आला हर नर्मदे! एक मुलगी शेतातुन रस्त्यावर आली,गोड हसली थक गयी माई? बाबाजी थक गये? लो पानी पिओ.तिने गार पाणी दिले अन्तरात्मा थन्ड झाला.सुखी रहो आमच्या मुखातुन आशीर्वाद बाहेर पडला.ती म्हणाली,सिधे चले जाना अब झाडी ही झाडी है.आम्ही धन्यवाद दिले आणि पुढे निघालो.
२/३कि.मि. गेलो तेलिभट्यान गाव आले.मैय्याच्या किनारी सितारामाआश्रमात आलो,मोठ्यापिम्पळाच्या पारावर पाठपिशवी काढुन विसावतोनविसावतो तोच हसतमुख सिताराम बाबा पाणी घेउन आले.वयवर्षे१००च्यापुढे,कमरेला फक्त लन्गोटी.लगबगीने बाबा चहा घेउन आले,खुप बरे वाटले.चहा घेतला,थोडी विश्रान्ती घेउन २५/३० पायर्या उतरुन मैय्याच्याजवळ गेलो,छान थन्डगार नर्मदाजल.तोन्डावर मारल्यावर सारा शिणवटा क्षणात पळाला.
वर आलो तोच बाबा सदाव्रत घेऊन आले,सदाव्रतात डाळ-तान्दुळ,साजुक तूप,साखर,बिस्किटचापुडा,उदबत्या,माचिस एवढे होते.आम्हाला दोघाना स्वतन्त्र सदाव्रत दिले,मी एकच पुरे असे म्हटले तर हसुन खुणेनेच असुदे असुदे म्हणाले.त्यान्चे मॉनव्रत असते.
सितारामबाबान्बद्दल गावकर्यानी असे सान्गितले की,बाबान्चा हा आश्रम धरणाच्या डुबक्षेत्रात येतो,सरकार त्याना दुसरीकडे जागा देत आहे पैसेही देत आहे पण बाबा म्हणतात मला काय करायचे पैसे?मैय्या सर्वकाही देते.मी इथुन कुठेही जाणार नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात खुप मोठा पुर आला होता पाणी सारखे चढतच होते,बाबा पारावर रामायण वाचत होते लोकानी त्याना गावात चलण्याचा आग्रह केला पण बाबा नाही म्हणाले मैय्या जो चाहेगी वही होगा असे म्हणून तिथेच बसले नाईलाजाने लोक निघुन गेले.रात्रभर पाऊस पडतच होता,सकाळी लोक आले त्याना वाटले होते बाबान्चे काय झाले असेल कोण जाणे.बघतात तर काय, बाबा बसल्याजागीच होते रामायणाची पोथी किन्चितही भिजली नव्हती.बाबान्चे फक्त पाय भिजले होते.लोकानी विचारले कसे काय झाले? बाबा म्हणाले,मैय्या आयी;श्रीरामजीके दर्शन किये ऑर चली गयी.लोकानी हर्षभराने श्रीरामाचा आणि मैय्याचा जयजयकार केला. बाबान्च्या पायावर लोटान्गण घातले
दुपारचे ४च वाजले होते त्यामुळे सर्वानुमते पुढे जावे असे ठरले,वाटचाल सुरु झाली. ३/४कि.मि. गेलो सन्ध्याकाळ झाली होती,छोट्याशा टेकडीवर गॉदाही आश्रम होता तिकडे गेलो,नन्दनभारती महाराजाना विचारून तिथे आसन लावले.घनदाट अरण्यात निसर्गरम्य आश्रम आहे. महाराज,त्यान्च्या शिष्या नर्मदामाताजी वयोव्रुद्ध आहेत.छोटेसे शेत,गायीगुरे,काही फळाची-फुलाची बाग असे सगळे सुन्दर आहे.
आज तुलाच चुलीवर स्वयम्पाक करावा लागेल सगळे मला चिडवत होते,मैय्या आहे;देखेन्गे मी म्हटले.स्नानादि आवरुन पुजारती करुन मी स्वयम्पाक घरात गेले.माताजी म्हणाल्या,बैठो! तुम्हे आदत नही चुल्हेपर खाना बनानेकी मै बनाती हु. मी मदत करते म्हटले,कणिक मळून दिली. मला ओम्कारेश्वरला भेटलेल्या महाराजान्ची आठवण झाली,चुलीवर स्वयम्पाक करण्याची गोष्ट निघाल्यावर ते मला म्हणाले होते,बेटा! मैय्याने तुम्हारेलिये अलग काम दिया है रुग्णसेवाका चुल्हेपर खाना बनाना तुम्हारा काम नही,परिक्रमामे तुम्हे हमेशा बनाबनाया खानाही मिलेगा.आज त्याची प्रचिती आली.
पहाटे स्नान पुजारती करुन निघालो,महाराजानी सर्वाना गायीचे धारोष्ण दुध दिले ते पिउन महराज माताजीना प्रणाम करुन आमची विनोबा एक्स्प्रेस प्रस्थान करती झाली.
३/४कि.मि. चाललो असू. पायवाट जन्गलात वळली आणि व्हायचे तेच झाले,वाट चुकलो.दोनएक तास भरकटलो अभिमान;आम्ही मार्ग शोधुच हा गर्व गळून पडला,नर्मदेहर! हाक मारली,प्रतिसादही त्वरीत मिळाला हरनर्मदे! आम्ही टेकडीवर होतो,खालच्या बाजुला काही गुराखीमुले होती.त्यानी खाणाखुणानी आम्हाला खाली या म्हटले,हळूहळू टेकडी उतरून खाली गेलो.त्यानी रस्ता दाखवला त्यान्चे आभार मानुन पुढे निघालो तेलियागाव गेले अमलथा आले.फुलकुमारी पवार यानी आग्रहाने चहा दिला. त्यान्च्याकडे भारती ठाकूर यान्ची चॉकशी केली,त्या अमलथा येथेच शाळेत शिकवतात.मग भारतीताईना फोन केला त्यानी शाळेत बोलावले पण आम्ही रस्ता चुकलो आणि पुढे गेलो.भारतीताईन्चा फोन आला त्याना झालेले सान्गितले मग त्यानी लेपाघाटला थाम्बा मी येते असे म्हटले.२कि.मि. वर लेपाघाट गावात शाळेजवळ पारावर थाम्बलो.थोड्याच वेळात भारतीताई आल्या.सरकारी नोकरीत व्हालेन्टरी रिटायरमेन्ट घेउन नाशिकचे सुखवस्तु जीवन सोडुन भारतीताई येथे आदिवासी मुला-मुलीला शिकवण्याचे सेवाकार्य विनामोबदला करीत आहेत. भारतीताई,निवेदिता खान्डेकरताई,उषःप्रभा पागेताई या तिघीनी २००५मध्ये पायी नर्मदापरिक्रमा केली होती.भारतीताईन्चे नर्मदापरिक्रमा एक अन्तर्यात्रा हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
भारतीताईन्चा निरोप घेउन मरकटी-नर्मदा सन्गमाजवळ मरकटिवरील पुलावरुन महेशश्वरधरणाजवळुन शान्तिनगर मार्गे माकडखेडा येथे डोन्गरेमहाराज सदाव्रतीस्थळी आलो. पडवीत आसन लावले सदाव्रत घेउन बरोबरच्या मन्डळीनी तिक्कड[कणकेच्या जाड जाड पोळ्या] आणि डाळ केली,मिरच्या भाजुन ठेचा केला.मला चतुर्थीचा उपास होता मी शेन्ग्दाणे खाल्ले.सर्वान्चे भोजन झाल्यावर थोडी विश्रान्ती घेउन २५/३० पायर्यान्चा घाट उतरुन मैय्याच्या किनार्याने पुढे वाटचाल सुरु केली.शेतीसाठी लावलेले पाण्याचे पाइप,वायरी यान्च्या जन्जाळातुन चिखल तुडवत चालत होतो,मैय्याच्या समोरील किनार्यावर महेश्वर देवी अहिल्याबाई होळ्करयान्चा राजवाडा मन्दिरे घाट दिसत होते.मैय्याच्या सानिध्यामुळे गार वारा होता त्यामुळे ऊन जाणवत नव्हते.
थोड्यावेळाने एक छोटी पण बिकट वाट असलेली टेकडी चढुन गेलो रस्ता दिसतच नव्हता काय करावे? एक शेतकरी महिला दिसली तिने मार्गदर्शन केले त्याप्रमाणे टेकडीच्या उतारावरील मोहरीच्या शेतातुन वाट काढत उतरलो,एक छोटा नाला होता एक्मेकाना आधार देत चिखलात फसत तो नाला पार केला,बरबटलेले पाय धुवुन पलिकडली टेकडी चढलो,सन्ध्याकाळ झाली होती टेकडी उतरलो पुन्हा एक चढ होता पण वर गाव दिसत होते.ते पाहुन थकवा पळाला.ते होते बडगाव.
गावात शिरताक्षणी गावकर्यानी हर्षौल्ल्साने आमचे स्वागत केले.२/३ ग्रुप मिळूण २५/३० जण झालो होतो.मग ४/५ घरात पाहुण्यान्ची विभागणी झाली.आम्ही श्री.राधेश्याम पाटिदार यान्च्याकडे राहिलो.योगायोगाने त्यान्च्या मुलीचे सासर नाशिकला आहे.मुलीच्या सासरची मन्डळी म्हणून आमचे आदरातिथ्य खास होते.स्नानाला गरम पाणी,भोजनाला खिरपुरी अगदी थाट होता आमचा.
काही ओळखपाळख नाही केवळ मुलीच्या सासरगावचे म्हणून एवढा पाहुणचार आम्ही अगदी भारावुन गेलो.गावातील बरेचजण मुलीच्या सासरकडच्याना आवर्जुन भेटायला आले.खुप गप्पा झाल्या.
बडगावलाच पुण्याच्या भागवत पती-पत्नी,माढेकरकाका,अम्बरनाथचे श्री. गोसावी भेटले.
क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 4
स्नानादि,पुजारती,चहापाणी उरकुन पाटिदार मन्डळीन्चा निरोप घेउन निघालो.गावकर्यानी पुरुषमन्डळीना धोतराची पाने दिली स्त्रियाना पान्ढरी साडी दिली म्हणाले ही परिक्रमावासीन्ची सेवा आहे. ह्या सेवेसाठी गावकरी बचतीद्वारे सोय करतात.धन्य ती सेवाभावी व्रुत्ती.
मैय्याकिनार्याने वाटचाल सुरु झाली साधारण तासाभराने नावडाटोलीला पोहोचलो.शालिवाहन आश्रम.शककर्ता राजा शालिवाहन,मातीचे सैन्य तयार करुन त्यात प्राण फुन्कुन त्याने शक-हुण यान्चा पराभव केला असी आख्यायिका आहे. येथेच मार्कन्डेय गुफा आहे,त्यानी येथे तप्स्चर्या केली असे सान्गतात. सध्याचे महन्त खुप आतिथ्यशिल आहेत.त्यानी नास्त्याला पोहे दिले.काही सत्सन्गही झाला.
पुढे निघालो,बुथगाव,ढालखेडा { येथे सुप्रसिद्ध सहस्त्रधारा धबधबा आहे पण आता महेश्वर धरणातुन पाणी सोडले तरच असतो. आज नव्हता.} मार्गे बलगावला मुना आश्रमात आलो. १२ वाजत आले होते.ओले कपडे वाळत घातले,भोजन प्रसादास थोडा अवकाश होता म्हणुन फिरुन आश्रमाचा परिसर पाहिला,मोठमोठी आम्ब्याची,चिन्चेची झाडे,फुलानी बहरलेला बगिचा सेवाभावी महन्त आणि त्यान्चे शिष्य सारेच सुन्दर. येथे पुण्याचे रानडे,शिरगोपीकर,श्रीमती वेलणकर श्री वेलणकर भेटले.
भोजनप्रसादाला मुगाची खिचडी गोड अदमुरे ताक असा बेत होता.दमलेला जीव त्रुप्त झाला. ३वाजत आले होते,पुढे निघालो,रोजचे ३०/३५ कि.मि. चालणे होत होते पायाना फोड आले होते त्यातील एक फुटला.म्हटले डायबेटीस आहे नसते दुखणे व्हायचे एका झाडाखाली बसलो बुटमोजे काढुन पायाचे ड्रेसिन्ग केले.आमच्या बरोबरील मन्डळी पुढे निघुन गेली. रस्ता नव्हताच आम्ही टेकडीवर होतो आमच्या डाव्या बाजुला तुरीची शेते होती,उजव्या बाजुला खाली मैय्या वाहत होती.टेकडीची माती बुलडोझर लावुन काढण्याचे काम चालु होते.रस्ता दिसतच नव्हता,नर्मदे हर! शेतात काम करणार्याने सान्गितले,मिट्टीके ढेरपरसे निचे उतरके किनारे किनारेसेही रस्ता है.ठीक है नर्मदे हर उतरलो ढिगारा ,बुटामध्ये माती भरली,ड्रेसिन्ग करायची बुद्धिच दिली मैय्याने नाहीतर फुटलेल्या फोडाचे काही खरे नसते.रस्ता कसला,नुसते खडक होते ,अस्ताव्यस्त वाढलेल्या बाभळी ,मैय्याला मिळणारे ओढे जागोजाग निसरडे झालेले होते.आणि जे व्हायचे तेच झाले एक ओढा पार करताना अस्मादिकानी लोटान्गण घातले.पाय घरुन अशी आपटले की विचारता सोय नाही.पाठिवर पाठपिशवी होती म्हणुन नाहितर फ्रक्चर स्पाइन नक्की होते.
ह्यान्च्या आधाराने कशीबशी सावरले.मैय्याजवळ जावुन चिखलाने भरलेले कपडे धुतले,हात-पाय धुतले मैय्याची प्रार्थना केली.मैय्या तुझ्या क्रुपेनेच परिक्रमा पुर्ण होईल,आम्हाला हिम्मत दे. पुढे निघालो, एकजण भेटला त्याने खडकावरुन चढुन कसे जायचे ते सान्गितले.
अकबरपुरा गाव लागले,मुस्लिम वस्ती होती पण आदरातिथ्य तेच बडगावात होते तसेच.चहा-पाणी घेउन निघालो.सन्ध्याकाळी ६ वाजता खल्बुजुर्ग येथे श्रीराम मन्दिरात पोहोचलो. महन्तानी स्वागत केले.मन्दिराचे काम सुरु आहे त्यामुळे पिम्पळाच्या पाराखाली आसन लावले.
मैय्याच्या घाटावर जाउन स्नान केले,कपडे धुतले.पुजारती केली.येथे बरेच मराठी परिक्रमावासी भेटले.बहुतेक सर्व सत्तरीच्या पुढचे पण उत्साह तरुणाना लाजवणारा.गरम गरम मुगाची खिचडी भोजनप्रसादात मिळाली. खुप थन्डी पडली होती,ओझे नको म्हणुन स्लिपिन्गबॉगज मागे श्रीराम महाराजान्कडे ठेवल्या होत्या,अन्थरायला बेडशीट आणि पान्घरायला पातळ शाल, जाम कुडकुडलो.
क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 5
आपण माणसे सवयीचे किती गुलाम असतो उन्हाळा असला की एसी,पन्खे लावुन आरामात झोपायचे,थन्डी असली की उबदार ब्लान्केट पान्घरुन.पण काल पिम्पळाच्या झाडाखाली,आकाशातील चान्दणे पहात रात्र काढणे किती कठीण याचा अनुभव आला.पुष्कळ वेळ चान्दण्यान्ची झालर पहात गेला.खुपच सुन्दर; रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कधी असे निवान्तपणे आपण आकाश न्याहाळू तरी शकतो का? चम चम चान्दण्या गगनात अन लखलख प्रकाश मैय्याच्या पदरात,सुन्दर चन्देरी साडी नेसल्यागत दिसत होती नर्मदामैय्या. पण जसजशी रात्र चढत गेली,थन्डीही वाढत गेली फक्त चादर अन्थरली होती सिमेन्टचा पार गार पडला होता शालही गार पडली होती थन्डीने दातावर दात वाजत होते अशा परिस्थितीत झोप लागणे शक्यच नव्हते.
भरीतभर माझे पोट बिघडले,पायाचा फोड फुटल्याने आग होत होती.परिक्रमेचा फक्त एक आठवडा होत होता कशी होणार परिक्रमा पुरी? परिक्रमेला आलो हे आपले चुकले तर नाही ना? विचारान्चा गोन्धळ उडाला होता. झुन्जुमुन्जु झाले,पिम्पळावर किलबिलाट सुरु झाला.आश्रम जागा झाला,लगबग सुरु झाली.मन्दिरात काकडारती सुरु झाली,परिक्रमावासी नर्मदा स्नान उरकु लागले,ग्रुप ग्रुपने मैय्याची पुजारती सुरु झाली.आश्रमाच्या सेवेकर्यानी सर्वाना चहा दिला तो पिवून सारे पुढच्या वाटचालीला लागले.
माझी परिस्थिती अवघड झाली होती,बरोबरच्या लोकाना पुढे जायला सान्गितले,महन्त म्हणाले; इतकी घाई करण्याची खरच गरज आहे का? थोडी विश्रान्ती घ्या बरे वाटले की पुढे जा,आम्ही थाम्बलो.८/९ वाजता नास्ता करुन मी कोरा चहा घेतला. निघालो,मुम्बई-आग्रा हायवेला लागुन बालाजी मन्दिरात गेलो,इकडे मारुतीला बालाजी म्हणतात निसर्गरम्य परिसर आहे. स्वयमभू कचरेश्वराचे दर्शन घेतले.या पिन्डीवर निसर्गतः बिल्वपत्र उमटलेले आहे.
माझ्या अन्गात चालायचे बळ नव्हते,पायाला पट्टी बान्धुन मोजे घालुन बुट घातल्यावरही पाऊल टेकवत नव्हते,मन्दिरातील महाराजानी ज्यादा शहाणपणा न करता बसने बडवानीला जा असे सान्गितले.आम्ही त्यान्चा सल्ला मानला,हायवे वर बस मिळाली,सन्ध्याकाळी बडवानीला गुरुद्वारात मुक्कामाला आलो.
बडवानी जिल्ह्याचे ठिकाण आहे. मेडिकल मधुन गोळ्या आणल्या,पायासाठी मलम घेतले. दोन दिवस बडवानीलाच राहिलो.बडवानीतील वैष्णोदेवी मन्दीर,गणपती मन्दीर पाहिले. तिसर्यादिवशी ५कि.मि. वरील राजघाटला गेलो.इथे महात्मा गान्धीन्चे अस्थीविसर्जन झाले होते म्हणून हा राजघाट,पण त्यान्चे स्म्रुतीस्थळ आता डुबले आहे. एकमुखी दत्तमन्दिर आहे.तेही डुबणार आहे.अगदी बडवानी गावापर्यन्त पाणी चढणार आहे. सर्वाना पर्यायी जागा दिलेल्या आहेत.पोट जागेवर आले,पायही बरे होते उद्या पुढे निघायचे ठरवले.
परिक्रमा सुरु करण्या आधी आम्ही शुलपाणीच्या झाडीतिल घोन्गसा येथील लखनगिरिबाबान्च्या आश्रमाला भेट देण्यास गेले होतो.मोठा अवघड प्रवास होता. बडवानी ते मोरकट्टा फक्त २५कि.मि. जायला आमच्या मारुतीव्हनला ३ तास लागले होते तिथे आम्हाला नेण्यासाठी मोटरबोट आली होती.तिच्यात चढणे ही मोठी कसरत होती. पण २ तासान्चा तो प्रवास मोठा रमणीय होता.बाबान्चा आश्रमही खुप सुन्दर हा सर्व भागही सरदार सरोवराच्या पाण्यात डुबणार आहे. बाबा नर्मदापरिक्रमा करत असताना त्याना या शुलपाणी झाडीत भिल्लमामालोकानी लूटले होते,तेव्हा परिक्रमेचा विचार पुढे ढकलून लखनगिरिबाबानी येथेच वास्तव्य केले.त्यानी आदिवासी बान्धवान्साठी शाळा काढली आहे.जवळजवळ १५०० फळा-फुलान्ची झाडे लावली आहेत,शेती-भाजीपाला लागवड केलेली आहे. सायकलपम्पाच्या सहाय्याने नर्मदेचे पाणी वर खेचुन टाक्यात साठवुन कुडूभोपळ्याच्या फळाना बारीक छिद्रे पाडुन ठिबक सिन्चन करुन झाडे वाढवली आहेत.गोशाळा उभारुन मुलाबाळान्च्या दुधा-तुपाची सोय केली आहे.पाणचक्कीच्या सहाय्याने पिठाची गिरणी चालवली जाते.उत्तम सेवाकार्य.
नुकतीच नाशिकला आमच्याच एका होस्पिटलमध्ये लखनगिरिबाबाना देवाज्ञा झाली.पण त्यान्चे शिष्य नर्मदागिरिबाबा हे सेवाकार्य पुढे नेत आहेत्.आळन्दी येथील वारकरी आणि नर्मदाभक्त श्री. चन्द्रकान्त माधवराव पवार आणि मन्डळीही हे सेवाकार्य पुढे नेत आहेत्.तर सान्गायची गोष्ट अशी की,नर्मदागिरिबाबानी त्यान्ची सर्वतोपरी मदत होणार असुनही केवळ जन्गलातील वाट खुप अवघड असल्याने शुलपाणीच्या झाडीतुन परिक्रमेत न जाण्याचा सल्ला दिला होता.त्यामुळे आम्ही झाडीतिल तुलनेने सोप्या जन्गल रस्त्याने जाण्याचे ठरवले.
बडवानीपासुन ८कि.मि. बावनगजा या जैन तीर्थक्षेत्री जाण्यासाठी सकाळी ६ वाजता गुरुद्वारात गुरुग्रन्थसाहिबान्समोर माथा टेकुन निघालो. गावाबाहेर पडल्याबरोबर तुरळक जन्गल झाडी सुरु झाली. पहिले नानी बडवानी गाव लागले.एका शेतकर्याने आग्रहाने चहा दिला,तो घेउन निघालो.आता घाट सुरु झाला.पक्षान्चा किलबिलाट अॅकत,हलका गारवा अनुभवत चालताना शिणवटा वाटत नव्हता,पायाचे दुखणेही जाणवत नव्हते.९ वाजता बावन गजाला पोहोचलो.डोन्गरात बावनगज उन्चीची भगवान पार्श्वनाथान्ची मुर्ती आहे. दर्शन घेउन खाली आलो.१० वाजुन गेले होते.झाडाखाली बसुन जवळची बिस्किटे खाल्ली.आता भैरू घाट पार करायचा होता.
डोन्गरावर वनविभागाचा सुन्दर बन्गला होता,पायथ्याशी वनविभागाचे वनोद्यान होते,सुन्दर नीट निगराणीने राखलेले.पाटीगाव जवळ आले,हायस्कुल समोर प्रल्हाद प्रजापती यानी दुकानात बोलावले,चहा दिला.मनोज मालवियला फोन केला आजचा मुक्काम त्याच्या घरी असणार होता. हा मनोज स्वतःचा व्यवसाय साम्भाळून लखनगिरिबाबान्च्या कामात मदत करत असतो,त्यानेच आम्हाला घोन्गशाला नेले होते. फोन केल्याबरोबर मनोज आला.त्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे गोई नदीवरील पुल पार करुन पाटीगावातील बाजारपेठेतील मनोजच्या घरी गेलो.
त्याचे वडील श्री.सुखदेव दुकानात होते.दुकानाच्या मागेच घर आहे. मनोजची आई,पत्नी आणि दोन गोगिरवाणी मुले रोशनी आणि पार्थ.मुले आम्हाला लगेच चिकटली नानाजी-नानीजी म्हणून.दोन वाजुन गेले होते,जेवण करुन विश्रान्ती. आज मुक्काम पाटीगाव.
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 6
पाटीगावात मनोज मालवीयच्या घरी उत्तम पाहुणचार झाला रात्री भोजनप्रसादासाठी दाल-बाटी आणि चुरम्याचे लाडू होते.मनोजच्या आईच्या हाताला अप्रतिम चव आहे. परिक्रमावासीची सेवा म्हणजे प्रत्यक्ष मैय्याची सेवा असे समजणारे हे कुटुम्ब आहे.
रोशनी आणि पार्थ तर आमची नातवन्डे असल्यासारखी आमच्याशी समरस झाली होती.ते आम्हाला घेउन गावातील साईबाबा मन्दिरात गेले लहानसे सुबक मन्दीर सुन्दर मुर्ती दर्शनाने समाधान झाले. नन्तर मारुती मन्दिरातही दर्शन घेतले.त्यान्ची शाळा बघितली.रोशनी शाळेच्या स्नेहसम्मेलनात डान्स करणार आहे,आम्ही तेव्हा आलेच पाहिजे असे तिने सान्गितले.आम्हीही हो नक्की येऊ म्हटले.
रात्री गावातील काही मन्डळी भेटायला आली. पाटीगाव या भागातली कापसाची मोठी बाजारपेठ आहे,आदिवासी भाग असुनही शिक्षणाचा भरपुर प्रसार झाला आहे,९०टक्के जनता साक्षर आहे.वगैरे गोष्टी समजल्या.आता पर्यन्तच्या प्रवासात मध्यप्रदेशातील लोक खुपच आतिथ्यशील आहेत्,परिक्रमावासी म्हणजे देवाचे रुप असतात अशी त्यान्ची धारणा आहे. नर्मदामैय्याचा नदी असा उल्लेख केलेला त्याना मुळीच आवडत नाही नदी मत कहो वो माता है हमारी,असे म्हणतात.समोर कुणी अनोळखी व्यक्ति आली तर साधे स्मितहास्यही न करणार्या मग आदरातिथ्य तर दुरची गोष्ट,अशा आपल्या सारख्या मराठी माणसाना तर माणुसकीने कसे वागावे याचा चान्गला धडा मिळतो परिक्रमेत.असो
पहाटे उठलो कारण आज बराच लाम्बचा पल्ला गाठायचा होता.स्नान पुजारती करुन खाली आलो तर पराठे दलियाची खीर असा नास्ता तयार होता.मुले झोपली होती त्याना जाग आली तर जाऊ देणार नाहीत म्हणुन अगदी गुपचुप नास्ता केला,सर्वान्चा निरोप घेउन निघालो पण... पार्थ उठलाच पाठोपाठ रोशनीही उठली मग काय जाऊ नका म्हणून भोकाड पसरले दोघानीही कमरेला मिठी मारली काहीकेल्या अॅकेनात,कसेबसे मनोजने त्याना बाजुला केले आम्ही लगेच परत येऊ असे आश्वासन दिले तेव्हा कुठे निघता आले.अगदी दिसेनासे होईतो नानाजी-नानीजी अशा हाका अॅकू येत होत्या आम्हालाही गलबलुन आले होते,मी तर रडतच होते.आम्ही दिल्लीहुन नाशिकला यायला निघालो की असेच द्रुश्य असते,खुशी आमची नात भोकाड पसरते,गुडिया मोठी आहे ती मुळूमुळू रडते,लग्नाला एवढी वर्षे झाली तरी राणीच्या {आमची मुलगी गीता} डोळ्यात पाणी तरारलेले असते,आमची अवस्थाही काही वेगळी नसते,असो खुपच विषयान्तर झाले.
भावपुर्ण निरोप घेऊन चालु लागलो.पाटी ते बोखराटा असा प्रवास करायचा होता.आवली,सावरियापानी ही गावे पार केली.जन्गल तुरळक होते ,रस्ताही चान्गला होता झपझप चालत होतो.साधारण १०कि.मि. चाललो असू,घाट सुरु झाला. खडा घाट दमछाक व्हायला लागली.उठत बसत पाणी पित मार्गक्रमणा करत होतो रस्त्यावर आम्हा दोघाशिवाय कुणी नव्हते १२ वाजले होते सकाळी केलेला नास्ता केव्हाच जिरुन गेला होता. मनोजच्या आईने बरोबर पराठे दिले होते,एका ओढयावर्च्या पुलाच्या कठड्यावर बसुन ते खाल्ले,थोडी विश्रान्ती घेउन चालु लागलो. झाडी कमी असल्याने उन खुप लागत होते बोखराटा ५कि.मि. पाटी दिसली,मी बसकणच मारली दुपारचे २ वाजुन गेले होते दोघेही खुप दमलो होतो डाम्बरी रोडमुळे बुटातही पाय पोळत होते बोखराटा येईपर्यन्त सन्ध्याकाळ झाली असती.मैय्या! नाही चालवत, कसे पोहोचणार? पाय ओढत चालत होतो कारण कुठे वस्तीचा मागमुसही नव्हता.आणि मागुन एक प्राथमिक आरोग्य केन्द्राची जीप आली,थाम्बली.ड्रायव्हर रवी कुमावत आणि विजय यादव उतरले,नमस्ते माताजी,नमस्ते बाबाजी .आम्ही बोखराटाला जात आहोत चला बसा गाडीत खुप दमला आहात आम्ही काही अॅकणार नाही तुम्हाला आमच्या बरोबर आलेच पाहिजे,असे म्हणून त्यानी आमच्या पाठपिशव्या त्यानी काढुन घेतल्या आणि आम्हाला जीपमधे बसायला भाग पाडले.त्यान्ची आपुलकी पाहुन काही बोलायला सुचलेच नाही. फक्त नर्मदे हर.
जिथे आम्ही जीपमध्ये बसलो तिथुन पुढचा घाट फारच कठीण होता,योग्यवेळी जीप पाठवली मैय्याने असेच म्हणावे लागेल.कितिही नाही म्हटले तरी तिच्या क्रुपेचा प्रत्यय आम्हाला पदोपदी येत होता.४ वाजता बोखराटाला पोहोचलो.रविने चहा दिला आणि गजानन मालवीय यान्च्या घरी सोडले.गजानन मालवीय यान्चे नाव बडवाणीला सन्जय पुरोहित यानी सान्गितले होते. आज मुक्काम बोखराटा. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 7
गजानन मालवीय यान्च्या दुकानाच्या पडवीतही थन्डी नसल्यामुळे झोप चान्गली झाली.पहाटे उठलो,हाबशावर स्नानादि आवरुन मैय्याची पुजारती करुन निघालो.मालवीय चहा घेउन आले,चहा घेतला तो पर्यन्त त्यानी आमच्या साठी शेन्गदाणे आणि गुळ बान्धुन दिला. पाठपिशव्या पाठीवर बान्धुन आमची विनोबा एक्सप्रेस निघाली परिक्रमेच्या मार्गावर.
झुन्जुमुन्जु झाले होते पायाखालचा रस्ता दिसु लागला होता. पक्षान्चा किलबिलाट मनाला सुखावत होता.आम्हाला आजही खुप मोठा पल्ला गाठायचा आहे,हा भागही शुलपाणीझाडीचाच आहे पण त्यातल्या त्यात सोपा आणि लुटालुटीचा धोका ह्या बाजुला नसतो.
५कि.मि.वरील बारिफल्या या गावी पोहोचलो.रस्त्यालगत एक आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्यकेन्द्राचे उपकेन्द्र होते,एक टपरीवजा झोपडी होती.चहा आहेका विचारले तो माणूस म्हणाला करतो मी नास्ता मिळेल का विचारले,त्याने पोहे चालतील का विचारले.मी हो म्हटले.बाजुच्या दगडावर बसलो. यथावकाश चहा घेतला,पोहे बान्धुन घेतले बिस्किटेही घेतली.आदिवासी गरीब बन्धू पैसे घेईना.परिक्कम्मा वासीसे कैसे पैसे? असा म्हणाला. नर्मदे हर! मैय्या कशी आहेत ही तुझी लेकरे,महान! हा एकच शब्द .जबर्दस्तीने त्याच्या खिशात ह्यानी पैसे कोम्बले.
गावा बाहेर पडताच रस्ता हरवला.दगडधोन्ड्यानी भरलेली वाट सुरु झाली. थोड्याच वेळात समोर खडा घाट उभा ठाकला. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे! स्वतःला समजावले आणि पुढे पाऊल टाकले. पण तो चढ छोटासाच होता.मग उतार लागला,भरभर उतरलो समोर ठाकला एक ओढा.बुट्मोजे काढुन हातात घेतले,साम्भाळुन ओढा पार केला.पुन्हा बुट चढवले.थोडे पुढे जावुन एक वळण घेतले समोर ओढा दत्त म्हणुन तयार,पुन्हा सगळे सोपस्कार,कमीतकमी १०/१२ वेळा एकच ओढा वळवळणाने समोर येत होता.मजा वाटली.आताच्या ठिकाणी पाणी कमी होते म्हणून बुट न काढता दगडा दगडा वरुन ओढा ओलान्डु लागलो हे नीटपणे पल्याड गेले पण माझे पाय भिजलेच. एक बरी जागा बघुन बसलो, बूट मोजे सुखायला ठेवले आणि पोह्यान्चा नास्ता करायला घेतला. एक आदिवासी भगिनी आपल्या मुला-मुलीला घेउन आली ,चालली होती जन्गलात कामासाठी, आम्ही मुलाना हाक मारली,आधी आली नाहीत पण आईने सान्गितल्यावर आली.गोड मुले जवळच्या लिमलेटच्या गोळ्या दिल्या अशी खुश झाली म्हणुन सान्गू. त्यान्च्या निरागस हास्याने शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला.
परत एक थोडा अवघड घाट चढलो,२ आदिवासी बन्धू भेटले,त्याना भागल अम्बा किती दुर विचारले,ते भागल अम्बाच होते.गजानन मालवीयनी सान्गितलेल्या कैलास राठोड या अन्गणवाडी चालकाचे झोपडीवजा घर रस्त्या लगतच होते पण ते घरी नव्हते घरात लहान मुलेच होती मग फक्त पाणी पिउन,त्याना खाऊ देउन पुढे निघालो.आता गाठायचे होते अम्बापाडा.
जन्गल घनदाट होऊ लागले होते रस्ता असा नव्हताच तरीही खचाखच भरलेल्या दोन जीप भेटल्या धन्य ते जीप ड्रायव्हर आणि धन्य ते प्रवासी. आज खेतियाचा बाजार होता म्हणून ही गर्दी.मोटरसायकलवालेही दामटवत होते गाडया. आम्बापाडा आले पावणेबारा वाजले होते,सखाराम रन्गारीकडे भोजनाची व्यवस्था होईल का विचारले आधी विचारु की नको असा विचार केला पण खुप भुक लागली होती,विचारले.खिचडी देतो म्हणाला,पडवीत बसलो.आम्हाला बघायला सारा पाडा जमला, पन्जाबीड्रेस घातलेली बाई आणि पायजमा-झब्बा घातलेला बाबा म्हणजे त्यान्च्या साठी प्रदर्शनीयच , आम्हीही त्याना नावे विचारली,शिक्षण विचारले.त्या छोट्याशा पाड्यावरही शाळा आहे,आदिवासीच शिक्षक आहे.मेधा पाटकरान्च्या ट्रस्टचे काम आहे हे. सखारामने भरपुर खिचडी आणली आम्ही एकच ताटली घेतली. हातसडीच्या तान्दुळाची खिचडी खुप चविष्ट होती.बळेबळे त्याच्या हातात पैसे दिले,घेतच नव्हता. या आदिवासी बान्धवान्च्या आमच्या अन्नदाता असलेल्यान्च्या उपकारात राहाणेच आम्हास आवडते. सखारामचा निरोप घेऊन निघालो.अजुन तसा बराच पल्ला गाठायचा होता.
आम्बापाडाचा घाट चढला आता पुन्हा जन्गल विरळ होऊ लागले,पण उतार होता त्यामुळे चालण्याचा त्रास कमी. ५ वाजले.बायगोर आले.इथे वनविभागाचे ठाणे आहे.टपरीवर चहा घेतला.अजुन खेतिया ८/१० कि.मि. दुर होते.सन्ध्याकाळ होऊ लागली होती.रस्ताही डाम्बरी झाला होता.पाय उचलायला हवे होते पण पाय नाही म्हणत होते. नेहेमीप्रमाणे मैय्याला दया आली. एक टेम्पो खेतियाला जात होता.बसलो त्यात आणि भुर्कन पोहोचलो खेतियाला.
खेतिया मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर आहे.दोन्ही सीमान्च्या बरोबरमध्ये बजरन्गकुटी या हनुमानाच्या मन्दिरात आसन लावले.आजुबाजुला चॉकशी केली.एकजण डबा देतात कळले,निरोप दिला ते लगेच आले.३० रु.डबा आम्ही देण्यास सान्गितले.
पायान्ची वाट लागली होती.फोड आले होते,सुजही आली होती.आज खुपच म्हणजे ४०कि.मि. चाललो होतो जवळजवळ. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 8
बजरन्गकुटी सोयीस्कर नव्हती,पायाचे फोडही बरोबर नव्हते दोन दिवसतरी विश्रान्ती घेणे जरुरी होते म्हणून तिथुन मुक्काम हलवला आणि सुरभि हॉटेलमध्ये आलो.जेवणाचा डबा खुपच छान होता.दुसर्यादिवशी तर त्या भाऊने खीरपुरी दिली पैसे मात्र फक्त ३० रु. घेतले मी विचारले तर म्हणाला,ये तो सेवा है माताजी आप परिक्रमावासी हो इसलिये आज खीर पुरी बनायी,धन्य तो मध्यप्रदेश आणि धन्य तिथले लोक. सन्ध्याकाळी महाराष्ट्राच्या बस स्थानकावर गेलो म्हटले बघावे शहादा किती दुर आहे,जवळ जवळ पन्धरा तीन वारानी महाराष्ट्राच्या भुमीवर पाय ठेवत होतो मनात भावनान्चा कल्होळ उठला होता.बस जवळ कन्डक्टर साहेब उभे होते भाऊ! मी हाक मारली,एक नाही दोन नाही; पुन्हा हाक मारली तरी तेच एक नाही दोन नाही.भाऊ !! थोडी जोरात हाक मारली, क्काय्य आहे? कन्डक्टर साहेब एकदम खेकसले,आलो महाराष्ट्रात, मी म्हटले.म्हणजे काय म्हणजे काय?कन्डक्टर उवाच.काही नाही दोन पावले दुर मध्यप्रदेश्,तिथे इतके आदरातिथ्य,इतका मान.आणि इथे माझा महाराष्ट्र माझी मराठी तर अशी वागणुक.भाऊ,मला फक्त शहादा किती लाम्ब आहे हे विचारायचे होते मी काही तुमच्या बसमधुन फुकट न्या म्हणत नव्हते. मराठी म्हणुन आपुलकीच्या भावनेने भाऊ अशी हाक मारली होती कन्डक्टर साहेब. असो.असे आहोत आपण मराठी लोक.शिष्ठ्, दुसर्याची जराही कदर न करणारे.
पाय थोडे ठीक झाले होते,पहाटे स्नान पुजा आटपुन सुरभिचा निरोप घेतला.टपरीवर चहा घेउन विनोबा एक्सप्रेस निघाली स्वतःच्या राज्यातुन परिक्रमेच्या मार्गावरुन. वाटेत काही मोर्निन्गवाकला निघालेले लोक भेटले,थोड्या गप्पा झाल्या त्यानी बळेबळे १००रु. ह्यान्च्या खिशात कोम्बले तेवढीच मैय्याची सेवा ही त्यान्ची भावना.थोडावेळ आमच्या बरोबर चालले,थोडे पुण्य मिळेल असे म्हणाले,अशावेळी काय बोलावे हे सुचत नाही.डॉक्टर,वकील असलेले ते श्री अग्रवाल,चॉधरी भर रस्त्यात आमच्या पाया पडले.नर्मदामैय्याबद्दलचा हा भक्तीभाव आम्हाला मध्यप्रदेश्,गुजराथ मध्ये सर्व ठिकाणी पहायला मिळाला.दराखेड{ महाराष्ट्र सुरु}, रायखेड,सुखीनदी.सुलतानपुर फाटा,ब्राम्हणपुरी,चान्दसैली गावे गेली.९वाजले होते एका ढाब्यावर जवळच्या शेन्गदाणे गुळाचा नास्ताकेला चहा घेतला. शहादा अजुन १० कि.मि. होते. चला पुढे.धडगाव फाटा येथे गोमाई नदीवर धरण आहे. मनोई लोनखेडा आले,शहादा ५कि.मि. राहिले होते १२ वाजले होते,पोलिसचेकपोस्ट आले.बन्द होते,ओट्यावर थोडावेळ बसलो.कडक उन होते निघालो,पोहोचलो शहाद्याला.इथे परिक्रमावासीन्साठी काहीच निवास व्यवस्था नाही.सरदार सरोवर झाल्या पासुन आणि शुलपाणिच्या झाडितिल लुटीच्या आणि कठीण चढाईच्या रस्त्यामुळे ९५टक्के परिक्रमावासी शहादा-प्रकाशा मार्गेच जातात,वर्षातील ८ महिने लोक परिक्रमा करत असतात तरीही महाराष्ट्रात फक्त प्रकाशा येथे दगडूमहाराजान्ची धर्मशाळा आहे.सरकारने आणि धनिक मन्डळीनी याचा विचार करावयास हवा. असो. शहाद्याहुन प्रकाशा जवळजवळ २०कि.मि. आहे,तेवढे चालणे तेही कडक उन्हात शक्य नव्हते,रिक्षाने प्रकाशाला आलो.दगडुमहाराज भक्तनिवासात १२५रु.भरुन खोली घेतली.
भक्त निवास चान्गले आहे. एकादशी होती,भन्डार्यातील माताजी म्हणाल्या पटकन हातपाय धुवुन या.फराळाचे तयार आहे. अनायसे प्रकाशा या दक्षिणकाशी क्षेत्री उपवास घडला. ४ नम्बरच्या खोलीत आसन लावले,हातपाय धुवुन भन्डारग्रुहात गेलो.भगर दाण्याची आमटी,खिचडी,बटाट्याची भाजी,ताक असा छान बेत होता. खुपच दमलो होतो म्हणुन विश्रान्ती.
सन्ध्याकाळी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि पुष्पदन्तेश्वराचे दर्शनास गेलो. पुष्पदन्त गन्धर्वाने शिवमहिन्म स्तोत्राची रचना येथेच केली,त्यानी स्थापिलेले शिवलिन्ग म्हणजे पुष्पदन्तेश्वर. तापीनदीच्या तीरावर ही दोन्ही मन्दिरे आहेत. जवळच मुस्लिम प्रार्थनास्थळ आहे.दोन्ही धर्मातील अॅक्यतेचे प्रतिक. सुर्यास्तसमयी दोन्ही प्रार्थनास्थळान्वर सुर्य आपलीसोनेरी किरणे सारखीच पसरत होता जणू सन्देश देत होता,सर्वधर्म समानत्व स्वदेशी स्पर्श भावना. इतके सुन्दर आकाश.रात्रीच्या थन्डीचा मुकाबला करण्यासाठी प्रुथ्वीला दिलेली जणू सुन्दर,उबदार सोनेरी शाल. खुप खुप सुन्दर नजारा.किती डोळ्यात साठ्वू किती नको असे झाले होते. पुन्ह:पुन्हा देवचित्रकारापुढे नतमस्तक होत होतो कारण हा सुन्दर नजारा,हा सुन्दर आमचा देश पाहण्यासाठी त्याने आम्हाला डोळे आणि हे निरोगी शरीर दिले आहे. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 9
पन्च पन्च उषःकाली केदारेश्वर,पुष्पदन्तेश्वराचे दर्शन घेउन विनोबा एक्स्पप्रेस निघाली. निम्भोरा पार केले खान्डसरी आले, येथेच खान्डसरी साखर कारखाना आहे.खान्डसरी साखर पान्ढरीशुभ्र नसते,पुरळ म्हणजे अगदी बारीक आणि किन्चित तपकिरी रन्गाची असते पण पान्ढर्या साखरेपेक्षा ही साखर पॉष्टीक असते हिचे दुष्परिणाम नसतात.तर खान्डसरी या गावाच्या नावावरुन या साखरेला खान्डसरी हे नाव पडले. हिलाच गावाकडे गुळी साखर म्हणतात.चला पुढे;बरेच विषयान्तर झाले. ५कि.मि. चाललो होतो ८ वाजले होते,कारखान्याच्या बाहेरच टपरीवर पाववडा-चहा असा नास्ता केला.रोजच्यापेक्षा लवकर,कारण काल एकादशी असल्याने रात्री भोजन नव्हते.
खान्डसरी गुजराथ मध्ये आहे म्हणुन आम्हाला वाटले गुजराथ सुरु झाले पण काही वेळाने परत महाराष्ट्राची हद्द लागली. थोडावेळाने परत गुजराथ,अशी गम्मत बरेच कि.मि. आहे. टपरीवर नास्ता करताना कळले होते की १०/१२ कि.मि.वर अमलाड येथे श्री. काशिनाथ पटेल यान्च्या घरी परिक्रमावासीन्साठी भोजन-निवासाची व्यवस्था आहे. निघालो,अमलाडला पोहोचलो गावाबाहेरच पटेल भेटले त्यानी आग्रहाने घरी जाण्यास सान्गितले,त्यानी सान्गितल्याप्रमाणे आम्ही गेलो.अजुन ८/१० दुसरे परिक्रमावासीही तिथे होते.स्वतः काशिनाथ पटेल बरेच व्रुध्द आहेत. त्यान्च्या मुलान्ची बहुदा वेगवेगळी घरे होती.आम्ही एका घरी होतो आणि बाकी परिक्रमावासी दुसर्या घरी होते.त्याना सदाव्रत दिले होते आणि ते स्वयम्पाक करत होते. प्रथम आम्हाला चहा-पाणी दिले.भोजन तयार होत होते,तो पर्यन्त आम्ही प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. भोजनासाठी बोलावणे आले म्हणून गेलो तर आम्हाला घराच्या मागील बाजुला धुणे-भान्डी करायच्या जागेजवळ बसण्यास सान्गितले,तिथे चुलीवर त्यान्चा घरगडी आमच्या साठी वरण-भात बनवत होता.त्यानेच आमच्यापुढे वरण-भाताची भान्डी ठेवली ताटल्या पाण्याचा गडवा ठेवला आणि तो निघुन गेला,आम्हाला समजेना असे काय आम्हीच वाढुन घ्यायचे की नाही? मोठा अपमान वाटला,उठून जावे असे वाटले पण अन्नाचा अनादर करु नये म्हणून वाढुन घेतले भात सम्पत होता तोच घरातुन एक मुलगी आली तिने आमच्यापुढे ठेपल्यान्ची ताटली अशा प्रकारे ठेवली कि,घ्या खा एकदाचे,कुठुन कुठुन येतात कोण जाणे,आणि ती आली तशी घरात निघुन गेली,अपमान सहन करण्याची हद्द झाली.आम्ही उठलो ताटल्या घासुन तिथे उपड्या घातल्या आणि येतो असे सान्गुन लगेच निघालो.
कुठे मध्यप्रदेशातिल आदरातिथ्य आणि कुठे महाराष्ट्रातील ही मानभावी सेवा. जमत नसेल तर करु नये,परिक्रमावासी भिकारी नसतात,काही व्रत म्हणुन ते स्वतःचे सुखाचे घर सोडून परिक्रमेसाठी निघालेले असतात. आणि पटेलतर आग्रह करकरुन परिक्रमावासीना घरी घेउन येतात,आणि मग त्यान्च्या घरच्या स्त्रियान्चे अतिथी बरोबर असे वर्तन? मैय्या जीवनाचे वेगवेगळे रन्ग दाखवत होती. नाहीतर असा अनुभव आम्हाला कधी आणि कसा आला असता?
ह्या सगळ्या प्रकारात खुप वेळ गेला होता.दुपारचे २ वाजले होते.रस्ता चान्गला होता दुतर्फा मोठी झाडे होती त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नव्हता पण गरममात्र खुप होत होते. वाटेत मनोज शहा भेटले त्यान्चा तळोदा येथे पेट्रोलपम्प आहे,त्याच्या मागे कनकेश्वराचे मन्दिर आहे त्याचे दर्शन घ्या असे सान्गितले,पम्पावर माझे वडील आहेत तुम्ही पुढे व्हा मी येतोच असे म्हणाले. नुकताच पटेलान्कडचा अनुभव चान्गला नव्हता त्यामुळे नुसते हो म्हणुन आम्ही पुढे चालु लागलो.
शहा यान्चा पेट्रोलपम्प आला.मनोजचे वडील बाहेर आमची वाट बघत उभे होते,मनोजने त्याना फोन केला होता. त्यानी आमचे स्वागत केले,मन्दिराचा रस्ता दाखवला आणि दर्शन घेउन या असे सान्गितले.आम्ही गेलो,दाट वनराईत कनकेश्वराचे शान्त मन्दिर आहे,सुबक बान्धकाम आहे.गाभार्यात स्वयम्भू शिवपिन्डी आहे. हात-पाय धुवुन दर्शन घेतले,अपमानाने झालेला मनाचा क्षोभ शान्त झाला.मन्दिराच्या प्रान्गणात बसलो,मनोज चहा-बिस्किटे घेउन आला.मोठ्या आदराने आम्हाला दिला. आज मुक्काम आमच्या घरी करा असे म्हणाला, आम्ही वाण्याविहिरला कन्हैयालाल परदेशी यान्च्या घरी जाणार आहोत असे म्हटले तर म्हणाला सर्वजण त्यान्च्याच घरी जातात,आम्हाला मैय्याची सेवा करण्याची सन्धी कधी मिळणार?आम्ही ठिक आहे तुमच्याकडे राहू असे म्हटले.त्याचे घर अक्कलकुवा येथे होते,म्हणजे जवळजवळ २५कि.मि.दुर.तो म्हणाला तळोदा येथुन बसने अक्कलकुवाला जा मी बस स्टन्डवर येतो.मग त्याप्रमाणे केले .
बसस्टन्डपासुन साधारण अर्धा कि.मि. अलीकडे मनोजचे घर होते.मनोज रस्त्यावर उभाच होता मग तिथेच उतरलो.मनोजचे घर म्हणजे बन्गला होता. मोठ्या आपुलकीने त्याच्या पत्नीने,आईने स्वागत केले. आमच्या सायम्प्रार्थनेतही सर्व कुटुम्बिय सहभागी झाले.रात्री भोजनप्रसादाला गुजराथी कढी-खिचडी होती,भोजनाला काय करु विचारले आम्ही सान्गितले म्हणून कढी खिचडी.चुरम्याचे लाडु मिष्ट्टान्न होते,आमच्या पन्गतीला मनोज त्याचे वडील बसले होते,आग्रह तर विचारुच नका. मनातील मैय्या म्हणाली मग आता कसे वाटते राग गेला ना? हो! तुझी क्रुपा आहे. झोपायची व्यवस्था राजेशाही होती. सारा थकवा शिणवटा छू मन्तर झाला. नर्मदे हर. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 10
सकाळी सहा वाजता मनोजचा निरोप घेउन निघालो,साधारण एक कि.मि. वर अक्कलकुव्याचे बसस्थानक आले.तिथे चहाच्या टपरीवर सुनिल मराठे आणि त्यान्चे दोस्त भेटले.एकमेकाचीचॉकशी झाली,परिक्रमेबद्दल बोलणे झाले,त्यानी आग्रहाने चहा दिला.त्यान्चा निरोप घेउन विनोबाएक्सप्रेस निघाली.
रस्ता चान्गला होता.१०कि.मि. वरील खापर या गावी पोहोचायला ९ वाजले.बाजाराचा दिवस होता खुप गर्दी होती एका टपरीवर नास्ता केला आणि पुढे निघालो.साधारण ७कि.मि. आलो,मागुन वाण्याविहिरचे कन्हैय्यालाल परदेशी त्यान्च्या मारुती गाडीतुन आले,आम्हाला पाहुन गाडी थाम्बवली,विचारले काल कुठे मुक्काम केला?आम्ही म्हटले तुमच्याकडेच येणार होतो पण मनोज शहाने आग्रह केला म्हणुन अक्कलकुवाला त्यान्च्याकडे राहिलो. काही हरकत नाही आजचा मुक्काम कुठे? गव्हाळीला पान्दुरन्गशास्त्री आठवले यान्च्या अम्रुतालयम मध्ये.तेव्हा ते म्हणाले उन झाले आहे,बसा गाडीत तेवढीच मैय्याची सेवा,बसलो गाडीत.गव्हाळीला पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजुन गेला होता.
आश्रमात पोहोचलो,पण तिथे कुणीच नव्हते आता काय करायचे? पुढे निघालो,एका अन्गणात नाना नावाचे व्रुद्ध बसले होते,त्याना विचारले ते म्हणाले येथे हल्ली सोय नाही आदिवासी लोक प्रार्थने साठी फक्त येतात,आता काय करायचे नाना याना त्रास देणे योग्य नव्हते. नानाच म्हणाले थोडे पुढे पुलावरुन पलिकडे गेलात की उजव्या बाजुला एक हॉटेल आहे तिथे तुमची व्यवस्था होईल. साधारण एक कि.मि.वर नदीवरील पुल लागला तो ओलान्डून पलिकडे गेलो उजव्याबाजुला टेकाडावर स्वागतढाबा होता.आम्हाला पाहुन श्री.सुनिल चॉधरी पुढे आले,त्यानी ढाब्याच्या मागच्या बाजुला परिक्रमावासीन्साठी बागेत सोय केली आहे. भोजनप्रसाद घेतला,सुनिलने १००रुपये दक्षिणा दिली.तिथे राहण्याची सोय नव्हती पुढे जाणे क्रमप्राप्त होते.
दुपारचे ३ वाजले होते,डोक्यावर ऊन मी मी म्हणत होते खुप थकलो होतो पण चालत राहण्याशिवाय गत्यन्तरच नव्हते.साधारणपणे ५कि.मि. चाललो असू, धनशेरा आले.तिथे गुजराथ राज्याचे चेकपोष्ट होते,५ वाजले होते,चेकपोष्टवरील इन्स्पेक्टरना विचारले ते म्हणाले चिन्ता करु नका झाडाखाली बसा एखाद्या गाडीत तुम्हाला लिफ्ट मिळवुन देतो तुम्ही डायरेक्ट राजपिपलाला जा कारण इथुन पुढे जन्गलाचा भाग सुरु होतो इथुन १०/१५ कि.मि.तरी मुक्कामाची सोय नाही दिवस लहान आहेत लवकर रात्र होते,आम्हाला त्यान्चे म्हणणे पटले आम्ही एका झाडाखाली थाम्बलो,पोलिसानी आम्हाला चहा-पाणी दिले. थकवा थोडा कमी झाला.
एक गाडी इन्स्पेक्टरनी थाम्बवली,त्याना आमची ओळख करुन दिली,पिशव्या डिकित टाकुन गाडीत बसलो,इन्स्पेक्टरान्चे आभार मानले आणि निघालो.गाडी शहाद्याच्या श्री.एकनथ पाटील,ब्रिजलाल पाटील, भगवान चॉधरी यान्ची इन्डिका होती.ते सर्वजण अम्बाजीदेवीच्या पायी वारीला गेलेल्या त्यान्च्या मुलाना भेटायला चालले होते,राजपिपलाच्याही पुढे त्याना जायचे होते.थकल्या भागलेल्या आमची व्यवस्था मैय्याने केली होती. सरळ राजपिपला येथे जाणार असल्यामुळे आमचा ३/४ दिवसान्चा प्रवास वाचला होता. आज पर्यन्तच पदोपदी हा अनुभव येतो आहे,२०/२५ कि.मि. चाल झाली,खुप दमायला झाले की मैय्या वाहनाची व्यवस्था करते आणि पुढचा मुक्काम सुलभ होतो.
आजच्या प्रवासात अक्कल्कुवा येथे वरखेडी नदी,खापरला देहली नदी,पेचरीदेव जवळ कान्जी नदी,गव्हाळीला जिरानदी आणि डेडियापाडा राजपिपलाला करसन नदी एवढ्या नद्या पार केल्या अर्थात या सगळ्या नद्यान्वर पुल होते.गव्हाळी नन्तर चिचली या गावापासुन गुजराथ राज्य सुरु झाले.आज ३०कि.मि. पायी चाललो आणि ७० कि.मि. इन्डिका गाडीने असा अक्कलकुवा ते राजपिपला १०० कि.मि. प्रवास झाला. पाटील मन्डळीनी आम्हाला राज्पिपला येथे सन्तोष चॉकडी{ सन्तोष चॉक} येथे सोडले.
सन्तोषचॉकडी ला हरसिद्धीमाता गायत्रीमाता मन्दिराची चॉकशी केली आणि तिकडे गेलो.भक्तनिवासात फक्त रात्रीपुरतीच जागा मिळाली कारण दुसर्यादिवसापासुन पुढचे ४/५ दिवस सर्व भक्तनिवास मुख्यमन्त्री नरेन्द्र मोदी यान्च्या दॉर्यासाठी आरक्षित केलेले होते.ठीक आहे.आज खुप दमलो होतो रात्रीचा निवारा गरजेचा होता.येथे भोजन प्रसादाची व्यवस्था नव्हती त्यामुळे पुरोहित भोजनालयात भोजन घेतले. अर्थात सायम्पुजारती केल्या नन्तर. आता विश्रान्ती.उद्या गोराग्रामकडे प्रस्थान.
धनशेरा पासुन दाट जन्गल सुरु झाले होते.वळणावळणाचा नागमोडी रस्ता चान्गला होता.खाचखळगे,खड्डे अजिबात नव्हते गुजराथ मध्ये झालेला विकास दिसतो. एक सम्रुद्ध प्रदेश आहे गुजराथ. जन्गलही सुन्दर होते.वाटेत जानकी आदिवासी कन्या आश्रमशाळाही दिसली,पण वेळ नसल्याने बघता आली नाही.पुढच्या परिक्रमेत पाहू असा विचार केला. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 11
राजपिपला हे जिल्हामुख्यालयाचे ठिकाण आहे.शहरात किल्ल्यासारख्या अॅतिहासिक वास्तु आहेत. हरसिद्धमाता मन्दिर हे पार्वतीचे आहे. सन्गमरवरी वास्तु आहे.आवारात चारीबाजुनी भक्तनिवासाच्या दुमजली इमारती आहेत. शेजारी गायत्रीमातेचेही भव्य मन्दिर आहे. मन्दिरासमोर तलाव आहे.
या मन्दिरात देवीला सोडलेल्या खुप कोम्बडे-कोम्बड्या आहेत्.पुर्वी देवीला बळी देण्याची पद्धत होती आता सोडुन देतात. कोम्बड्या मन्दिराच्या आवारातच नव्हे तर देवीच्या गाभार्यातही फिरतात,आवारातील झाडावर,शिखरावरही त्यान्चा मुक्त सन्चार असतो.
देवीच्या आवारातील झाडाना पाणी देण्यासाठी ठिबकसिन्चनाची व्यवस्था आहे. त्याची पाइपलाइन प्रान्गणाच्या फरशीखालुन नेलेली आहे आणि प्रत्येक झाडाच्या बुन्ध्यापाशी ठीबकसिन्चनाची तोटी उघडलेली आहे.उत्तम व्यवस्था.
भक्तनिवासात स्नानासाठी सोलरच्या गरम पाण्याची सुविधा आहे. स्नानादी उरकुन मैय्याची पुजारति केली,हरसिद्धीमातेचे दर्शन घेतले पुजा नैवेद्दयासाठी पावती केली आणि निघालो. सन्तोषचॉकडीला आलो,टपरीवर चहा घेतला.शुलपाणिश्वरमन्दिर गोराग्रामला २५कि.मि. दुर आहे.परिक्रमेचा मार्ग राजपिपलावरुनच पुढे आहे म्हणून दर्शन घेऊन परत यावे या विचाराने १०रु.सिटने रिक्षाने गोराग्रामला आलो.
पान्डवकालीन प्राचीन शुलपाणेश्वराचे मन्दिर सरदार सरोवराच्या पाण्यात बुडाले म्हणून येथे टेकडीवर गुजराथ सरकारने नवीन मन्दिर बान्धले आहे.मन्दिराच्या सभोवती सुन्दर बगिचा फुलवलेला आहे.सुन्दर परिसर आहे. पायथ्यापासुन ३०/४० पायर्या चढुन आपण मन्दिर प्रान्गणात येतो. मन्दिर सन्गमरवरी आहे. भव्य गाभार्यात शिवपिन्डीचे प्रसन्न दर्शन होते. मानसपुजा करुन शिवस्तोत्र म्हटले. नर्मदामैय्याचे पिता शिवशम्भो आपल्या क्रुपेने ही परिक्रमा पुर्ण होवो अशी प्रार्थना केली.
मन्दिर परिसरात भक्तनिवासाचे बान्धकाम चालु आहे.तेथिल महन्ताना प्रणाम करुन निघालो. मन्दिरापासुन काही अन्तरावर नर्मदामैय्यावर केवडियाला जाणारा पुल आहे. पुला खालुन मैय्याच्या पात्राजवळ जाण्यासाठी सिमेन्टचा रस्ता आहे,यावर्षी पावसाळ्यात प्रचन्ड पुर आला असताना सन्तापलेल्या मैय्याने हा रस्ता उखडुन टाकला होता.तरीहि थोडा फार भाग जाण्यासाठी होता,मैय्याजवळ गेलो.सुन्दर मैय्या दर्शन. खलबुजुर्ग,राजघाट सोडल्या पासुन मैय्याच्या जलाने स्नान झाले नव्हते.स्वच्छ नितळ पाणी,स्नानासाठी चान्गली जागाही होती म्हणुन स्नान केले.छान वाटले.
पोटपुजेची वेळ झाली होती,हरिहरकुटीबद्दल कळले,२कि.मि. चालुन तिथे पोहोचलो. निसर्गरम्य ठिकाणि हा आश्रम आहे. येथिल व्यवस्थापक एक माताजी आहेत. भोजनप्रसादाला अवकाश होता,चहा घेउन परिसर बघायला निघालो. गोशाळा आहे.आदिवासी मुलीन्ची शाळा आहे. परिक्रमावासीन्साठीच्या दालनात आसन लावले.तिथे एक तरूण सन्यासी भेटला,बी.कॉम. शिकलेला होता.
भोजनप्रसाद घेतला,माताजीना प्रणाम करुन निघालो. आनन्दाआश्रयधाम बद्दल अॅकले होते तिकडे जाणार होतो पण नन्तर विचार केला आज इथे राहिलो तर उद्या इथुन राजपिपला आणि नन्तर पुढे जाण्यास उशीर होईल तेव्हा आज जर राजपिपलाला राहिलो तर उद्या पुढचा प्रवास लवकर सुरु करता येइल,म्हणून रिक्षाने राजपिपलाला आलो, हरसिद्धीमाता मन्दिरात जागा मिळणार नाही हे माहीत होते म्हणून गावात एखादे हॉटेल पहावे म्हणून गेलो.एवढे जिल्हयाचे ठिकाण पण फक्त ३/४ हॉटेल होती पण तिही मोदीन्च्या लोकान्साठी राखीव ठेवलेली होती. ह्या सगळ्या खटाटोपात खुप उशीर झाला ४ वाजुन गेले,उन्हाचा त्रासही होताच.शेवटी पुन्हा गोराग्रामला जायचा निर्णय घेतला.रिक्षाने पुन्हा गोराग्रामला आलो.
स्टॉप पासुन २कि.मि. दुर आनन्दाआश्रयधाम होते,गेलो. इतका निसर्गसुन्दर आश्रम आहे.बघुनच खुप छान वाटले.परिक्रमावासीन्साठी स्वतन्त्र इमारत आहे,पण तेथिल व्यवस्थापकानी आम्हाला मुलान्च्या वसतिग्रुहातील एक स्वतन्त्र खोली दिली सर्व सुखसोयीनी युक्त खोली. आसन लावले,हातपाय धुवुन मन्दिरात दर्शनाला गेलो.श्रीम्रुत्युन्जयेश्वराचे मन्दिर भव्य आहे. शिवपिन्डी व्यतिरिक्त राम क्रुष्ण देवी गणपती यान्चीही मन्दिरे आहेत.मन्दिर सन्गमरवरी आहे.समोरच नर्मदामैय्याचे शान्तशीतल दर्शन सतत होते. रमणीय मन्दिर परिसर.सुन्दर भव्य गोशाला.खुपच आवडले.
दिवेलागणीच्या वेळी सर्व मन्दिरपरिसरात ,घाटाच्या मार्गावर पणत्या लावतात. इतके सुन्दर शान्त द्रुश्य.सन्थ वाहणारी मैय्या जणू आम्हाला म्हणत होती असे सगळे सुन्दर पवित्र ठिकाण न बघता तुम्ही पुढे जाऊ नये म्हणुनच तुमची राजपिपलाला व्यवस्था केली नाही.
रात्री भोजनप्रसादाच्यावेळी महन्त म्हणाले,आता दोन दिवस रहा,इथला नित्यक्रम पहा नन्तर पुढे जा. आम्हालाही हे सर्व खुप आवडले होते,आम्ही त्याना होकार दिला. भोजना नन्तर प्रत्येकाला एक मोठा पेला भरुन गायीचे दुध देतात. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 12
स्नान,पुजारती करुन देवदर्शन केले,चहा घेउन आणि सर्वान्चा निरोप घेउन नर्मदे हर म्हणून विनोबा एक्स्प्रेस निघाली .पिशव्यान्मधल्या सामानाचे रीसटीन्ग केल्यामुळे ओझे थोडे हलके वाटत होते.२कि.मि.वरील बसस्टॉपवर आलो,लगेचच रिक्षा मिळाली राजपिपलाला सन्तोष चौकडीला उतरलो.परिक्रमेच्या रस्त्याची चौकशी केली आणि चालु लागलो. हरसिद्धीमाता मन्दिरात दर्शन घेउन काळाघोडा मार्गे ओरीच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
करसन नदीवरील पुल ओलान्डून वरपाडा गावात आलो.आठ वाजुन गेले होते चहा घ्यावा असे वाटत होते कुठे मिळेल असे बघत होतो तर तिथे कामावर जाण्यासाठी उभे असलेले एका ग्रुहस्थानी नर्मदे हर म्हटले,स्वतःची ओळख सान्गितली मी नगीनभाई तुम्हाला आमच्याकडचा चहा चालेल का? मी मुस्लीम आहे म्हणून विचारतो.मी म्हटले,न चालायला काय झाले अहो चालेलच नाही तर धावेल. हिन्दू-मुसलमान दोघेही बाबा बर्फानीअमरनाथचे सन्तान.द्यावा आम्हाला चहा.तिथे मागच्या बाजुलाच त्यान्चे घर होते,नगीनभाईनी पत्नीला चहा देण्यास सान्गितले आणि कामावर जायचे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा नर्मदे हर म्हणून ते गेले.सबिनाभाभीनि नर्मदेहर म्हणून आम्हाला चहा आणि बिस्किटे दिली.त्यान्चामुलगा ;समीर त्याचे नाव,नर्मदे हर म्हणून आमच्या पाया पडला. नर्मदामैय्या सर्वान्चीच माता आहे. चहा घेउन आम्हीही नर्मदे हर म्हणून त्यान्चा निरोप घेतला.
साधारणपणे २/३कि.मि. चाललो असू,दोन रस्ते लागले हायवे अन्कलेश्वरला जात होता ह्याच रस्त्याने ओरी असेल कारण नन्तर आम्हालाही अन्कलेश्वरला जायचेच होते असा विचार करुन चालु लागणार तोच काही परिक्रमावासी त्या दुसर्या रस्त्यावरुन जाताना दिसले,मग एकजणाला विचारुन त्या दुसर्या रस्त्याने चालायला सुरवात केली.
या रस्त्याला फारशी झाडे नव्हती उन लागायला लागले होते दहा वाजले साधारणपणे बाराएक कि.मि. चाललो असु.वरखड गाव आले.रसिकभाई भेटले सरपन्च आहेत या गावाचे.रस्त्याच्या कडेलाच त्यान्चे घर होते त्यानी घरी चला म्हटले आम्हालाही तहान लागली होती,जवळचे पाणी सम्पले होते गेलो. रसिकभाई देवभक्त होते बराच मोठा देव्हारा होता बर्याच तसबिरी होत्या.घरात म्हातारी आई,पत्नी मुले होती. नर्मदेहर म्हणून सर्वजणानी नमस्कार केला.चहा-पाणी झाले.रसिकभाई म्हणाले जेवण येथेच करा पटकन भाजी-भाकरी तयार होईल.पण जास्त उशीर झालेला नव्हता म्हणून नको म्हटले आणि ओरीही आता फक्त ३/४कि.मि.च राहिले होते म्हणून पुढे निघालो.
रस्ता कच्चा होता पण मधुन मधुन झाडाची सावलीही मिळत होती त्यामुळे जीवाची अगदी काहिली होत नव्हती पण उनतर लागतच होते.ओरी बर्यापैकी मोठे गाव होते.कोटेश्वर मन्दिराची चौकशी केली,मन्दिर गावाबाहेर होते.थोडे चालुन उजव्या हाताला मन्दिराकडे जायला वळलो,दुतर्फा केळीच्या बागा होत्या जीवाला गार वाटले.केळी काढायचे काम चालले होते.
कोटेश्वर मन्दिर सुबक सन्गमरवरी आहे. तिथे एक माताजी व्यवस्थापक आहेत.गोड हसुन स्वागत केले आणि म्हणाल्या,आसन लावा हात पाय धुवुन घ्या भोजन वाढते. थन्डगार पाण्याने नळावर हातपाय धुतले बरे वाटले.भोजनाला आमटी,भात तिक्कड आणि मिरचिचे लोणचे होते.मी लोणचे तिखट असेल म्हटले तर वाढणारा मुलगा म्हणाला या मिरच्या तिखट नसतात,खरोखरच मिरच्या तिखट नव्हत्या लोणचे मोठे चविष्ट होते.स्वयम्पाक रुचकर होता,आत्माराम त्रुप्त झाला. भोजन झाल्यावर माताजीनी एक वही दिली आणि त्यात आमचे नाव पत्ता लिहायला आणि आमच्या वहीवर त्यान्चा शिक्का मारुन घ्यायला सान्गितले .
कोटेश्वरहुन निघालो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता.आतापर्यन्त १४कि.मि. चाललो होतो सिसोदरा ४कि.मि. आणि तिथुन पुढे ८कि.मि. पुढे कार्तिकेश्वर{स्कन्देश्वर} मौनीबाबा आश्रम कान्दरोज. पाय उचलायला हवेत.उन खुप होते भोजनही झालेले त्यामुळे चालण्याचा वेग कमी झाला होता. सिसोदरा आले तेव्हा साडेतीन वाजले होते.गावाला छान प्रवेशद्वार होते,समोरच मोठा पिम्पळाचा पार होता,गार सावलीला बसलो.गावात कुणा मालदार आसामीकडे एखादा समारम्भ असावा,पाराखाली बर्याच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. नर्मदेहर झाले,आम्हाला राहण्याचा आग्रहही झाला पण आम्ही आजचा मुक्काम कान्दरोजला ठरवला होता म्हणून नाही म्हटले.चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली. रस्ता प्रवेशद्वारा बाहेरुन डाव्या बाजुला होता.
कच्चा रस्ता दुतर्फा शेते पण सावलीसाठी मोठी झाडे नसल्याने उन्हाचा त्रास खुप होत होता.साधारणपणे तीन चार कि.मि. चाललो असुनसु माझे डोके खुप दुखायला लागले कसेतरी होत होते सिसोदर्याला राहिलो असतो तर बरे झाले असते असे वाटायला लागले,पण आता सिसोदरा चार कि.मि. आणि कान्दरोजही चारच कि.मि. राहिले होते पुढे जाणेच इष्ट.मैय्या दमले ग बाई ! नर्मदे हर.
पाय ढकलत होतो आणि... एक जीप आली,नर्मदे हर माताजी नर्मदेहर बाबाजी जीपमधील माणसाने हाक मारली.कुठे जाणार? कार्तिकेश्वर मौनीबाबा आश्रमात आमचे उत्तर.बसा;मी सोडतो. ते होते अरुणभाई विठ्ठलभाई पटेल.बसलो.
आम्ही गाडीत बसलो तिथुन पुढचा रस्ता अतिशय खराब होता.थोड्याच वेळात एक नदी लागली तिला खुप पाणी होते,अरुणभाई म्हणाले समुद्राला भरती आली की हिला पाणी चढते.म्हणजे आता थोड्याच दिवसात आमचा दक्षिण किनार्यावरचा परिक्रमेचा भाग पुर्ण होणार याचा आनन्द झाला. अरुणभाईनी अगदी लीलया जीप त्या पाण्यातुन बाहेर काढली,आणि एक चढ चढुन थाम्बवली.म्हणाले या उजव्या बाजुच्या रस्त्याने जा तो बघा तो दिसतो आहे तोच मौनीबाबा आश्रम. नर्मदे हर.अशातर्हेने पुन्हा मैय्या आपल्या बालकान्ची किती काळजी घेते याचा प्रत्यय आला ऊर भरुन आलेंअर्मदे हर.
सन्ध्याकाळ झाली होती.आश्रमात पोहोचलो,महाराज बाहेर गेले होते सेवेकर्याने पडवीत आसन लावायला सान्गितले त्या पडवीत आधीच बरेच परिक्रमावासी बसले होते,विड्यान्च्या धुराने पडवी भरली होती तम्बाखुचा वास प्रचन्ड होता मला तिथे रहाणे शक्यच नव्हते,सेवेकर्याला मी तिथे राहण्यास नकार दिला आणि खोली द्यावी अशी विनन्ती केली ते म्हणाले महाराज आल्यावर तेच काय ते सान्गतील. आम्ही झाडाच्या पारावर बसलो,समजा खोली नाही मिळाली तरी पारावर रहाणे त्या पडवीपेक्षा कितितरी चान्गले असा विचार केला.हातपाय धुवुन चहा घेतो तोच महाराज आले,त्यानी आम्हाला खोली द्यायला सान्गितली.
महाराज खुप शिकलेले आहेत.आमच्याशी खुप वेळ बोलत होते. मौनीबाबानी या ठिकाणी तप केले होते.त्याकाळी या जागी दाट जन्गल होते,स्वयम्भू स्कन्देश्वरा बद्दल लोकाना काहिही माहित नव्हते,मौनीबाबानी या क्षेत्राचा विकास केला.आता मौनीबाबा नाहीत त्यान्ची समाधी बडोदा येथे आहे. रात्री भोजनानन्तर भजनाचा कार्यक्रम झाला.आता विश्रान्ती.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 13-14
आनन्द आश्रय धाम गोराग्राम-राजपिपला सुन्दर आश्रम.पहाटे ४ वाजता मन्दिरात पुजाभिषेकाला सुरवात होते,रुद्रपाठ,शिवमहिन्म स्तोत्रपाठ होतो त्यानन्तर होतो मधुर शन्खनाद,आरतीला यावे असा सन्देश शन्खनादाद्वारे देतात.तबला पेटी म्रुदुन्ग डमरु आणि झान्जा यान्च्या तालावर सुरेल आरती सुरु होते. तेथिल वेदशाळेतील विद्यार्थी हे सर्व करतात. अत्यन्त शिस्तशीर वातावरण असते. पुजारतीनन्तर चहापान होते आणि सर्वजण आपापल्या कामाला लागतात.
आम्ही मैय्या किनार्याने फिरायला बाहेर पडलो कारण नास्ता ८ वाजता मिळणार होता. सुर्योदय नुकताच झाला होता. प्राची गुलाबी लालसर रन्गाने न्हाउन निघाली होती. छान गार वारा सुटला होता अर्थात थन्डीही वाजत होती पण वातावरणात उत्साह भरुन ओसन्डत होता. आश्रमाच्या बगिच्यातील फुले सुन्दर उमलली होती सुगन्ध वातावरणात दरवळत होता. घाटावर उतरलो मैय्याच्या पात्रात पाणी कमी होते,थोड्याच दुरीवर सरदार सरोवर असल्याने पाणी सोडले तरच पात्रात पाणी असते पण तरिही अधुनमधुन असलेल्या खडकान्च्या कपारीमधुन अवखळपणे दूडु दुडू धावणारी जलरुपी नर्मदामैय्या सोनेरी उन्हाचे चमचमते परकर पोलके घातलेल्या अवखळ बालिके सारखी गोजिरवाणी दिसत होती. पात्रातिल दगडा खडकान्च्या आश्रयाने उभ्या रानवेली आणि त्यान्च्यावर उमललेली छोटी छोटी रन्गिबिरन्गी सुन्दर फुले जणू तिच्या सोनेरी परकर चोळीवरचा कशिदाच. कितीतरी वेळ आम्ही अनिमिष नेत्राने भान हरपुन बघत होतो.
नन्तर तसेच किनार्याने शुलपाणेश्वराच्या मन्दिराकडे गेलो.वाटेत हरिधाम दिसले,काल दुपारी तिथे भोजनप्रसाद घेतला होता.आश्रमाची मागची बाजु होती ही. मोठमोठ्या व्रुक्षान्च्या दाटीत लपले होते हरिधाम.आम्ही खालच्या बाजुला होतो आणि आश्रम उन्च टेकडीवर पण कम्पाउन्डला लावलेल्या रन्गिबिरन्गी बोगन्वेली सुन्दर दिसत होत्या. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे शुलपाणेश्वराच्या मन्दिराकडे जाणारा रस्ता तुटला होता त्यामुळे मन्दिरात न जाता आम्ही आनन्दधाम मध्ये परत आलो. नास्ता तयार होता. तो करुन खोलीत परत आलो,आता १२ वाजता भोजनाची घन्टा होइपर्यन्त काही काम नव्हते. कपडे धुणे राहिले होते कारण घाईघाईने आरतीला जावे लागले होते,कपडे धुतले. नन्तर नातेवाईकाना फोन केले.
दुपारी भोजनप्रसाद घेतल्यानन्तर थोडावेळ सन्ध्याकाळच्या स्वयम्पाकाच्या कामात मदत केली,तान्दुळ निवडले,भाजी निवडली अशी काहीबाही मदत. नन्तर खोलीत आलो.थोडावेळ विश्रान्ती घेतली. ह्यान्च्या जवळच्या पिशवीत माझ्यामते जास्त सामान होते म्हणजे त्यान्ची पिशवी जड आणि माझी हलकी,म्हणून सेटीन्ग बदलले आता आपापले सामान आपापल्या पिशवीत केले. बघू उद्या चालताना कळेल किति वजन आहे ते.
४ वाजता चहाची घन्टा झाली,चहा घेतला.तिथे इन्दिराबेन या बुजुर्ग महिलेची भेट झाली,त्या आधी या आश्रमाचे व्यवस्थापन पहात असत. आता व्रुध्दापकाळामुळे त्या निव्रुत्त जीवन शान्तपणे याच आश्रमात व्यतित करत आहेत.त्या उत्तम मराठी बोलतात कारण त्यान्चे लहानपण महाराष्ट्रातील डहाणू येथे गेले होते,त्यान्चे वडील तिथे स्टेशनमास्तर होते. आम्ही बराचवेळ गप्पा मारत होतो,त्यानी भारती ठाकुर,निवेदिता खान्डेकर आणि उष्प्रभा पागे यान्ची आठवण काढली.
सन्ध्याकाळी मुख्यमहाराजान्ची महन्त वियोगानन्द सरस्वती यान्ची भेट झाली ते बरेच वयस्क आहेत. त्याना प्रणाम केला. दोन दिवसानी येथे मोठा रुद्रयाग होणार आहे,सजावटीच्या कामात आम्ही दोघानी मदत केली. महाराज म्हणाले याग होईपर्यन्त रहा पण ते शक्य नव्हते. आज कार्तिक अमावास्या आहे,सन्ध्याकाळी दिपोत्सव केला होता.शुद्धतुपातील पणत्यान्च्या शान्त प्रकाशात सारा आसमन्त,मैय्याचे पात्र उजळून निघाले होते.डोळ्यान्चे पारणे फेडणारा नजारा होता.
उद्या देवदिवाळी. पुढे प्रस्थान. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 15
स्नान पुजारती करुन निघणार तोच महाराज म्हणाले,नास्ता केल्याशिवाय जायचे नाही,त्यानी स्वतः उभे राहुन पोहे बनवुन घेतले. स्कन्देश्वराची शास्त्रोक्त पुजा पहाटेच झाली होती.तिथे एक मामा आहेत थोडे अपन्ग आहेत पुजेच्या तयारीची जबाबदारी त्यान्ची असते. ह्यान्चे पोट दुखत होते दोनतीन दिवसापासुन.तर त्या मामानी त्यान्चा फोन नम्बर दिला आणि म्हणाले रस्त्यात जास्त त्रास झाला तर फोन करा मी गाडी घेउन येइन मग आपण दवाखान्यात जावू.दुखणे अन्गावर काढू नका.अशी सगळी प्रेमळ माणसे. नास्ता चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली.
साधारण एक कि.मि.वर कान्दरोज गाव आहे.आमच्या बरोबर काल कार्तिकेश्वर आश्रमात वस्तीला असलेले एक बुजुर्ग परिक्रमावासी चालत होते,साधारण २/३कि.मि. चालल्यावर एका ठिकाणी त्यानी एका डेअरीतुन दुध घेतले आणि एका घरात फक्तदुधाचा फक्कड चहा करायला दिला,आम्ही पुढे निघालो होतो तर म्हणाले,मैय्याजी आप लोग पन्डीत हो {ब्राम्हण आहात} आपको चाय पिलाना बडा पुण्यका काम है इसलिये आपकेलियेही ये दुध लिया है चायपिकेही आगे बढिएगा. मग आमचा नाईलाज झाला.मध्यप्रदेश,गुजराथ मध्ये ब्राम्हणाना फार आदराने वागवले जाते.आमच्या सारख्या जात-पात न मानणार्यान्ची अशावेळी फार पन्चाईत होते. असो. नर्मदेहर.
साधारणपणे तीन कि.मि. चाललो नावडोगाव आले.दोन रस्ते फुटले होते,दुकानात चौकशी केली डाव्या हाताच्या रस्त्याने जायचे होते,त्याच दुकानात बिस्किटे,साबण वगैरे घेतले आणि पुढे निघालोंअन्तर तीन कि.मि.वर वडीयातलाव गाव आले,तिथे गौआश्रम आहे.श्रीक्रुष्णाचे मन्दिर आहे,दर्शन घेतले तेथिल दुकानदाराने आम्हाला थन्डपाण्याचे पाऊच दिले. नर्मदेहर. तिथुन पुढे एक कि.मि.वर वेलुग्रामला जाणारा फाटा लागला पण आमच्या लिस्ट मध्ये असलेला आशाघाटचा आसा आश्रम तर दिसला नव्हता त्यामुळे हे वेलुग्राम वेगळे असेल म्हणुन आम्ही तिकडे न जाता सरळ निघालो.तीनएक कि.मि. चाललो असु,हान्चे पोट खुपच दुखायला लागले,त्याना चालवेना.निर्मोही आश्रम अजुन बराच लाम्ब होता आणि एखाद्या मोठ्या गावात जाणेच अशा परिस्थितीत योग्य होते.
काहीजण तिथे उभे होते ते बसची वाट पहात होते, उमल्ला गाव येथुन १५कि.मि. होते त्या गावाहुन १०कि.मि.वर राजपारडी हे तालुक्याचे ठिकाण होते मग आम्हीही उमल्ला येथे जाण्याचे ठरवले.थोड्याच वेळात एक सहासिटर विक्रम रिक्षा आली तिने उमल्ला येथे आलो. आता राजपारडीला जायचे होते,एखादे वाहन मिळावे म्हणून वाट बघत रस्त्यावर उभे होतो,एक पोलिस जीप आमच्या जवळ येउन थाम्बली आणि त्यातील ट्राफिक इन्स्पेकटरने आम्हाला नर्मदेहर केले आणि विचारले पेहचाना नही क्या? आम्ही खरेच ओळखले नव्हते,एवढ्या दिवसाच्या प्रवासात कुणा पोलिसाची ओळख झाल्याचे स्मरत नव्हते,नाही आम्ही मान हलवली.ते इन्स्पेक्टर म्हणाले मै नगीनभाई आप हमारे घर आये थे.खरच की तेव्हा ते युनिफॉर्ममध्ये नव्हते आणि आता कडक युनिफॉर्म होता कसे ओळखणार?
त्यानी इकडुन कसे काय आलात विचारले ह्यान्च्या पोटदुखीबद्दल सान्गितले ते म्हणाले चला राजपारडीला मग बसलो जीपमध्ये.बोलता बोलता आम्हाला नन्तर भालोदला जायचे आहे असे म्हटले तर नगीनभाई म्हणाले राजपारडीहुन भालोद फक्त ७कि.मि. आहे तेव्हा तुम्ही आजच भालोदला जावू शकाल आम्ही ठीक आहे म्हटले,पोट दुखायला लागल्यावर लगेचच त्याना गोळी दिली होती त्यामुळे त्याना आता थोडे बरे वाटत होते म्हणुन राजपारडीला अजुन काही गोळ्या घेउन भालोदला जाण्याचे ठरवले.राजपारडीला नगीनभाईन्च्या पोलिसचौकीत पोहोचलो.
पाणी पिवुन मी समोरच्याच मेडिकल दुकानातुन गोळ्या घेउन आले.जेवण्याची वेळ झाली होती हलके अन्न म्हणुन नगीनभाईनी जिरा राइस मागवला आणि आम्हाला खायला लावला,बिसलरी पाण्याच्या दोन बाटल्याही दिल्या.एवढेच नाहीतर एका रिक्षावाल्याला पैसे देउन आम्हाला भालोदला सोडण्यास सान्गितले. अशी सज्जन,मोठ्या मनाची माणसे मैय्या आम्हाला वारन्वार भेटवीत होती.
राजपारडीला चौकीत बसलो असताना एक भयन्कर प्रकार बघायला मिळाला मन सुन्न करणारा. मोठा गडबड गोन्धळ उडाला आणि पोलिस एका माणसाला गच्ची पकडून घेउन आले,काय झाले आम्ही घाबरुनच गेलो.त्या माणसाने म्हणे एक गरिब आदिवासी मुलगी विकत घेतली होती अवघ्या ५०,००० रुपयाना.त्या मुलीच्या गावातील काही जणानी त्याला रन्गेहात पकडुन त्यान्च्यातील मध्यस्थासह पकडले होते.ती मुलगी तिचे कुटुम्बीयही होते,मुलगी फारतर १४/१५ वर्षान्ची असावी्आ प्रकार पाहुन आम्हीतर हादरुनच गेलो.गुजराथ सारख्या राज्यातही असले प्रकार होतात?बाप रे.
नगीनभाईनी आम्हाला रिक्षात बसवुन ताबडतोब रवाना केले.दोन वाजता भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्च्या दत्तकुटीरमध्ये पोहोचलो.महाराज नव्हते ते बदलापुरच्या बापट गुरुजीन्च्या परिक्रमे बरोबर गेले होते. महाराजान्चे शिष्य राहुल,सोमण,आणि नाशिकच्या विनयनगरमधील रहिवासी खगेन्द्रबुवा यानी स्वागत केले त्यानी महाराजाना फोन केला,महाराज म्हणाले परान्जपेना सान्गा मी आल्याशिवाय जायचे नाही.ते उजैनीला होते.
हात-पाय धुवुन जेवायला बसलो,वरण-भात भाजी गरमगरम पोळ्या.अगदी घरच्यासारखे मराठमोळे जेवण.अन्तरात्मा त्रुप्त झाला. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 16
भालोद, तालुका राजपारडी जिल्हा राजपिपला-गुजराथ.एक लहानसे खेडेगाव.येथे श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराज हे मराठी व्यक्तिमत्व रहाते.वासुदेवानन्द सरस्वती स्वामीन्चे अनुग्रहीत दत्तभक्त आहेत्.मुर्ती लहान किर्ती महान असलेले प्रतापे महाराज साधे धोतर सदरा घातलेले असतात. हसुन मनमोकळे बोलणे,आदराने विचारपुस करुन आपल्याला हवे नको पहाणार.
त्यान्च्या दत्तमन्दिरातील एकमुखी दत्तमुर्ती काळ्या गन्डकी पाषाणाची असुन मुर्तीच्या छातीवर गोमुख आहे. ही मुर्ती भालोदला प्रतापे महाराजान्कडे कशी आली याची एक कहाणी आहे.बडोद्याच्या श्री. निरखे यान्च्याकडे ही मुर्ती होती,प्रसन्वशाने व्रुधत्व आल्याने पुजा होणे कठीण होते,त्या घरातील माताजीना स्वप्न द्रुष्टान्त झाला की एक ब्राम्हण येईल त्याला ही मुर्ती द्यावी तो भालोदला मुर्तीची प्रतिष्ठापना करुन तो पुजा करेल.ईकडे प्रतापे महाराजानाही स्वप्नात बडोद्याला जावुन मुर्ती आणावी असा द्रुष्टान्त झाला.मग महाराज बडोद्याला जावुन मुर्ती घेउन आले आणि मन्दिर बान्धुन मुर्तीची प्रतिष्ठापना केली.दत्तमुर्तीच्या पायापाशी वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्च्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
पहाटे काकड आरतीने,भुपाळी म्हणून दत्तगुरुना जागवतात,नन्तर लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवतात. नन्तर पन्चाम्रुती पुजा करतात. गुरुचरित्र पठण करतात.दुपारी भोजनप्रसाद असतो,नैवेद्य दाखवल्यानन्तर देवाला सुन्दर रेशमीवस्त्र घालतात,दागिने घालतात.मोठे मनोहर दिसते रुप. सन्ध्याकाळी धुपारती होते धुपाच्या सुगन्धाने सारा परिसर दरवळतो. सकाळच्या आरतीच्यावेळी नर्मदामैय्याची वासुदेवानन्दसरस्वती रचित सन्स्कृत आरती म्हणतात,तर सन्ध्याकाळच्या आरतीच्यावेळी मैय्याची हिन्दी आरती म्हणतात. रात्री शेजारती होते,थन्डीचे दिवस असल्याने देवाला लोकरीचे कपडे घालतात.रुपडे इतके गोजिरवाणे दिसते की मनातली माया उमडुन येते,वाटते पटकन उचलुन कडेवर घ्यावे.वासुदेवानन्दसरस्वतीना लोकरी शाल पान्घरतात.
देवाच्या गाभार्यात एक लक्ष गायत्रीमन्त्राचा जप केलेल्या व्यक्तीलाच प्रवेश करता येतो.दत्तगुरु आणि वासुदेवानन्दसरस्वती यान्चे कडक सोवळे पाळावे लागते.भालोदला सगळे मराठी वातावरण आहे. पुजा करण्याची पद्धत मराठी,आरत्या मराठी,भोजनप्रसाद मराठी. भाषा मराठी,विचार मराठी.खुप दिवसानी घरी आल्यासारखे वाटत होते.
भालोदला मोर खुप आहेत. सन्ध्याकाळी अन्गणात येतात,त्याना चारा घालतात. अगदी आपल्या जवळ येतात. हातही लावुन देतात.जणू पाळलेले आहेत. महाराजान्च्या घरवजा आश्रमाचा मैय्याजवळ जाण्यासाठी स्वतन्त्र घाट आहे. स्वच्छ सुन्दर जल,भव्य पात्र आहे मैय्याचे भालोदला. राहुल येवल्याचा,खगेन्द्र तर नाशिकचा विनयनगर म्हणजे अगदी आमच्या घराजवळच. धनन्जय जोशी हा छोटा मुलगा धुळ्याचा म्हणजे नाशिक जवळचाच जणू आम्ही सर्व एकाच कुटुम्बातील सदस्य असे मिसळुन गेलो होतो.
भालोदला तीन दिवस मुक्काम होता,तिन्ही दिवस मी अन्गण झाडणे,सडा घालणे,रान्गोळी काढणे अशी माझी आवडती कामे करत होते खुप छान.आमचे घर पहिल्या मजल्यावर अन्गण सडा-रान्गोळी कुठली मिळते करायला,इथे ती हौस भागली.अगदी माहेरी आल्यासारखे वाटत होते.
दोन दिवसानी महाराज आले.साधी वामनमुर्ती,वाढलेली दाढी केस.मुखावर प्रसन्न हास्य. दत्तजयन्ती जवळ आली होती,महाराजान्चे आल्या आल्या उत्सवाच्या कामाबद्दल सुचना देणे सुरु झाले,नुसती लगबग. एकीकडे आमच्याशी गप्पाही मारत होते.प्रतापेमहाराजान्च्या दर्शनाने परिक्रमेला आल्याचे सार्थक झाले.
आजपर्यन्तच्या परिक्रमेत, ओम्कारेश्वरापासुन खेतिया पर्यन्त मध्यप्रदेश्,नन्तर शहादा,दक्षिणकाशी प्रकाशा,अक्कल्कुवा,गव्हाळी पर्यन्त महाराष्ट्र,धनशेरा-राजपिपला पासुन गुजराथ असा प्रवास चालु आहे,गुजराथ नर्मदासन्गम पार केल्यावरही बराच काळ आपल्याला सोबत करणार आहे. उद्या पुढे निघुया.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 17
भालोदला पुण्याच्या निखिल वाळिम्बेची भेट झाली.तसेच चन्द्रकान्तविचारे यान्ची भेट झाली,विचारे सायकलवर परिक्रमा करत होते.रात्रीच्या भोजनाच्या वेळी सर्वान्ची एक पन्गत करुन खिचडीचे पातेले मधोमध ठेवून बसलो,कुर्डया पापड,लोणचे,तळलेले मिरचीचे सान्डगे असा छान मराठमोळा बेत होता.महाराजही आमच्याच बरोबर बसले होते,मोठ्या मजेत हास्यविनोद करत जेवणे झाली नन्तर चान्दण्यात गप्पाही झाल्या.खुप मजा आली.
पहाटे उठलो,काकड आरती झाल्यावर अन्गण झाडुन सडा-रान्गोळी केली,स्नान पुजा आरती करुन नास्त्यासाठी पोहे केले. चहा-पोहे खाऊन निघालो,निखिल आज राहणार होता,विचारे सायकलवर जाणार होते त्यामुळे आम्ही दोघेच निघालो.
मैय्याकिनार्याने खुप दलदल असल्याने गावातुन रस्त्याने जाणे क्रमप्राप्त होते,महाराज आणि बाकी सर्वान्चा निरोप घेउन,नर्मदेहर म्हटले आणि विनोबाएक्स्प्रेसचा प्रवास पुढे सुरु केला.साधारणपणे ३कि.मि. गेल्यावर एक नदी लागली नदी ओलान्डून पलिकडे एक रस्ता दिसत होता आणि एक आम्ही उभे होतो त्या किनार्याने वरच्या बाजुने एक रस्ता होता कोणता रस्ता आमचा होता? नदीला गुढग्यापर्यन्त पाणी असावे असे वाटत होते,पाण्याला ओढही बर्यापैकी दिसत होती काय करावे ह्या विचारात होतो तितक्यात विचारे आले,त्यानी आधीही परिक्रमा केलेली असल्याने त्याना रस्ता माहित होता,नदीपलिकडचा रस्ता आमचा होता. बुटमोजे काढून हातात घेतले,मी एका हाताने विचारेन्ची सायकल धरली आणि नदी पार केली.आधी विचारे भालोदला राहाणार होते पण मग त्यान्च्या मनात विचार आला,वाटेत नदी आहे परान्जपे आणि वहिनी दोघेच आहेत,त्याना माहीत होते नदीला पाणी असते आणि म्हणुन त्यानी लगेच निघायचा विचार केला आणि ते आले. फक्त एक दिवसाची ओळख तरी त्याना आमच्याबद्दल एवढे वाटले,हीच मैय्याची क्रुपा.
नदी पार केल्यावर विचारे पुढे गेले,अर्थात मला जाऊ का? असे विचारुनच ते गेले. नदीपलिकडच्या रस्त्याला चिखल होता कारण नदीतुन ट्रक्टर,बैलगाड्या जात असल्याने चिखल झाला होता,बुट घालण्यासाठी बसायला जागा नव्हती म्हणुन थोडे अन्तर तसेच चालावे लागले.एक वस्ती लागली,झोपडीतिल माताजीना विचारुन त्यान्च्या ओट्यावर बसलो,हातपाय धुतले,तो पर्यन्त त्या माताजीनी चहा केला मैय्या तुझ्या लेकरान्चे कौतुक करावे तितके कमीच आहे. नर्मदेहर.
पुढे निघालो.४कि.मि.वर अविधा गाव आले.तिथे रामेश्वराचे प्राचिन मन्दिर आहे.दर्शन घेतले,ओट्यावर बसलो.तिथे डेअरीला दुध घालण्यासाठी आजुबाजुच्या गावातुन लोक आले होते,एका टेम्पोत डिग्री लावुन दुध सन्कलीत केले जात होते.रामेश्वर मन्दिराच्या आवारात एक खोली होती,एका ग्रुहस्थानी ती खोली उघडली आणि आम्हाला तिथुन भान्डे घेउन त्या शेतकर्यान्कडुन दुध घेउन चहा करुन प्या असे सान्गितले.ती खोली परिक्रमावासीन्साठी आहे,तिथे काही भान्डी,वातीचा स्टोव्ह होता पण आम्ही थोड्यावेळापुर्वीच चहा घेतला होता म्हणून नको म्हटले.
अविधा बर्यापैकी मोठे गाव आहे,पुढे निघालो. साधारणपणे ३/४ कि.मि. गेलो रस्त्याच्या कडेला एक बोर्ड दिसला मढी-तरई ३कि.मि. आम्हाला जगदीशमढीला जायचे होते आणि ते झगडियाला होते,हे वेगळे असेल म्हणुन आम्ही पुढे निघालो. नवीन रेल्वे लाइन टाकण्याचे काम चालु होते,एका बान्धकाम चालु असलेल्या पुलाजवळ थोडे विश्रान्ती घ्यावी म्हणुन थाम्बलो,उन चढायला लागले होते,थकवाही वाटू लागला होता.दहा वाजुन गेले होते.
कैलास प्रजापति नावाचा मुलगा आम्हाला पाहुन थाम्बला,आपुलकीने आमची चौकशी केली,म्हणाला मढीचा रस्तातर मागे राहिला,आम्हाला झगडियाला जायचे आहे म्हटल्यावर त्याने स्वतःचा मोबाईलनम्बर दिला आणि काही वाटले तर फोन करा असे सान्गुन गेला. थोडावेळ बसुन आम्ही पुढे निघालो. दोनेक कि.मि. नन्तर कराड गाव आले,रस्त्यावर कैलास प्रजापती आमची वाट बघत उभा होता,आग्रहाने आम्हाला घरी घेउन गेला त्याच्या आईने हसुन स्वागत केले थन्ड पाणी दिले.जेवण करण्याचा आग्रह केला पण ह्यान्चे पोट आज पुन्हा दुखायला लागले होते त्यामुळे नको म्हटले. मग चहा घेतला.कैलासने आमच्या पाण्याच्या बाटल्या थन्ड पाण्याने भरुन दिल्या,म्हणाला हन्डपम्पाचे पाणी पिऊ नका,अक्वागार्डचे पाणी देतो.अशी अगत्यशील माणसे आहेत.
कराडगावातुन कैलास प्रजापती आणि त्याच्या आईचा निरोप घेउन पुढे निघालो.दोनेक कि.मि. वर वाघपुरा गाव आले,इथुन जगदीशमढीचा रामधुन आश्रम आणखी तीन कि.मि. दुर होता.बारा वाजले होते,ह्यान्चे पोटही दुखत होते,वाघपुराला हायवे होता आणि इथुन अन्कलेश्वर १५कि.मि. होते.अन्कलेश्वरला आमची भाची राहते तिच्याकडेच आम्हाला नन्तर जायचेच होते,म्हणुन आम्ही आश्रमात न जाता सरळ अन्कलेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला.वाघपुराच्या बसस्टॉपवर उभे राहिलो. एका मारुती गाडीतुन अन्कलेश्वरला आलो.अन्कलेश्वरच्या राजपिपला चौकडीवर सदानन्द होटेलजवळ आमचे जावई श्री.ओन्कार कर्वे आम्हाला घेण्यासाठी आले. वाटेत एका ठिकाणी कोल्डड्रिन्क पिवुन दोन कि.मि. चालत आमच्या भाचीच्या मिनूच्या घरी आलो.
मिनूला खुप आनन्द झाला म्हणाली,मामाचा वाढदिवस आज माझ्या घरी साजरा होणार.अरेच्चा! खरेच की,आज ह्यान्चा वाढदिवस आहे.आम्ही विसरलोच होतो. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 18
अन्कलेश्वरला घरच असल्याने मजाच होती. मिनुने ह्यान्च्या वाढदिवसानिमित्त श्रीखन्ड आणले होते पण पोटदुखिने तिचे मामा बेजार झाले होते थोडेसे खाल्ले.निशाला ,{ह्यान्ची बहीण मिनुची आई} फोन करुन अन्कलेश्वरला ये सान्गितले,रात्रीच्या बसने निघुन ती लगेच सकाळी आली सुद्धा.
सकाळी डॉक्टरकडे जाउन ह्याना तपासुन आणले,मी दिलेली औषधे बरोबर आहेत असे डॉक्टर म्हणाले.त्यामुळे बरे झाले. पुण्याच्या भागवतान्चा फोन होता,ते आणि त्यान्च्याबरोबरचे सहा जण मिनुच्याच घरी येणार आहेत.कारण अन्कलेश्वरला आश्रमासारखी काही सोय नाही.मिनुला ते येणार म्हणून खुप आनन्द झाला.मिनुचे घरमालक श्री. सिन्ग यानाही येणार्या पाहुण्यान्बद्दल सान्गितले.ते म्हणाले ,परिक्रमावासि लोगोन्की सेवा करनेका ये मौका सौभाग्यसे आया है,वे लोग हमारे घरमे रहेन्गे और आप सब लोग भोजन हमारे यहा करेन्गे. यावर काय म्हणणार? हो म्हटले.
ठरल्या प्रमाणे दुसर्यादिवशी भागवतान्चा फोन आला,मग हे आणि सिन्ग त्यान्ची गाडी घेउन त्याना घेण्यासाठी गेले.काहीजण रिक्षात आणि काही सिन्ग यान्च्या गाडीत असे घरी आले.श्री. अशोक भागवत,सौ. विद्या भागवत,सौ. लिला शिन्दे,श्री. अशोक माढेकर,श्री. गोवर्धन गोसावी,श्री. अरुण सवदी असे सहाजण आले.माढेकर,गोसावी,सवदी याना सिन्ग यान्च्या घरी आणि बाकी सर्व मिनुकडे राहिले.सन्ध्याकाळी भागवतान्चे मित्र श्री. जाधव हे औरन्गाबादहुन आले,ते रत्नसागर पार करुन पुढे भरुचपर्यन्त आमच्या बरोबर येणार होते,मग आम्ही निशाला म्हटले की तू सुद्धा चल.ती चालेल म्हणाली. रात्री सिन्ग यान्च्याकडे भोजनाचा बेत अगदी फक्कड होता,पुर्या खीर फ्लॉवरचा रस्सा जिरा राइस आणि चुरम्याचे लाडू्. हसत खेळत भोजन झाले,गप्पा झाल्या.उद्या कठपोर; नर्मदामैय्या आणि रत्नसागर{अरबी समुद्र} सन्गम.
सकाळी इतक्या जणान्च्या आन्घोळी,कपडे होईपर्यन्त दहा वाजुन गेले.एकीकडे स्वयम्पाकही झाला.साधा बेत,वरण-भात भाजी पोळी.जेवण झाल्यावर निघालो.आम्ही दहाजण होतो एक बारासीटर गाडी केली.प्रथम रामकुन्ड राममन्दिर पाहिले.खरेतर हा पुर्वीचा स्मशान घाट.आता कुन्डाच्या एका बाजुला राममन्दिर बान्धुन तिथे परिक्रमावासीन्साठी सोय केली आहे,आश्रमात अन्नक्षेत्र आहे. श्रीराम सीता लक्ष्मण यान्च्या सन्ग्मरवरी मनोहर मुर्ती आहेत.आम्ही गेलो त्यावेळी देवाची विश्रान्तीची वेळ होती पण तिथल्या महन्तानी पडदा बाजुला करुन आम्हाला दर्शन घडवले. नर्मदेहर.रामदर्शनानन्तर गेलो बलबला किन्वा बुलबला कुन्ड बघायला.एक छानसा बगिचा,त्यात एक हनुमान मन्दिर आणि थोड्या अन्तरावर आहे बलबला कुन्ड यामधील पाण्याचा रन्ग पाढुरका गढुळ आहे आणि पाण्यात असन्ख्य बुडबुडे फुटत असतात,उकळी फुटल्या प्रमाणे. पाणी गरम असेल असे वाटले पण नव्हते.भुगर्भवायूमुळे बुडबुडे येत असतात.भाबड्या लोकाना चमत्कार वाटतो. नन्तर गेलो हासोट येथे सुर्यकुन्ड दर्शनास.एक शिवमन्दिर आहे,पण कुन्डाबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.तिथुन खिचडीवालेबाबा आश्रम हनुमान मन्दिरात आलो.येथे परिक्रमावासीना राहण्याची सोय आहे.अन्नक्षेत्र आहे.तिथे चहा मिळाला,तो घेउन पुढे निघालो.
चार वाजता कठपोरला पोहोचलो.रिक्षातुन उतरुन दोन कि.मि. चालुन रैनबसेरात पोहोचलो.तेथिल महाराजानी आम्हा दहाजणाना एक स्वतन्त्र खोली दिली,खोलीच्या खिडक्या-दाराला दरवाजे नव्हते. नवीन बाम्धकाम असल्याने नुसत्या भिन्ती आणि वरती स्लाबचे छप्पर होते आणि थन्डीवार्या पासून बचावासाठी तेच महत्त्वाचे आणि पुरेसे होते.
हे ,जाधव गोसावी महाराजाना परिक्रमावासी लोकान्च्या नावान्ची लिस्ट करणे,नावेच्या प्रवासासाठी प्रत्येकी ५०रू.वर्गणी गोळा करणे वगैरे कामात मदत करायला गेले.महाराज शिकलेले नाहीत आणि उद्या पार जाण्यासाठी गर्दीही खुप आहे.त्यामुळे अशी मदत करणे खुप आवश्यक होते.
रात्री खिचडीचा भोजनप्रसाद होता.ओम्कारेश्वर ते कठपोर हा १४००कि.मि.अन्दाजे परिक्रमेचा पहिला टप्पा आज पुर्ण झाला.उद्या नावेत बसुन उत्तर किनार्यावर गेलो की परिक्रमेचा पुढचा टप्पा सुरु होणार.मैय्या! आपल्या लेकराना साम्भाळून तुच तो त्यान्च्याकडुन पुर्ण करुन घेणार आहेस. नर्मदे हर. वन्दे नर्मदाम. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 19
सकाळी स्नान पुजा करुन नावा जेथुन सुटतात त्या ठिकाणी गेलो.रैनबसेरापासुन ते अन्तर दीड दोन कि.मि. असावे.सर्व अन्तरे मी अन्दाजाने लिहिली आहेत,नक्की किती असेल कोण जाणे.ओम्कारेश्वर ते कठपोर आम्ही वीस दिवसात आलो कारण बर्याच वेळा वाहनाचा उपयोग केला.एका तासात तीनएक कि.मि. आणि उन चढल्यावरतर ह्यापेक्षाही कमी चालणे होत असे.दिवसभरात आम्ही २०/२५कि.मि. चालत असू. तर तिथे बरीच गर्दी होती,भरती येण्यास बराच अवकाश होता,नावाडी म्हणाले ११वाजता भरती सुरु होईल. मग तिथे बसुन गप्पा-गाणी सुरु केली.बसने परिक्रमा करणार्या ग्रुपमधल्या महिला लोकगितातुन नर्मदामैय्याचा उगमापासुन सन्गमापर्यन्तचा प्रवास गात होत्या,खुप गोड गिते होती.
भरतीची वेळ झाल्यावर महाराज आले आणि त्यानी कोण कितीजण कोणत्या नावेत बसणार याची यादी करु लागले.एकेका नावेत ३०/४० जण नावेच्या क्षमतेप्रमाणे बसणार होते.आमचा सारा ग्रुप एकाच नावेत बसणार होता.एकुण आठ नावा होत्या. सर्व नावा मैय्याच्या काठावर ठेवलेल्या होत्या.भरती सुरु झाल्यावर पात्रातुन पाणी आणुन नावान्च्या खाली टाकुन जागा निसरडी करत होते,नन्तर सगळेमिळून त्या नावा ढकलत पात्रात घेउन गेले,खुपच मेहनतीचे काम होते.
त्यानन्तर आमची नावेत चढण्याची कसरत सुरु झाली. बुट काढुन पिशवीत टाकले आणि एकमेकाना साम्भाळत चिखलातुन नावेपर्यन्त गेलो,नाव बरीच ऊन्च होती,तिच्यात चढण्यासाठी एक टायर बान्धलेला होता त्यात पाय ठेवुन कसेबसे चढलो एकदाचे नावेत.कपडे चिखलाने बरबटले,थोडेफार भिजायलाही झाले.आमच्या नावेत ४३जण होतो.पण मजा आली.
सन्गमाच्या दिशेने जलप्रवास सुरु झाला.मैय्या कधी शान्त तर कधी उछलकुद करुन तिची नवनवीन रुपे दाखवत होती.भरतीच्या समेवरतर नाव थोडावेळ लाटान्वर नर्तनच करत होती,मोठमोठ्या लाटा उसळत होत्या,सर्वाना समुद्रस्नान घडले. एका ठिकाणी नावाड्याने सान्गितले सन्गम आला,पुजा करा म्हणून समजले नाहीतर मैय्या कोणती आणि रत्नसागर कोणता हे कळतच नव्हते. नावाड्याने सर्वान्च्या कुपीतिल अर्धे नर्मदाजल सागराला अर्पण करुन त्याच अर्ध्या कुपीत समुद्रजल भरुन दिले.लोकानी आणलेले नारळ नावाड्याने ठेवुन घेतले पण बाकी प्लास्टिकच्या थैल्यातील चुनरी वगैरे सामान आम्ही त्याना पाण्यात टाकू दिले नाही आमच्या नावेपुरतेतरी आम्ही सर्वानी मिळून जल प्रदुषण होणे टाळले.उदबत्ती लावुन मैय्याची पुजा आरती केली. नावाड्याला यथाशक्ति दक्षिणा दिली.अदल्या दिवशी नावेत बसण्यासाठी प्रत्येकी ५०रु. महाराजान्कडे दिले होते कारण नावान्चे व्यवस्थापन तेच बघतात,सरकारी मदत मिळत नाही.
दुपारी बारा ते चार असा प्रवास झाला.चार वाजता नावेतुन उतरण्याचा अवघड प्रकार झाला.जवळजवळ एक कि.मि. चिखलातुन एकमेकाना साम्भाळून कसेतरी बाहेर पडलो.त्यानन्तर खडकाळ रस्त्याने दोनएक कि.मि. चालुन रिलायन्सच्या गेट नम्बर २वर पोहोचलो. तिथे चिखलाने भरलेले हातपाय धुतले.थोड्याच वेळात श्री.अरुण मान्डके यानी गाड्या पाठवल्या. हायवेने ४५कि.मि. वरील भरुचला त्यान्च्या एबीसी एल कम्पनीक्वार्टरच्या बन्गल्यावर पोहोचलो.
श्री. अरुण मान्डके हे भागवतान्च्या ग्रुपमधील शिरगोपीकर यान्च्या भावाचे सासरे.एबीसीएल कम्पनीत मोठ्या हुद्दायावर आहेत.मोठे आदरातिथ्य झाले,चहा घेउन प्रथम स्नान कपडे धुणे करुन मग मैय्याची सायम्पुजा आरती केली.भोजनाला भरली वान्गी,फ्लावरबटाटा रस्सा,वरणभात पोळ्या आणि गोड शिरा असा छान बेत होता.मान्डकेन्चा बन्गला खुप मोठा आहे त्यामुळे सर्वान्ची आरामात सोय झाली.उद्यापासुन उत्तर किनार्याने परिभ्रमण परिक्रमा सुरु. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 20
सकाळी स्नान पुजा आरती झाल्यावर नास्ताकरुन नास्ता कसला पोटभर जेवणच झाले,पुरी भाजी इडली चटणी जिलेबि खमण लागेल त्याला वरणभात असे सगळे केले होते.श्री. आणि सौ.मान्डके यान्चा निरोप घेउन निघालो.आज मान्डकेनी आमच्या साठी सुमो गाडी दिली होती,भरुचमधील सर्व ठीकाणे दाखवुन गाडी आम्हाला मन्गलेश्वरला सोडणार होती.
गायत्री मन्दिर नर्मदाकिनार्यावर एका टेकडीवर आहे.मन्दिरापासुन मैय्यापर्यन्त सुरेख बान्धीव घाट आहे.स्वामीनारायण मन्दिर अक्षरधाम मन्दिरा सारखेच आहे. निलकन्ठेश्वर मन्दिरही खुप सुन्दर आहे.इथेही मैय्याकडे जाण्यासाठी सुन्दर घाट आहे.परिक्रमावासीना राहण्याची आणि भोजन प्रसादाची सोय आहे.त्यानन्तर ओसारा या ठिकाणी महाकाली मन्दिरात आलो. हे मन्दिर फक्त मन्गळवारी दर्शनासाठी खुले असते.माता महाकाली पावागडला जातेवेळी येथे फक्त एक दिवस राहिली होती म्हणून फक्त मन्गळवारी दर्शन होते अशी आख्यायिका आहे.
त्यानन्तर शॉर्टकटने मन्गलेश्वरला आलो त्यामुळे शुक्लतीर्थला जाता आले नाही.मन्गलेश्वरला शशीबेन जोशी यान्च्या घरी आलो.स्वतः शशीबेन आता नाहीत पण ज्योतीबेन,कमलाबेन,बोनीबेन यानी अगदी हसतमुखाने सर्वान्चे स्वागत केले.कमलाबेन अन्ध आहेत पण सर्व काम अगदी केरवारे सुद्धा डोळस माणूस काय करेल इतके निगुतिने करतात.त्यान्च्या घरी ही परिक्रमावासीन्ची सेवा पिढ्यान्पिढ्या चालु आहे.येणार्या प्रत्येकाला भोजन मिळते,पडवीत राहण्याची सोयही आहे.आज एकादशी असल्याने फराळाचे होते.भगर,दाण्याची आमटी,साबुदाण्याची खिचडी,ताक आणि केळी असा बेत होता.आमचा उपास नव्हता तरीही फराळ दिलाच.सर्व भगिनी इतक्या प्रेमळ आहेत.खुप छान वाटले.या कुटूम्बाबद्दल सुहास लिमये यान्च्या नर्मदेहर हर नर्मदे या पुस्तकात वाचले होते अगदी तसेच हे कुटुम्ब अगत्यशील आहे.कमलाबेननी त्यान्च्या भावाकडे आवर्जुन जा असे सान्गितले आणि त्याना तसा फोनही केला.जोशी भगिनीन्चा भावपुर्ण निरोप घेउन विनोबा एक्सप्रेस पुढे निघाली.
आता आमचे लीडर होते पुण्याचे श्री. अशोक भागवत.त्यानी गेल्याच वर्षीही पायी परिक्रमा केलेली होती त्यामुळे त्याना रस्ते माहित आहेत.कबीरवडाचे दुरुन दर्शन घेतले कारण ते स्थान पात्राच्या मधोमध आहे आणि परिक्रमा करत असताना तिकडे नियमाप्रमाणे जाता येत नाही. नन्तर भारद्वाज आश्रम पाहिला.भारद्वाजमुनीनि येथे तपस्या केली.मोठी गो शाळा,परिक्रमावासीन्ची निवास व्यवस्था आहे.तिथुन कमलाबेनचे मामेबन्धू श्री. धनन्जय जोशी यान्च्या घरी गेलो.तिथे चहापाणी झाले त्यानी प्रत्येकाला नर्मदामातेचा फोटो,निरान्जनाच्या वातीसाठी कापसाचा पेळू आणि उदबत्या दिल्या.
विनोबा एक्सप्रेस निघाली मुक्कामाच्या ठिकाणाकडे.वाटेत फुलान्चीच शेते होती.झेन्डू,लालगुलाब,पायस,आपल्याकडील कुन्दा या सुवासिक पान्ढर्या फुलाना इकडे पायस म्हणतात.७/८कि.मि.वरील झणोरका परा धर्मशिला या गावी मिनी शिर्डी या साईधाम आश्रमात आलो.आश्रम खरोखरच आधीच्या शिर्डीतिल द्वारकामाईप्रमाणे आहे.खाली वीटा लावुन केलेली जमीन वरती पतर्याचे छप्पर. छोटासा सुन्दर बगिचा.सुन्दर निर्मळ वातावरण.वाटले इथेच राहावे,हीच खरी शिर्डी आणि हेच खरे साईधाम.साईबाबाना असाच आश्रम अभिप्रेत असणार कारण ते किती साधे होते.
हा आश्रम साईराम शिवकुमार उर्फ साईप्रेमावतार यान्चा आहे.ते नियमितपणे शिर्डीला उलटे चालत जातात.महाराज गावाला गेले होते पण त्यान्चि पत्नी आणि मुला-मुलीने छान स्वागत केले. त्यान्ची मुलगी एम कॉम एमसीए शिकली आहे आणि आता एमफिल ची तयारी करते आहे मुलगा बारावीत आहे. सन्ध्यारती झाल्यावर गरम गरम मुगाच्या खिचडीचा साईप्रसाद मिळाला.उद्या नारेश्वरला प्रयाण. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 21
आज गीता जयन्ती,पहाटे उठुन सर्व आवरुन मैय्याची आणि साईबाबान्ची पुजा आरती केली आणि नन्तर गीतेचा बारावा आणि पन्धरावा अध्याय म्हटले. नन्तर चहा घेउन माताजी,मुले यान्चा निरोप घेउन साईबाबाना प्रणाम करुन मिनी शिर्डी साईधाम सोडले आणि विनोबा एक्सप्रेस पुढे निघालो.
झणोर पर्यन्त साधारणपणे सात कि.मि. चाललो,तिथे दोन मोटरसायकलस्वारानी लिफ्ट दिल्याने विद्याताई भागवत आणि लिलाताई गोजरे या नान्द पर्यन्त गेल्या.बाकी आम्ही सर्वजण पायी गेलो. नान्द पर्यन्तचा रस्ता चान्गला होता.तिथुन एका घराजवळून शेतातुन,टेकड्या चढत उतरत चालत होतो चालताना एक मोर आमच्या बरोबर जवळ जवळ दीडएक कि.मि. चालत होता त्याला जवळचे चणे दाणे घातले नन्तर चॉकलेटचे तुकडे घातले तर तेही खाल्ले मोठे नवल वाटले.वाटेत एक छोटी नदी लागली तिला फारसे पाणी नव्हते ती पार केल्यावर थोड्याच वेळात सोमज,दिलवाडा लागले तिथे चणे-गूळ,खाउन पुढे निघालो हायवे लागला होता. तीनएक कि.मि. चालल्यावर ओज गाव लागले तिथे रस्त्यालगतच मिरा आश्रम होता अकरा वाजले होते पण त्या आश्रमात काही व्यवस्था नव्हती पुढे जाणे क्रमप्राप्त होते.
उन चढायला लागले होते १४/१५कि.मि. चाल झाली होती विद्याताई दमल्या होत्या भागवत म्हणाले तुम्ही सर्वान्चे सामान घेउन रिक्षाने पुढे जाउन नारेश्वरला भक्तनिवासात खोल्या घ्या आम्ही मागुन चालत येतो,म्हणुन एक रिक्षा केली सर्वान्चे सामान आणि आम्ही दोघे,विद्याताई,लिलाताई असे नारेश्वरला श्रीरन्गावधुत आश्रमात आलो. दोन खोल्या घेतल्या. आमचे आवरेपर्यन्त बाकीसर्वजण आले. भोजनप्रसाद घेउन कपडे धुण्याचा कार्यक्रम पार पाडला.
सन्ध्याकाळी पुनित आश्रम पाहण्यासाठी गेलो.तिथे नर्मदा मन्दिर पन्चकुबेरेश्वर मन्दिर आहे.सन्गमरवरी मन्दिर समुह आहे.भक्तनिवासही आहे. मैय्याच्या समोरच्या तिरावर मणीनागेश्वर आणि भालोद दिसत होते.आठदिवसापुर्वी भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्कडे मुक्काम होता.
नारेश्वर महात्म्य.:- हे पवित्र ठिकाण म्हणजे पुराणकालीन कपर्दिकेश्वर महादेव तीर्थक्षेत्र. वेळोवेळी नर्मदेला आलेल्या पुरामुळे जमिनीत गाडले गेले होते.सरदार नारोशन्कर हे शिवभक्त होते त्याना लागोपाठ तीन दिवस स्वप्न द्रुष्टान्त झाला आणि मग त्याप्रमाणे खोदकाम केल्यावर ही शिवपिन्डी मिळाली. मग सरदार नारोशन्कर यानी त्यावर मन्दिर बान्धले,छोटेसे सुबक मन्दिर आहे. नारोशन्कर यान्च्या नावावरुन नाव पडले नारेश्वर.
कालान्तराने या स्थानाकडे दुर्लक्ष झाले आणि सभोवती जन्गल वाढले.जनलोकान्पासुन दुर जाउन साधना करावी म्हणून श्रीरन्गावधुत महाराज या घनदाट जन्गलात वास्तव्यासाठी आले.या भागाला त्या काळी देहरा म्हणत.आसपासच्या सात गावान्चे इथे स्मशान होते.महाराज आले त्यावेळी त्याना जन्मजात एकमेकान्चे हाडवैरी असलेले नाग आणि मोर इथे एकमेकान्शी खेळताना दिसले आणि हा शुभ सन्केत ही देवभुमी आहे असे म्हणुन महाराजानी मन्दिरा समोरील कडूनिम्बाच्या झाडाखाली झोपडी बान्धुन राहण्याचे ठरवले व त्याप्रमाणे ते राहु लागले.
महाराजाना तिथे पहाटे आणि सन्ध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घन्टानाद आरती अॅकु येत असे आणि भरजरी वस्त्रे घातलेले काहीजण न्रुत्य गायन करताना दिसत,महाराज आपल्या झोपडीच्या ओट्यावर पडून हे पहात पण मराराज उठून बसले की ते द्रुश्य नाहिसे होत असे.अशी आख्यायिका समजली. काही दिवसानी महाराजान्च्या मातोश्री त्यान्च्या जवळ राहण्यास आल्यावर तिथे मोठी झोपडी बान्धली.लोकाना भेटणे सत्सन्ग करणे सुरु केले.१९२५ साली मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला महाराज या ठिकाणी रहाण्यास आले.
सध्या इथे महाराजान्चे भव्य समाधीमन्दिर आहे.मातोश्रीन्ची मुर्ती आहे सुन्दर बाग,ध्यानकुटीरे,भक्तनिवास,भोजन शाळा वगैरे वास्तू आहेत. बरेच उत्सव येथे होतात,भक्तान्ची मान्दियाळी सदैव लागलेली असते.
नारेश्वरला सान्गलीचे देशपान्डे हे बुजुर्ग ग्रुहस्थ सायकलवरुन परिक्रमा करणारे भेटले.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 22
पहाटे उठून सर्वान्ची स्नाने,पुजा आरती होईपर्यन्त सहा वाजले.रन्गावधुत महाराजान्च्या समाधीचे दर्शन घेउन नारेश्वरचा निरोप घेतला. आश्रमाबाहेर टपरीवर चहा घेउन विनोबा एक्स्प्रेस निघाली.रस्ता चान्गला होता,डाम्बरी. थन्डी चान्गलीच पडली होती.सगळ्याना चालण्याचा हुरुप आला होता.रामनामाचा जप करत मजेत चालत होतो,सहाएक कि.मि. चालले असू ;डेरोली गाव आले.या गावच्या सरपन्चबाई सौ. ज्योतीबेन ठाकूर यानी आग्रहाने बोलावले,सगळी उच्चशिक्षित लोक महाराष्ट्रातुन इतक्या लाम्बुन परिक्रमा करण्यासाठी आलेले पाहुन त्याना फार कौतुक वाटले.त्यान्च्याकडे चहा घेउन शॉर्टकटने पुढे निघालो.
साधारनपणे तीनएक कि.मि. चालल्यावर कोठिया गावात आलो.उन चान्गलेच वर आले होते.इन्दिरा आवास योजनेतील घरे लागली,एका घराच्या ओट्यावर बसुन पाणी प्यायलो,तिथल्या छोट्याशा दुकानातुन शेन्गदाणे-गूळ घेतला,दुकानदार आम्ही परिक्रमावासी म्हणून पैसे घेत नव्हता आम्ही बळेबळेच त्याला पैसे दिले. हातावर पोट असलेल्या गरीबान्कडे असलेली श्रद्धा किती मोठी आहे. नर्मदे हर.पुढे निघालो अशोकभाई पटेल यानी बोलावले,भागवत गेल्यावर्षीही त्यान्च्याकडे गेले होते,तिथे चहा घेतला आणि पुढे निघालो. गुजराथ वॉटर आणि गटर व्यवस्थापन यूनिटच्या मधुन बाहेर पडुन शेतान्च्या बान्धा-बान्धाने चालत तीनएक कि.मि. वरील राणापुर मधील रणछोडराय मन्दिरात आलो. साडेदहा वाजले होते.
पाळीपाळीने सर्वानी कपडे धुतले गवतावर वाळत घातले.इथे खिचडीचे सदाव्रत मिळाले,एका परिक्रमावासीजवळ टमाटे होते.लिलाताईनी चुल पेटवली,मी डाळ-तान्दुळ धुतले.टमाटे चिरुन दिले,विद्याताईनी खिचडी फोडणीस टाकली,परान्जपे आणि माढेकर काका यानी खिचडी शिजवली.तिथे पन्जाबमधील एक ग्रुहस्थ भेटले,ते परिक्रमेत नव्हते पण अशीच भ्रमन्ती करत होते.त्यानी गावातुन खुपसारे ताक आणले.भोजन झाल्यावर पावणेदोन वाजता निघालो.रस्ता दाखवायला ते पन्जाबी भाईसाब आले,त्यानी मैय्याच्या किनार्यावर आणून सोडले.
आता रणरणत्या उन्हात वाळवन्टातुन चालायचे होते,वरती आग ओकणारे ऊन आणि खाली पाऊल बुडेपर्यन्त गरम पुरळ वाळू,कसेतरी पाय उचलत चालत होतो.जवळुन मैय्या सन्थ वाहात होती,तिच्या कडून गार वार्याची झुळूक आली की अगदी स्वर्गसुख मिळत होते.वाटेत एक शेत झोपडी दिसली,ती आम्हा थकल्या जीवाना वाळवन्टातील ओअसीस सारखीच भासली.शेतातुन वाट काढत झोपडीत पोहोचलो,एक आजीबाई बसल्या होत्या;त्यानी हसतमुखाने स्वागत केले,माठातील थन्डगार पाणी सर्वाना दिले.आमची विचारपुस केली जेवण करा म्हणाली,आम्ही जेवण झाल्याचे सान्गितले हा आमचा सन्वाद म्हणजे गम्मतच होती,आजी गुजराथीत विचरायची आणि आम्ही हिन्दीत उत्तर द्यायचो आज हे कळले प्रेम आस्था असेल तर भाषा गौण ठरते विचार समजुन घेण्यासाठी भाषेची मुळीच गरज नसते.
साधारणपणे तीनएक कि.मि. चाललो असु. आजीबाइनी वर टेकडीवर चढुन रस्ता आहे असे सान्गितले होते,पण झाडी इतकी होती की कुठुन वर चढायचे हेच समजत नव्हते,पुढे काहीमुले मासे पकडत होती त्यान्च्या जवळ गेल्यावर विचारले एक मुलगा आम्हाला वाट दाखवायला बरोबर आला,त्याच्या मागून वर चढलो.आता झाडीतिल पायवाटेने चालु लागलो,दमायला झाले होते जवळचे पाणी सम्पले होते,झाडान्च्या सावलीत बसलो तो मुलगा सगळ्यान्च्या बाटल्या घेउन पाणी आणायला गेला.पाणी आल्यावर निघालो,पुन्हा साधारणपणे दोनेक कि.मि. चालल्यावर सुरसामल गावात पोहोचलो.त्या मुलाला खाऊसाठी पैसे दिले तो घेत नव्हता तरी दिलेच.बिस्किटेही दिली.
पाच वाजले होते,आजच्या मुक्कामाचे ठिकाण मालसर मोठ्या रस्त्याने ८कि.मि. आणि शॉर्टकट पण अतिशय खराब रस्त्याने ५कि.मि. होते.विद्याताई चालण्या सारख्या नव्हत्या,आम्हीही दमलो होतो,एक अगदी छोटा चढ चढुन पुलावर आलो आणि नेहेमीप्रमाणे मैय्या धावुन आली तिला का आपल्या लेकरान्चे कष्ट बघवतील? श्री. सुरेशभाई पटेल याना तिने पाठवले. नर्मदे हर. तुम्ही बसस्टॉपवर जावुन थाम्बा मी गाडीची व्यवस्था करतो,सुरेशभाई म्हणाले. कसेबसे बसस्टॉपवर गेलो. सुरेशभाईनी जीप आणली,सर्वजण जीपमध्ये बसलो.सुरेशभाईन्चे आभार मानले,ये मैय्याजीकी सेवा है इसमे आभार नही माने जाते.सिर्फ नर्मदे हर.खरेच आहे,नर्मदे हर.आठ कि.मि.मालसरला पोहोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते.
मालसरला पन्चमुखी हनुमान मन्दिराच्या भक्तनिवासात आसन लावले. हातपाय धुवुन दर्शन घेतले. पन्चमुखी हनुमान,श्रीराम लक्ष्मण सीता,जगन्नाथ बलभद्र सुभद्रा येथे स्थानापन्न आहेत. डोन्गरे महाराजान्ची समाधीचे मात्र काही दिसले नाही.महाराज म्हणाले डोन्गरेमहाराजानी जलसमाधी घेतली होती त्यामुळे समाधी वगैरे नाही. येथे अन्नछत्र असल्याने भोजन करुन पण त्याआधी मन्दिरातील सन्ध्यारती नन्तर आमची मैय्याची सायम आरती करुन आता विश्रान्ती.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 23
मालसरच्या या पन्चमुखी हनुमान मन्दिरात स्नानासाठी गरम पाण्याचा बम्ब होता,थन्डीही बरीच होती मग काय गरम गरम पाण्याने मस्त स्नान झाले कपडेधुणेही उरकले.सर्वान्चे आवरल्यावर मैय्याची पुजा आरती केली,मन्दिरातील देवदेवतान्चे दर्शन घेतले आणि चहा घेउन निघालो.विनोबा एक्स्प्रेस बसस्थानकावर येउन थाम्बली.आज सिनोर पर्यन्त बसने जायचे ठरवले होते आमच्या लीडरने;भागवत साहेबानी.खरेतर सिनोर फक्त पाच कि.मि. दुर होते.असो. बस मिळाली नऊ वाजता सिनोरला पोहोचलो,ती बस पुढे डभोईला जाणार होती,घाईघाईने सर्वजण उतरलो.अतिघाई सन्कटात नेई ह्याचा प्रत्यय आला,विद्याताईन्चे बेडीन्ग बसमध्येच विसरले,आता काय करायचे? मग तेथिल कार्यालयातून डभोई डेपोत फोन केला,आणि बेडीन्गची वाट पहात बसलो.दरम्यान ढोकळा चहा असा नास्ता केला.थोड्याच वेळात बेडीन्ग आले,बस चालकाचे,कार्यालयातील कर्मचार्यान्चे आभार मानून विनोबा एक्स्प्रेस निघाली.
मैय्या किनार्याने चालत होतो मोठ्या मजेने,बेडीन्ग मिळाल्याने सारा तणाव सम्पला होता,विद्याताईन्ची कळीही त्यामुळे खुलली होती.मजेत थट्टामस्करी करत चालत होतो.एक परिक्रमावासी भेटले,त्यान्च्या मानेला भलामोठा लायपोमा {टयुमर.} दिसला,तो तसा बिनाइनच होता म्हणजे त्यात कर्करोगाची लक्षणे नव्हती,मी म्हटले बाबा ऑपरेशन करुन काढुन टाका छोटेसेच होईल ऑपरेशन सरकारी हॉस्पिटलमध्ये पैसेही लागणार नाहीत.तर ते बाबा म्हणाले,पाचकिलो वजन है इस गोलेका पुर्वजनम का पाप होगा भुगतके समाप्त करेन्गे,ऑपरेशन नही करेन्गे.काय म्हणावे या अन्धश्रधेला? त्या गोळ्यामुळे त्या माणसाची मान अक्षरशः वाकडी झालेली होती,आणि खरेतर तेच चान्गले नव्हते गोळा साधा होता पण वाकडी मान पुढे फारच त्रासदायक ठरेल.पण मी समजावत होते म्हणुन ते बाबा घाईघाईने पुढे निघून गेले. नर्मदे हर.
उन्चसखल कच्च्या रस्त्याने साधारण पाच कि.मि. चालुन क्रुष्णकान्त महाराजान्च्या नर्मदाआश्रमात आलो.क्रुष्णकान्त महाराज उच्चशिक्षित बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे. रामक्रुष्णमिशन प्रेरीत आश्रम आहे.साधेसे घर,आजुबाजुला बगिचा,छोटेसे नर्मदामन्दिर.परिक्रमावासी लोकान्साठी राहण्यासाठी खोल्या,स्वयम्पाकासाठी एक खोली असा सारा सुन्दर परिसर आहे. ओले कपडे वाळत घातले,खिचडीचे सदाव्रत मिळाले कालच्यासारखी खिचडी केली आश्रमातील लिम्बाच्या झाडाला खुप लिम्बे लागली होती,खुप पिकलेली लिम्बे जमीनीवर पडली होती मी ती गोळा केली प्रत्येकाजवळ ठेवायला दिली.परान्जपेनी बरेच फोटो काढले,शुटीन्ग केले. रामक्रुष्ण परमहन्स यान्च्या जीवनावरील प्रसन्गान्चे बरेच फोटो तिथे होते विषेशतः परमहन्सानी हिन्दुधर्मा व्यतिरिक्त मुस्लिम्,ख्रिश्चन' ,शीखधर्मान्चा अभ्यास केला तेव्हा ते त्या त्या धर्माप्रमाणे कसे वागत याबद्दलचे फोटो.
सव्वा वाजता मन्दिरातील नर्मदामैय्या आणि क्रुष्णकान्त महाराज याना प्रणाम करुन निघालो,थोड्याच दुरवर कन्जेठा गाव लागले तेथील सौभाग्यसुन्दरी देवीचे दर्शन घेउन मैय्या किनारी आलो.अगदी काश्मीर मधील गुलमर्ग,सोनमर्ग सारखे हिरवळीचे गालिचे किनार्यावर पसरलेले होते,उन कडक होते पण हिरवळ आणि मैय्याकडुन येणारा झुळझुळता गार वारा यामुळे त्याचा त्रास वाटत नव्हता.सगळ्यानी पायातले बूट काढुन हातात घेतले आणि त्या सुखद हिरवळीवरुन चालण्याचा आनन्द मजेत लुटत चालायला लागलो.मैय्या किनारीही किती विविधता आहे,काल तापत्या वाळूचे वाळवन्ट होते तर आज हे हिरवळीचे गालिचे.थोडे थाम्बुन मैय्याचे सुमधुर जल प्राशन केले,चेहर्यावर थन्डगार पाण्याचे हाबके मारले मस्त.उरलासुरला शिणवटाही पळून गेला.
दोनएक कि.मि. चालल्यावर पुन्हा कठीण रस्ता आला,बूट चढवले एक टेकडी चढली,झाडाझुडपातुन वाट काढत चालत होतो,टेकडीचा उतार आला थोडे अवघडच होते पण एकमेकान्च्या काठीचा आधार घेत उतरलो;परत दुसरा चढ चढलो.आता एरन्डाची शेते लागली.छान वाढलेल्या एरन्डाच्या बनातुन चालणे त्या कडक उन्हात मोठे आल्हाददायक होते.एरन्डीचे बन सम्पले आणि कापसाच्या शेतातुन वाटचाल सुरु झाली.थोड्याच वेळात अनसुया आश्रम परिसरात प्रवेश केला. वाटेत एक सुन्दर नवीनच बान्धलेले नर्मदामाता मन्दिर लागले,दर्शन घेउन जरा बसलो.
तीन वाजुन गेले होते.पायवाटेने एका पाणी नसलेल्या नदीवरील पुल पार करुन अनसुया मन्दिराच्या प्रान्गणात प्रवेश केला.ती एरन्डी नदी होती अनसुया आश्रम नर्मदा-एरन्डी सन्गमावर आहे.सर्व तीर्थक्षेत्री असतात तशी प्रसादाची,चहापाण्याची दुकाने सभोवार होती.चहा घेउन,पिशव्या,बुट त्याच दुकानात ठेवून दर्शनाला गेलो.
याच ठिकाणी सत्त्वपरीक्षा घेण्यास आलेल्या ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवाना अनसुया मातेने बाल रुप दिले होते. हे प्रसिद्ध सतीक्षेत्र आहे. येथे नवचन्डी याग करण्याचे महत्त्व आहे.आजही तिथे नवचन्डीयाग सुरु होता आम्हाला प्रसादाचा लाभ झाला.
अनसुया आश्रमातुन पाच वाजता रिक्षाने बारा कि.मि.वरील चान्दोदला जाण्यासाठी निघालो.रानडेबाई-राजवाडेबाईनी सान्गितल्यामुळे बद्रिकाश्रमला जायचे नाही असे ठरले होते म्हणून चान्दोदला जाणार होतो. गोसावी यान्च्या ओळखीचे उमेशगिरी नावाचे साधक चान्दोदला रहात होते त्यान्च्याच कडे आम्ही निघालो होतो.वाटेत रिक्षा पन्क्चर झाली त्यात वेळ गेला.सात वाजता चान्दोदला उमेशगिरी यान्च्या घरी पोहोचलो.उमेशगिरी वयाने लहान आहेत २२/२४ वय असेल,शिकलेले आहेत,सन्यास घेतला आहे.महाराजानी आम्ही येणार हे आधीच कळवलेले होते म्हणुन भात भाजी आमटी करुन ठेवली होती कणीक मळून ठेवली होती.फ्रेश होउन चहा घेतला आणि विद्याताई,लिलाताई यानी पोळ्या केल्या मी एकीकडे सर्वाना जेवायला वाढले,पुरुषमन्डळीन्चे झाल्यावर आम्ही तिघी जेवलो. नन्तर भान्डीकुन्डी आवरुन थोड्यावेळ गप्पा मारुन झोपलो. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 24
नेहेमीप्रमाणे स्नान पुजा आरती करुन चहा घेउन उमेशगिरी महाराजान्चा भावपुर्ण निरोप घेउन विनोबा एक्स्प्रेस निघाली.काल चान्दोदला पोहोचलो त्यावेळी रात्र झाली होती त्यामुळे गाव बघायला मिळाला नव्हता,सकाळी चालता चालता बघायला मिळाला.चान्दोदगावाला एक इतिहास आहे.चान्द्रवन्शी राजाची राजधानी होती. इमारती सुन्दर नक्षीकाम केलेल्या आहेत सुन्दर कलाकुसर केलेले दरवाजे तावदाने आहेत.
नर्मदेवर बान्धीव घाट आहे.इथे नर्मदा-ओरी{ओरसन्ग}-गुप्त सरस्वती असा त्रिवेणी सन्गम आहे.पवित्र तीर्थक्षेत्र आहे.एक प्रसिद्ध श्लोक आहे .
सर्वत्र सुलभा रेवा,त्रिषु स्थानेषु दुर्लभा!
ओम्कारेsच भ्रुगुक्षेत्रे तथा रेवोरि सन्गमे !! अर्थः- रेवा{नर्मदा}सर्व ठिकाणी सुलभ आहे पण तीन ठिकाणी दुर्लभ आहे,ओम्कारेश्वरला,भ्रुगुक्षेत्र {भरुच},नर्मदा-ओरि-सरस्वती सन्गमस्थळी{चान्दोद-कर्नाली}.या ठिकाणी रेवा स्नान अतीव पुण्यदायी आहे.
थोड्या अवघड वाटेने मान्डवा गावात आलो. वाटेत एक पिराचे स्थान दिसले,दादापीर. हिन्दु-मुस्लीम दोन्ही मानतात या स्थानाला. मान्डवा गावात प्राचीन राजवाडा आहे.अर्थात तो रिकामा आहे.राजा महाराज इन्दुरला राहतात. नर्मदा जयन्तीच्या उत्सवाच्या वेळी येतात.पुजेचा मान त्यान्चा असतो.एका अवघड घळीतुन उतरून सन्गमावर आलो. गुढग्या एवढ्या पाण्यातुन ओरिनदी पार केली,पाण्याला बरीच ओढ होती थन्डगार पाण्याचा स्पर्श मोठा सुखद होता.एकमेकान्चा आधार असल्याने नदी पार करणे सोपे झाले. नदीपार केली पण किनार्यावरील वाळूत पाय घोट्यापर्यन्त रुतत होते,कसेबसे किनारा पार करुन वर चढलो.पण रस्ताच दिसत नव्हता,कसे करणार? सगळीकडे कापसाची शेते होती,मग त्या कापसाच्या झाडान्ची धक्का लावण्या बद्दल मनोमन क्षमा मागुन हाताने त्याना बाजुला करत शक्यतो ती तुडवली जाणार नाहीत असे पहात पुढे निघालो.गोसावी आधी पुढे गेले आणि लाम्बवर दिसत असलेल्या घराजवळ वाट आहे का ते पाहुन घेतले,त्यानी इशारा केल्यावर बाकीसर्वजण गेलो.
कर्नाली गाव आले. हेही प्राचीन इतिहास असलेले गाव आहे.बराच मोठा मन्दीर समुह आहे.गणपती,हनुमान,शिव,देवी अशी मन्दिरे आहेत.एक गम्मत तिथे बघायला मिळाली,कोकणस्थ ब्राम्हणान्च्या नावाचे बरेच बोर्ड दिसले.त्यामागे कारण काय ते समजले नाही,बहुतेक लोक सध्या सान्गलीचे रहिवासी आहेत.कर्नाळी त्यान्चे मुळ गाव आहे किवा कसे ते समजले नाही.तिथे नळाच्या पाण्याखाली चिखलाचे पाय धुतले,भागवतान्च्या पायाचे ड्रेसिन्ग केले.टपरीवर चहा घेतला,बरेच फोटोही काढले नन्तर गावाबाहेर असलेल्या कुबेरभन्डारी मन्दिरात आलो.तिकडे जातानाच एका टेम्पोवाल्याशी लिम्बपुरा पर्यन्त जाण्याचे ठरवुन ठेवले.
या क्षेत्रस्थळी शिवशन्कर भगवान विष्णू च्या रुपात प्रगट झालेले आहेत.भन्डारेश्वराच्या शाळुन्केच्या ठिकाणी पाणी आहे.महाकालीचे मन्दीर आहे त्या मन्दिराच्या तळघरात योगी अरविन्द{पॉन्डेचरीचे} यान्चे तपस्या स्थळ आहे.शान्त ध्यान मन्दीर आहे.एक शिवपिन्डी आहे. योगीजीन्ची तसबीर आहे. या ठिकाणी नर्मदेला ७०/८० पायर्यान्चा छान बान्धीव घाट अहिल्याबाई होळकरनी बान्धलेला आहे. स्वच्छ सुन्दर घाट,शीतल सुन्दर स्वच्छ निर्मल नर्मदाजल. मन प्रसन्न झाले.भोजनाची वेळ होईपर्यन्त हे सारे बघितले,कपडेही वाळवले. भोजन झाल्यावर रिक्षाने लिम्बपुराला आलो. तिथे एका मारुतीगाडीतुन दोन वाजता गरुडेश्वरला आलो. जुन्या धर्मशाळेच्या कॉमन हॉलमध्ये आसन लावले.येथे रानडेबाई,राजवाडेबाई भेटल्या.त्या थोड्या आजारी झाल्याने चारपाच दिवसापासुन येथे मुक्कामाला होत्या आणि आता श्रीराम महाराज त्यान्ची परिक्रमेची बस घेउन आले की त्यान्च्या बरोबरच परिक्रमा पुर्ण करणार होत्या.त्यान्च्या सान्गण्यावरुन मी श्रीराम महाराजान्शी फोनवर बोलले,ते दोन दिवसानी गरुडेश्वरला येणार आहेत. इथेच भावसार,जोशी,सवदीही भेटले. नाशिकचे शिवानन्दस्वामी{शिव शिव बाबा} यान्चे दर्शन झाले,बाबा नी येथे दत्तयाग केला आज दत्तजयन्तीला त्याची पुर्णाहुती आहे.बाबानी आम्हाला दोघाना एकेक शाल दिली,भोजनप्रसादही मिळाला.आशीर्वादाचा मोठा भाग्याचा योग आज गरुडेश्वरसारख्या तीर्थक्षेत्री दत्तजयन्तीच्या पवित्र दिवशी आमच्या सारख्या अतिसामान्य भक्तान्च्या नशिबात होता,हे नक्की पुर्वजन्मीचे पुण्य. श्री.जगन्नाथ कुन्टेही भेटले,त्यान्चाही आशीर्वाद मिळाला.
आज चन्द्रग्रहण असल्याने रात्री भोजन नव्हते. वासुदेवानन्दसरस्वती महाराज यान्च्या समाधीचे दर्शन घेतले,अभिषेकाची पावती केली. काही परिक्रमावासी ग्रहण सुटल्यावर रात्री नर्मदास्नान करुन आले,तेवढया रात्री त्यानी पुजापाठही केला.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 25
पाच वाजता उठलो,प्रातर्विधी उरकुन घाटावर स्नानाला गेलो.ग्रहण सुटल्यामुळे चन्द्रमा आता नव्या तेजाने चमकत होता त्यामुळे अन्धार नव्हता २५/३० पायर्या उतरुन मैय्याच्या पात्राजवळ गेलो.पाणी जास्त नव्हते सरदार सरोवरातुन पाणी सोडले तरच पाणी वाढते. थन्डीच्या दिवसात वाहत्या पाण्याने स्नान करणे हा अनुभव स्वतःच घेणे छान वाटेल.छान उबदार असते पाणी.उगवत्या सुर्याला अर्घ्य दिले आणि शिवमन्दिरात वाहण्यासाठी पाणी जवळच्या ताम्ब्याच्या लोट्यात पाणी घेउन समाधीमन्दिरात गेलो.शिवपिन्डीवर पाणी वाहुन मानसपुजा केली,नन्तर वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्च्या समाधीदर्शनास गेलो.तिथे दत्तबावनी म्हटली. नन्तर चहा घेउन हॉलवर येउन पिशव्या पाठीवर लादुन विनोबा एक्सप्रेस निघाली. नर्मदे हर.
गरुडेश्वरला जानकीमाताजी नावाच्या एक माताजी प्रसिद्ध आहेत.त्या परिक्रमावासीन्ची सेवा करत असतात. परिक्रमावासीना हव्या असलेल्या वस्तू त्या देतात.त्या गावाला गेल्या होत्या त्यामुळे भेट झाली नाही याची चुटपुट लागली.असो. नर्मदे हर.
तासाभराचे चालणे झाल्यावर खडगदा गाव आले.तिथे रामसिन्गभाई मोतीभाई तडवी यान्च्या सत्यम शिवम सुन्दरम या घरी त्यानी आग्रह करुन नेले,चहा दिला.अर्धातास तिथे थाम्बुन पुढे निघालो. गरुडेश्वर पासुन केवडिया कॉलनी फाटा आठ कि.मि. होता.तिथे डाव्या बाजुच्या रस्त्याने जायचे होते,समोरचा रस्ता केवडिया कॉलनीला जाणारा रस्ता होता. झरिया येथिल बान्धकाम चालु असलेल्या मन्दिरात पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.
हनुमान मन्दिरात विद्याताई,लिलाताई यानी खिचडी केली,मी हापशावर कपडे धुतले.भोजन झाल्यावर बागेतील मोठ्या झाडाच्या पारावर विश्रान्ती घेउन दीड वाजता पुढे निघालो. उन्हाचा कडाका वाढला होता,दमायला झाले होते,नर्मदे हर नर्मदे हर जप करत कसेतरी पाय ओढत चालत होतो.मुक्कामाचे ठीकाण अम्बाजी किती दुर आहे माहीत नव्हते.इतक्यात एक टेम्पो आला,त्याने अम्बाजीला सोडायचे कबुल केले मग सर्व सामान टेम्पोत टाकुन बसलो. अम्बाजीला जाणारा रस्ता खराब होता त्यातच अम्बाजीचे ठाणे उन्चावर असल्याने घाट चढायचा होता.अगदी वेळेवर टेम्पो मिळाला होता नाहीतर आज अम्बाजीला पोहोचणे अशक्य होते.
अम्बाजी दहा कि.मि. दुर होते.चार वाजता पोहोचलो. माता अम्बाजीचे हे क्षेत्र मोठे रमणीय आहे. चारी बाजुना दाट व्रुक्षराजीने भरलेले डोन्गर,मन्दिरामागे झुळझुळ वाहणारी छोटी नदी,सुबक बान्धणीचे मन्दिर,सन्गमरवरी पाषाणाची स्वरुपसुन्दर अम्बाजीची प्रसन्न हसतमुख मुर्ती.सुन्दर निसर्ग.
नवीनच बान्धलेल्या भक्तनिवासात एका हॉल मध्ये आसन लावले. वान्गी,बटाटे,कणीक सदाव्रतात मिळाले रस्सा-पोळ्या असा स्वयम्पाक केला.पुजा आरती केली नन्तर भोजन केले आज एका परिक्रमावासीलाही भोजन प्रसाद देण्याचा योग आला. आता विश्रान्ती.
नर्मदापरिक्रमा एक आनन्द यात्रा आहे. आजचा दिवस मजेत पार पडला,उद्या कुठे कधी कसे माहीत नाही तरीही सारा आनन्दीआनन्द. नर्मदे हर. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 26
आज सकाळी सहा वाजता अन्धारातच अम्बाजीमातेला प्रणाम करुन नानी अम्बाजी सोडले.विनोबा एक्सप्रेस फास्ट निघाली,७कि.मि. वर हरीपुरा गावात एका शाळेच्या ओट्यावर बसलो.पाणी पिवुन विश्रान्ती घेत होतो,तिथे भुराभाई पटेल यानी आम्हाला पाहिले आणि लगेच चहा घेउन आले पण न बोलता उभे राहिले,भागवतानी विचारपुस केली तेव्हा मोठ्या सन्कोचाने ते म्हणाले,आप पढे-लिखे;बडे घरके लगते हो हम गरीब है दुध नही है बिना दुधका चाय कैसे दे दे? हे अॅकुन परान्जपे उठले,त्याना मिठी मारुन म्हणाले;नही नही भाई हम सब भाई-भाई है दुधकी जरुरत नही यही चाय पिलाओ. भुराभाईना आनन्द झाला त्यानी लगेच सर्वाना स्टीलच्या कपबशीतुन चहा दिला.परिक्रमावासीना काचेच्या कपातुन तिकडे चहा देत नाहीत कारण चिनीमातीची भान्डी निशिद्ध मानली जातात आणि ती शुभ कामाला वापरत नाहीत,परिक्रमावासीना मोठा मान असतो ती मैय्याची सेवा असते म्हणुन खरेतर काशाच्या पेल्यातुन चहा द्यायला हवा पण गरिबाकडे ती भान्डी नसतात म्हणून स्टीलच्या कपबशा. हे सर्व मला भुराभाईनी मी विचारल्यावर सान्गितले.किती मोठा भाव. नर्मदे हर.
भुराभाईन्चा हार्दिक निरोप घेउन पुढे निघालो.भरवाडा गाव आले,तिथे विनोदचन्द्र भील या शिक्षकानी त्यान्च्या घरी बोलावले,त्यान्च्या घरातील सगळ्यानी अगदी म्हातार्या आजी-आजोबानीसुद्धा आम्हाला नमस्कार केला,आम्ही सर्वजण अगदी सन्कोचुन गेलो,कितीही भाबडी श्रद्धा. आम्ही नमस्कार करु गेलो तर ते मागे सरकले नही नही आप पन्डीत{ब्राम्हण} और परिकम्मावासी हमको पाप लगेगा. निरुत्तर होतो आपण अशावेळी.
पुढे मेणन नदी लागली.पोटरी एवढे पाणी आणि बरेच दगडधोन्डे होते,पाय निसटत होते,केली पार. नवग्राम आले.तिथे असवन नदी होती पण तिच्यावर सान्डवा होता.त्यामुळे प्रश्नच नव्हता.पुढचा रस्ता शेताशेतातुन होता.गढपुरिया गाव आले,रणछोडराय मन्दिरात दर्शन घेतले्ए गाव बर्यापैकी मोठे आहे. गावातुन हायवेवर आलो. तिथे जीप मिळाली,वागछा येथे शिवमन्दिरात आलो.छोटेसे सुबक मन्दीर आहे,सभोवती बाग आहे.येथे त्याबागेत एका ठिकाणि वेलीचा सुरेख मान्डव करुन चारी बाजुना सुद्धा वेली पसरवुन स्त्रियाना स्नाना साठी आडोसा तयार केला आहे.स्नान कपडे धुणे करुन मैय्याची पुजा आरती केली,वागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
येथे सुरेशचन्द्र महाराज नावाचे तरुण उच्चशिक्षीत सन्यासी आहेत.आमचे आवरेपर्यन्त भाजी करुन पोळ्यान्ची कणीक मळून ठेवली होती.दोघीनी पोळ्या केल्या,सर्वान्चे भोजन झाल्यावर निघालो. रस्त्यावर लगेच टेम्पो मिळाला.२५ कि.मि. वरील कवाट येथे कामनाथ महादेव मन्दिरात मुक्कामाला आलो. येथे अन्नक्षेत्र आहे.त्यामुळे पुजा-आरती,भोजन आणि झोपणे.
आजही अन्धारातच निघालो. वाटेत अजिबात न थाम्बता पाच कि.मि.वरील चिचबा गावातील निवासी कन्या आश्रम शाळेत आलो. तेथील शिक्षिका कोकिळाबेन यानी चहा दिला. अर्धातास थाम्बुन विनोबा एक्सप्रेस निघाली.८/९कि.मि. चालुन रेन्धवा गावाबाहेरील हनुमान मन्दीर,नर्मदा अन्नकुटीर मध्ये आलो. भारतीमहाराज म्हणाले,माताजी पाकसिद्धी हम करेन्गे आप आराम करो,थक गये हो.
मन्दिराजवळून बन्धोईनदी झुळुझुळू वाहात होती,स्वच्छ निर्मळ पाणी. सर्वानी स्नान -कपडे धुणे केले. हनुमानमन्दिरात मैय्याची पुजा-आरती केली.भोजनप्रसाद घेउन महाराजान्चा निरोप घेउन निघालो. दोन कि.मि.वर छ्कताल गाव आले. येथे गुजराथ राज्य सम्पुन मध्यप्रदेश सुरु झाले.
छकताल येथे जीप केली,उमराळी येथे आलो तिथे जीप बदलुन सोन्डवा येथे पोहोचलो,सन्ध्याकाळचे सहा वाजले होते.उत्तरतटावरील शुलपाणीच्या झाडीतील पहिले गाव.लक्ष्मीनारायण,हनुमान मन्दिरात आसन लावले.तिथे ओम्कारेश्वरचा रीतेश दुबे हा तेथिल रघुनाथ मन्दीर वेदपाठशाळेचा विद्यार्थी पुजापाठ करण्यासाठी येउन राहिला आहे.
भागवत गेल्या परिक्रमेच्यावेळी ज्या किराणादुकानदार राठोड यान्च्या कडे जेवले होते तेच आजही भोजनाची व्यवस्था करणार आहेत. श्री. परमानन्द धाकेड हे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर भेटायला आले.त्यानी त्यानी आदिवासी कन्या निवासी शाळेत झोपावे असे सान्गितले पण त्या मुलीन्ची गैरसोय होऊ नये म्हणुन आम्ही देवळातच रहाणे पसन्त केले.भोजन झाल्यावर आम्ही दोघे,भागवत दोघे आणि लिलाताई असे लक्ष्मीनारायणाच्या देवळात आणि गोसावी,माढेकरकाका रीतेश बरोबर त्याच्या खोलीत असे झोपलो. नर्मदे हर.
हा शुलपाणीच्या झाडीचा प्रदेश आहे,धोका नसला तरी दाट जन्गल आहे म्हणुन धाकेड साहेबानी पहाटे आमच्या साठी बोलेरो गाडी दिली,त्यान्च्या येथील एक शिक्षिका सौ.कुशवाह याना मिटीन्ग साठी बडवानीला जायच्याच होत्या म्हणुन त्यान्च्याच बरोबर त्यानी आम्हाला नीसरपुर पर्यन्त जाण्याचा सल्ला दिला,त्याप्रमाणे पहाटे पाच वाजता आम्ही निघालो,डही कडूनचा रस्ता खराब असल्याने अलिराजपुर कुक्षी मार्गे नीसरपुरला सकाळी सात वाजता पोहोचलो.
नीसरपुरला एक डॉ. कनोजिया हे.एम.डी. फिजिशियन आहेत.ते गेली ३५वर्ष ह्या अगदी खेडेगावात जनसेवा करत आहेत.त्या सेवाभावी मानवाला भेटुन धन्यता वाटली.तेथुन पाच कि.मि. वरील कोटेश्वरयेथील दगडूमहाराज अखन्ड रामधून आश्रमात आलो.आसन लावले. सुन्दर बान्धीव घाटावर नर्मदामैय्याच्या सुखकर जलाने स्नान केले.पुजापाठ केला. भोजन प्रसाद झाल्यावर सर्व परिसर पाहिला.मुळ कोटीनाथ मन्दिरात दर्शन घेतले,कनकबिहारी मन्दिरात गेलो.तेथील कमलदास महाराज १०० पेक्षा जास्त वयाचे आहेत,त्यान्च्याकडे वेदपाठशाळा आहे,मोठी गोशाला आहे. महाराजान्चे दर्शन घेतले. हे कोटेश्वर तीर्थही बुडीत क्षेत्रात आहे. आताच येथे मैय्याचे पात्र इतके प्रचन्ड आहे मग आणखी पाणी वाढले म्हणजे किती आणि कसे होईल?क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 27
कोटेश्वर येथील दगडुमहाराज अखन्ड रामधुन आश्रम आपल्या धुळे जिल्ह्यातील चापळगावचे सन्तश्री दगडुमहाराज प्रेरीत आहे. सन्त गाडगे महाराजान्प्रमाणेच या महाराजान्चे कार्य आहे.त्यानी नर्मदा परिक्रमा केल्या होत्या. नर्मदाकिनारी त्यानी बरेच आश्रम बान्धले असुन तेथे अन्नछत्र,व्रुद्धाश्रम चालवले जातात.आदिवासी मुलिन्च्या शिक्षणासाठी मदत केली जाते.
पहाटे पाच वाजता उठलो स्नान पुजा आरती करुन आश्रमाचे व्यवस्थापक श्री.लालजीबाबा यान्चा निरोप घेउन दगडुमहाराज,नर्मदामाता,कोटेश्वरमहादेव याना प्रणाम करुन विनोबा एक्स्प्रेस निघाली. साडेसात वाजता नीसरपुरला पोहोचलो.चहा-नास्ता करुन साडेआठच्या बसने मनावरला निघालो. दहा वाजता मनावरला पोहोचलो,लगेच कालीबावडी साठी बस मिळाली. वाटेत लुन्हेरा बुजुर्ग येथे तेथील युवा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष श्री. सुनील शर्मा यानी आम्हाला त्यान्च्या घरी नेउन सामोसे लाडू दिले,चहा दिला. आमचे होईपर्यन्त बस थाम्बुन राहिली होती,पुढार्याचा प्रभाव.
साडेबारा वाजता कालीबावडी येथे श्रीराम मन्दिरात पोहोचलो. मन्दीर सुन्दर आहे,मुर्ती मनोहर आहेत. पण मन्दीर बन्द होते तिथे काहीच सोय नाही.पण मन्दिरासमोरच गोस्वामी किराणा आणि मेडिकल स्टोअर आहे.तेथील माताजी सर्व परिक्रमावासीना सदाव्रत देतात.त्यानी खिचडीचे सदाव्रत दिले. ते घेऊन कालीबावडीचे सरपन्च श्री. हन्सराज चौहान यान्च्या घरी गेलो.भागवत गेल्यावर्षी त्यान्च्या कडेच गेले होते. सरपन्च घरी नव्हते पण त्यान्च्या बहिणीने खिचडी करुन दिली.भोजन प्रसाद घेउन पुढे निघालो.सरपन्चान्च्या घरी श्री. रामेश्वर चौहान भेटले.
दुपारचे दोन वाजले होते.उन मी मी म्हणत होते,पाय ओढत चालत होतो. थोड्याच वेळात तीन मोटर सायकल मिळाल्या विद्याताई,लिलाताई आणि गोसावी गेले.आणखी एक मोटारसायकल मिळाली तिच्यावरुन भागवत बडीछितरी पर्यन्त गेले.आम्ही दोघे,माढेकरकाका चालत होतो. बियाबानी दर्गा नन्तर बडीछितरी आले. दाट चिन्चेची झाडे गार सावली देत होती.भागवत तिथे आमची वाट बघत होते. नन्तर आणखी तीनएक कि.मि. चालुन मतलबपुरा येथे श्री.दिनेश सोळन्की या शिक्षकाकडे उतरलो.
मतलबपुरा गाव मान्डवगडाच्या पायथ्याशी आहे.इकडील गावान्मध्ये एक आजार पसरलेला आहे.येथील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण खुपच जास्त आहे,ते पाणी बरीच वर्षे प्यायल्यामुळे येथील माणसाना ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार जडला आहे. त्यान्चे दात पिवळे ,वाकडेतिकडे,किडलेले झाले आहेत,सन्धिवाताने हाडे ठिसूळ झाली आहेत. आता सरकार तर्फे उपाय योजना चालु आहेत.सुनील चौहान हा मुलगा तिथे आरोग्यसेवकाचे काम करतो.सेवाभावी गरीब मुलगा आहे. दिनेश सोळन्की सुद्धा फार सज्जन आहेत. आधी चहा नन्तर रात्री पोळी-भाजीचे भोजन मिळाले.आता विश्रान्ती.उद्या मान्डू.
सकाळी साडेआठच्या बसने मान्डूसाठी निघालो. वाटेत हनुमानमन्दिरात दर्शन घेतले.मान्डूचा रस्ता नुसता दगडधोन्ड्यान्चा होता.एवढे मोठे आन्तरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन स्थळ आहे पण रस्ता असा.पन्धरा मिनिटान्च्या प्रवासाला एक तास लागला. हाडे खिळखिळी होणे म्हणजे काय ते पुरेपुर समजले.दहा वाजता मान्डूला पोहोचलो. नास्ता करुन श्रीराम मन्दिराच्या भक्तनिवासात आलो. खोली घेतली. भागवत आणि मन्डळी मान्डूला मुक्काम करणार नव्हती ,रेवा कुन्डाला उजवी घालुन ते आजच महेश्वरला जाणार होते त्यामुळे त्यानी कॉमन हॉलमध्येच आसन लावले.इथुन पुढे परत आम्ही दोघेच.
मान्डू म्हणजेच मान्डवगड.राणी रुपमती आणि बाजबहाद्दुर यान्ची प्रेम कहाणी येथेच घडली असे सान्गतात. राणी रुपमती नर्मदामैय्याची भक्त होती,फक्त नर्मदाजलानेच स्नान करत असे तिच्या भक्तीनेच मैय्या येथे कुन्डात प्रकट झाली,तेच रेवाकुन्ड.परिक्रमेत नर्मदेचा छोटासा प्रवाहही ओलान्डायचा नसतो म्हणून परिक्रमाकरताना मान्डूला यावे लागते.
मान्डूमध्ये बर्याच अॅतिहासिक इमारती आहेत. बाजबहाद्दूरचा महाल,हिन्दोला महाल,जहाज महाल,होशन्गशहाचा मकबरा वगैरे. येथील दुरसन्चार यन्त्रणा फारच छान आहे,एको पॉइन्टवर काही वाक्य उच्चारले की त्याचा शेवटचा शब्द काही कि.मि. दुर असलेल्या मनोर्यात घुमतो,तिथे त्या पुढचे वाक्य उच्चारले की तिथुन पुढच्या मनोर्यात.या प्रमाणे सन्देश वहन होत असे. नीलकन्ठ मन्दिरातील बान्धकाम काश्मीर-श्रीनगर येथील चष्मेशाही उद्याना प्रमाणे आहे. येथे अकबर बादशहा राहिले होते असे म्हणतात. मान्डूमध्ये गोरख चिन्चेची खुप झाडे आहेत.प्रचन्ड आकाराची ही झाडे आहेत.या झाडाला ७० वर्षानन्तर फळे येतात.पपईच्या एवढे हे फळ असते,यातील गर वाळवुन ठेवतात, हा खाल्यावर बराचवेळ तहान लागत नाही.
मान्डूतील सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे श्रीराम मन्दीर.याची आख्यायिका अशी आहे.साधारणपणे तीनशे-साडेतीनशे वर्षान्पुर्वी पुण्याच्या रघुनाथस्वामी नावाच्या सन्त महात्माना स्वप्नात द्रुष्टान्त झाला आणि मान्डवगडावर तळघरात आम्ही बन्द असुन लोकहितार्थ प्रकट होणे आहे असे श्रीरामानी सान्गितले.रघुनाथ स्वामी मान्डवगडावर आले,पण त्यावेळी तिथे दाट जन्गल माजलेले होते,एकट्याने शोध घेणे शक्य नव्हते,म्हणुन स्वामी धारच्या राणीसाहेब सकुबाई पवार याना जाउन भेटले आणि त्याना स्वप्नाची गोष्ट सान्गितली.राणीसाहेब त्यान्च्याबरोबर आवश्यक सामान आणि माणसे घेउन गडावर आल्या. जन्गल साफ करणे खोदकाम करुन मुर्तीन्चा शोध सुरु झाला,पण मुर्ती सापडत नव्हत्या. पुन्हा स्वामीना द्रुष्टान्त झाला गडाच्या इशान्य कोपर्यात एक टेकडी आहे तिच्यावर एक वडाचे झाड आहे आणि भैरवाचे ठाणे आहे.तिथे खोदकाम करावे,पायर्या दिसतील आणि तेवत असलेल्या दिव्याचा प्रकाशही दिसेल.उतरुन खाली जा,तिथेच आम्ही आहोत.द्रुष्टान्ता प्रमाणे खोदकाम केले,तळघरात एका चौथर्यावर चतुर्भुज श्रीराम,लक्ष्मण,सीता,गरुड,सुर्य,जैनान्चे भगवान आदिनाथ अशा मुर्तीन्चे दर्शन झाले,दीपकही शान्त प्रकाश देत तेवत होता.भगवन्ताचा किती मोठा चमत्कार.
सन्गमरवरी पाषाणाच्या साधारण चार फुट उन्चीच्या सुन्दर मुर्ती आहेत.चतुर्भुज श्रीराम कुठे बघायला मिळत नाहीत,हे एकच स्थान आहे. मुर्तीन्च्या पायाजवळ शके९०१ असे लिहिलेले आहे. म्हणजे या मुर्ती अकराशे वर्षापुर्वीच्या आहेत. भारतावर मुसल्मानी आक्रमण झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापासुन वाचवण्यासाठी मुर्ती तळघरात लपवल्या असाव्या. नन्तर राजवटी बदलत गेल्या ,वसाहती उठल्या,जन्गल वाढले आणि सर्वच विस्मरणात गेले असावे. पण आपले सर्वान्चे मोठे भाग्य म्हणुन तीनशे-साडेतीनशे वर्षान्पुर्वी स्वामीना द्रुष्टान्त देउन भगवन्त प्रकट झाले.
धारच्या राणीसाहेबानी भव्य मन्दीर बान्धले आहे.आदिनाथ भगवानही जैन मन्दिरात स्थानापन्न आहेत.भागवत आणि मन्डळीन्बरोबर लगेच पुढे गेलो असतो तर हे काहीच बघता आले नसते.मन्दिराच्या आवारात ते तळघरही बघता येते.उद्या पुढे.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 28
नमस्कार मन्डळी,
एक महिना झाला, काही कारणाने गावाला जावे लागले होते त्यामुळे लिखाण करता आले नव्हते, याचा खेद वाटतो. चला, परिक्रमा मान्डवगडावरुन पुढे सुरु करुया.
श्रीरामप्रभुन्चे दर्शन घेउन मान्डवगड उतरायला सुरवात केली.रस्ता अवघड होता,उतार होता सुलाबर्डी येथे गन्गा यमुना आणि नर्मदा असा त्रिवेणि सन्गम आहे.एक कुन्ड आहे मारुतीमन्दीर आहे. पुढे नाल्छा गाव आले. उशीर झाला होता त्यामुळे लुन्हेरा फाट्यावर बसने जायचे ठरवले त्याप्रमाणे आलो.तिथुन किलासराय घाट प्रारम्भ होत होता त्यामुळे महेश्वरलाही बसनेच जाण्याचे ठरवले बस मिळाली,टोलरोड सुरु अशी पाटी होती चला हायवे लागला असे वाटले पण कसलेकाय! रस्ता भयन्कर खराब होता.उतावली,भारुडपुरा अशी काही गावे लागली.येथील जन्गलात बेलाची झाडे खुप होती.
महेश्वरला पोहोचलो त्यावेळी बारा वाजले होते,मैय्याच्या घाटावर पोहोचलो,देवी अहिल्याबाई होळकर यान्चे पवित्र दर्शन घेउन रिक्शाने मन्डलेश्वरला आलो.आमचा अन्दाज होता त्याप्रमाणे दत्तमन्दिरात भागवत आणि मन्डळी भेटली पण ते लगेच पुढे खेडीघाटला जाणार होते,मग त्यान्च्याबरोबरचा देण्याघेण्याचा व्यवहार पुर्ण केला आणि त्याना निरोप दिला.दोघे सुखी हेच खरे.
दत्तमन्दिर साधेसुधे पण प्रशस्त आहे. वासुदेवानन्दसरस्वती स्वामीन्चे शिष्य श्री. जहागिरदार यानी ही वास्तु बान्धली.सुधाकर भालेराव हे येथील पुजापाठ वगैरे व्यवस्था पाहतात. पद्मजा केळकर,नन्दा भोपळे या भोजनाची व्यवस्था पहातात. भागवत मन्डळीन्साठी स्वयम्पाक केलेलाच होता त्यामुळे त्यानी लगेच आम्हाला भोजनप्रसाद दिला.आणि शाळेत जायचे असल्याने त्या गेल्या.
आज आम्ही दोघेच परिक्रमावासी मुक्कामाला आहोत. बहुदा फक्त मराठी परिक्रमावासी येत असावेत.चार वाजता चहा घेउन मन्डलेश्वर दर्शनाला निघालो. भारतीताई ठाकुर याना फोन केला पण त्या काही कामासाठी रावेरला गेल्या होत्या त्यामुळे त्यान्ची भेट होणार नव्हती. योग नव्हता.
काशीविश्वेश्वर मन्दिरात गेलो. येथेच वासुदेवानन्दसरस्वती स्वामी यान्चे वास्तव्य होते.बहुतेक सर्व ग्रन्थरचना स्वामीनी याच ठिकाणी केली.त्यान्च्या कुटीत पादुकान्चे दर्शन घेतले.त्यान्च्या वापरातील वस्तु येथे जतन केलेल्या आहेत. या सर्व वास्तुच्या मालकिणबाई सौ. जहागिरदार वहिनी भेटल्या.त्यानी आस्थेवाईकपणे आमची चौकशी केली,स्वामीन्बद्दल माहिती सान्गितली.पुन्हा आल्यावर त्यान्च्याचकडे मुक्काम करावा असा आग्रहही केला.
तिथून श्रीराम मन्दिरात गेलो.श्रीगोन्दवलेकरमहाराजान्च्या प्रेरणेने हे मन्दिर १९३२ मध्ये बान्धले आहे.भव्य मन्दिर आहे. सुन्दर श्रीराम लक्ष्मण सीता आहेत. नर्मदामैय्याचा प्रशस्त घाट आहे. श्री. मोडक येथील व्यवस्थापक आहेत.त्यानी चहापाणी करुन आमचे आदरातिथ्य केले.
सन्ध्याकाळी आरतीनन्तर दत्तबावनीचा पाठ केला. भोजनाला फक्त आम्ही दोघे आणि भालेरावगुरुजीच होतो पोळ्या शिल्लक होत्या म्हणून वान्ग्याबटाट्याची रस्सा भाजी आणि थोडा भात केला भोजन करुन आता झोपणे. उद्या खेडीघाट.
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 29
सकाळी स्नान पुजारती करुन भगवान गुरुदत्तात्रयान्चे दर्शन घेउन भालेराव यान्चा निरोप घेउन विनोबा एक्सप्रेस निघाली.काशिविश्वेश्वर,वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्चे दर्शन घेतले.जहागिरदार वहिनीनी दिलेला चहा घेउन त्यान्चा निरोप घेतला.थोड्याच वेळात छप्पन्नदेव मन्दिर आले.पुरातन शिवमन्दिर आहे. याच ठिकाणि आद्य श्रीशन्कराचार्य आणि मन्डलेश्वर यान्चा प्रसिद्ध वाद झाला अशी आख्यायिका आहे. पुढे गुप्तेश्वर महादेव मन्दिरात गेलो.येथे शन्कराचार्यानी मन्डलेश्वरपत्नी माता सरस्वती यान्च्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी परकाया प्रवेश करुन एका राजाच्या शरीरात एक महिना वास्तव्य करुन माता सरस्वतीच्या सान्सारिक प्रश्नान्ची उत्तरे देउन त्यान्चा वादात पराभव केला होता. जगद् गुरुनी परकाया प्रवेश केला असताना त्यान्च्या देहाचे येथील गर्भग्रुहात त्यान्च्या शिष्याने रक्षण केले होते. अशी आख्यायिका आहे. हा सारा परिसर खुप रमणीय आहे.आश्रम,शिवमन्दिर,गुप्तगुहा सुन्दर आहे.
दर्शन घेउन पुढे निघालो. येथुन पुढे महेश्वर-मन्डलेश्वर धरण आणि हायड्रोपॉवर प्रोजेक्टचा परिसर सुरु होतो त्यामुळे मैय्याकिनारा दुर राहतो.रस्ता चान्गला होता.साधारण ३कि.मि. चालल्यावर दोन रस्ते आले,उजव्या बाजुचा रस्त्यावर नर्मदेवर पुल आहे,त्यावरुन लेपाघाटला रस्ता जातो. आम्हाला नर्मदा ओलान्डने वर्ज्य असल्याने आम्ही डाव्या रस्त्याने निघालो. थोड्याच वेळात पॉवरप्रोजेक्टचे गेट आले. तिथे चहा नास्त्याची टपरी होती,आठ वाजले होते म्हणुन तिथे चहा घेतला आणि नास्त्यासाठी पोहे बान्धून घेतले.आम्ही परिक्रमावासी म्हणुन टपरीवाल्याने चहाचे पैसे घेतले नाहीत्,एका ग्रुहस्थाने पोह्यान्चे पैसे दिले.तिथे असलेल्या सर्वानी आम्हाला नमस्कार केला.त्यान्ची ही नर्मदामैय्या आणि तिचे परिक्रमावासी यान्च्याबद्दलची अपार श्रद्धा पाहुन आनन्द होतो.
गेटसमोरील कच्च्या रस्त्याने पुढे निघालो.जलोद,उतवली,सुलगाव अशी गावे लागली प्रत्येक गावात आदरातिथ्य होत होते. सुलगावाच्या बाहेर एका माळरानावर बसलो.दहा वाजले होते. जवळचे पोहे खाल्ले पाणी पिउन थोडावेळ विश्रान्ती घेतली.ऊन तापु लागले होते. विनोबा एक्सप्रेस पुढे निघाली. गोगाव आले. आतापर्यन्त १०/१२कि.मि. चाललो होतो.थकवा जाणवत होता.एका ठिकाणी कम्पाणुन्ड लगत सुन्दर अशोकाची झाडे होती.वाटले एखादी शाळा असावी,गेट उघडुन आत गेलो,रविवार असल्याने शाळेला सुटी असावी असे वाटले व्हरान्ड्यात बसलो.थोडा चहा मिळाला तर बरे होईल असे मनात आले न आले तोच एक व्रुद्धबाबा आले.ती शाळा नव्हती त्यान्चे घर होते.पाटीदार आडनाव होते त्यान्चे.आस्थेवाइकपणे आमची चौकशी करुन त्यानी चहा दिला.त्यानी जवळचा रस्ता दाखवला.त्यामुळे पथराडला जावे लागले नाही. वाटेत सगळी आवळ्याच्या झाडान्चीच शेती होती. भरपुर आवळे लगडलेले होते. एका ठिकाणि एका शेतात लमाणान्चा तान्डा उतरलेला होता,त्यान्चे उन्ट,शेळ्या-मेन्ढ्या,गाई असा बारदाना होता.त्यान्च्याबरोबर काही फोटो काढले.त्यानी गाईचे दुध दिले.असेही आपले देशबन्धू.या परिक्रमेच्या निमित्ताने भारतमातेचे असे दर्शन घडते आहे. हे पुर्वसुकृतच म्हणायचे.
कतरा गावी दौलतराव भेटले त्यानी चहा दिला.सुहास लिमये यानाही हेच भेटले होते.बोथ्यापुरा,कोन्गवा गावे मागे टाकुन पिपल्या-बुजुर्ग यागावी राममन्दिरात मुक्कामाला थाम्बलो. भोजनप्रसाद मैय्याच्या क्रुपेने झाला. उद्या खेडीघाट. आजचा प्रवास ३०कि.मि. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 30
पिपल्याबुजुर्ग काहीजण यालाच पितामली म्हणतात.आम्ही राम मन्दिरात राहिलो होतो.येथे पिप्पलेश्वरतिर्थ आहे. सकाळी लवकरच चालायला सुर्वात केली कारण खेडीघाटला आज पोहोचायचेच होते.धारेश्वर{दारुकेश्वर तीर्थ},सेमल्दा;येथे मनकामेश्वरमन्दीर आहे. यालाच गन्गातखेडी असेही म्हणतात.य ठिकाणी वर्षातुन एकदा गन्गामाता काळ्या गाईच्या रुपाने येउन नर्मदा स्नान करुन स्वतः शुद्ध होउन पान्ढर्याशुभ्र गाईच्या रुपाने परत जाते अशी आख्यायिका आहे. वैशाख पौर्णिमेला ती येते असे म्हणतात. म्हणुन हे स्थान गन्गाप्राकट्य स्थान म्हणुन ओळखले जाते. विमलेश्वर या ठिकाणी चन्द्रेश्वर मन्दिरात भलीमोठी घन्टा आहे. तिचे वजन सोळामण आहे असे समजले. रामगड-रामपालघाट येथे रामकुटीर आश्रम खुप सुन्दर आहे.मार्कन्डेय सन्यास आश्रमही आहे. येथे पोहोचेपर्यन्त दुपारचे तीन वाजले होते आज सकाळपासुन जवळ असलेली बिस्किटे आणि चहाच फक्त घेतला होता.२१कि.मि. चाल झाली होती .उशीर झाला असल्याने भोजनाचे कसे विचारावे असा प्रश्न आम्हाला पडला होता.श्रीराम दर्शन करुन थोडावेळ बसुन पुढे जाऊ खेडीघाट फक्त तीनच कि.मि. आहे असे ठरवले,पण मैय्या आपल्या लेकराना थोडिच उपाशी राहू देईल. एक माताजी आल्या; म्हणाल्या थक गये ना? यहा सदाव्रत मिलता है,मगर मैने दाल-तीक्कड बनाये है, आओ प्रसादी पाओ.डोळ्यात टचकन पाणी आले.खरच खुप भुक लागली होती आणि सदाव्रत मिळाले असते तरी चुल पेटवून स्वयम्पाक करणे मला कसे जमणार होते. ओम्कारेश्वरला भेटलेल्या साधुमहाराजान्ची आठवण झाली,ते म्हणाले होते बेटा आपको हमेशा बनाबनाया खानाही मिलेगा.आज त्याचा प्रत्यय आला.खरेच,आज पर्यन्त जेव्हा जेव्हा सदाव्रत घेउन भोजन बनविण्याचा प्रसन्ग आला तेव्हा तेव्हा कुणीतरी बनवुन दिले. नर्मदे हर!
चार वाजता पुढे निघालो.सहा वाजता खेडीघाटला श्रीराम महाराजान्च्या समर्थकुटी आश्रमात पोहोचलो,वाटले आपण आपल्या घरीच आलो. महाराज काहीलोकाना घेऊन बसने नर्मदापरिक्रमेलाच गेलेले होते.गरुडेश्वरला असताना त्यान्च्याशी फोनवर बोलणे झालेले होतेच. श्री.आणि सौ. देशपान्डे त्यान्चा मुलगा धनन्जय हे व्यवस्था पाहात होते,त्याना महाराजानी आमच्या बद्दल सान्गितलेले होते. त्यानी भक्त निवासात आमची व्यवस्था केली व.महाराज चारएक दिवसात येतील तोपर्यन्त येथेच रहायचे असा महाराजान्चा निरोपही दिला.
श्रीराम महाराज यान्चे आडनाव इनामदार आहे. ते गोन्दवल्याचे राहाणारे असुन त्यान्च्या लहानपणीच त्यान्च्यावर गोन्दोवलेकरमहाराजान्चा अनुग्रह झालेला आहे. गोन्दवले येथे शालेय शिक्षण झाल्यावर त्यानी नाशिकला तपोवनात बारावर्ष तपोसाधना केली,नन्तर गुरुनी दिलेल्या आदेशानुसार तीन वेळा नर्मदापरिक्रमा केली आहे.
समर्थकुटी येथे श्रीराममन्दीर आहे. गोन्दोवलेकर महाराजान्च्या पादुका आहेत. मोठे भक्तनिवास आहे. प्रशस्त भोजनशाळा आहे. येथे सोवळे नेसुन स्वयम्पाक करतात. गोशाला आहे. गोन्दवलेकरमहाराजान्च्या स्वारीचा घोडा आहे. ध्यान मन्दीरात अखन्ड रामनामाचा जप चालतो. सर्व अनुग्रहीत भक्त आळीपाळीने श्रीराम जयराम जयजय राम हा जप करतात. मराठमोळे वातावरण आहे. पुजाविधि,आरत्या मराठीच असतात. महाराज काही व्रुद्धान्चाही विनामोबदला साम्भाळ करत आहेत. स्वतः त्यान्ची मुलाप्रमाणे सेवा करतात.शुभ्र केस दाढी असलेले श्रीराम महाराज साठीकडे झुकलेले हसतमुख प्रसन्नचित्त व्यक्तिमत्वाचे ग्रुहस्थ आहेत.
खेडीघाट हे नर्मदेच्या उत्तरतीरावरील तीर्थक्षेत्र आहे. येथुन काही अन्तरावर चोरलनदी आणि नर्मदा यान्चा सन्गम असुन दादा धुनीवाले,विरक्तकुटी-अवधुतेश्वर महादेव आश्रम हरिओम आश्रम वगैरे बरेच आश्रम आहेत. येथे दादा दरबार ट्रस्टचे मोठे धर्मादाय हॉस्पिटल असुन तेथे सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जातात. तसेच आय. सी.सी.यू. स्त्री बाल रुग्णसेवाही उपलब्ध आहेत.
मैय्या किनारी वासुदेवानन्दसरस्वती स्वामीन्चे तपस्या स्थळ आहे. पण देखभाली अभावी दुर्लक्षित आहे.खेडीघाट ते मोरटक्का जोडणारा नर्मदेवर मोठा पुल आहे. मोरटक्क्याहुन श्रीक्षेत्र ओम्कारेश्वर फक्त बारा कि.मि. दुर आहे. अर्थात परिक्रमेत असल्यामुळे आम्हाला सध्या तिकडे जाणे नव्हते. ह्या पुलापासुन थोड्या अन्तरावर एक पुल आहे. तो कशासाठी आहे ? अहो ! ओम्कारेश्वर धरणातुन कालव्यात सोडलेले पाणी यापुलातिल कालव्यातुन पलीकडे नेउन इन्दोरला नेले जाते. नर्मदेच्या पात्रावरुन नर्मदेचे पाणी वाहते,अशी गम्मत. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 31
आता समर्थकुटीत दोन तीन दिवस राहायचे आहे,कारण श्रीराम महाराजाना परिक्रमा पुर्ण करुन येण्यास तेवढा अवकाश आहे.आणि त्यानी ते येईपर्यन्त राहावे असे सान्गितले आहे.
पहाटे पक्षान्च्या मधुर किलबिलाटाने जाग आली. खुप प्रसन्न वातावरण आहे.प्रातर्विधी आटपुन स्नानासाठी घाटावर गेलो. चन्द्रप्रकाशात मैय्या मनमोहक दिसत होती.शीतल मधुर जल शान्तपणे झुळझुळ वाहात होते.भक्तजन स्नानासाठी जमत होते. नर्मदेहर जयघोष सुरु होता. हलकी गुलाबी थन्डी पडली होती. मैय्याचे जलमात्र सुखकर उबदार होते. परिक्रमेत पात्रात उतरुन स्नान करायचे नसते,काठावर बसुन ताम्ब्याने पाणी घेउन स्नान करायचे असते. नर्मदेहरचा घोष करत स्नान करत होतो,लोटेच्या लोटे पाणी घेउन सचैल स्नानाचा आनन्द वर्णनातीत आहे. बाहेर यायला मन तयारच होत नव्हते.पण झुन्जुमुन्जु होऊ लागले होते,पुर्वेला अरुणोदय होत होता,पुर्वा लालगुलाबी शालु परिधान करुन त्या भास्कराच्या स्वागतासाठी सलज्ज तयार झाली होती.मैय्याच्या जलावरची रुपेरी छटा जाउन लालसर गुलाबी छटा उमटू लागली होती. नाइलाजाने ओलेत्याने उगवत्या दिनकराला अर्घ्य देउन आश्रमाकडे परतलो.
आमचे आसन लावलेल्या हॉलमध्ये मैयाची पुजा आरती करुन मन्दिरात दर्शनाला गेलो. सर्वात वरच्या मजल्यावर श्रीराम लक्ष्मण सीता ,मधल्या मजल्यावर शिवलिन्ग,तळमजल्यावर गोन्दवलेकरमहाराजान्च्या पादुका आणि मोठा फोटो समोर भक्ताना बसण्यासाठी प्रशस्त जागा. तिथेच उभे राहुन पहाटे काकड आरती,सकाळची,माध्यान्ह,सन्ध्याकाळची धुपारती,रात्रीची शेजारती करतात.
तिथेच मागच्या बाजुला एक ध्यानमन्दिर आहे,तिथे अनुग्रहीत भक्त { श्रीराम महाराजान्कडून ज्यानी अनुग्रह घेतला आहे असे} आळीपाळीने नामस्मरण जप करायला बसतात.
दर्शन घेउन आम्ही त्या हॉलमध्ये बसलो. हॉलमध्ये मन्द प्रकाशाचा दिवा होता,समोर महाराजान्च्या पादुकान्पुढे समई शान्तपणे तेवत होती.फोटोला घातलेल्या ताज्या सुगन्धी फुलान्च्या हाराचा आणि पादुकान्वर वाहिलेल्या फुलान्चा तसेच लावलेल्या उदबत्त्यान्चा सुगन्ध वातावरण अधिकच प्रसन्न करत होता. आम्ही डोळे मिटुन शान्त बसुन नामस्मरण करत होतो.
मिटल्या डोळ्यान्पुढे परिक्रमेची आतापर्यन्तची वाटचाल सरकत होती.मी परिक्रमा का सुरु केली,सुखीसन्सार आहे. चान्गली नोकरी आहे. हे सरकारी नोकरीतुन सेवानिव्रुत्त झाले आहेत.एकुलतीएक मुलगी तिच्या सासरी सुखात आहे. आमची उभयतान्ची शरीर प्रकृती निरोगी आहे. म्हणजे सर्वकाही उत्तम आहे.म्हणजेच सन्सारासाठी मैय्याकडे काही मागण्याची आवश्कता मोरयाच्या क्रुपेने नाही. काही मागण्यासाठी परिक्रमा सुरु केली नाही.वीस-बावीस वर्षापुर्वी सटाण्याच्या अहिरेगुरुजीन्चे नर्मदापरिक्रमा हे पुस्तक वाचले आणि मैय्याच्या प्रेमात पडले.तेव्हापासुन रोज परिक्रमा करायची आहे असे म्हणत होते.या वर्षी योग आणला मैय्याने.
दरवेळी रेल्वे प्रवासात होशन्गाबादला मैय्याचे होणारे भव्यदिव्य सुन्दर दर्शन परिक्रमेची ओढ वाढवत असे.मग श्रावण महिन्यात ओम्कारेश्वरला गेलो तिथले स्वच्छ सुन्दर आणि भव्य श्रीगजाननमहाराज देवस्थान,भक्तनिवास. नर्मदामैय्याचा अहिल्याबाई होळकर यानी बान्धलेला गोमुख घाट,ब्रम्हपुरी मधला लाम्बलचक आधुनिक घाट. मैय्याच्या उत्तरतीरावरील ओम्कारेश्वर आणि दक्षिण तीरावरील ममलेश्वर प्रत्यक्षात दोन वेगवेगळी मन्दिरे असलेले एक ज्योतिर्लिन्ग,ओम्कारेश्वर परिक्रमेचा बान्धीव मार्ग आणि त्यावर लिहिलेले श्रीमदभग्वत्गीतेचे अठरा अध्यायान्चे स्तम्ब.दाट जन्गलझाडी,नर्मदा-कावेरी सन्गम,परिक्रमा मार्गातील ॠणमुक्तेश्वर,गौरीशन्कर, लम्बे हनुमान{झोपलेल्या अवस्थेतील हनुमानमुर्ती} ही मन्दिरे सर्वच खुप सुन्दर्ए सर्व पाहुन याचवर्षी परिक्रमा करायची असे ठरवणे त्यासाठी फक्त याच वर्षी येणारा ११/११/११ हा योग साधुन सकाळी बरोबर११वाजुन ११ मिनिटानी परिक्रमा उचलणे { परिक्रमेची वाटचाल सुरु करणे} असे सगळे सगळे डोळ्यापुढुन सरकत होते,किती वेळ गेला हे समजलेच नाही. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 32
समर्थकुटीत स्वयम्पाक अगदी महाराष्ट्रियन असतो. वरण भात भाजी पोळी चटणी कोशिम्बीर लोणचे पापड.खुप दिवसानी घरी जेवल्या सारखे वाटले. दुपारी महाराजान्च्या लायब्ररीतिल पुस्तक वाचायला घेतले. गोन्दोवलेकर महाराजान्चे चरित्र. ग्रुहस्थाश्रमात राहुनही परमार्थ कसा साधता येतो हे महाराजान्च्या जीवनचरित्रावरुन समजते. नामस्मरण करता करता आपला सन्सार करत राहावे, समाजाच्या उपयोगी पडत असावे. दीनदुबळ्यान्ची सेवा करावी.भुकेलेल्या तहानलेल्याना अन्न-पाणी द्यावे,पशुपक्षान्चीही काळजी घ्यावी,व्रुक्षवल्लीना साभाळावे. देश धर्म कार्यात कधिही कमी पडू नये ही त्यान्ची शिकवण .त्यानी केलेली नर्मदा परिक्रमा.सारे सारे वाचताना सन्ध्याकाळ कधी झाली समजलेच नाही. सन्ध्याकाळी मैय्याच्या घाटावर गेलो.पहाटे दिसली त्यापेक्षा आताचे मैय्याचे रुप निराळेच होते. लोकान्ची येजा सुरु होती. स्थानिक नावाडी पात्रात होड्या घालुन मासेमारी करत होते. दक्षिण तिरावरील आश्रम दिसत होते.मैय्या सन्थ वाहात होती .
भालोदच्या प्रतापेमहाराजान्कडील राहुल गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी समर्थकुटीत सात दिवसान्साठी आला आहे,तो आणि आम्ही घाटावर बसुन बोलत होतो तितक्यात पाणी एकदम वाढल्याचे दिसले,ओम्कारेश्वर धरणातुन पाणी सोडले होते,बघता बघता त्याची पातळी आणि वेग दोन्ही वाढले,पात्रात एक मुलगा होडीत बसुन मासे पकडत होता,एकाएकी त्याची होडी गर्कन फिरली ;क्षणात वाहून जायला लागली,आम्ही घाबरुन ओरडलो.क्षणभर तो मुलगाही सटपटला पण लगेच त्याने त्याच्या जवळील मोठ्या बाम्बुने नदीपात्रात आधार शोधला आणि होडीला स्थिरावले,आणि किनार्याकडे गेला. इकडे आमचाही जीव भान्ड्यात पडला. बाप रे! काही क्षण पण जीव थरारला होता.
तिन्हीसान्जा झाल्या. मन्दिरा-आश्रमात सन्ध्या-आरतीची तयारी सुरु झाली,मैय्याच्या पात्रात छोटे छोटे दिवे सोडले जाऊ लागले. बघता बघता आकाशात चान्दण्या आणि पात्रात दिवल्या यान्च्यात रात्रिच्या अन्धाराला पळवुन लावण्याची जणू चढाओढच सुरु झाली. मैय्याचे रुप त्या दिवल्यान्च्या सोनेरी प्रकाशाने चमचमू लागले.आकाशात शुभ्र चान्दण्या आणि नदीपात्रात मन्द पिवळसर प्रकाशाने चमचमणार्या दिवल्या,मोठे मनोहर द्रुश्य होते. आम्हालाही आश्रमातील आरतीला जायचे होते,म्हणुन पुन्हा पुन्हा मागे वळून बघत परत फिरलो.
आश्रमात धुप धालण्याचे काम धनन्जय करत होता,धुपाच्या वासाने सर्व परिसर दरवळत होता.मन्दिरात देशपान्डे आरतिची तयारी करत होते.आम्ही सभाग्रुहात नामस्मरण करीत बसलो. पुजा झाल्यावर आरतीला सुरवात झाली,सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची,नुरवी पुरवी प्रेम क्रुपा जयाची. गणपती,श्रीराम,दत्त्,शन्कर,देवी,गुरुदेव गोन्दवलेकरमहाराज आणि नर्मदामैय्याची ओम जय जगतानन्दी,मैय्या जय जगतानन्दी ही आरती शेवटी घालिन लोटान्गण वन्दीन चरण म्हणुन आरती सम्पन्न झाली.त्या नन्तर अकरा माळा श्रीराम जयराम जयजय राम असा जप केला. नन्तर गोन्दोवलेकर महाराजान्च्या प्रवचनान्तील काही वाचन झाले. असा सुन्दर सोहळा असतो.
रात्रीच्या भोजनाला मुगाच्या डाळीची खिचडी,त्यावर साजुक तुप पापड लोणचे असा छान बेत होता.भोजन झाल्यावर अन्गणात सर्वजण गप्पा मारत बसलो.टिपुर चान्दण्यात गप्पा मारायला मजा आली.दोन दिवसाच्या सहवासाने आम्ही आणि आश्रमवासी जणु एकमेकान्चे नातेवाईकच झालो होतो.बर्याच वेळाने सर्वजण झोपायला गेलो.
आज पहाटे उठल्यावर आधी भोजन शाळा,आम्ही राहात असलेला हॉल,आणि अन्गण झाडण्याची सेवा केली व नन्तर घाटावर जाऊन नर्मदा स्नान केले.पुजा आरती करुन खाली नास्त्यासाठी खाली भोजनशाळेत गेलो तर देशपाण्डे वहिनी म्हणाल्या अहो एवढे सगळे एकट्याने कशाला झाडले दमला असाल ना ? दोघानी मिळून केले तेवढीच सेवा मी म्हणाले. नास्त्याला खमन्ग पोहे होते.
नास्ता करुन फिरायला बाहेर पडलो. दादा दरबार हॉस्पिटल पहायला गेलो,भव्य इमारत आहे. आत गेलो तर तिथे डॉ. गोखले आणि डॉ.सौ. निलम गोखले हे गुहागरचे राहणारे व आता येथे सेवा देत असलेले दाम्पत्य भेटले. एकाच व्यवसायातील असल्याने गप्पा रन्गल्या,माझे सर आणि निलमताईन्चे सर एकच आहेत. नाशिकचे डॉ.प्रमोद शिन्दे.त्या मिरजेला असताना सर त्यान्चे वरिष्ठ होते.त्यानी मला दादा दरबार मध्ये सेवा करण्याची ऑफर दिली.मी परिक्रमा पुर्ण झाल्यावर बघू असे सान्गितले.
नन्तर रिक्षाने बडवाह येथे गेलो,मोठे शहर आहे. बाजारपेठ आहे.रेल्वे स्टेशन,बस स्थानक पाहिले.आश्रमासाठी काही वस्तुन्ची खरेदी करुन ,आमचा पुढील मार्ग कुठुन आहे ते पाहुन परत आश्रमात आलो.भोजनानन्तर कालच्या प्रमाणेच ग्रन्थवाचन विश्रान्ती घेउन सन्ध्याकाळी राहुल बरोबर तो पारायण करीत असलेल्या वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्चे तपस्यास्थळ पहायला गेलो. पण तेथील अवस्था पाहुन वाईट वाटले.मैय्या किनारी लहानसे मन्दिर आहे,आजुबाजुला भरपुर मोकळी जागा आहे पण ट्रस्टीन्चे लक्ष नाही त्यामुळे अनावस्था आहे.
उद्या श्रीराम महाराज येणार आहेत्.त्यान्चे दर्शन घेउन पुढे निघायचे. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 33
आज थोडे बरे वाटत नाही;ताप आला आहे, त्यामुळे स्नान आश्रमातच गरम पाण्याने केले. पुजा आरती केली,नास्त्या साठी खाली भोजनकक्षात गेलो.धनन्जय म्हणाला,महाराज रात्री येणार आहेत. म्हणजे आजही येथेच रहावे लागणार.माझी तब्येत बरी नसल्याने मी खोलीत विश्रान्ती घ्यायला गेले आणि हे बाहेर फिरायला बाहेर पडले.मी नामस्मरण करत पडून राहिले.
दुपारी मी भोजनासाठी खाली गेले नाही.देशपान्डेवहिनी माझ्यासाठी पेज घेउन आल्या,छान ओवा,आल्याचे तुकडे घातलेली तान्दुळाच्या रव्याची पेज. अगदी आपल्या घरी आजारी माणसाला घरातील आजी किन्वा आई करुन देते तशीच. आपुलकीने चौकशी करुन वहिनी माझ्याजवळ बसल्या आणि मला पेज घ्यायला लावली,गोळी घेतली.मोरया! बरे वाटू दे.अशी प्रार्थना करुन नामस्मरण करत पडुन राहिले.ह्यानी वाचायला पेपर आणला होता.
रत्नागिरी येथुन करकरे कुटुम्ब आले आहे.सौ. करकरे याना ब्रेन ट्युमर झाला होता,ऑपरेशन झाले होते.त्यान्ची अशी श्रद्धा आहे की श्रीराम महाराजान्च्या आशीर्वादाने त्या या मोठ्या सन्कटातुन बाहेर पडल्या. खरेच.आशीर्वाद लाखमोलाचाच असतो. करकरे यान्चा मुलगा खुप गोड आहे. करकरे दोघेहीजण वयाने तसे लहानच आहेत्.आणि एवढा मोठा कठीण प्रसन्ग त्यान्च्यावर आला होता. श्रद्धेच्या बळावर त्यानी त्यावर मात केली. हे खरोखरच कौतुक करण्या सारखेच आहे.
महाराज रात्री खुप उशिरा आले. सकाळी सर्व आवरुन त्याना भेटायला गेलो. नमस्कार करुन बसलो,बरेच लोक आलेले होते.महाराज प्रत्येकाची हसतमुखाने चौकशी करत होते. आम्हालाही विचारले,मला म्हणाले डॉक्टरान्कडे जाउन औषध घ्या,बरे वाटल्याशिवाय पुढे जाऊ नका.
अकरा वाजता दादा दरबार हॉस्पिटलला गेलो.गोखले सरानी तपासले,औषध लिहुन दिले. समर्थकुटीत येउन तीन दिवस झाले होते,आजची रात्र तिसरी होती म्हणजे परिक्रमेच्या नियमाप्रमाणे उद्या पुढे निघायला हवे होते.
सकाळी थोडे बरे वाटत होते म्हणून महाराजाना नमस्कार करुन निघण्याची परवानगी घेतली आणि निघालो.पण दादादरबार येईपर्यन्तच पाय लटपटायला लागले,परिक्रमेत मागे फिरायचे नसते,आता काय करायचे? गोखले सर म्हणाले,आमच्या घरी रहा,त्यान्ची क्वार्टर चार खोल्याची होती,मग तिथेच राहिलो. नर्मदा मैय्याची क्रुपाच अशी आहे. मदतीला माणसे लगेच हजर असतात.
दोन दिवसानी आणखी थोडे पुढे बडवाह रस्त्याला स्वामी रामानन्द भक्त मालधाम या आश्रमात आलो, या आश्रमात नाशिकच्या आमच्या मित्राचे { विजय महाजन} ओळखीचे श्री. व्यास हे व्यवस्थापक आहेत. काल विजयशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्याने येथे जाण्यास सान्गितले होते. हा आश्रम खुप मोठा आहे.सर्व आधुनिक सोयी सुविधा आहेत.दोन दिवस येथे राहिलो.आज ३१ डिसेम्बर आहे.२०११ सम्पले.उद्या २०१२चा प्रारम्भ.
एक आठवडा आजारपणामुळे खेडीघाटमध्येच गेला. आज पुढे निघालो,फक्त पाच कि.मि. चालुन बडवाहला नागेश्वर कुन्डाजवळील श्रीराम मन्दिर धर्मशाळेत उतरलो.श्री.महाजन यान्च्या नानाजीन्चे हे खाजगी मन्दिर आहे.धर्मशाळा आहे. शेतकरी कुटुम्ब आहे.ते परिक्रमावासीना सदाव्रत देतात पण आम्हाला त्यान्च्या घरीच भोजनास बोलावले. तिथे जवळच धर्माधिकारी आजी राहतात,त्यान्चे यजमान येथेच शिक्षक होते.सारे आयुष्य येथेच गेल्यामुळे त्या या म्हातारपणातही महाराष्ट्रात न जाता एकट्या येथेच राहतात. धर्मशाळेत सोय नव्हती म्हणून धर्माधिकारी आजीनी उद्या पहाटे त्यान्च्या घरी स्नानादि साठी बोलावले आहे.धर्मशाळेत आणखी काही परिक्रमावसीही मुक्कामाला होते म्हणुन महाजनानी तिथेच असलेल्या शाळेच्या वर्गात आमची व्यवस्था करुन दिली. नर्मदे हर!
१ जानेवारी २०१२. नवीन वर्षारम्भ. पहाटे ५ वाजता धर्माधिकारी आजीन्च्या घरी गेलो.स्नान करुन चहा घेउन धर्मशाळेत येउन पुजा आरती करुन निघालो. नागेश्वराचे दर्शन घेतले.मन्दिराच्या चारी बाजुना पाण्याचे कुन्ड आहे. नागेश्वराला उजवी घालुन पुढेमहाकाली,दत्त,गोपालक्रुष्ण यान्चे दर्शन घेउन विनोबा एक्स्प्रेस परिक्रमेसाठी सज्ज झाली.
च्यवनाश्रमाला जाण्या साठी चोरलनदी पार करावी लागते आणि तिला बरेच पाणी असते म्हणुन महाजनान्च्या सल्ल्यानुसार आम्ही वनविभागाच्या हद्दीतुन कुन्डी मार्गे पिपरीला जाण्याचे ठरवले होते. कुन्डी नन्तर ५कि.मि. जगत्पुरा फाटा आला. नुकतीच आजारपणातुन उठल्यामुळे, अशक्तपणामुळे मी थकुन गेले होते पिपरी ३०कि.मि. होते .पण आम्हाला काळजी करायचे काय कारण ? मैय्या आहे. एक बस आली ती उदयनगर मार्गे काटकूटला जात होती,कन्डक्टर म्हणाले; उदयनगरला पिपरीला जाणारी बस मिळेल. मग बसलो त्या बसमध्ये तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.
उदयपुरला जाणारा सर्व रस्ता घनदाट जन्गलातुन जात होता.बरा होता. थन्डगार सावली,पक्षान्चा किलबिलाटात उदयपुर कधी आले समजलेही नाही. उतरलो,तिथे श्री. दुबे भेटले.ते तेथिल गोपालक्रुष्ण मन्दिराचे पुजारी आहेत.दर्शन घेउन त्यानी दिलेला खडीसाखरेचा मोठा पुडा प्रसाद घेउन त्यान्च्या घरी गेलो. चहा घेतला.तिथे मुलुन्डचे ठक्करबाबा भेटले,ते गेली १२ वर्षे परिक्रमेत आहेत. उत्तम मराठी बोलत होते.
१२ वाजता रतनपुरला जाणारी बस आली,ती सीतावन मार्गे जाणारी होती बसलो. गोसावीना फोन करुन मुक्कामाच्या ठिकाणाबद्दल विचारले,ते पिपरीला डॉ. पाटील यान्च्याकडे उतरले होते. मला एकदम आठवले;नाशिकच्या प्रल्हाद भान्ड यानी पाटील डॉक्टरान्चा फोन नम्बर दिलेला आहे.मग त्याना फोन करुन आम्ही दोघे येत असल्याचे कळवले.
एक वाजता पिपरीला पोहोचलो.डॉ. सुरेश पाटील वाटच पहात होते.ते अमळनेरचे राहणारे आहेत. धारसन्स्थानचे राजे आनन्दराव पवार यानी त्याना १९७९ साली या आपल्या सन्स्थानाच्या इलाक्यात वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणले.त्यान्चा मुलगा पन्कज.सुनबाई सौ. ज्योत्स्ना. नातु चेतन आणि नात तेजस्विनी.आमच्या स्वागताला दारातच उभे होते सौ.पाटील दुसर्या मुलाकडे जळगावला गेल्या होत्या. मोठे सेवाभावी कुटुम्ब. लगेच हातपाय धुवुन भोजन केले. आता विश्रान्ती. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 34
आज फारसे लवकर उठलो नाही,आज रविवार असल्याने मुलाना सुटी होती.आमची आन्हिके उरकुन चहापाणी होते न होते तोच मुले उठली आज त्याना फक्त नवे आजी आजोबा हवे होते अगदी ब्रशवर पेस्ट लावुन देण्यापासुन आन्घोळी,नन्तर कपडे कुठले घालायचे इथपर्यन्त सर्व काही करण्यासाठी.
आन्घोळ झाल्यावर चिऊने{तेजस्विनी} फुले काढली तर चेतनने पुजेचे बाकी साहित्य दिले.मग पुजा होईपर्यन्त दोघे आमच्याजवळ बसले.मुलाना सगळ्या आरत्या येतात अगदी नर्मदामैय्याचीसुद्धा.मुलाना नर्मदाष्टकही येते हे पाहुन खुप कौतुक वाटले.
ज्योत्स्नाने नास्त्याला पोहे केले होते. नास्ता झाल्यावर चेतनचे परान्जपे आजोबान्बरोबर शेजारची मुले जमवुन क्रिकेट खेळणे सुरु झाले तर चिऊ,तिच्या मैत्रिणी बरोबर आमची भातुकली.लहान मुलान्बरोबर त्यान्च्यासारखे होउन खेळताना किती आणि कसे छान वाटते हे आजी-आजोबा झाल्यावरच कळते. एकीकडे डॉक्टरान्बरोबर गप्पा चालु होत्या.डॉक्टर आमच्या बरोबरचे असल्याने आमची मैत्री छान झाली होती,माझ्याशी हॉस्पिटल्,दवाखाना,मेडिसिन,सर्जरी या बद्दल गप्पा मारताना त्यान्चे काम एकीकडे चालु होते.जोत्स्ना स्वयम्पाकात तर पन्कज त्याच्या कामात होते.वातावरण असे होते जणू आम्ही दोघे त्यान्च्या रोजच्या जीवनाचा एक भाग होतो.
दुपारी भोजनाला खान्देशी बेत होता,भरली वान्गी आणि कळणाची भाकरी ,मिरचिचा ठेचा ,घरच्या गाईचे तुप ,घट्ट दही अगदी फक्कड बेत. जेवणे झाल्यावर गप्पा रन्गल्या त्या चहाची वेळ होईस्तोवर. चहा झाल्यावर डॉक्टर एका व्हिजीटला गेले,पन्कज काही कामासाठी बाहेर गेला,जोत्स्ना गावची आशा म्हणूनही काम करते,तिने मला तिची पोलिओ-ट्रिपल वगैरेची रजिष्टर दाखवली काही कामान्बद्दल मी माहिती दिली. चिऊ,चेतन आणि हे पत्ते खेळत होते.सन्ध्याकाळ झाली.
डॉक्टर आल्यावर त्यान्च्या बरोबर आम्ही आणि मुले फिरायला बाहेर पडलो.धावडीकुन्डाच्या रस्त्याने चालताना डॉक्टरानी आम्हाला माहिती सान्गितली.याच धावडीकुन्डात शिवबाणलिन्गे सापडत,रामजी भिल्ल या आदिवासीच्या सात पिढ्यान्पासुन .त्याच्या पणजोबाना कुन्डात बुडी मारल्यावर देवता दिसत त्या त्याना प्रसाद खाऊ घालत त्यामुळे ते म्हणे जेवत नसत. बाणलिन्ग त्याना सात पिढ्याच मिळतील नन्तर कुन्ड बुडेल असेच वरदान होते . रामजी भिल्ल सातव्या पिढितील आहे आणि धरण झाल्याने आता कुन्ड बुडाले आहे.तो आता शेती करतो.बाण मिळणे बन्द होणारच होते पण तरिही वाईटतर वाटतेच कारण ते पुण्याचे काम होते असे तो म्हणतो.पोटला गावाच्या रस्त्यापर्यन्त जाउन आम्ही माघारी फिरलो.
उद्या मराठे आणि कोथमिरे हे आमचे नाशिकचे सहपरिक्रमावासी यायचे आहेत्.त्यान्च्या बरोबर उद्या पुढे प्रवास सुरु.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 35
सकाळी सर्वच लवकर उठले कारण मुलाना शाळेत जायचे होते.तयार होउन मुले शाळेत गेली,जाताना आम्हाला बजावुन गेली आजी-आजोबा तुम्ही जायचे नाही बर का! आम्ही हो ला हो केले कारण आज मराठे कोथमिरे आले की कसे काय करायचे ते ठरणार होते. मुले गेल्यावर आमचे आन्हिक स्नान पुजा पाठ झाला तेवढ्यात श्री.गिरिधर गुप्ता आम्हाला त्यान्च्याकडे चहा नास्त्याला बोलावयाला आले. मग त्यान्च्याकडे गेलो. श्री. गिरिधर गुप्ता,श्री. दिनेश गुप्ता यान्चे कापड दुकान आहे.त्यान्च्याकडे परिक्रमावासीना सदाव्रत देण्याची परम्परा आहे. घरातील सर्व आबालव्रुद्ध आमच्या पाया पडले आम्ही अगदी सन्कोचुन गेलो होतो,परिक्रमावासीना नमस्कार करणे तिकडे पुण्याचे समजतात.
आम्ही तिथे बसलो असतानाच एक १५/२० परिक्रमावासीन्चा जत्था तिथे आला.सर्वजण नगर औरन्गाबाद कडचे मराठी बन्धु-भगिनी होत्या. त्यान्च्या बरोबर एक पुण्याचे विघ्नेश पाटील होते. त्यान्च्यापैकी काही जणाना डॉक्टरानी गोळ्या दिल्या.
ज्योत्स्ना स्वयम्पाक करुन पन्कज बरोबर मुलान्च्या शाळेत काही कार्यक्रम होता म्हणून गेली होती. मराठे कोथमिरे ११ वाजता आले,त्यान्चे स्नान पुजा झाल्यावर भोजन केले.बाकी मराठी मन्डळी पुढे गेल्याचे कळल्यावर मराठेनी लगेच निघण्याची खुप घाई केली, पुढे सगळा जन्गलाचा भाग असल्याने ग्रुपने प्रवास करणे श्रेयस्कर असे त्यान्चे म्हणणे पडले.मग डॉक्टरान्चा निरोप घेउन निघालो.
३कि.मि. वर सितावन होते. याच ठिकाणी वाल्मिकीमुनी यान्चा आश्रम होता.श्रीरामाने त्याग केल्यावर ल्क्ष्मण सीतेला येथेच सोडून गेला होता.याच ठिकाणी लव-कुश यान्चा जन्म झाला.त्यानी याच परिसरात श्रीरामाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवुन बान्धुन ठेवला होता,श्रीरामान्बरोबर युद्ध करुन त्यान्चा पराभव केला होता. अशी ही बालवीर भूमि,पण सध्या इथे एक मन्दिर आहे.श्रीराम सीता लक्ष्मण यान्च्या सुन्दर सन्गमरवरी मुर्ती आहेत. टेकडीच्या खाली पाण्याचे कुन्ड आहे. हा सारा परिसर मध्यप्रदेश सरकारच्या वनविभागाच्या अखत्यारीत आहे. त्यानी एक साधू आणि काही कर्मचार्यान्ची नेमणूक केलेली आहे.पण ते परिक्रमावासीन्ची दखलही घेत नाहीत. खुप वेळा सान्गितल्यावर त्या साधु महाराजानी आमच्या वहीवर शिक्का मारुन दिला. माकडे मात्र भरपुर आहेत. असणारच त्याना सीतामाईचे रक्षण करावे अशी श्रीरामप्रभुन्ची आज्ञाच आहे.
थोडी फोटोग्राफी करुन निघालो.उन्हाचा तडाखा मी मी म्हणत होता.तशात मराठे यान्ची तुफानमेल निघाली त्यापुढे आमची विनोबा एक्स्प्रेस म्हणजे ..... आम्ही बरेच मागे पडू लागलो,कोथमिरेही थकत होते त्याना आम्हाला सोडून पुढे जाववत नव्हते.शेवटी मीच त्याना पुढे जा असे सान्गितले.
उन्हामुळे माझी तब्येत बिघडायला लागली होती,माझे डोके खुप दुखायला लागले होते.१२कि.मि. वरील रतनपुरला पोहोचलो तेव्हा चार वाजायला आले होते.मराठे कोथमिरे चहा घेउन पुढे जाण्यास तयार होते.आम्हाला पाहिल्या बरोबर मराठे लगेच पुढे निघाले कोथमिरेन्चा पाय निघेना,आम्ही त्याना पुढे जा आमची चिन्ता करु नका असे सान्गितले.मोठ्या नाईलाजाने ते गेले. मी तिथेच एका घराच्या ओट्यावर पडले.मला चान्गलाच ताप भरला होता. नुकतीच तापातुन उठल्यावर लगेच उन्हातान्हा तुन चालण्याची घेतलेली ही मेहनत मला महागात पडणार बहुतेक असे वाटायला लागले.
चहा घेतला.आणि विचारान्ती परत पिम्परीला डॉक्टरान्च्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. रतनपुरचा सरपन्च राजेश देवडा आणि त्याचा मित्र ग्रामपन्चायतीचा सचिव प्रकाश चोयल हे आम्हाला मोटारसायकलवरुन पिम्परीला सोडायला आले.अर्थात आम्ही परत येत अस्ल्याचा डॉ. ना फोन केला.
घरी गेल्या गेल्या ज्योत्स्नाने चहा बिस्किटे दिली,डॉक्टरानी गोळी दिली.डॉक्टर म्हणाले मी म्हणणारच होतो तुम्हाला की उन्हाचे जाऊ नका,पण मराठे तुमचे सहकारी चला म्हणाले म्हणून. थोड्यावेळाने ताप उतरला.रात्री थोडी खिचडी खाल्ली.उद्या बसने नेमावरला जायचे असे ठरवले.
मध्यरात्री दोन मोटरसायकलस्वार अपघात झाल्याने आले.त्यान्च्या मोटरसायकलला एक रानडुक्कर आडवे आले होते.त्यान्चे ड्रेसिन्ग करायला डॉक्टराना मदत केली,एकाच्या डोक्याला टाकेही घातले,तेवढीच सेवा माझ्या हातुन मैय्याने घडवुन घेतली.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 36
पहाटे ५ वाजता मुलेही आमच्या बरोबरच उठली,जाऊ नका जाऊ नका अशी भुणभुण सुरु होती.सुटीत नक्की येऊ असे आश्वासन दिले तेव्हा कुठे समाधान झाले त्यान्चे.सहाची बस साडेसहाला आली,सर्वान्चा भरल्यागळ्याने निरोप घेउन बसमध्ये बसलो.
सात वाजता बस सुटली दाट जन्गलातुन जाणारा वळवळणान्चा रस्ता काळ्या नागिणीसारखा दिसत होता. थन्डी खुप होती,दाट धुक्याची दुलई पान्घरुन सारी स्रुष्टी पहुडली होती, पाखरान्चा गोड किलबिलाट भुपाळी गाऊन सुर्यदेवाला जागवत होता.आणि ,एका डोन्गरा आडून तो हळूच डोकावला.पिचकारीने त्याने क्षणात सार्या आसमन्तात केशरीरन्गाची उधळण केली.सारी धरती खुशीने खुदकन हसली. पाना पानान्वरचे दवबिन्दुन्चे मोती चमकू लागले.पाखरान्चा चिवचिवाट वाढला,रानगवतावरची छोटी छोटी रन्गीबिरन्गी फुले मन्द वार्याच्या झुळूके बरोबर हसत डोलू लागली.देवाची ही पुण्यभूमि सुखी झाली.
साडेआठ वाजता चापडागाव आले.याठिकाणी आम्हाला बस बदलायची होती,उतरलो. एका हॉटेलच्या बाकावर पिशव्या ठेवल्या. नेमावरची बस नऊ वाजता होती.म्हणुन पोहे,चहा असा नास्ता केला,गोळी घेतली.चापडागाव बर्यापैकी मोठे असावे कारण बसेसची बरीच येजा दिसत होती,वर्दळ मोठी होती. बाजाराचा दिवस दिसत होता. येणारा जाणारा आमची मोठ्या आपुलकीने चौकशी करत होता.चहापाणी विचारत होता,परिक्रमावासी म्हणून नमस्कार करत होता. हॉटेलवाल्यानेही पैसे घेतले नाहीत. परिक्रमेने पुण्य मिळते म्हणतात आम्हालामात्र माणूसकीचे,बन्धुभावाचे सतत घडत असलेले हे दर्शनच खुप काही अगदी भरभरुन देत होते,परिक्रमा उचलल्याचे सार्थक वाटत होते.
बरोबर नऊ वाजता बस आली. बसला गर्दी होती पण आम्हाला बसायला जागा मिळाली.मध्यप्रदेशात खाजगी बसेस असतात पण त्यान्ची अवस्था मात्र त्या प्रमाणात बरी नसते,किती माणसे भरायची याला काही मर्यादाच नसते,प्रत्येक स्टॉपवर बस थाम्बते;एकदोनजण उतरतात आणि साताआठ चढतात. चापडागावाबाहेर पडेपर्यन्त बस साताआठ ठिकाणी थाम्बली. हा जबलपुर हायवे आहे पण रस्ता रुन्दीकरण चालू आहे त्यामुळे प्रचन्ड खड्डे-खुड्डे धुळ यातुन खडखडत बस साडेबारा वाजता एकदाची नेमावरला पोहोचली.
बसस्टॉप जवळच ग्वाल टेकडीवर ब्रम्हचारी आश्रमात पोहोचलो,मैयाचे विस्तीर्ण पात्र दिसले आणि बसमध्ये ठेचाळून निघालेल्या शरीराला वार्याच्या सुखद झुळूकीने आराम वाटला.आम्ही पोहोचलो त्यावेळी सर्वजण भोजनाला बसले होते,गाडगीळ महाराजानी हात-पाय धुवुन आधी भोजन करुन घ्या असे सान्गितले म्हणून पिशव्या तिथेच ओट्यावर ठेउन हात-पाय धुतले आणि पन्गतीत येउन बसलो.वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,सहज हवन होते नाम घेता फुकाचे,जीवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रम्ह, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म! ह्या आपल्या अस्सल मराठी श्लोकाने भोजनाला सुरवात झाली आणि पिम्परीहुन आपल्याच एका नातलगाकडुन नेमावरला दुसर्या नातलगाकडे आलो असे वाटले.
भोजन झाल्यावर एका खोलीत आसन लावले.पहाटे स्नान झालेले होते तरीही पुन्हा स्नान करुन कपडे धुतले.सर्व आश्रम परिसर अगदी स्वच्छ आहे. आम्ही उतरलो तिथे चार खोल्या आहेत्,समोरच आणखी काही खोल्या आहेत. दोन शेडही आहेत,नन्तर चार पायर्या उतरुन भोजनशाळा आहे. तिच्यापुढे छान सारवलेले अन्गण आहे. अन्गणात मोठे आवळ्याचे दोन व्रुक्ष आहेत,काही फुलझाडे आहेत. चार पायर्या चढुन उजव्या हाताला गाडगीळ महाराजान्चे निवासस्थान असुन त्या समोर सिमेन्टने बान्धलेला मोठा ओटावजा अन्गण आहे,तुळशीचे सुन्दर व्रुन्दावन आहे. डेरेदार तुळस खुप सुन्दर दिसते, त्या ओट्यालगत खालच्या बाजुला सुन्दर व्रुक्षमन्दिर आणि गुलाब कुन्दा वगैरे सुवासिक फुलानी बहरलेला बगिचा आहे. समोरच मैय्याचे दर्शन होते,मैय्याच्या पात्राच्या मध्यभागी नाभिकुन्ड आहे. येथुन पुर्वेकडे अमरकन्टक मैय्याचे उगमस्थान आणि पश्चिमेला रत्नसागर सन्गमस्थळ दोन्ही सारख्याच अन्तरावर आहेत. म्हणुन या स्थानाला मैय्याचे नाभिस्थान {मध्य} म्हणतात.
चार वाजता चहा झाल्यावर गावात फेरफटका मारुन गरजेच्या वस्तू खरेदी करुन आलो.माझे घड्याळ बन्द पडले होते पण येथे त्याचा सेल मिळाला नाही. सन्ध्याकाळी तुळशीच्या कट्ट्यावर बसलो. गाडगीळ महाराजही बसले होते.ते अगदी भालोदच्या प्रतापे महाराजान्सारखेच साधे आहेत. त्यान्ची दाढी-केस वाढलेली मुर्ती अगदी समर्थ रामदासस्वामीन्प्रमाणे दिसते. ते त्यान्च्या सारखीच भगवी कफनी घालतात.अगदी साधे कसलाही डामडौल नाही.आमच्याशी छान गप्पा मारत होते. सरदारसरोवराची ऊन्ची वाढवणे,त्यामुळे बुडणारे क्षेत्र,होणारे विस्थापित यावरही गप्पा झाल्या, आधुनीक धरणे वगैरे प्रगती हवी असेल तर अॅतिहासिक धरोहर वगैरे विसरायला हवे असे म्हणाले.
आश्रमाच्या मागे बगिच्यात मोगर्याच्या मान्डवाखाली श्रीवासुदेवानन्दसरस्वती यान्ची पदचिन्हे आहेत त्यान्चे दर्शन घेतले.तिन्हिसान्जेच्यावेळी महाराज स्वतः कन्दिलाच्या काचा पुसुन तेलवात करत होते,इकडे नेहेमीच लाइट जात असतात त्यामुळे तयारीत रहावे लागते असे म्हणाले.तुळशीपुढे सान्जवात लावल्यावर महाराजान्च्या खोलीत आरतीसाठी सर्वजण जमले.तिथे महाराजान्च्या गुरुन्ची बालब्रम्हचारी महाराजान्ची तसबीर एका चौरन्गावर ठेवलेली आहे. आतमध्ये देव्हारा आहे. आधी सर्व आरत्या झाल्या समर्थ रामदासस्वामीन्चीही आरती म्हटली. नन्तर गीतेचा पन्धरावा अध्याय,मनाचे श्लोक,भिमरुपीमहारुद्रा आणि हनुमानचालिसा यान्चे पठण झाले,नन्तर महाराजानी मनाच्या श्लोकान्वर थोडे भाष्य केले. नन्तर प्रसाद वाटप झाले. आजुबाजुची बरीच मुले आली होती.
रात्री भोजनाला खिचडीचा बेत होता. जेवण झाल्यावर आश्रमाचे व्यवस्थापक श्री.विक्रम तुळापुरकर यान्च्या बरोबर खोलीबाहेरच्या व्हरान्ड्यात गप्पा मारत बसलो. तुळापुरकर हे मागे आम्ही कैलास यात्रेला गेलो असताना आमच्या ग्रुपमधिल तुळापुरकर यान्चा पुतण्याच आहे असे कळले. उद्या एकादशी आहे म्हणून येथेच राहणार आहोत.
पहाटे उठलो,प्रातर्विधी आटोपले,स्नानाला मैय्याच्या घाटावर जाणार होतो पण अन्धार होता त्यामुळे झुन्जुमुन्जु होईपर्यन्त थाम्बावे लागले. मैय्याचा घाट प्रशस्त दगडी बान्धीव आहे. जवळच पडझड झालेला किल्ला किन्वा राजवाडा आहे. सिद्धनाथाचे पान्डवकालीन मन्दीर आहे. ते सुस्थितीत आहे. सुन्दर अगदी बारीक कोरीव काम आहे. गाभार्यासमोर सुबक नन्दी एका दगडी कोरीव मन्डपात विराजमान आहे. गाभार्यात श्रीसिद्धनाथान्ची पिन्डी आहे. ह्याची स्थापना पान्डवानी केली अशी आख्यायिका आहे. हा सर्व परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे पण येथे कुठलीही माहिती लिहिलेली नाही. त्यामुळे या स्थानाचा इतिहास समजत नाही.
आज एकादशी असल्याने खुप गर्दी आहे. बरेचसे परिक्रमावासी घाटावरच मुक्कामाला आहेत. आपल्या आश्रमात बहुदा फक्त मराठी परिक्रमावासीच उतरत असावेत्.आश्रमात नर्मदाजयन्तीची तयारी सुरु आहे.दुपारी गोन्दवल्याच्या कुलकर्णीबाई नर्मदाजयन्तीसाठी आल्या,पुण्याहुन पुणे-जम्मु झेलमएक्स्प्रेसने खान्डव्याला उतरुन बसने नेमावर असा प्रवास त्यानी केला. सन्ध्याकाळी पुण्याचेच शिन्दे हे सेवानिव्रुत्त शिक्षक वय ७५वर्ष हे पायी परिक्रमेत असलेले आले. त्यान्ची जिद्द बघुन नवल वाटले,एकटेच निघाले आहेत. सन्ध्याकाळी हन्डीयाला जोडणारा पुल पाहून आलो. मैय्याच्या या उत्तर तीरावर सिद्धनाथ तर पलीकडे दक्षिणतीरावर रिद्धनाथ आहेत.
रात्री बोलता बोलता तुळापुरकर म्हणाले,मला गुरुचरित्र सप्तशतीचे पुस्तक हवे आहे,मोठ्या गुरुचरित्राचे पारायण करण्यास बराच वेळ लागतो,सप्तशती बरे पडते.मी गरुडेश्वरला ते पुस्तक घेतले होते सत्पात्री ब्राम्हणाची इच्छा होती म्हणून ते पुस्तक मी त्याना दिले. उद्या बुधनीसाठी प्रयाण.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 37
पहाटे येथे सुर्यपुजा करुन सर्वानी बारा सुर्यनमस्कार घालण्याचा प्रघात आहे.सर्वान्बरोबर महाराजही सुर्यनमस्कार घालतात.आम्हीही सहभागी झालो. रामदासी परम्परा आहे या आश्रमाची.
महाराजाना नमस्कार करुन निघण्याची परवानगी मागितली,चहा घेउन मग निघा म्हणाले म्हणुन तसेच केले. शिन्दे काका म्हणाले उद्या गेला असतात तर मला सोबत झाली असती.आम्ही त्याना मराठे आणि कोथमिरे हे आमचे सहकारी आज उद्याकडे येतील त्यान्च्या बरोबर या तोपर्यन्त येथेच थाम्बा दमला आहात विश्रान्ती घ्या असे सान्गितले.
विनोबाएक्स्प्रेस निघाली.मैय्या किनार्याने वाटचाल सुरु.गव्हाची हिरवीगार शेते शिणवटा घालवत होती.दप्पर,चिचली गावे पार करुन करोन्दला एका चहाच्या टपरीवर चहा घेतला,१०कि.मि. चाल झाली होती. नन्तर पिपलतेरिया आले. एक आश्रम दिसला शिरलो आत. महाराज म्हणाले भोजनप्रसादी पाओ,आम्ही लगेच हो म्हणालो. बोलता बोलता कळले श्री. सुहास लिमये येथेच येउन गेले होते.आम्हीही परिक्रमा त्यानी त्यान्च्या पुस्तकात दिलेल्या मार्गावरुनच बहुतान्शी करत आहोत. त्यामुळे आमचा आजचा मुक्काम छिपानेर येथे दादाधुनिवाले यान्च्या आश्रमात असणार होता.
दोन वाजता पुढे निघालो. लिमयेकाकानी म्हटल्याप्रमाणे खरेच बोरीची खुप झाडे होती,भरपुर बोरे खाल्ली. शेताच्या कडेने बोरे वेचुन खाण्याची गम्मत काही न्यारीच.सिहोर जिल्ह्यात प्रवेश केला.सन्ध्याकाळी सहा वाजता छिपानेरला दादाधुनिवाले आश्रमात आलो.
इथे नर्मदामैय्याचे रुप सुन्दर आहे.पण पाणी कमी होते.स्नान केले पाणी गार होते,थन्डी वाजु लागली.थन्डीचे दिवस आहेतच असा विचार केला. पुजा आरती केली.आज आमच्याबरोबर मध्यप्रदेशातील परिक्रमावासी आहेत सगळे शेतकरी. त्यान्ची गावरान हिन्दी समजत नाही. भोजनाला खिचडी-कढी असा बेत होता. आता विश्रान्ती.
रात्री मला ताप भरला,मैय्या ! असे २०/२२कि.मि. चालल्यावर ताप येऊ लागला तर आमची परिक्रमा कशी पुर्ण होणार? आम्ही उठलेले पाहिल्यावर आश्रमाचे महन्त आले,त्यानी चौकशी केली मला रडू यायला लागले,ते म्हणाले बेटा रोना नही,परिक्रमा पैदल हो या बससे कुछ नही परिक्रमा पुर्ण होना काफी है. आप कल बससे बुधनी जाओ मी मान डोलावली,नाइलाज को क्या इलाज.
सकाळी चहा घेउन निघालो. सात वाजता बस मिळाली. ४५कि.मि.वरील बुधनीला पोहोचायला दुपारचे १२ वाजले. दर दोन कि.मि.वर बस थाम्बत असे. बसमधुन उतरलो. घाट दोनकि.मि. आतमध्ये होता. लागलो चालायला. रेल्वे क्रॉसिन्ग आले,फाटक बन्द होते.थोडावेळ थाम्बावे लागले.गाडी गेली फाटक उघडल्यावर वाहनान्ची ही गर्दी उसळली,कशीबशी वाट काढत असताना व्हायचेतेच झाले.माझा पाय मुरगळला आणि मी पडले,हे पुढे गेले होते,माझी हाक त्याना अॅकू गेली नाही.एका भाऊने हात देउन उठवले. पाय लचकला होता,गुडघ्याला खरचटले होते. कसेतरी त्याना गाठले,झालेले सान्गितले. थोडे चालल्यावर बुधनीचे कोर्ट आले,बाहेर चहाची टपरी होती,बसलो. चहा सान्गितला,गुडघ्याला नी़क्याप चढवली.घाट कुठे आहे चौकशी केली जवळच आहे,थोड्या अन्तरावर भन्डारा चालू आहे तिथे भोजन घेउन मग घाटावर जा असे एका भाऊने सान्गितले.
पुढे निघालो.पाय दुखत होता,चालायला त्रास होत होता,भन्डार्याचे ठीकाण निघुन गेलेले कळलेच नाही. घाटावर पोहोचलो.आश्रमात गेलो पण तिथे नुसता गान्जेकसान्चा अड्डा होता,ते गोपाल मन्दिर होते पण तिथले महाराज ब्रम्हलीन झाल्यापासुन अनावस्था आहे असे कळले.ठाकूरसमाज आणि दुसरीएक धर्मशाळाही चान्गल्या नव्हत्या.एका चहाच्या टपरीवर बसलो,कथिया हॉटेल.त्याचे मालक दिनेशचन्द्र राठौर यानी मा रेवा किराणासेन्टरचे मालक श्री.दुबे यानी बान्धलेल्या खोलीत रहा असा सल्ला दिला,श्री.दुबे बाहेर गेले होते ते येईपर्यन्त हॉटेलमध्ये वडा खाऊन चहा घेतला.
बोलता बोलता कळले कथिया होटेलचे मालक दिनेशचन्द्र हे आग्र्याचे राहाणारे आहेत.आमच्या मुलीचे सासरचे गाव आणि त्यान्चे गाव एकच आहे,जरार; जिल्हा आग्रा. ते तिच्या सासर्याना चान्गले ओळखतात.मग गावकी बहुके माता-पिता म्हणुन मोठे आगत-स्वागत झाले. दुबे आल्यावर त्यानी दिलेल्या खोलीत सामान ठेउन आसन लावले. रात्री दुबे डबा देणार आहेत.
थोडी विश्रान्ती घेउन सन्ध्याकाळी घाटावर गेलो. ४० पायर्यान्चा बान्धीव घाटाचे १९९८ साली नुतनीकरण झाले आहे,महामहीन राष्ट्रपती शन्करदयाळ शर्मा यान्च्या शुभहस्ते. मैय्याचे रुप मनमोहक आहे. भरपुर मासे आहेत. घाटावर मैय्याची आरती झाली. परत खोलीवर आल्यावर पुजा आरती केली.आशिष दुबे यानी डबा आणुन दिला,भोजन झाले.पाय सुजला आहे,तापही आहे गोळी घेतली.उद्या बसने पतईघाटला जायचे असे ठरवले.आता विश्रान्ती. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 38
झुन्जुमुन्जु झाल्यावर घाटावर स्नानासाठी गेलो. गावातिल लोकही स्नानासाठी आलेले होते. पायरीवर बसुन स्नान करायला लागलो. थन्डीचे दिवस आहेत्,पण नर्मदाजल सुखद उबदार होते. अरुणोदय झाला होता पुर्वा उजळली होती,आणि आपल्या सातरन्गी किरणान्च्या घोड्यान्च्या रथात आरुढ होउन भास्कराचे आगमन झाले.पुर्वेकडे तोन्डकरुन सुर्याला अर्घ्य देण्यासाठी उभी राहिले तर तेव्हा दिसले,सुर्य आपले प्रतिबिम्ब मैय्याच्या जलात पाहुन जणू तिला विचारत होता,खरच धरतीच्या सफरीवर जाण्यासाठी मी रथावर आरुढ होउन जेव्हा निघतो तेव्हा इतका सुन्दर दिसतो? की ही सर्व माणसे भान हरपुन माझ्याकडे बघत राहतात,पक्षी किलबिलाट करु लागतात,व्रुक्षवेली बहरतात,कमलफुले फुलतात,रान फुले हसु लागतात. सान्ग शिवकन्ये ! खरच मी इतका सुन्दर दिसतो? आणि मैय्या लहरीन्च्या खळखळत्या हास्याने उत्तर देत होती,अरे दिवाकरा ! खरच तू खुपच सुन्दर आहेस. तिचे हे उत्तर अॅकुन सुर्याने मोठ्या खुशीने तिच्यावर सप्तरन्गान्ची उधळण केली. मैय्याला लाल सोनेरी फिरत्या रन्गान्ची जणू कान्जीवरमची साडीच भेट दिली. आणि मैय्याही लगेच ती परिधान करुन चमचमत रत्नसागराला भेटण्यासाठी लगबगीने निघाली. मग आम्हीही अर्घ्य देउन परतलो.
खोलीत येउन निघायची तयारी केली.आशिष दुबेनी डबा खोलीतच ठेवुन दाराला नुसती कडी घालुन गेलात तरी चालेल असे सान्गितले होते, म्हणून नर्मदामैय्याच्या आरती-प्रसादासाठी काही पैसे त्या डब्यात ठेवुन आम्ही निघालो. काल दिनेशने जवळचा रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने चौराहापर्यन्त फक्त २कि.मि. यायला माझ्या दुखर्या पायामुळे पाउणतास लागला. पिण्याचे पाणी सम्पले होते,समोरच एक माताजी अन्गणात झाडलोट करत होत्या त्यान्च्याकडे पाणी मागितले.त्यानी घरात बोलावले लगेच चहाही दिला,पाण्याच्या बाटल्याही भरुन दिल्या. घरातील सर्वानी आम्हाला परिक्रमावासी म्हणुन नमस्कार केला. ते घर बुधनी भाजपच्या अध्यक्षान्चे होते. त्या भाविक कुटुम्बाचा निरोप घेउन बसस्टॉपवर आलो.
तासभर वाट पाहिल्यावर फौजदार कम्पनीची बस आली,पतईघाटला ही बस जाते असे कन्ड्क्टरने सान्गितले म्हणुन चढलो. बस खचाखच भरलेली होती,सर्वात मागच्या सीटवर कसेबसे बसलो. पिशव्या ठेवायलाही जागा नव्हती;पायापाशी ठेवल्या .गळ्यातच घेउन बसलो. रस्ता भयन्कर होता त्यातच मागच्या सीट अन्ग खिळखिळे करणारे धक्के बसत होते.प्रत्येक एकदोन कि.मि. थाम्बत प्रवाश्यान्ची चढ उतर करत बस डूकू डूकू चालत होती,चालत गेलो असतो तर बरे झाले असते असे होउन गेले होते. दुपारी दीडवाजता पतईघाट आले उतरा असे सान्गितले म्हणुन उतरलो. बस भुर्कन निघुन गेली. रस्त्याच्या समोरील बाजुला पाटी होती थाना दियावन.
अरे बापरे! पतईघाट नाही. तिथे फक्त एक टपरीवजा एक हॉटेल होते.काहीमाणसे तिथे होती.चौकशी करता समजले पतईघाट येथुन १०कि.मि. दुर आहे. एरवी तिथे जाण्यासाठी रिक्षा मिळतात पण आज काही कारणाने रिक्षा बन्द होत्या म्हणजे आता चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.खुप भुक लागली होती,एक साधुबाबा चालवत असलेल्या त्या एकुलत्याएक टपरीवर फक्त चहा बिस्किटेच मिळत होती तीच घेतली.पतईघाट खुप सुन्दर निसर्गरम्य ठिकाण आहे असे पुण्याच्या सुहास लिमये यान्च्या नर्मदे हर हरनर्मदे या पुस्तकात लिहिलेले आहे,आम्ही आमची परिक्रमा बहुतान्शी त्या पुस्तकानुसार करत होतो म्हणून मला पतईघाटला जावेच असे फार वाटत होते पण माझ्या तब्येतीमुळे आणि आता सुजलेल्या पायामुळे हे मात्र पायी जायचे नाही यावर ठाम होते. तिथे असलेले एकग्रुहस्थ म्हणाले,तीन वाजता जबलपुरला जाणारी बस आहे,तुम्ही तिने जबलपुरला जाणेच श्रेयस्कर होईल.
तीन वाजता बस आली.गर्दी होतीच पण चढलो. थेट जबलपुरला जाणार म्हटल्यावर कन्डक्टरने दोघा जवळच जाण्यार्या प्रवाशाना उठवुन आम्हाला जागा दिली.खट्टूमनाने प्रवास सुरु झाला कारण आता सरळ जबलपुरला जाण्याने वाटेतील हीरापुर,ब्रम्हान्डघाट,भेडाघाट,छोटी धुव्वाधार वगैरे सुन्दर ठिकाणे पाहता येणार नव्हती.मन नाराज झाले होते.
खराब रस्त्याने नाराज मनाने प्रवास करताना वाटेत लागलेले जन्गल दर्या डोन्गर यान्च्या सौन्दर्याचा आस्वाद घेणेही जमले नाही.जबलपुरला पोहोचायला सन्ध्याकाळ होणार होती,तिथे राहायचे कुठे आश्रमाची,धर्मशाळेची काय सोय असेल मैय्या किती दुर असेल काहीच कल्पना नव्हती . आमच्या मुलीच्या राणीच्या कॉलेजमधील शिरीष कुलकर्णी याची ताई जबलपुरला राहत असे हे आठवले.शिरीष आम्हाला अगदी जवळचा आहे म्हणून त्याला फोन केला. त्याच्या नवीन दुकानाचे दुसर्यादिवशी उद्घाटन होते त्या गडबडीत तो होता पण मला बरे नसल्याचे मदतीची गरज असल्याचे सान्गितले,तो म्हणाला मी ताईचा पत्ता आणि फोननम्बर एस एम एस करतो . आम्ही निश्चिन्त झालो.
सात वाजता जबलपुर आले. शिरीषने काहीच कळवले नव्हते,त्याला फोन केला तर तो बन्द. आता काय करायचे? आठवले, डायरीत जबलपुर मधील काही हॉटेल्सची इन्टरनेट वरुन घेतलेली यादी आहे. मग त्या प्रमाणे रिक्षाने रसेलचौकातील हॉटेल क्रिष्णा मध्ये आलो. हॉटेल स्टार हॉटेल होते त्यामूळे फार महाग पण आता नाइलाज होता चेक इन केले.
रुम मध्ये आल्यावर पहिल्यान्दा गरम पाण्याने स्नान केले कारण फारच चिकचिक झाले होते. पुजापाठ करुन खाली रेस्टॉरन्ट मध्ये जावुन पोटभर जेवलो,कारण आज उपाशीच होतो, आता विश्रान्ती.
आज मैय्याने दोन धडे शिकवले, पैशासाठी कन्डक्टर दिशाभुल करतो. आणि मुख्य म्हणजे काहीजण आपल्याला कितीही जवळचे वाटत असले तरी ते तसे असतातच असे नाही. म्हणून जो दुसर्यावरी विसम्बला त्याचा कार्यभाग बुडाला हे नेहेमी ध्यानात ठेवावे.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 39
हा ताप माझ्या मागे हातधुन लागला आहे. स्नान पुजा करुन बाहेर पडलो,गोळ्या बदलुन बघते. मेडिकल मधुन दुसर्या गोळ्या घेतल्या, नन्तर माझ्या घड्याळाचा सेल बदलुन घेतला,फोटो शॉप मध्ये आतापर्यन्त काढलेले फोटो पेनड्राइव्ह मध्ये टाकुन घेतले. नन्तर रेल्वेस्टेशनवर जाऊन अमरकन्टकसाठी गाडीची चौकशी केली पण सुटेबल गाडी नव्हती. परत हॉटेलवर परत आलो.
माझा ताप वाढला होता,गोळी घेतली.मनात विचारान्चे काहुर माजले होते,का येत असेल ताप? एप्रिल मध्ये टायफॉइड झाला होता,ब्लडमधील एस.जी.ओ.टी. एस.जी.पी.टी. वाढलेले होते.लिव्हर फन्क्शन बिघडलेले होते,परिक्रमा काळात खुपदा बोअरचे पाणी पिण्यात आले होते,मान्डवगडाच्या पायथ्याचे गाव मतलबपुर येथे तर पाण्यात फ्लोराईड जास्त प्रमाणात होते,या सार्याचा तर हा परिणाम नसेल? यावर्षी पुणे मुम्बई येथे बदल्या झाल्या त्या काळात हॉस्टेलला राहणे,मेसचे जेवण,वेळेला बाहेर हॉटेलमध्ये खाणे. या सार्याचा हा परिणाम असणार त्यातच परिक्रमेच्या सुरवातीच्या दिवसात सह परिक्रमावासीच्या आग्रहाने एकेका दिवसात उरापोटी ३५/४० कि.मि. चालणे हेच झेपले नाही.
मैय्या! मला परिक्रमा करायची आहे हे मी मागची पन्धरावर्ष घोकते आहे.जवळ जवळ निम्मी परिक्रमा होत आली आहे.मला धीर दे. मला एकदम पुण्याच्या नर्मदाप्रसाद जोशी यान्ची आठवण झाली.भागवत बरोबर होते त्यावेळी यान्च्याशी फोनवर बोलणे झाले होते,किती आश्वासक स्वर होता त्यान्चा.किती मनापासुन त्यानी परिक्रमेबद्दल सान्गितले होते. नर्मदे हर नर्मदे हर म्हणत डोळे मिटून पडले होते,आणि माझा फोन वाजला,तो फोन नर्मदाप्रसाद जोशी यान्चा होता ते म्हणाले, बसने परिक्रमा करावी लागते आहे म्हणुन खन्त करु नको. तब्येत साम्भाळून जमेल त्याप्रमाणे परिक्रमा पुर्ण कर;ते महत्त्वाचे आहे.मला खुपच आश्चर्य वाटले याना माझ्या मनाची हाक कशी अॅकू आली?टेलेपथी? खुप आधार वाटला हुरुप आला, मी नक्की परिक्रमा पुर्ण करेन. भागवताना फोन केला ते अमरकन्टकहुन दिन्डोरीला पोहोचले आहेत. म्हणजे येत्या आठवड्यात त्यान्ची परिक्रमा पुर्ण होईल.उदयाही जबलपुरच.
आजही ताप आहेच. डॉ. घाडगे सरानी मागे लिव्हर फन्क्शन,टॉयफॉइड साठी दिलेल्या गोळ्यान्चे प्रिस्क्रिपशन घेउन त्या गोळ्या आणण्यासाठी हे बाहेर गेले मी नामस्मरण करीत पडून राहिले. येताना हे बसची चौकशी करुन आले,अमरकन्टकला जाणारी बस मैय्या पार करुन दिन्डोरीमार्गे जाते,आम्ही परिक्रमेत असल्याने मैय्या आम्हाला पार करुन चालणार नाही त्यामुळे आम्हाला मन्डला येथे जावे लागेल तिथुन मग पुढे कसे जायचे ते ठरवावे लागेल.
आज चौथा दिवस जबलपुरात आहोत,आमचे सारे बजेटच कोसळले. राणीचा फोन आला ,ती म्हणाली पैशान्चा विचार करायचा नाही पुर्ण बरे वाटले की मगच पुढे जायचे,यापुढची परिक्रमा बसने रेल्वेने मुक्काम वाटेतील मोठ्या शहरात चान्गल्या हॉटेलमध्येच करत पुर्ण करायची आणि नन्तर नाशिकला न जाता थेट दिल्लीलाच यायचे. हो ग बाई! किती काळजी करशील? मोरया तुझी क्रुपा! म्हणुन मी राणीची आई आहे. नर्मदे हर!
सकाळी स्नानपुजा केली,नास्ता करुन हॉटेल क्रुष्णा सोडले,खरेतर बसस्टॉप जवळच होता पण मला अशक्तपणा आला होता त्यामुळे रिक्षाने गेलो. मन्डला बस लागलेली होती.जबलपुरला आधी ति़कीट काढून मग नम्बरप्रमाणे बसमध्ये बसतात, हे चान्गले आहे. बसलो .बसही चान्गली होती .
मन्डला ९७कि.मि. वर होते रस्ताही चान्गला होता.रस्त्यात लागणार्या गावान्ची नावे ओळखीची होती,सुहास लिमये काका याच मार्गे पायी गेले होते असे लक्षात आले.
सव्वाबारा वाजता मन्डला येथे पोहोचलो.बसस्टॉप समोर आर के हॉटेलमध्ये मुक्काम केला. सन्ध्याकाळी मन्डला पाहाण्यासाठी बाहेर पडलो.येथील लोक हीच खरी माहिष्मती नगरी जेथे च आद्यशन्कराचार्य आणि मन्डनमिश्र यान्चा वाद झाला असे मानतात.मन्डलेश्वरचे लोक त्यान्चे शहर म्हणजेच माहिष्मती नगरी असे म्हणतात. असो.
बन्जर-नर्मदा सन्गमावर गेलो तिथे बान्धीव घाट नव्हता दोन्ही नद्याना भरपुर पाणी होते लोक अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी नावेचा उपयोग करत होते.समोरच्या तीरावर महाराजपुर होते मन्डला आणि महाराजपुर म्हटलेतर जुळी शहरे होती नर्मदेवर दोन्ही शहरे जोडणारा पुल आहे. त्या घाटाजवळ पडक्या किल्ल्याचे अवशेष आहेत एक बुरुजही आहे. तिथेच पन्चमुखी शिवाचे छोटे मन्दिर आहे.सुबक कोरीव काम असलेली शिवशन्कराची उभी मुर्ती आहे. तिथेच दुसरीही दोन मन्दिरे आहेत त्यान्ची जडणघडण मशिदीप्रमाणे आहे. नन्तर रन्गरेज,पिप्पल हे दोन बन्जरनदीवरील घाट पाहिले.काही फोटोही काढले.पिप्पल घाटाजवळ बन्जरनदीवर पुलाचे काम चालु आहे. तो पुल झाल्यावर रस्त्यात येणारी बरीच जुनी पक्की घरे पाडावी लागणार आहेत,आणि प्रगतीच्या आड येणारी हीच खरी अडचण.
हॉटेलवर परत येताना अमरकन्टकच्या बसची चौकशी केली.सकाळी सव्वानऊ वाजता बस आहे. परत आलो.मैय्याची आरती केली. माईला माझ्या मोठ्या बहीणीला फोन केला.ती काळजी करतच होती.आम्ही सुखरुप आहोत दोनतीन दिवसात अमरकन्टकला पोहोचू असे तिला सान्गितले.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 40
स्नान पुजा आरती करुन चेक आउट केले. समोरच असलेल्या बसस्टॉपवर गेलो,टपरीवर भाजीवडा चहा असा नास्ता केला. निवास मार्गे कुन्डम बस लागलेली होती,मिनि बस चान्गली होती.बसलो. नऊची बस बरोबर नऊला सुटली आणि बाहेर येउन उभी राहिली . हळू हळू लोक येत होते बसमध्ये बसत होते,पन्धराएक मिनिटे झाली बस निघाली साधारण २००मि. गेल्यावर परत थाम्बली. बराच वेळ झाला,घाई घाईने दोघीतिघीजणी आल्या बसमध्ये चढल्या, आज देर हो गयी दीदी ,कन्डक्टरने विचारले.जी. क्या करे? घरका कामकाज निपटाके आना पडता है भैय्याजी! दीदीने उत्तर दिले.बस निघाली,पुन्हा थाम्बली.पुन्हा वाट बघणे लोक येणे बस निघणे असे करता करता बस गावाबाहेर पडायला दहा वाजुन गेले.
रस्ता चान्गला होता. जन्गल होते पण घनदाट नव्हते. प्रत्येक स्टॉपला थाम्बत निवासला बस पोहोचली तेव्हा सकाळचे साडेअकरा वाजले होते. बस थाम्बली,आमच्या दोघान्शिवाय बाकी सारे प्रवासी उतरले,ड्रायव्हर-कन्डक्टरही गायब झाले. उन्हाचा चटका जाणवायला लागला होता.बराच वेळ झाला बस कधी निघणार? एका माणसाला विचारले,साडेबारा वाजता जाते असे त्याने सान्गितले.जवळचे पाणी सम्पले होते पण या आदिवासी भागात बिसलरीवॉटर मिळणे शक्य नव्हते. नाइलाजाने हापशाचे पाणी बाटलीत भरुन घेतले. आजारपण सुरु असताना असे पाणी पिणे योग्य नव्हते पण तहान खुप लागली होती प्यायले. एकदाचे साडेबारा वाजले पण ड्रायव्हर-कन्डक्टर साहेबान्चा कुठेच पत्ता नव्हता.
पन्धराएक मिनिटे गेली दुसरेच ड्रायव्हर-कन्डक्टर आले. लोकही आले बस सुरु झाली. २५/३० कि.मि. अन्तरावरच्या कुन्डमला पोहोचायला दुपारचे दोन वाजुन गेले. कुन्डम तालुका आहे,बर्यापैकी मोठे गाव असावे पण बसस्टॉप खुपच गचाळ आहे.एका दुकानाच्या फळीवर बसलो होतो,खुप भुक लागली होती पण काही खाण्यासारखे नव्हते म्हणून चहा-बिस्किटे घेतली. तीन वाजता एक बस आली पण ती मन्डला-महाराजपुर-दिन्डोरी मार्गे अमरकन्टकला जाणारी होती,मैय्या ओलान्डून जाणारी,त्यामुळे आम्हाला ती चालणार नव्हती. आम्हाला आज उमरियाला मुक्काम करुन उद्या अनुपपुर आणि परवा अमरकन्टक असाच प्रवास करावा लागणार होता.
नन्तर आलेल्या बसमध्ये जागा नव्हती पण पिशव्या वरती टपावर टाकुन कसेबसे बसमध्ये चढलो.मैय्याची कुपी असलेली शबनम पिशवी एका मुलीजवळ देउन कसेतरी उभे राहिलो. रस्ता चान्गला होता पण थाम्बत थाम्बत शाहपुरला चार वाजता पोहोचली. उमरियाची बस पाच वाजता होती. बसलो एका टपरीवर.
श्री.कुमार गुप्त्ता यानी चौकशी केली . आमच्यासाठी चहा सान्गितला. बोलता बोलता त्रम्बकेश्वरचा विषय निघाला म्हणाले, तेथे यात्रेकरुना लुबाडतात गन्गेचे तीर्थ देण्यासाठी सुद्धा पैसे घेतात.शरमेने मान खाली झाली कारण ते म्हणत होते ते सत्य होते.एवढ्या उन्च ब्रम्हगिरी,गन्गाद्वारला चढुन गेल्यानन्तर तीर्था साठी तिथले पुजारी पैसे दिल्याशिवाय पळीभर तीर्थही आपल्या हातावर देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
श्री. कुमार गुप्ता यानी फोन करुन उमरियाच्या बसमध्ये दोन जागा रिझर्व केल्या. बस आल्यावर आमचे सामान बसमध्ये चढवले,एका तिकीटाचे पैसेही दिले.आणि म्हणाले तेवढीच मैय्याची सेवा.धन्य ती नर्मदामैय्या आणि धन्य तिची ही सेवाभावी लेकरे.
जन्गलच्या चान्गल्या रस्त्याने उमरियाला पोहोचायला सन्ध्याकाळचे सात वाजले.काळोख झाला होता बसस्टॉप गावा बाहेर होता रिक्षाही नव्हत्या बसच्या कन्डक्टर मुलाने सोबत केली,एक सायकल रिक्षा मिळवुन दिली.रूप हॉटेलमध्ये एक अगदी लहानशी रुम मिळाली,रात्रीपुरता निवारा मिळाला. खालीच एक गुरुक्रुपा भोजनालय होते तिथे थाळी घेतली. उद्या अनुपपुर. उमरियावरुनही अमरकन्टकसाठी रेल्वे असते पण अमरकन्टकचे रेल्वेस्टेशन पेड्रारोड हे मैय्या पार असल्याने आम्हाला चालणार नाही म्हणून उद्या अनुपपुर आणि परवा बसने अमरकन्टक.
लाइट नसल्याने उजाडेपर्यन्त थाम्बुन नन्तर प्रातर्विधी स्नानपुजा करुन चालतच रेल्वेस्टेशनवर गेलो.जवळच होते,समोरच बसस्टॉप होता पण काल काळोख पडल्यामुळे रिक्षा करावी लागली होती. अनुपपुरसाठी गाडी पावणेअकराची होती. तिकिट खिडकी नऊ वाजता उघडणार होती.बाहेरच बसलो थन्डी खुप पडली होती. स्टेशनच्या फलाटावर ऊन आले होते पण तिकीट काढल्याशिवाय आत कसे जाणार? नऊ वाजता खिडकी उघडली ति़कीट काढायला गेले तर तिकीट बाबू म्हणाले गाडीको देर है,धुपमे बैठना है बिना तिकीट अन्दर कैसे जाए ? मी विचारले. चलता है ते म्हणाले पण मी वह गैरकानुनी है असे म्हटल्यावर हसुन त्यानी तिकिट दिले. आम्ही आत जाऊन उन्हात बसलो.
गाडी वेळेवर आली आम्ही स्लिपरकोच मध्ये चढलो.गाडीला गर्दी नव्हती . आमच्या समोरच्या सीटवर आदिवासी विकास खात्यात ऑफिसर असलेले अजयसिन्ग बसले होते. गप्पा मारताना आम्ही परिक्रमावासी आहोत म्हटल्यावर त्यानी अनुपपुर मधील त्यान्च्या मित्राला फोन करुन हॉटेल गोविन्दम मध्ये आमच्यासाठी रुम बुक केली. दुपारी दोन वाजता अनुपपुरला पोहोचलो. अजयसिन्ग यानी रिक्षा करुन दिली.गोविन्दम हॉटेलला गेलो. हॉटेल खुपच सुन्दर आहे. स्नान पुजा करुन भोजन ग्रुहात गेलो.ते मात्र खुपच महाग होते.
सन्ध्याकाळी गाव पाहण्यासाठी गेलो.अनुपपुर जिल्हा आहे पण आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने फारसे मोठे शहर नसावे. साधारण बाजारपेठेतच बसस्टॉप आहे. अमरकन्टकसाठी सकाळी साडेआठला बस आहे. दुपारी उशिरा जेवल्यामुळे रात्री फक्त दुध घेतले. उद्या अमरकन्टक.
सकाळी स्नानपुजा नास्ता करुन चालतच बसस्टॉपवर आलो. बस लागली होती,बसायला जागाही मिळाली. बस मध्ये काही परिक्रमावासीही होते.वेळेवर बस सुटली. गावा बाहेर पडताच दाट जन्गल सुरु झाले. थोड्याच वेळात घाट सुरु झाला. रस्ता चान्गला आहे. जसजसे वर चढत होतो तसतशी थन्डी वाढत चालली होती. घनदाट झाडान्मधुन हळूच सुर्यकिरणे डोकावत होती. पक्षान्चा किलबिलाट कानसुख देत होता. मधुनच माकडान्च्या टोळ्या इकडेतिकडे ह्या झाडावरुन त्या झाडावर झेपावत होत्या. वार्याच्या मधुनच येणार्या झुळूकेबरोबर रानफुलान्चा येणारा मन्द मन्द सुगन्ध मनाला उल्हासित करत होता. मधुनच एखाद्या खळखळणार्या झर्याचेही दर्शन होत होते. काही झाडान्वर मोठमोठी मधाची पोळी लटकत असलेली दिसली. उन्च डोन्गर, दाट जन्गलानी गच्च भरलेल्या खोल दर्या एकदा या बाजुला एकदा त्या बाजुला बस जसजशी वळणावरुन वळत असे तसतश्या होत होत्या. मजेत प्रवास चालु होता.वाटेत लहान लहान अनेक गावे लागत होती. पुष्पगढ हे एकच मोठे गाव लागले. हे पुर्वीचे सन्स्थान होते. राजवाडा आहे.
कालच्या त्रासदायक प्रवासानन्तर आजच्या सुखद प्रवासाने मन प्रसन्न झाले. साडेबारा वाजता अमरकन्टकच्या बसस्टॉपवर पोहोचलो. तिथे मार्गदर्शक नकाशा लावलेला आहे. त्यावरुन आश्रम एक कि.मि. अन्तरावरच आहेत ,नकाशा पाहण्याआधी रिक्षावाल्याने तीस रुपये मागितले होते आणि म्हणून पुढे निघालो होतो,नकाशा पाहिल्यामुळे फार लाम्ब नाही हे कळले. विनोबा एक्सप्रेस निघाली. प्रथम गुरुद्वारा आले पण तिथे चान्गली खोली नव्हती. पुढे निघालो कल्याण आश्रम खुप सुन्दर आहे पण त्याचे ऑफिस बन्द होते,पुढे निघालो म्रुत्युन्जय आश्रम भव्य आणि सुन्दरही आहे. तिथे परिक्रमावासीन्साठी कॉमन हॉलमध्ये मोफत राहण्याची सोय आहे तसेच पैसे भरुन स्वतन्त्र खोलीही मिळते. आम्ही पैसे भरुन खोली घेतली. आमची खोली तीसर्या मजल्यावर होती. खिडकीतुन मैय्या आणि खालच्या बगिच्यातील नयनमनोहर द्रुश्य दिसत होते. हातपाय धुवुन हे भोजनप्रसाद घेण्यास गेले.माझा चतुर्थीचा उपास असल्याने मी जवळ असलेला बटाट्याचा चिवडा खाल्ला.
सन्ध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. अमरकन्टक ला नर्मदामैय्याचाचे उगमस्थान असल्याने हे तीर्थक्षेत्रतर आहेच पण आपल्या महाबळेश्वर सारखे थन्डहवेचे ठीकाण आहे. त्यामुळे चान्गल्यापैकी हॉटेल्स वगैरे सोयीसुविधा आहेत. बर्यापैकी स्वच्छताही आहे. सन्तोष यादव ह्या मुलाची रिक्षा अमरकन्टक दर्शनासाठी ठरवली. उद्या कपिलधारा,ज्वालेश्वर वगैरे ठिकाणे दाखवेल आणि परवा मकर सन्क्रान्तीच्या मुहुर्तावर माईका बगिचा येथे मैय्याचा उत्तर किनारा ओलान्डून दक्षिण किनार्यावर जाऊन पुजा कढई करुन दक्षिण किनार्याने ओम्कारेश्वरकडे परिक्रमा सुरु . नवीन बान्धकाम चालु असलेले जैन मन्दिर पाहिले. मैय्याच्या मन्दिर समुहापर्यन्त गेलो पण ते कुन्ड दक्षिण किनार्यावर असल्याने आज तिथे जाता येणार नव्हते. येथे मैय्याला सुन्दर घाट बान्धलेला आहे,आमच्या म्रुत्युन्जय आश्रमासमोरच तो असल्याने खुप वेळ तिथे बसलो.
रात्री भोजनशाळेत थोड्या पोळ्या करण्याची सेवा केली. सायन्पुजा आरती झाल्यावर भोजनप्रसाद घेतला.आता विश्रान्ती. क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 41
प्रचन्ड थन्डी आहे. स्नानासाठी घाटावर गेलो, मैय्याचे पाणी सुखद ऊबदार होते. स्नान तर छान झाले पण नन्तर दातावर दात वाजायला लागले. पटकन आश्रमात परतलो. दोन स्वेटर चढवले शाल गुन्डाळून घेतली तेव्हा कुठे बरे वाटले. थोड्यावेळाने पुजा आरती करुन बाहेर टपरीवर जाऊन गरम गरम चहा घेतला कारण आश्रमात चहा सात नन्तर मिळतो,आश्रमाच्या गाई आहेत त्यान्चे दुध काढणे झाल्याशिवाय चहा कसा मिळणार? असो.
आठ वाजता सन्तोष यादवला फोन केला आम्ही तयार असल्याचा. साडेआठला तो आला. त्याने प्रथम ७कि.मि. वरील कपिलधाराच्या स्टॉपवर नेले तिथुन २कि.मि. जन्गलातुन पायवाटेने चालत कपिल धाराला गेलो. या ठिकाणी कपिलमुनिनी तपश्चर्या केली,येथे नर्मदामैय्या जवळ जवळ ६०/७० फुटा वरुन खोल दरीत उडी घेते त्यामुळे येथे बाराही महिने कोसळत असलेला सुन्दर धबधबा आहे. कपिलमुनी यान्ची कुटी असुन तिथे तेव्हापासुन म्हणजे तीन युगान्पासुन पेटती असलेली अखन्ड धुनी आहे.{शिर्डी येथे आहे तशी} मध्यप्रदेश सरकारने तिथे व्हू पॉइन्ट रेलिन्ग,बसण्यासाठी बाकडी वगैरे करुन तयार केलेला आहे. शान्त निसर्गरम्य स्थान आहे. त्याच्याच पुढे दाट जन्गल झाडीतुन पायवाटेने काही ठीकाणी पायर्या उतरुन दुध धाराला गेलो. या ठिकाणी दुर्वासमुनीनी तपस्चर्या केली त्यावेळी ते काहीच खात नसत म्हणुन मैय्या त्यान्च्यासाठी आपल्या पाण्याचे दुधात रुपान्तर करुन देत असे अशी आख्यायिका आहे. अजुनही सकाळी दहा वाजेपर्यन्त पाण्याचा रन्ग दुधासारखा पाण्ढरा असतो. आम्ही तेथे पोहोचलो त्यावेळी दहा वाजायला आले होते,पाण्याचा रन्ग पान्ढरा दिसत होता पण ओन्जळीत पाणी घेतले ते पाण्यासारखेच नितळ होते,तेथे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे साधारण दहा-पन्धरा फूट उन्चीवरुन दोन धारात तो धबधबा कोसळत असतो त्यामुळे जो फेस निर्माण होतो त्यामुळे लाम्बुन बघताना दुधासारखा पान्ढरा रन्ग दिसत असावा. दू धारा म्हणजे दोन धारा असाही एक अर्थ आहे. तिथे एक कमी उन्चीची पण आतमध्ये बर्यापैकी मोठी गुहा आहे. तिच्यात दुर्वासमुनीन्ची एक मुर्ती आहे ती इतकी हुबेहुब आहे की प्रथम दर्शनी खरोखरीच कुणी साधू तिथे बसले आहेत असे वाटते. एक शिवलिन्गही आहे. याच मार्गावर रामक्रुष्णमिशनचे केन्द्र आहे त्यात एक दवाखाना चालवला जातो.मोफत सेवा आहे. राहण्याचीही सोय आहे. तिथे असलेल्या स्वामीन्शी बोलत असताना ते म्हणाले नर्मदामैय्याच्या पाण्याचे प्रुथ्करण के असता त्यामध्ये गाईच्या दुधातील गुणधर्म आढळले आहेत. हे स्वामी सायन्सचे द्विपदवीधर असुन विवेकानन्दान्च्या विचाराने प्रेरीत होऊन सन्यास घेउन या ठीकाणी राहुन रामक्रुष्ण मिशनचे सेवाकार्य करीत आहेत. सेवा देणारे डॉक्टरही एम्.डी. आहेत.
घनदाट जन्गल, नाना रन्गान्चे पक्षी , रानफुलान्चा सुवास , हे सारे सुख अनुभवत चालत होतो, आमच्या समोरुन अगदी भर्कन चारपाच पान्ढरे करडे मोठे कापसाचे गोळे पळाले आधी समजलेच नाही काय गेले ते पण लाम्ब जाऊन त्यातला एक गोळा थबकला, ते गुबगुबीत ससे होते. इतका आनन्द झाला पण हे सार एका क्षणात घडले फोटो काही काढता आला नाही. मोठ्या मजेत इकडे तिकडे पाहात चालत होतो आणि धप ,धप्कन एक आवाज झाला, बघते तर काय हे जमिनीवर लोटान्गन घालुन पडलेले , मी जाम घाबरले धावले माझे हात-पाय लट लट कापत होते,बापरे ! आता याना जास्त लागले असेल तर या जन्गलात मी कसे घेउन जावू आश्रमापर्यन्त . पण मैय्याची क्रुपा. त्याना ऊठून बसायला मदत केली,ते बसले पायजमा गुडघ्याजवळ फाटला होता,खरचटले होते,तळहातालाही खरचटले होते. हळूच उभे राहिले , चला थोड्क्यात निभावले. हळू हळू चालत रिक्षापर्यन्त गेलो.
सन्तोष म्हणाला इथेच काही खाऊन घ्या पुढे कदाचित मिळणार नाही. कपिलधाराला सरबत घेतले होते इथे भाजीवडा खाल्ला.मध्यप्रदेशात पोहे जिलबी आणि खुपश्या मिक्स भाज्या घालुन केलेले डाळिचे हे चपटे मोठे भाजीवडे प्रसिद्ध आहेत. निघालो ज्वालेश्वरला.
१०कि.मि. वरील हे ज्वालेश्वर आहे मात्र छत्तीसगड राज्यात. हे पुरातन मन्दीर छोटेसेच आहे. पान्डवानी याची स्थापना केली असे म्हणतात. तिथुन रस्त्या पलिकडे थोडेसे चालल्यावर गेलो अमरेश्वर दर्शनाला मध्यप्रदेशात . येथील पान्डवकालिन मन्दीर काळाच्या ओघात नष्ट झाले होते,आता नव्या भव्य मन्दिराचे बान्धकाम चालु आहे. अमरेश्वराची पिन्डी ११फूट ऊन्च आणि ५१ टन वजनाची नर्मदेच्या पात्रातील शाळीग्राम शिळेची आहे. तिथुन निघाल्यावर सन्तोषने एका ठिकाणी रिक्षा थाम्बवली आणि म्हणाला,आप इधरसे पगदन्डीसे उतरकर चलिये आपको दुर्गाधारा,दुर्गा मन्दीरके दर्शन होन्गे ,मै रास्तेसे उधर आउन्गा, यहाका खुबसुरत नजारा पगदन्डीसे अच्छा दिखेगा. आम्ही उतरलो,खरोखरच तो पायर्या पायर्यान्चा मार्ग खुप सुन्दर होता,घनदाट जन्गल भर दुपारच्या उन्हाला आम्हाला त्रास देण्यासाठी खाली उतरायला जागाच नव्हती. तरीही काही काही चुकार किरणे येत होती. धो धो पाणी उन्चावरुन कोसळण्याचा आवाज येत होता पण कुठून? दिसत नव्हता पायर्या खोल दरीत उतरत होत्या,बरेच खाली उतरलो आणि एक छोटी नदी दिसली सन्तोषने तिचे नाव अमरगन्गा असे सान्गितले होते,अमरेश्वरमन्दिराजवळच तिचा उगम होता. थोड्या पायर्या आणखी उतरल्यावर दुर्गामन्दिराचा कळस दिसला,नन्तर एक वळण घेउन थोडे उतरलो आणि दुर्गाधारा धबधब्याचे दर्शन झाले. हा धबधबाही कपिलधारा प्रमाणेच आहे.फक्त कपिलधाराजवळ जायला घनदाट जन्गलामुळे जागा नाही. आणि इथे सहज जाता येते. धबधब्याजवळच दुर्गामन्दिर आहे. येथे दुर्गादेवीने राक्षससन्हारासाठी शक्ती मिळावी म्हणून तप केले . या ठिकाणी सोलरलाइटची व्यवस्था आहे. यात्रेकरुन्साठी राहण्याची व्यवस्थाही आहे. नन्तर पुन्हा रिक्षात बसुन धरमपानी येथे गेलो. इथे पुर्वी एक साधुमहाराज राहात असत पण मध्यप्रदेश सरकारने ही जागा ताब्यात घेतली आणि तेथे एक रेस्टहाऊस बान्धले,व्ह्यू पॉइन्ट तयार केला आहे. तिथुन अमरकन्टकच्या जन्गलाचा खुप दुरवरचा भाग शोणनदीचा प्रवाह द्रुष्टीपथात येतो.शेजारीच एक कुन्ड;धर्मकुन्ड आहे. डोन्गराच्या कपारीत कालीमातेची मुर्ती आहे. तिचा फोटो काढण्या साठी मला त्या खोबणीत कसेबसे बसता आले. हा सनराइज पॉइन्ट आहे पण आम्ही तिथे भरदुपारी गेलो होतो. अमरकन्टक दर्शन झाले परत म्रुत्युन्जय आश्रमात परत आलो.भोजनप्रसादाची वेळ टळून गेली होती म्हणून मग भोजनप्रसादासाठी भोजनालयाचा आश्रय घेतला. सन्तोष उद्या सकाळी सात वाजेपर्यन्त येतो असे सान्गुन गेला.आम्ही आश्रमात परतलो.
थोडी विश्रान्ती झाल्यावर उद्या करायच्या कढई साठी चौकशी करायला गेलो पण कमीतकमी दहा किलो रव्याचा शिरा म्हणजेच कढईची ऑर्डर घेतात म्हणून परत आलो. आश्रमाच्या बगिच्यात तेथेच सन्स्कृतचे अध्ययन करणारे गोपालस्वामी बसले होते त्यानी बोलावले म्हणून बसलो.भागवत,रामायण, भगवत्गीता यावर त्यानी बरेच सान्गितले. बोलता बोलता कढईचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले माईकी बगिचामे सौ दो सौ रुपये देना वो लोग कढाई कराते है,चला आमचा प्रश्न मिटलां. नर्मदे हर.
त्यान्चा निरोप घेतला तितक्यात काही महिला आल्या मला नर्मदे हर करुन म्हणाल्या,कल आपने रोटी बनानेमे हमारी मदत की तबसे बात करनी थी मगर सोचा आप इतनी पढी लिखी कैसे बोले? मी असे काहीच नाही सगळी समानच असतात एकाच नर्मदामैय्याची लेकरे असे म्हटल्यावर मग मनमोकळ्या बोलु लागल्या.
अमरकन्टक नगरपालिकेची कालच निवडणूक झाली होती आज मतमोजणी होऊन भा.ज.प. निवडून आले होते मोठ्या जल्लोशात मिरवणूक आश्रमात आली,गुलालाने आसमन्त रन्गीत झाला,आवारात असलेल्या झाशीच्या महाराणी लक्षुमीबाईन्च्या अश्वारुढ पुतळ्याला हार घालुन पेढे वाटले. आम्हालाही मिळाले. निवडून आलेल्या नगरसेवकान्शी स्वामीनी आमची ओळख करुन दिली ,महाराष्ट्रके अपनी महाराणीके देशसे आये है नर्मदामैय्याकी परिक्रमा कर रहे है. अभिमान वाटला महाराष्ट्रीयन असल्याचा.मध्यप्रदेशात थोरले बाजीराव,अहिल्यादेवी होळकर,महाराणी लक्षुमीबाई ,यान्च्या बद्दल प्रचन्ड अभिमान आणि प्रेम सर्वत्र दिसते आणि ते मराठी होते म्हणून इकडे मराठी लोकानाही मोठ्या आदराने वागवतात ,ह्याचा आम्हाला पदोपदी अनुभव आला ह्या परिक्रमेच्या काळात.
रात्री भोजनाला मुगाच्या डाळीची खिचडी होती,आज भोगी होती आपल्याकडे आजच्या दिवशी खिचडी वान्ग्याची भाजी तीळलावुन बाजरीची भाकरी असा बेत असतो. आम्हालाही भोगीच्या दिवशी खिचडी मिळाली. आता विश्राती. उद्या माईकी बगिच्यात नर्मदामैय्या उगमाजवळ मैय्या क्रॉस करुन पुन्हा दक्षिण किनार्याने परिक्रमा पुढे चालू.क्रमशः
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 42
पहाटे उठलो,घाटावर स्नानासाठी गेलो.आज मकर सन्क्रान्त आहे. पौष महिन्यातिल क्रुष्ण पक्ष आहे त्यामुळे आकाशात चन्द्र नाही पण घाटावर लाइट असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पटकन स्नान आटोपले कारण थन्डी खुप होती. म्हणजे मैय्याचे जल सुखद उबदारच होते पण कुठपर्यन्त? जो पर्यन्त आपण लोटेच्या लोटे पाणी अन्गावर घेत असतो तो पर्यन्तच्,एकदा ते थाम्बले की थन्डीने दात वाजायला लागतात. म्हणून पटकन आवरुन परतलो.
पुजा आरती करुन स्तोत्रपाठ पुर्ण होतच होता तोच खिडकीतुन आकाशातील रन्गान्च्या उधळणीकडे लक्ष गेले. अरुणोदय झाला होता. आमची खोली तिसर्या मजल्यावर असल्यामुळे डोन्गरावरील घनदाट जन्गल झाडी आडून लाल-गुलाबी रन्गाची उधळण करीत हळूहळू वर येणारा तो बाल दिनकर आम्हाला अगदी सहज दिसत होता. आणि त्याच बरोबर त्यानेच दिलेली लाल्,गुलाबी,सोनेरी रन्गाची गर्भरेशमी परकर चोळी परिधान करुन आपली छोटी नर्मदा अवखळपणे नाचत पुढे पुढे धावत होती. भान हरपुन आम्ही खिडकीत उभे होतो. तोच घन्टानाद कानावर आला.चला चहाचे बोलावणे आले.अरे हो! सान्गायचेच राहिले,इथे चहा,भोजन यान्ची वेळ झाली की घन्टा वाजवतात मग जायचे भोजन शाळेत.
खाली उतरुन भोजन शाळेत गेलो,निरश्या दुधाचा गरमगरम चहा खुप छान होता. इथल्या दुधात पाणी घालत नाहीत त्यामुळे तो दाट चहा खुपच छान असतो. चहा घेता घेता सर्वान्चा निरोप घेतला. महाराजान्कडून वहीवर शिक्का मारुन घेतला तितक्यात सन्तोष रिक्षा घेउन आलाच. निघालो माईच्या बगिच्याकडे.
गावाबाहेर साधारणपणे दोनएक कि.मि. गेल्यावर सन्तोष म्हणाला.आपण इथे उतरुन ह्या समोरच्या पायवाटेने माईच्या बगिच्या जवळ या मी रस्त्याने तिकडे येतो कारण रस्त्याने जाताना मैय्या क्रॉस होते.ठीक आहे असे म्हणून आम्ही उतरलो,पिशव्या रिक्षातच ठेवल्या फक्त मैय्याच्या कुप्या असलेली शबनम तेवढी घेतली. जन्गलातल्या पायवाटेने आमची विनोबा एक्स्प्रेस निसर्गाची रमणीयता पाहात पक्षान्चे गोड गाणे अॅकत निघाली. दव पडल्यामुळे जमीन ओली झालेली होती,जपुनच चालत होतो कारण जरा दुर्लक्ष झाले तर मग धरतीमातेला लोटान्गण नक्की. कालचा अनुभव ताजा होता.असे साधारण दोन कि.मि. चाललो, समोरच्या बाजुला एक मन्दिर दिसले तेथील कुन्डावर काही लोक स्नान करत होते,आम्ही आणि ते लोक यान्च्या मधुन एक छोटा स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहात होता ती नर्मदामैय्या होती की दुसरी कोणती नदी कळत नव्हते,नर्मदे हर! आम्ही त्या लोकाना हाक मारुन विचारतच होतो तितक्यात सन्तोष आला,त्याने तिथेच थोडे पुढे असलेल्या एका फळकुटावरुन आम्हाला पलीकडे नेले.आम्ही मैय्याच्या उत्तर किनार्यावरुन दक्षिण किनार्यावर आलो.
मोठमोठ्या व्रुक्षान्च्या खाली दोन कुन्डे होती. मोठ्या कुन्डात लोक स्नान करत होते आणि निळ्या आकाशी टाइल्सने बान्धलेले छोटेसे कुन्ड म्हणजे नर्मदामैय्याचे उगमस्थळ होते.तिथेच नर्मदामैय्याची सन्गमरवरी मुर्ती होती. त्या कुन्डात शिवपिन्डी होती. तिथे असलेल्या पुजारीबाबानी आम्हाला स्नान झाले आहे का विचारले,आम्ही हो म्हटल्यावर त्यानी आम्हाला बसायला आसन दिले आणि आमच्या जवळ असलेल्या मैय्याजलाच्या कुप्या समोर ठेवायला सान्गितल्या नन्तर पुजेचे काही मन्त्र म्हणुन पुजा करवून घेतली आणि उभे राहुन कुपी हातात घेउन त्यातील निम्मे नर्मदा-सागर जल त्या कुन्डात अर्पण करायला सान्गितले व नन्तर त्यानी त्या कुन्डातील जलानी त्या कुप्या परत भरुन आम्हाला दिल्या. आता हे जल ओम्कारेश्वरला गेल्यावर परिक्रमा पुर्ति प्रित्यर्थ नर्मदापुजन करुन नन्तर ह्यातील अर्धेजल आधी दक्षिण किनार्यावरील ममलेश्वराला अर्पण करुन नन्तर नर्मदामैय्या ओलान्डुन ओम्कारेश्वराला अर्धे जल अर्पण करावे म्हणजे परिक्रमा सम्पुर्ण होईल. त्याना काही दक्षिणा देउन तिथेच बसलेल्या एका साधूबाबाना कन्यापुजन आणि कढईसाठी पैसे दिले,त्यानी लगेच तिथेच असलेल्या कन्याना तयार असलेली हलवा-पुरी दिली आम्हालाही प्रसाद दिला. आमची सागरसन्गमापासुन सुरु झालेली उत्तर किनार्यावरील परिक्रमा पुर्ण झाली,पुन्हा दक्षिण किनार्याने पुढची परिक्रमा सुरु करण्यासाठी.
थोडीफार फोटोग्राफी करुन रिक्षात बसलो.रस्ता चान्गला सिमेन्टचा बान्धलेला आहे. जन्गल दाट आहे,या जन्गलात अनेक ऑषधी वनस्पती आहेत त्यामुळे येथील हवा शुद्ध,प्रदुषणमुक्त आहे.तीन कि.मि. शोणभद्र नदाच्या उगमस्थळी गेलो,येथुन शोणनदाचा उगम झाला आहे याच शोणाबरोबर नर्मदेचा विवाह ठरला होता पण नर्मदेच्या एका दासीने खोटे बोलुन त्याच्याशी विवाह केला म्हणुन अविवाहीत राहण्याचा निश्चय करुन लोककल्याणासाठी उलटदिशेने फिरुन पश्चिमेकडे जलरुप घेउन प्रवाहीत झाली अशी पुराणकथा आहे.शोणनद पुर्वेला प्रवाहित झाला. या ठिकाणी धबधबा आहे पण तो पावसाळ्यातच असतो. तिथे बर्याच ॠषीमुनीन्च्या अगदी हुबेहुब मुर्ती आहेत. हनुमानमन्दिर्ही आहे म्हणून त्याचे अनुयायी वानरही भरपुर आहेत्.पुढे श्रीयन्त्र मन्दिरात गेलो,या श्रीयन्त्राचे दर्शन घेत नाहीत तशी आद्य शन्कराचार्यान्ची धर्माआज्ञा आहे त्यामुळे मन्दिराच्या गाभार्याचा दरवाजा बन्द होता बाहेरच्या बाजुला शिवपिन्डी आहे. तिथुन नर्मदाकुन्डावर गेलो,समोर कर्णमन्दिर,शन्कराचार्यमठ आहे तो पाहुन नर्मदाकुन्डाच्या दक्षिणदरवाजाने प्रवेश केला. कुन्ड भव्य असुन पाणी अगदी स्वच्छ निर्मळ आहे. कुन्डात पाय घालायला परवानगी नाही. अगदी खालच्या पायरीवर शिवपिन्डी आहे आपल्या जवळील ताम्ब्याने कुन्डातील पाण्याने तिच्यावर पाण्याचा अभिषेक करतात.फुले बेल वाहिले तरी लगेच ते उचलुन निर्माल्यकलशात टाकायचे. ह्यामुळे स्वच्छा आहे. अशीच व्यवस्था बाकी सर्व तीर्थक्षेत्रीही झाली तर किती चान्गले होईल. बाहेर आलो.
दुपारचा एक वाजला होता आज नास्ता-भोजन काहीच झाले नव्हते मग एका टपरीवर भाजीवडा खाल्ला. नन्तर सन्तोषने रिक्षाने जन्गल रस्त्याने काही अन्तरावर सोडले,इथुन पुढे आम्हाला बसस्टॉप पर्यन्त चालतच जावे लागणार होते. वाटेत एका आश्रमाच्या चारीबाजुनी नर्मदेचा प्रवाह वाहतो येथेच नर्मदेवर छोटा बन्धारा बान्धला आहे त्यामुळे येथे तिचे पात्र थोडे मोठे झाले आहे आणि घाटावर स्नानासाठी मुबलक जलसाठा आहे. ह्या तलावाला कबीर तलाव म्हणतात.
यथावकाश बसस्टॉपवर पोहोचलो.थोड्याच वेळात बस मिळाली. सुन्दर जन्गलातुन जाणार्या रस्त्याने कबीर चौथरा,करन्जिया,गोरखपुर,गाडासराई,वगैरे गावे पार करत पाच वाजता दिन्डोरीला पोहोचलो. हॉटेल नर्मदा इन मध्ये उतरलो. आणि तेच योग्य झाले असे नन्तर जेव्हा नर्मदामैय्याचा घाट आश्रम वगैरे पहायला बाहेर पडलो तेव्हा तिथली परिस्थिती पाहिल्यावर वाटले.
बाल नर्मदा
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 43
स्नान पुजा करुन तिठ्यावर आलो,थोडावेळ वाट पाहिली पण येणार्या बस मन्डलामार्गे जाणार्याच होत्या.म्हणुन मग मन्डला स्टॉपवर गेलो. तिथे सिवनी व्हाया देवगाव बस मिळाली. साडेदहा वाजता देवगाव फाट्यावर उतरलो. तिथुन ३कि.मि. आत देवगावला जाताना वाटेत श्री. प्रेमकुमार सौ.रामकुमारी यानी बोलावले,विचारपुस केली.आम्हाला तीळाचा आणि गुळपापडीचा लाडू खायला दिला,चहाही झाला,खुप बरे वाटले.
पुढे निघालो,आज किन्क्रान्त आहे त्यामुळे नर्मदास्नानासाठी आजुबाजुच्या गावातील लोकान्ची खुप गर्दी होती त्यामुळे रस्त्याने चालताना चालावे लागतच नव्हते,आपोआप ढकलले जात होतो,तेवढ्या गर्दीतही परिक्रमावासी म्हणून लोक आमच्या पाया पडत,या नर्मदामैय्यावरील श्रद्धेला काय म्हणायचे हेच समजत नाही.
देवगावला जमदग्नेश्वर मन्दिरात आलो. या ठिकाणी जमदग्नी मुनिनी तप केले अशी आख्यायिका आहे. नर्मदा आणि बुढनेर यान्चा सन्गम आहे. बुढनेरनदीला इकडे बुढीमा म्हणतात.ही नर्मदेची आई आहे असे सान्गतात. सन्क्रान्तीचा मेळा लागला होता. लोक भान्डी-कुन्डी स्वयम्पाकाचे सामान घेउन आले होते,सन्गमस्नान नन्तर स्वयम्पाक मैय्याला भोग चढवणे{नैवेद्य} आणि मेळा पाहुन सन्ध्याकाळी घरी असा सार्या कुटुम्बासहीतचा कार्यक्रम असतो.
धर्मशाळेत खुप गर्दी होती तेथिल व्यसथापकानी राहण्याचा भोजनप्रसाद घेण्याचा खुप आग्रह केला पण तिथली गर्दी पाहुन आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पन्चवीसएक पायर्यान्चा सिमेन्टने बान्धलेला घाट आहे. घाटावरील धर्मशाळेच्या एका खुप म्हातार्या साधुबाबानिही खुप आग्रह केला पण हे नाही म्हणाले,पायर्याउतरुन खाली प्रवाहाजवळ आलो. बुढीमाला जास्त पाणी नव्हते पण पात्रात दगडधोन्डे खुप होते,निसरडेही होते हे तर पुढे गेले पण माझे पाय सटकत होते,हातातली काठीही सटकत होती शोरगुल इतका होता की माझा आवाज त्यान्च्यापर्यन्त पोहोचत नव्हता.एका मुलाला माझी दया आली,त्याने माझी पिशवी घेतली आणि मला आधार देउन पलिकडे नेले.माझे लाख लाख आशीर्वाद त्याला.थोडे वाळवन्टातुन चालावे लागले तिथे लागलेल्या दुकानातुन बिस्किटे,आणि ताजे मुळे घेतले. एक दरड चढून वर आलो. दोन तीन बस उभ्या होत्या,एका महाराजपुरला जाण्यार्या बसमध्ये बसलो,उन चढले होते भयन्कर गरम होत होते.
बराच वेळ झाला तरी बस सुटायचे नाव नव्हते जवळची बिस्किटे,मुळे सम्पले पाणीही थोडेच शिल्लक राहिले होते .शेवटी द्रायव्हर म्हणाला,सब लोक स्नान,भोजन करके आयेन्गे तब बस छुटेगी ये स्पेशल मेळाबस है. बसलो डोक्याला हात लावून खुप भुक लागली होती,मनात आले आश्रमात मैय्याचा भोजनप्रसाद नाकारला म्हणून तर ही वेळ आली नसेल? मैय्या क्षमा कर. मुर्ख आहोत आम्ही पण आहोत तर तुझीच लेकरे. क्षमा कर माते.
चार वाजुन गेले.मोटरसायकलवरुन दोन पाण्ढर्याकपड्यातील पुढार्यान्सारखी माणसे आली,ते बसच्या ड्रायव्हरशी कुठल्या बस कुठे न्यायच्या ते सान्गत होते,आम्ही त्याना विचारले ते म्हणाले आधी जवळपासच्या गावातील लोकाना सोडून शेवटी महाराजपुरला बस जाईल. आम्ही हैराण झालो,चालत गेलो असतो तर निदान रामनगरला तरी मुक्कामाला गेलो असतो पण आता खुपच उशीर झाला होता. मग त्याच माणसाने आम्हाला चहा दिला.
अखेर सहावाजता एक बस महाराजपुरला निघाली.आम्ही बसलो. खरेतर तिथे नेहमी बस नसते फक्त मेळा असेलतरच बस सर्व्हीस असते.असो झाले ते झाले. बिलगाव आले,सकाळी आमच्यासमोरुन चालत निघालेले काही परिक्रमावासी तिथे बसची वाट बघत होते.म्हणजे चालत आलो असतो तरी फक्त बिलगावलाच पोहोचलो असतो.
रामनगर आले.इतिहास प्रसिद्ध नगर ,आता एक कसबा आहे. सुहास लिमयेकाकानी या स्थळाबद्दल खुप लिहिले आहे. भारती ठाकुर यानीही लिहिले आहे. पण रात्र व्हायला लागली होती त्यामुळे नीटपणे काही बघता आले नाही. पुन्हा येईन असे आश्वासन श्रीरामाला दिले,बस पुढे निघाली. मधुपुरी,पद्मीचौराहा,सुरजकुन्ड आणि बन्जरनदीवरील पुल क्रॉस करुन महाराजपुरला आलो. एवढया रात्री आश्रम वगैरे शोधणे अवघड होते,खुप दमलो होतो भुक लागली होती,देवगावला प्रेमकुमार-रामकुमारी यानी दिलेले ते लाडू चहा जणू मैय्याने याच साठी दिले होते कारण नन्तर आम्हाला होणारा त्रास तिला माहीत होता.आम्हाला डायबेटीस आहे फक्त चारदोन बिस्किटे आणि त्यानन्तर बराचवेळाने मिळालेला चहा. आमची शुगरलेव्हल डाउन झाली होती,त्या साजुकतुपातील पौष्टीक लाडवान्मुळेच आम्ही तग धरुन होतो.
एकजणाजवळ हॉटेलची चौकशी केली,त्याने जवळच असलेले नवेच बान्धलेले रमारमण हॉटेल दाखवले. चान्गले हॉटेल मिळाले,तिथे असलेल्या मुलाने आमची आस्थेने चौकशी करुन लगेच आम्हाला स्नानासाठी गरम पाणी दिले आधी गरम गरम चहा दिला. आम्ही परिक्रमावासी म्हणून हॉटेलच्या मालकिण बाईनी आपल्या घरुन गरम जेवणाचा डबा पाठवला. स्नान पुजा आरती भोजन मैय्याच्या असीम क्रुपेने दिवसभर झालेल्या मनस्ताप आणि दमणूक यान्चे इतके सुरेख परिमार्जन झाले. आता विश्रान्ती.
सकाळी स्नान पुजा करुन धुतलेले कपडे गच्चीवर वाळत घातले. नन्तर बाहेर पडलो,नास्ता केला आणि रेल्वेस्टेशन्वर गेलो पण आम्हाला सुटेबल गाडी नव्हती.तिथुन सन्गमघाटावर गेलो इथेही मेळा लागलेला होता,उगमापासुन सागरसन्गमापर्यन्त प्रत्येक पर्वकाळी मैय्याच्या किनारी असे मेळे लागतात. घाटावर खुप गर्दी होती.समोरच्या तिरावर मन्डला फोर्ट दिसत होता. मागच्याच सोमवारी नऊ जानेवारीला आम्ही त्या तिरावरुन हा महाराजपुरचा घाट पाहिला होता. मैय्याचे दर्शन घेउन पवारसमाज धर्मशाळा पाहिली,इथेच सुहास लिमये काका राहिले होते.
परतलो.शशीभोजनालयात भोजनासाठी आलो. भोजनालयाचे मालक परिक्रमावासीना रोज भोजन करवतात,अर्थात पैसे घेत नाहीत हे निराळे सान्गणे नकोच. तिथे समजले की मैय्या क्रॉस न करता नरसिन्हनगर बस दोन वाजता आहे असे कळले म्हणून बसची तिकिटे रिझर्व करण्यासाठी शशी जवळ पैसे देउन आम्ही हॉटेलवर आलो,सामान आवरुन चेकआउट केले. परत शशीभोजनालयात येउन बसलो. त्या बस साठी परिक्रमावासीन्ची बरीच गर्दी होती म्हणुन शशीने एक मुलगा बरोबर दिला आणि थोडे पुढे जाऊन आम्हाला उभे राहायला सान्गितले. तुमच्या रिझर्व सीट काढून ठेवल्या असतील त्या कन्डक्टरला लावून द्यायला सान्गा असेही त्याने आम्हाला सान्गितले.
दोनची बस अडीचला आली,बसमध्ये चढलो पण कितीही सान्गितले तरी तो कन्डक्टर आम्हाला काढून ठेवलेली ती सीट लावून देईना. मग आम्ही शशीला फोन केला,त्याने मुलाला परत पाठवले तेव्हा आम्हाला सीट मिळाल्या. बस अगदी खचाखच भरल्यावर निघाली. दर अर्ध्या कि.मि. थाम्बत एकदोन प्रवासी उतरत पाचसहा चढत असे करत रात्री साडेनऊला एकदाची नरसिन्हनगरला पोहोचली.शशीने रेल्वेस्टेशनला उतरुन जवळच्या लुनावत हॉटेल मध्ये रहा म्हणजे सकाळची पिपरियाला जाणारी रेल्वे पकडणे सोपे जाईल असे सान्गितले होते म्हणुन तसेच केले. श्री. लुनावत यानी त्यान्च्या घरातुन आम्हाला जेवण आणून दिले.आता विश्रान्ती.उद्या पिपरियाहुन पन्चमढी.
मंडला इथे नर्मदामय्या
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 44
लुनावत यान्चा निरोप घेउन स्टेशनवर आलो,चहा घेतला, दुर्ग येथुन भोपाळला जाणारी अमरकन्टक एक्सप्रेस लेट होती. पिपरियाचे तिकिट काढले,फक्त १६रु. प्रत्येकी लागले. सात वाजता गाडी आली गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे स्लिपरच्या डब्यात बसलो.साडेआठला पिपरियाला पोहोचलो.स्टेशन बाहेर पडलो तर एक जीप निघण्याच्या तयारीतच होती,दोन सीट खाली होत्या बसलो.बस मध्ये दोन लहान मुले होती अगदी आमचे बबलू आणि राणी लहानपणी दिसत तशीच.त्यान्चे फोटो काढायचा मोह आवरला नाही,त्यान्च्या आई-वडीलान्ची परवानगी घेउन मग त्यान्चे फोटो काढले. नन्तर त्यान्च्याशी इतकी गट्टी झाली की दीडतास कसा गेला समजले नाही पिपरिया ते पन्चमढी दाट जन्गल आणि घाटाचा रस्ता आहे. दहा वाजता पन्चमढीला पोहोचलो.
जीप ड्रायव्हरने हॉटेल अभिमन्यू दाखवले छान होते म्हणून चेक इन केले. हॉटेल मालकाने साइटसिईन्ग साठी एका जिप्सीवाल्याला फोन करुन आमची ती सोय केली.मग प्रथम स्नान पुजा आरती करुन नास्ता केला तेवढ्यात गाडी आली. निघालो पन्चमढी दर्शनाला.
पान्डवगुफा आमच्या नाशिकच्या पान्डवलेण्या प्रमाणेच आहेत्.पायथ्याशी छान गार्डन डेव्हलप केलेली आहे.तिथुन गेलो हान्डी खो पॉइन्टला. याचा शोध हान्डी नावाच्या ब्रिटीश आधिकार्याने लावला. आपल्या माथेरान,महाबळेश्वरच्या सारखापॉइन्ट आहे. खाली खोल दाट जन्गलानी गच्च दरी आहे. समोर अगदी दुरवर उन्च डोन्गरावर शिवमन्दिर आहे त्याचा कळस दिसतो. त्या मन्दिराची स्थापना पान्डवानी वनवासात असताना केली. जटाशन्कर महादेव तिथे जाण्यासाठी ११०० पायर्या चढाव्या लागतात. येथे पॉइन्ट पहाण्यासाठी दुर्बिणीची सोय होती,दुर्बिणीतुन मन्दिराचा कळस स्पष्ट दिसला त्याही पेक्षा त्या डोन्गराच्या अगदी वरच्या बाजुला असलेल्या एका झाडाची एक मुळी अगदी खालपर्यन्त त्या दरीत उतरत होती आणि त्या मुळीला धरुन एक आदिवासी त्या दरीत उतरत होता,कमरेला कोयता लावुन ते त्यामुळिच्या आधारे जन्गलात उतरुन औषधी वनस्पती गोळा करुन ते गाठोडे पाठीवर बान्धुन परत त्याच मुळीला धरुन वर येतात. बापरे! केवढे हे धाडस. यशवन्तीच्या शेपटीला दोर बान्धुन कोन्ढाणा चढणार्या तानाजी मालुसरे आणि त्यान्च्या मावळ्यान्ची आठवण होऊन नतमस्तक झालो.
गुप्त महादेव,या ठिकाणी एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अशी गुफा आहे, दोन्ही बाजुच्या भिन्ती खाबड खुबड आहेत. आतमध्ये मात्र सात-आठ माणसे उभी राहु शकतात.तिथे एक शिवपिन्डी आहे. त्या गुफेत एक महाराज राहतात. वैष्णोदेवीला शिवखोरीला असलेल्या गुफे प्रमाणेच पण लहान आहे.
बडा महादेव, हे ठिकाण अति रम्य आहे. काश्मीरमधील बाबा बर्फानी अमरनाथजी यान्च्या गुफेप्रमाणे ही गुफा असुन आतमध्ये स्वयम्भू शिवलिन्ग आहे. त्यावर गुफेच्या छतातुन सतत जलाभिषेक होत असतो,वातावरण अतिशय थन्ड आहे. बाजुला तशीच गुफा असुन ती माता पार्वतीची आहे. आपल्या मराठी जनतेच्या अत्यन्त जिव्हाळ्याची एक गोष्ट या स्थानाशी निगडीत आहे ती म्हणजे,आगर्याहुन सुटका करुन घेतल्यानन्तर महाराष्ट्रात रायगडावर परतत असताना शिवाजीमहाराजानी या ठिकाणी बरेच दिवस वास्तव्य करुन शिवाराधना केली. गनिमी काव्याची{ इकडे म्हणतात चुहेकी चाल} आखणी करुन हर हर महादेव ही घोषणा दिली.म्हणून हा महादेव हर हर महादेव म्हणून ओळखला जातो. यालाच बडा महादेवही म्हणतात. अशी माहिती तिथे असलेल्या पुजारीबाबानी दिली.
प्रियदर्शिनी पॉइन्ट. एक व्हयू पॉइन्ट आहे. इन्दिरा गान्धीनी भेट दिल्या नन्तर त्यान्च्या नावावरुन हे प्रियदर्शिनी नाव दिले. सन्ध्याकाळ झाली होती म्हणून परतलो. हॉटेल महाराष्ट्र मध्ये जेवण केले.आता विश्रान्ती.
रात्री मला खुप ताप भरला.मोरया!काय चालले आहे हे. ताप आल्याने राहिलेले पन्चमढी दर्शन रद्द करावे लागले. येथे मोबाईल चालत नाहीत.कारण विचारले तर कळले येथे मिलिट्रीचे मोठे केन्द्र आहे काही गुप्त माहितीचे त्यामुळे इथे प्रीपेड मोबाईल चालत नाहीत.फक्त बी एस एन एल पोस्टपेडच चालतात. आजही मुक्काम पन्चमढी.
ह्या तब्येतीमुळे परिक्रमा अक्षरशः गुन्डाळल्या सारखी करावी लागते आहे याची मला खुपच खन्त वाटते आहे.मैय्याची इच्छा असेल तर पुन्हा चातुर्मासानन्तर पुर्ण पायी प्रत्येक घाटाचे दर्शन घेत परिक्रमा करण्याची फार इच्छा आहे. मैय्या ती पुर्ण करेल अशी खात्री आहे. नर्मदे हर.
पन्चमढीहुन प्रयाण करण्यासाठी सकाळी साडेसात वाजताच चेक आउट करुन हॉटेल बाहेरच जीप मध्ये बसलो पण सीट भरत भरत पन्चमढी बाहेर पडायला नऊ वाजले. दहा वाजता पिपरियाला आलो. सुटेबल रेल्वे नसल्याने बसस्टॉप कुठे आहे हे विचारत विचारत चालत बसस्टॉपवर आलो. होशन्गाबाद बस लागलेली होती,जागाही मिळाली,साडेअकरा वाजता बस सुटली सव्वा वाजता होशन्गाबादला पोहोचलो.
बसस्टॉप जवळच हुजुरी लॉज दिसले. सुहास लिमयेकाका इथेच उतरले होते,आम्हीही चेक इन केले. सामान ठेवुन लगेच जेवायला गेलो.
होशन्गाबाद जिल्हा आहे. मोठे शहर आहे. सन्ध्याकाळी येथील मैय्याचा प्रसिद्ध शेठाणी घाट पहायला गेलो. ब्रिटीशान्च्या काळात इथे घाट नव्हता लोकाना फार त्रास होत असे घाट बान्धायचा तर निधी हवा असे कलेक्टर साहेब म्हणाले,मग येथे राहणार्या जानकीदेवी या श्रीमन्त शेठाणिने खर्च दिला आणि ब्रिटीश कलेक्टरने १८८० मध्ये हा प्रशस्त घाट बान्धला ,म्हणून हा शेठाणी घाट यालाच फत्ते घाट असेही म्हणतात.
आज आमचा योग मोठा होता,आम्ही घाटावरील नर्मदा मन्दिरात गेलो तेव्हा तिथे नर्मदापुराणाची समाप्ती होती.दर्शनप्रसादाचा लाभ झाला. आज एकादशीच्या दिवशी हा अम्रुतयोग आमच्या नशिबात होता ही मैय्याचीच क्रुपा. तिथे चालु असलेल्या प्रवचनात महाराजानी सन्गितले की,भगवान शन्कराला आपल्या सर्वान्चे दु:ख हरण करुन सुख देणार्या नर्मदा {नर्मम ददाति इति नर्मदा} या पुत्रीचा इतका अभिमान होता की त्यानी स्वतःच्या नावापुर्वी तिचे नाव लावायला सान्गितले म्हणून नर्मदे हर असे म्हणण्याचा प्रघात आहे. आपल्या सामान्य जीवनातही आधी आपले नाव व नन्तर पित्याचे नाव लावण्यामागेही हेच कारण,भगवन्ताची आज्ञा. उद्या बान्दराभानला जाउन येणार.
सकाळी स्नान पुजा झाली बान्दराभानला जाण्यासाठी रिक्षा बघु लागलो पण १०कि.मि. जाऊन दर्शन करुन परत येण्याचे काहिच्या बाही पैसे मागत होते,शेअर रिक्षात १४ सीट भरणार म्हणे म्हणजे पायाच्या फक्त बोटान्वरच बसावे लागले असते कारण रिक्षा सहा सीटर होत्या शेवटी बेत रद्द केला. मैय्याच्या घाटावर गेलो,तिथे भोजनप्रसादाचा लाभ झाला. सौ. अभ्यन्कर या मराठी बाई भेटल्या. पुन्हा आलात की आमच्याच कडे उतरायचे असा त्यानी आग्रह केला. उद्या हरदा.
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – 45
स्नान पुजा आरती झाल्यावर घाटावर जाऊन मैय्याचे दर्शन घेतले नन्तर नास्ता करुन बसस्टॉपवर आलो. साडेदहाची हरदा बस मिळाली. नेहेमीप्रमाणे टूकू टूकू चालत होती,वाटेत लागणारी गावे बघुन सुहास लिमये काका याच रस्त्याने गेले होते हे समजले.साडेबारा वाजता बस पन्क्चर झाली,एक तास मोडला.दुपारी दोन वाजता हरदा येथे पोहोचलो.
कोर्टाजवळील हॉटेल राघव मध्ये चेक इन केले.दोन दिवस येथेच राहाणार आहोत कारण सोमवारी २३ जानेवारीला स्नानदानादिची सोमवती-मौनी अमावास्या आहे,यावेळी नर्मदास्नानाचा योग आला आहे. अन्नपुर्णा भोजनालयात भोजन. विश्रान्ती.
आज लवकर उठलो नाही. सावकाशीने सर्व आवरले स्नान पुजाआरती झाल्यावर नास्ता करुन रेल्वेस्टेशनवर गेलो,दिल्लीला जाण्यासाठी तिकिट मिळाले नाहीच अर्थात ते अपेक्षितच होते.आता परिक्रमा पुर्ण झाल्यावर तात्काळ सेवाच करावे लागणार असो. खान्ड्व्याला जाण्यासाठीही सुटेबल गाडी नाही त्यामुळे बस शिवाय पर्याय नाही.
सन्ध्याकाळी गोन्दवलेकर महाराजानी बान्धलेले श्रीराम मन्दीर बघायला गेलो.छान मन्दीर आहे. श्री. गोडबोले व्यवस्थापक आहेत.
जितेन्द्रशास्त्रीना ओम्कारेश्वरला फोन केला,ते म्हणाले पन्चवीस तारखेला येऊन गजाननमहाराज भक्तनिवासात उतरा सव्वीस तारखेला सकाळी सन्कल्पपुर्ती करु. वा! छानच झाले,सव्वीस जानेवारी,माघातील शुद्धचतुर्थी मोरयाचा जन्म दिवस मोठ्या पवित्र दिवशी परिक्रमा पुर्ती होणार ही मोरया आणि नर्मदामैय्या यान्चीच क्रूपा.
आज सोमवार २३ जानेवारी. सोमवती-मौनी अमावास्या. लवकर उठून सारे आवरुन बसस्टॉपवर गेलो हन्डियाला जाणार्या बसला खुप गर्दी होती पण आज मेळा असल्याने बस भरपुर होत्या, चौथ्या बसमध्ये जागा मिळाली मला बसायला,हे उभेच राहिले.
हन्डियाला नेमावरला जोडणार्या पुलाखाली नवीन घाट आहे. थन्डी खुप आहे पण मैय्याचे पाणी सुखद उबदार. स्नान केले.रिद्धेश्वराचे दर्शनाला गेलो. हे मन्दिर पुरातन आहे. पान्डवानी बान्धले असे म्हणतात.नेमावरच्या सिद्धनाथमन्दिरापेक्षा लहान आहे.
या बाजुने मैयाचे नाभिकुन्ड जास्त स्पष्ट दिसत होते परिक्रमेत असल्याने अर्थातच तिकडे जाता येणार नव्हते.वसुन्धरा आश्रम पाहिला.काशीवाले बाबा आश्रमातुन शिक्का मारुन घेतला.परिक्रमेतील हा शेवटचा शिक्का. आश्रमातील बाबान्चे पोट दुखत होते,त्याना गोळी दिली आणि काही गोळ्या लिहुन दिल्या. त्याना बरे वाटले.
हन्डियाहुन परत येताना एक अतिशय भयानक दुखःद घटना बघितली.एका हिरोहोन्डा मोटरसायकलवरील दोघाना अज्ञात वाहनाने उडवले होते.एक जण डोके फुटुन जागीच गेलेला होता,दुसर्याच्या दोन्ही पायाना मल्टिपल फ्र्क्चर झाली होती दोघेही अगदी तरुण दिसत होते.गेलेला तरुण कपड्यावरुन मोठ्या घरचा दिसत होता आणि दुसरा बहुदा त्याच्याकडे काम करणारा मजुर असावा. आज सोमवती अमावास्या त्यातच नर्मदाकिनारी मरण आले होते तो आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे कैलासाला गेला,मोक्ष मिळाला. पण मागे राहिलेल्या त्याच्या कुटुम्बियान्चे काय?
आज माघ शुद्धप्रतिपदा. पालीला मोरयाच्या{बल्लाळेश्वर} जन्मोत्सवाला सुरुवात झाली.सर्वच अष्टविनायक स्थानी उत्सव सुरु झाला. सकाळी स्नानपुजा आटपुन बसस्टॉपवर आलो. पाचच मिनिटात खान्डव्याची बस मिळाली.बस चान्गली होती सामान व्यवस्थित ठेवता आले. नेहेमीप्रमाणे बस वेळेवर सुटली आणि गावाबाहेर येउन थाम्बली. सर्व बस भरल्यावरच सुटली.रस्ता चान्गला होता पण तरीही थाम्बत थाम्बत खान्डव्याला पोहोचायला दुपारचा एक वाजला.
खान्डवा येथे रेल्वेस्टेशनसमोर पार्वतीबाई धर्मशाळेत उतरलो्. ही धर्मशाळा १९२१ साली बान्धलेली असुन खुप मोठी आहे.सन्ध्याकाळी किशोरकुमारचे स्मारक पाहिले,छान बगिचा आहे. किशोरकुमारची प्रसिद्ध् गाणी वाजत असतात. पण त्यान्चे घरमात्र जिर्णावस्थेत आहे. दादा धुनीवाले यान्चे समाधीमन्दिर आश्रमही पाहिला.छान आहे,अखन्डरामधुन, अन्नछत्र,व्रुद्धाश्रम आहे.
रेल्वेस्टेशनवर जाऊन तात्कालसेवा तिकिटाची चौकशी केली,उद्या २५ तारखेला सकाळी २७च्या मन्गलाएक्सप्रेसचे तिकीट मिळेल कारण गाडीच्या सुटण्याच्या आदल्या दिवशी तिकीट काढता येते.२७ला खान्डव्याला येणारी मन्गला २५ला रात्री एर्नाकुलमहुन सुटेल म्हणून तिचे तिकीट मिळेल.चला,आमचा प्रॉब्लेम सुटला उद्या तिकीट काढून ओम्कारेश्वरला जाता येईल मैय्या! खरच तुलाच काळ्जी तुझ्या लेकरान्ची. नर्मदे हर!
सकाळी लवकर ति़किटाला नम्बर लाउन उभे राहिलो.आठ वाजता तिकिट मिळाले. सर्व आवरुन बसस्टॉपवर आलो. इन्दुर बस लागली होती बसलो.सनावदला आल्यावर ही बस मोरट्क्क्याला मैय्या क्रॉस करेल म्हणून बदलली आणि अन्जरुद कोठी मार्गे ओम्कारेश्वरला जाणारी बस घेतली. ही बस एकरोटी आश्रमावरुन ओम्कारेश्वरला आली त्यामुळे मैय्या उजव्या हातालाच राहिली.
गजाननमहाराज भक्तनिवासात आसन लावले. लगेच भोजन आणि विश्रान्ती. सन्ध्याकाळी जितेन्द्रशास्त्री यान्चा भाऊ देवेन भेटायला आला. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सन्कल्पपुर्ती पुजा करायची आहे.
सकाळी लवकर नर्मदा स्नान करुन आलो. गजाननमहाराजान्चे दर्शन घेतले. खोलीत आल्यावर कुपितिल नर्मदामैय्याची पुजा आरती केली. आता केलेली पुजा आरती पुन्हा परिक्रमेला येईपर्यन्त्ची अखेरची आरती. आता मैय्याच्या घाटावर जाऊन हे जल थोडे तिच्या जलात,थोडे ममलेश्वरला आणि थोडे ओम्कारेश्वराला वाहायचे की परिक्रमा सुफलसम्पुर्ण होणार.
साडेनऊला गोमुख घाटावर गेलो,जितेन्द्रशास्त्री यान्ची वाट बघत एका उन्च खडकावर बसलो. मैय्याचे रुप सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होते.स्थानिक लोकान्ची रोजचीच लगबग चालू होती.कोणी स्नान करत होते,कोणी कपडे अगदी मनाई असतानाही साबण लावुन धुत होते. काही भक्त पर्यटक नौकाविहाराचा आनन्द लुटत होते. लहान मुले धडाधड मैय्याच्या पात्रात उन्चावरुन उड्या घेत पोहण्याचा आनन्द लुटत होती मैयाच्या वेगवान प्रवाहाची भिती त्यान्च्या मनात सुतरामही नव्हती कारण ती सर्व जन्मापासुनच तिच्या अन्गाखान्द्यावर खेळत बागडत आहेत. ती आई आहे त्यान्ची मग भीती कशी वाटेल.
दोन बस भरुन परिक्रमावासी आले होते परिक्रमा करण्यासाठी आलेले होते,त्या सर्वान्चा सन्कल्प होता होता आमच्याकडे येण्यास जितेन्द्रशास्त्रीना अकरा वाजले. मग पुजा झाली,आरती प्रसाद झाला. जितेन्द्रशास्त्री घरुनच कढईचा हलवा घेउन आले होते. खुप मुली मुले आमच्या भोवती जमली होती,सर्वाना प्रसाद दिला.कन्येला देण्याचा पोषाख जितेन्द्रशास्त्रीच्या मुलीसाठी त्यान्च्याजवळ दिला.त्यान्च्या सौभाग्यवती साठी आणलेल्या परिक्रमा प्रारम्भ आणि पुर्ती दोन्ही वेळच्या साड्या आधीच तिच्याकडे दिलेल्या होत्या. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ही परिक्रमा खुपवेळा वाहनाचा उपयोग करुन पुर्ण करावी लागली म्हणून ही झाली परिभ्रमण परिक्रमा.चातुर्मासानन्तर पुन्हा पायी परिक्रमेला येईन असे नर्मदामैय्याला सान्गितले. नन्तर ममलेश्वराला जल वाहिले. पुलावरुन पलीकडे जाऊन ओम्कारेश्वरालाही जल अर्पण केले.आणि सन्कल्पपुर्ति झाली.
भोजनप्रसाद घेतल्यावर रिक्षाने मोरटक्कामार्गे खेडीघाटला श्रीराममहाराजान्च्या समर्थकुटी आश्रमात आलो.महाराजान्चे दर्शन झाले. त्याना बघितल्यावर सम्पुर्ण पायी परिक्रमा झाली नाही म्हणून मला खुप रडू कोसळले,त्यानी माझी समजुत घातली,आणि पुन्हा निघा चातुर्मासानन्तर परिक्रमेला असे म्हणाले. आशीर्वाद दिला.
तिथे ठेवलेले आमचे काही सामान घेउन पुन्हा एकदा महाराजाना वन्दन करुन निघालो. बडवाहला धर्माधिकारी मावशीना भेटून परत भक्त निवासात आलो. उद्या ओम्कार पर्वताची परिक्रमा आणि माझे परिक्रमेबद्दलचे मनोगत सान्गुन ही लेखमाला पुर्ण करेन.
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा – समारोप
लवकर्च उठलो स्नानपुजा आटपुन ओम्कारेश्वर दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नव्हती, शान्तपणे भगवन्तासमोर उभे राहुन मानसपुजा स्तोत्र म्हणून मानसपुजा केली.भगवान शिवजी माझ्या मोरयाचे पिताजी,नर्मदामैय्याचेही पिताजी त्यान्च्याच कॄपेने परिक्रमा पुर्ण झाली. तब्येत बिघडणे हे आमचे प्राक्तन.पण त्यामुळेच यन्दा पुन्हा पायी परिक्रमा करण्याची उमेद बाळगुन आहे.
ओम्कार पर्वताची परिक्रमा करण्यास निघालो.उत्तम बान्धीव परिक्रमामार्ग आहे.वाटेत पान्डवकालीन छोटे शिवकेदारेश्वर मन्दिरात दर्शन घेउन पुढे नर्मदा-कावेरी सन्गमावर गेलो,पर्वताच्या उजव्या बाजुने कावेरी आणि डाव्या बाजुने नर्मदा सन्थपणे वाहात एकमेकीन्च्या गळ्यातगळा घालुन भेटतात. निळसर रन्गाची नर्मदा आणि हिरव्या रन्गाची झाक असलेली कावेरी ही भगिनीभेट तासन्तास बघत रहावे अशी.पण कितिही वाटले तरी परत फिरणे भागच होते.
ॠणमुक्तेशवरदर्शन करुन पुढे निघालो. या मन्दिरात चण्याची डाळ अर्पण करतात. आता थोडा चढाचा मार्ग आहे. जन्गलही बर्यापैकी आहे.सारा परिसर राजा मान्धाता यान्च्या राजधानीचा आहे. सर्व पडझड झालेला. असे म्हणतात की फार पुर्वी भुकम्प झाला होता. जागोजाग उत्खननात मिळालेल्या भग्न मुर्ती ठेवलेल्या आहेत. आदिवासी,काही साधुसन्त याच्या चन्द्रमौळी झोपड्या,काही चहा नास्ता मिळणार्या टपर्या आणि मार्गाच्या दोन्ही बाजुना भग्वतगीता लिहिलेले स्तम्भ सारे पहात गौरीशन्कर मन्दिरात आलो. समोर मोठा सुन्दर नन्दी मन्डप आहे. नन्दी खुप सुन्दर आहे.गळ्यातल्या माळा,घन्टा उत्कॄष्ट शिल्प. गौरीशन्कर मन्दीरही पुराणकालिन आहे. सुन्दर कोरीव काम आहे. पिन्डी प्रचन्ड आकाराची आहे. पुर्वी पिन्डीला मिठी मारुन आपले दोन्ही हात जर एकमेकाना मिळाले तर आपल्यला मोक्ष मिळेल असे म्हणत,पण आता पिन्डीभोवती कठडा उभारला आहे व मिठी मारण्यास परवानगी नाही. या पिन्डीत निरखुन बघितले तर ओम आणि शिवमुख दिसते.
दर्शन घेतले.बाजुला असलेल्या झोपलेल्या अवस्थेतील लम्बे हनुमान यान्चेही दर्शन घेतले.
पुढे राजराजेश्वरीदेवीचे दर्शन घेउन गायत्रीपीठ सन्स्कॄतपाठशाला पाहिली,येथेच जितेन्द्रशास्त्रीनी वेदपाठाचे शिक्षण घेतले आहे.त्यान्चे वडील सुधाकरशास्त्री काशीविद्यापिठात शिकलेले होते.जितेन्द्रशास्त्री{बालाशास्त्री} यान्च्या घराण्याकडे ओम्कारेश्वराचा माध्यान्ह नैवेद्याचा मान आहे.आमचे हेच सन्कल्पदाते आहेत. बहुतान्शी महाराष्ट्रीय भक्त त्यान्च्याकडेच जातात कारण ते मुळचे महाराष्ट्रीयन आहेत.
पुढे चान्द-सुरज द्वार,दक्षीणद्वार मार्गे सिद्धेश्वर मन्दिरात आलो. हे पुराणकालीन मन्दीरही भग्नावस्थेत आहे पण सभामन्डप आणि गाभारा चान्गला आहे. हे स्वयम्भू शिवलिन्ग आहे.मन्दिराच्या प्रान्गणातुन ओम्कारेश्वर धरण दिसते.
मन्दिराच्या प्रान्गणात झाडाखाली बसलो,नऊच वाजले होते आज शास्त्रीजीन्च्याकडे प्रसादभोजनासाठी जायचे आहे आणि साडेबारा वाजता नैवेद्य मन्दिरात जातो त्यानन्तरच आपले भोजन असते.
आसमन्त पहातापहाता विचारचक्र फिरू लागले.आम्ही परिक्रमा का करायची ठरवली? फार भाविक आहोत? नाही. उपासतापास,व्रतवैकल्ये यान्चा अतिरेक करत नाही. मोरयाची आठवण करुन हात जोडून नमस्कार करावा आणि कामाला लागावे एवढेच.मग?
आम्हाला भटकन्तीची आवड आहे,निसर्गदर्शन करणे आमची एक जीवनावश्क बाब आहे. सुन्दरसा जलप्रपात बघताना शिवजटेत अडकल्यामुळे अभिमानाचा चकनाचुर झालेली जनहिताच्या आवेगाने बेचैन होऊन मिळेल त्या मार्गाने बाहेर उडी घेणारी गन्गामैय्याच दिसते.डेरेदार वॄक्ष दिसला की स्वतः उन्हात होरपळूनही आपल्या मुलाबाळाना सुखाची सावली देण्यासाठी धडपडणारे मातापिता दिसतात तर एखादा निष्पर्ण वॄक्ष देव-मानव पॄथ्वी यान्च्या रक्षणासाठी इन्द्राला वज्र बनविण्यासाठी स्वखुशीने आपल्या अस्थी देणारे महर्षी दधिची यान्ची आठवण करुन देतो.पण परिक्रमा करण्याचा फक्त एवढाच उद्देश होता? नाही.मग? फार वर्षापुर्वी ९०/९२ साली मला माधवराव लिमयेकाका { माजी आमदार.नाशिकच्या प्रसिद्ध सर्जन डॉक्टर सौ. शोभाताई नेर्लीकर यान्चे वडील, प्रसिद्ध आर्थोपेडीक सर्जन डॉ. विनायक नेर्लीकर यान्चे सासरे} यानी एक पुस्तक दिले होते माझी वाचनाची आवड पाहुन. पुस्तक होते,सटाणा येथील निवॄत्त शिक्षक श्री. एन.व्ही. आहिरे{वियोगी नारायण} यानी लिहिलेले नर्मदे हर नर्मदा परिक्रमा.एका बैठकीत वाचुन काढले ,नन्तर पुन्हा पुन्हा वाचतच राहिले,आजतागायत वाचतेच आहे. नर्मदामैय्या,तिची लेकरे, तो मध्यप्रदेश,गुजराथ तिचे उगमस्थान सन्गमस्थान,तिच्या किनार्यावरील निसर्गसम्पत्ती सर्व सर्व माझ्या जीवनाचा एक भागच होऊन गेला. नर्मदा परिक्रमा हा एकच ध्यास रोज आन्घोळ करताना गन्गेच यमुने चैव म्हणताना माते नर्मदे परिक्रमा करायची आहे,लवकर योग आण अशी प्रार्थना करत असे. मुलान्ची शिक्षणे मग लग्न मग नातवन्डे लहान करता करता पन्नाशी उलटली. नोकरी व्यवसाय खाजगी जास्त रजा मिळणार नाही निवॄत्त झाल्याशिवाय काही परिक्रमेला जाता येणार नाही अशी मनाची समजुत घालत असे.माझ्याकडे असलेल्या पुस्तका शिवाय भारती ठाकुर,जगन्नाथ कुन्टे यान्ची पुस्तके घेतली,वाचली.परिक्रमा करायची हे नक्की पण कधी? आणि मोरयाने तो योग आणला. माझ्या हॉस्पिटलचे नुतनीकरण सुरु झाले माझी बदली पुण्याला झाली नन्तर मुम्बईला झाली मला तिकडे रहाणे शक्य नव्हते म्हणून मी विनावेतन रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.आता माझ्याकडे समयच समय होता परान्जपेतर सेवानिवॄत्तच आहेत. निर्णय झाला ११/११/११ चा दुर्मिळ योग साधायचा.
पुस्तकाची पारायणे केल्याने काय आणि कसे करायचे हे माहित होतेच.दरवर्षी अमरनाथ यात्रा,बद्रिकेदार यात्रा एकदा केलेली ओम्पर्वत आदिकैलास यात्रा यामुळे ट्रेकिन्गचा अनुभव होताच.पुण्याचे डॉ. फडनीस आणि कोल्हापुरचे डॉ. गुन्डे हे आमचे तन आणि मन याचे फिटनेस गुरु आहेत.त्यामुळे डायबेटिस असला तरी त्यान्ची शिकवण रोज अमलात आणून रोजचा व्यायाम,योग-प्राणायाम,मेडिटेशन असतेच .रोज सात-आठ कि.मि. चालणे,पान्डवलेणे चढणे आहेच.फक्त पाठीवर ओझे घेउन चालण्याचा सराव करायला हवा.
चार पान्ढरे ड्रेस,स्वेटर ग्लोव्हज सॉक्स वगैरे सर्व चार. दोन बेडशीट शाल वजनाला हलके ब्लान्केट आणि अन्थरुणासाठी हिटलॉन शीट हवेची उशी डोक्याला उन्हाची टोपी आणि रुमाल पायात स्पोर्टशुज आणि फ्लोटर.ब्याटरी,चाकू सुईदोरा कात्री ड्रेसिन्गचे सामान{चिकटपट्टी मलम स्पिरिट डेटॉल वगैरे} काही किरकोळ आजारावरच्या गोळ्या व्हीक्स आयोडेक्स वगैरे पाण्यासाठी बाटली जेवण्यासाठी ताटली चमचा पेला पुजेसाठी निरान्जन उदबत्ती कापुर खडीसाखर नर्मदाजलासाथी दोन छोट्या बाटल्या एका बाटलितिल जलाची पुजा करायची आणि दुसर्याबाटलीतिल जल जेव्हा आपण मैय्याकिनार्यापासुन दुर असु तेव्हा स्नानाच्या पाण्यात काही थेम्ब टाकण्यासाठी.काही खाण्याचे पदार्थ .अशी तयारी केली प्रत्येकाची पाठपिशवी वेगळी केली हिटलॉनबेडमध्ये बेडशिट शाल ब्लान्केट घालुन त्याची वळकटी करुन दोरीने बान्धुन खान्द्याला अडकवायची पाठपिशवी पाठीवर एक शबनम बिस्किटे,पाण्याची बाटली मार्गदर्शक पुस्तक शिक्क्याची वही हे भरुन गळ्यात .असे सारे घेउन रोज चालण्याचा सराव केला.
श्रावणात ओम्कारेश्वरला जाऊन जितेन्द्रशास्त्रीना परिक्रमेबद्दल सान्गितले. एक नोव्हेम्बरला ब्लड चेक करुन घाडगेसराना दाखवुन फिटनेस घेतला. आमदार वसन्त गिते यान्च्याकडुन ओळखपत्र घेतले.माहेरी जाऊन मोठ्या भाऊ-वहिनी,मोठी बहिण यान्चे आशीर्वाद घेतले. ह्यान्चे मोठे भाऊ बहिण नाशिकलाच आहेत त्यान्चे आशीर्वाद घेतले.
११/११/११ ला सकाळी ११वाजुन ११ मिनिटानी ओम्कारेश्वर नगरपालिकेतुन सर्टीफिकेट घेउन परिक्रमा सुरु केली.आज २७ जानेवारी २०१२ परिक्रमा पुर्ण करुन येथे बसलो आहोत.
परिक्रमेने आम्हाला काय दिले?खुपसारे प्रेम.स्वतः अत्यन्त प्रतिकुल परिस्थितीत जगत असतानाही अतिशय ममतेने मोठ्या आदराने जेऊ-खाऊ घालणार्या आसरा देणार्या अन्नपुर्णा.लाखोवर्षान्ची परम्परा असलेली नर्मदा खोर्यातील सन्स्कॄती,विविधतेने नटलेली जैविक निसर्गसम्पदा,रोज आपुलकीने भेटणारे अनेक बान्धव, मैय्याचा किनारा पवित्र करणारे साधुसन्त,मैय्याच्या प्रेमात भक्तिभावात आकन्ठ बुडालेले एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ असे म्हणणारे परिक्रमावासी,रेवा तटावरील असन्ख्य तीर्थस्थाने,घाट,आणि कुठे छोटूकली तर कुठे विशाल,कुठे सन्थ तर कुठे खळाळत वाहणारी कधी उन्च पर्वतावरुन बेधडक उडी घेणारी तर कुठे असन्ख्य धारानी धावणारी सुन्दर नर्मदामैय्या . एवढे सगळे मिळाले परिक्रमेने.
कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता कसे जगावे हे शिकलो आम्ही. लखन्गिरीबाबा,दगदू महाराज,दादाधुनिवाले,गौरीशन्करमहाराज, सियारामबाबा श्रीराममहाराज या सारख्या सन्त महात्म्यान्चे महान सेवा कार्य बघुन धन्य झालो.
आधिक काय लिहू? फक्त नर्मदे हर!
वंदना परांजपे...